DNA मराठी

राजकीय

BJP News: मोठी बातमी! अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक पदी भानुदास बेरड यांची नियुक्ती

BJP News :  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुक होणार आहे. यासाठी आत्तापासूनच भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. यानुसार भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री व आ.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी महा विजय 2024 अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक म्हणून प्रदेश कार्यकारणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड यांची निवड केली आहे.  मागच्या 35 वर्षापासून भानुदास बेरड हे भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ निष्ठावंत म्हणून काम करीत आहेत.

BJP News: मोठी बातमी! अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक पदी भानुदास बेरड यांची नियुक्ती Read More »

Anna Hazare : आता मुख्यमंत्र्यांची पण चौकशी होणार!! जाणून घ्या नवीन कायद्याबद्दल सर्वकाही……

Anna Hazare: भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा समावेश करत विधान परिषदेने महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाला अखेर वर्षभरानंतर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेतेमंडळींची चौकशी करणे शक्य होणार असून मुख्यमंत्री, मंत्री व आमदारही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी केले आहे. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच लोकायुक्त हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. तब्बल वर्षभरानंतर हे विधायक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देखील आता या कायद्याच्या चौकटीमधून सुटणार नाही लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लढा दिला. या दरम्यानच्या काळात अनेक मोठी आंदोलने देखील अण्णांनी केली. विधानसभेत मंजूर झालेला हा कायदा आता विधानपरिषदेत देखील मंजूर झाला.  तसेच पुढे बोलताना अण्णा म्हणाले, आम्ही केलेल्या मागणीनुसार लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार झाला होता. हा मसुदा विधानसभेत मंजूर करण्यात आला होता. विधान परिषदेत हे विधेयक आल्यानंतर यात सदस्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची चौकशी या माध्यमातून करता येणार आहे. मुख्यमंत्री देखील आता या कायद्याच्या चौकटीमधून सुटणार नाही. या कायद्याच्या आधारे आता मुख्यमंत्र्यांवर देखील कारवाई करणे शक्य होणार आहे असे यावेळी बोलताना अण्णा हजारे म्हणाले.

Anna Hazare : आता मुख्यमंत्र्यांची पण चौकशी होणार!! जाणून घ्या नवीन कायद्याबद्दल सर्वकाही…… Read More »

Sujay Vikhe Patil : आम्ही सदैव मराठा बांधवांच्या पाठीमागे! मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच तोडगा काढणार: डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil :  खासदार डॉ. सुजय विखे पाटील आज शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे साखर वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाज, बोधेगाव यांनी त्यांची भेट घेऊन सकल मराठा समाज बाधवांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी निवेदन दिले. खासदार विखेंनी त्यांचे निवेदन स्वीकारून सकारात्मक संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात यापूर्वीही नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून मराठा बांधवांच्या पाठीमागे आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत. पालकमंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व खासदार म्हणून मी यापूर्वीही मराठा समाजाची भूमिका स्पष्ट मांडली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल असे मत त्यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून आजवर कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिलेला नाही व इथून पुढेही निरनिराळ्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे मत मांडून आपण माझ्यावर जो विश्वास दाखवून मतदान केलं, या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही.  विशेष म्हणजे याची प्रचिती आपल्याला विविध विकासकामांच्या माध्यमातून वेळोवेळी आलीच आहे असे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले. आज बोधेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या साखर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.  खासदार विखे पुढे म्हणाले, बोधेगाव गावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. यापुढे देखील भरीव निधी उपलब्ध करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट केले. दरम्यान २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटपाचे नियोजन चालू आहे असे सांगून २२ जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत असे मत मांडले.  सर्व लाभधारकांनी या साखरेतून दोन लाडू बनवावे आणि श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावेत असे देखील आवाहन खासदार सुजय विखे यांनी उपस्थितांना केले. यावेळी ताराभाऊ लोंढे, बापूसो पाटेकर, नितीन भाऊ काकडे, रजाक शेख, बाबा सावळेकर, बाळासो कोळगे, महादेव घोरतळे, मयूर हुंडेकरी, बाळासाहेब कोळगे, संजय खेडकर, भगवान मिसाळ, बाळासाहेब डोंगरे, रामकाका केसभर, अमोल सागडे आदी मान्यवरांसह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sujay Vikhe Patil : आम्ही सदैव मराठा बांधवांच्या पाठीमागे! मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच तोडगा काढणार: डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Madhi Devasthan : मढी देवस्थानच्या अध्यक्ष निवडीवरुन जबरदस्त राडा; वाचा सविस्तर

