Concussion Substitute Controversy: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 15 धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 गडी गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 19.4 षटकांत 166 धावांवर आटोपला. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक 3 बळी घेणाऱ्या हर्षित राणाने, जो कन्कशन पर्याय म्हणून आला होता, तो बाद झाला. त्याने मधल्या षटकांमध्ये आपल्या शानदार गोलंदाजीने सामना बदलून टाकला. पण आता त्याला कन्कशन सबस्टिट्यूट बनवल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत जेव्हा इंग्लंडच्या कर्णधाराला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा बटलरने ही लाईक टू लाईक रिप्लेसमेंट नव्हती. असं उत्तर दिले. आम्ही याच्याशी सहमत नाही. असं देखील बटलर म्हणाला.
पुढे बोलताना तो म्हणाला की, शिवम दुबेचा चेंडूचा वेग ताशी 25 मैलांनी वाढला आहे किंवा हर्षित राणाने त्याची फलंदाजी खूप सुधारली आहे. शेवटी बटलर म्हणाला, हे सगळं सामन्याचाच एक भाग आहे. शेवटी आपण सामना जिंकायला हवा होता, जे होऊ शकले नाही.
भारताकडून शिवम दुबेने 34 चेंडूत 53 धावांची महत्त्वाची खेळी केली आणि संघाला 181 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजी करताना, 20 व्या षटकातील पाचवा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. कन्कशन टेस्ट न घेता, तो सामन्याचा शेवटचा चेंडू खेळला आणि धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तो मैदानावर आलाच नाही. त्याच्या जागी राणाने क्षेत्ररक्षण केले आणि नंतर गोलंदाजी करून सामना बदलला. त्याने 4 षटकांत 33 धावा देत 3 बळी घेतले. राणाने लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि जेमी ओव्हरटन यांच्या विकेट घेत भारतीय संघाला सामन्यात परत आणले.
आंतरराष्ट्रीय टी20 इतिहासात हर्षित राणा हा कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून पदार्पण करणारा पहिला खेळाडू ठरला. सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर राणा म्हणाला की, इंग्लंडच्या डावाच्या दुसऱ्या षटकात गौतम गंभीरने त्याला सांगितले होते की तो कन्कशन पर्याय म्हणून मैदानात उतरणार आहे. तथापि, 11 व्या षटकानंतर याची अधिकृत पुष्टी झाली आणि हर्षित गोलंदाजी करायला आला आणि दुसऱ्याच चेंडूवर लिव्हिंगस्टोनला बाद केले. यानंतर, सामन्यादरम्यान या मुद्द्यावर सतत चर्चा होत राहिली.