Madhi Devasthan : आज श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून जबरदस्त राडा झाला.   समोर आलेल्या माहितीनुसार अध्यक्ष बदलासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये हाणामारी झाली.  या घटनेमध्ये अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून दोन गटात मागील काही दिवसांपासून धूसफूस सुरू होती. यामुळे आज गुरुवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान देवस्थानच्या सभागृहामध्ये विश्वस्तांच्या बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता. अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असतानाच तेथे दोन गटात राडा झाला. विश्वस्तांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली असताना काही स्थानिक युवक पडले. अखेर या शाब्दिक चकमकीचे रुपांतर लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाले.  दोन गटात सुरू झालेल्या हाणामारीने उपस्थितांमध्ये चांगलीच धांदल उडाली. दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्याने काहीजण जखमी झाले. या सर्व जखमींना उपचारासाठी पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी पाथर्डी ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती.  जखमींवर उपचार सुरू असून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Madhi Devasthan : मढी देवस्थानच्या अध्यक्ष निवडीवरुन जबरदस्त राडा; वाचा सविस्तर Read More »

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण

Nilesh Lanke : – अहमदनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप विधानसभेत आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.  यामुळे जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आला आहे. या प्रकरणात कारवाईची मागणी देखील त्यांनी विधानसभेमध्ये केली आहे.   विधानसभेत लंके म्हणाले, ठेकेदारास काम देण्यासाठी गैरमार्गाचा अनेकदा अवलंब करण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे जोडणे, ठेका मिळाल्यानंतर काम पुर्ण नसणे, कॅपॅसिटीपेक्षा कोटींची जास्त कामे देण्यात आली.  एका ठेकेदारास सुरूवातील अपात्र ठरविणे व त्याच ठेेकेदाराला लगेच दोन दिवसांत पात्र ठरविण्यात आले आहे. टेेंडर रद्द करून पुन्हा करणे, टेेंडर नोटीसमधील अटी बदलणे अशा गैरमार्गाचा अवलंब केल्याच्या तक्रारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे करूनही काहीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी नमुद केले.   जल जीवन कार्यक्रमांतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील मौजे जामगांवसह सहा गावांची पाणी पुरवठा योजनेचे काम घेताना ठेकेदारांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. ठेकेदाराकडे कोणतीही कागदपत्रे नसताना काम देण्यात आले आहे. या ठेकेदाराने काम पुर्ण झाल्याचे दाखलेही खोटे सादर केले असून त्यावर संबंधित विभागाच्या जावक क्रमांकाचा उल्लेख नाही तसेच सही देखील बनावट आहे. शासन निर्णयाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी सांगितले.   ठेका घेतलेली सर्व कामे 25 ते 30 टक्के पुर्ण आहेत. टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती, संस्था यांच्याविषयी नगर जिल्हयातील लोकप्रतिनिधीनींनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पुराव्यासह वारंवार तक्रारी करण्यात येऊनही चौकशी करण्यात येत नाही.  ठेकेदारासबंधी माहीती मागविल्यानंतर माहीती देण्यात येत नाही. बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदाराने कामे मिळविली आहेत. या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी आ. लंके यांनी यावेळी बोलताना केली.

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण Read More »

Bachchu Kadu : ..अन्यथा प्रहार कार्यालयात घुसून मुक्काम आंदोलनं करणारं!! ‘त्या’ प्रकरणात प्रहार आक्रमक

Bachchu Kadu: आ.बच्चू कडू आपल्या आक्रमक आंदोलने आणि रोखठोक भूमिकेमुळे संपूर्ण राज्यात चर्चेत राहतात. राज्यात त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहे.  आता नगरमध्येही प्रहारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायती, आणि महानगरपालिका मधील  दिव्यांगांसाठी असलेला राखीव निधि आठ दिवसात वितरित करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुक्काम व ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ.बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.  जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांनी अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात, केंद्र शासनाने दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपंग व्यक्ती समान संधी हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम लागू केला आहे.  दिव्यांगांना समाजात सहजतेने जगता यावे यासाठी शासनाने विविध योजना लागू केल्या आहेत तथापि ग्रामपंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायती, महानगरपालिका तसेच संजय गांधी निराधार योजना आदी विभाग आजही दिव्यांगंच्या बाबत उदासीन आहेत. यामुळे दिव्यांगांच्या योजना व त्यासाठी असलेल्या राखीव निधी वाटपाबाबत दिरंगाई होऊन प्रशासनाकडून शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली जात होती. त्यामुळे अनेक दिव्यांगांना त्यापासून वंचित राहावे लागत होते.  ही बाब शासनाचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने कठोर पावले उचलून दिव्यांग अधिनियम 2016 नव्याने पारित केला आहे. ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना त्यांच्या अर्थसंकल्पाच्या तीन टक्के निधी दिव्यांगांचे कल्याण व पुनर्वसनासाठी राखीव ठेवून दिव्यांगाना वाटपाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांची माहिती विहित नमुन्यात अद्यावत भरून ठेवण्याच्या शासनाने सूचना दिलेल्या आहेत. तसेच पंचायत राज संस्थांनी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवून तो वाटपाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.  तसेच सदरील निधी हा दिव्यांगाना रोख स्वरूपात देण्यात यावा वस्तू स्वरूपात दिल्यास त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरोवर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून दिव्यांगांना गरज नसलेली वस्तू वारंवार वाटप होताना आढळून आलेले आहे. त्यामुळे या निधीचा अपव्यय होत आहे.तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांनी दिव्यांगांसाठी असलेला राखीव निधी आठ दिवसात वितरित करावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व कार्यालयांचा ताबा घेवुन दिव्यांगांसह मुक्काम व ठिय्या आंदोलन उभारण्यात येईल इशारा प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत  पोटे यांनी दिला आहे.

Bachchu Kadu : ..अन्यथा प्रहार कार्यालयात घुसून मुक्काम आंदोलनं करणारं!! ‘त्या’ प्रकरणात प्रहार आक्रमक Read More »

Satyajit Tambe :  सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत टाकले… ‘त्या’ प्रकरणात तांबेंचा सरकारवर निशाणा

Satyajit Tambe : केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कांद्यामुळे तापमान वाढला आहे.  केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीवर बंदी लावली आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकरी आंदोलन करत आहे यातच आता आमदार सत्यजीत तांबे या प्रकरणात केंद्र सरकारवर निशाणा साधत कांद्याच्या निर्यातीवरील बंदीवर तातडीने फेर विचार करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावी, अशी मागणी सभागृहात केली. आमदार सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनात शेतकरी प्रश्न, महावितरण व महापारेषणमधील कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नांकडे  सरकारचे लक्ष वेधले. तसेच कांदा निर्यात बंदीवर राज्य शासनाने केंद्र सरकारकडे फेर विचार करण्याची मागणी करावी असे मुद्दे आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडले.  वीज कंपन्यांमध्ये रिक्त जागांवर कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाते. तसेच आजच्या घडीला 42 हजार कंत्राटी वीज कामगार कार्यरत असून कंत्राटी वीज कामगार विजेची कामे करत असतात. कामगारांना कोणतीही सुरक्षा साधनांचा पुरवठा कंपनीमार्फत केला जात नाही. मागील तीन वर्षांत विजेचा धक्का (शॉक) लागल्यामुळे 80 वीज कामगारांना जीव गमवावा लागला, अशी खंत आ. तांबे यांनी सभागृहात बोलून दाखवली.  या कामगारांना वीजेपासून संरक्षण करणाऱ्या साहित्याचा वाटप होते का? याकडे सरकारने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असा कंत्राटी वीज कामगारांचा सुरक्षेसंदर्भातील गंभीर मुद्दा अधिवेशनात आमदार तांबे यांनी मांडला.  मुलभूत सुविधांपासून वीज कामगार वंचित लाईनमन व अन्य कामगारांना सुरक्षेच्या साधनाशिवाय खांबांवर चढणे, बिघाड दुरुस्त करणे, अशी जोखमीची कामे करावी लागतात. सुरक्षा संदर्भातील साधने पुरविणे हे कंपनीचे काम असते. मात्र, कंपनी याकडे दुर्लक्ष करते. तसेच कामगारांना वेळेवर पगार दिला जात नसून, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी व विमा काढला जात नाही. अशा मुलभूत गरजांपासून कामगारांना वंचित राहावं लागत आहे असं आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.

Satyajit Tambe :  सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत टाकले… ‘त्या’ प्रकरणात तांबेंचा सरकारवर निशाणा Read More »

Raj Thackeray : मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, आठ दिवसांचा वेळ नाहीतर रस्त्यावर…

Raj Thackeray :  दुकान व आस्थापणांना मराठी भाषेतील पाटी लावण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयाने मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी अद्यापही परिस्थिती जैसे थी आहे, यामुळे आता मनसेने आक्रमक पाऊल उचलले आहे. न्यायालयाचा आदेश पाळून आपण तात्काळ आठ दिवसांच्या आत आपल्या आस्थापनेचे नाव मराठी भाषेत करून घ्यावे. अन्यथा मनसेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन हातात घेतले जाईल. असे पत्र अहमदनगर शहरातील बाजारपेठेतील इंग्रजी भाषेत पाट्या असलेल्या व्यावसायिकांना दिले आहे. आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा रस्त्यावर….मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीत पाट्या हव्यात असे सांगून महाराष्ट्रात मराठी पाट्यांसाठी रान उठविले होते. त्यानंतर महाराष्ट्रातही अनेकांनी आपल्या आस्थापनांच्या पाट्या मराठीत केल्या होत्या. त्यानंतर मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी होऊन महाराष्ट्रात व्यवसाय करत असलेल्या प्रत्येक आस्थापनांची नामफलक हे मराठी देवनागरी लिपी मध्ये असावं हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. परंतु आदेशानंतरही बऱ्याच दुकानदारांकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेकडून मराठी पाट्यांसाठी व्यावसायिकांना पत्राची मोहीम हाती घेतली आहे. मराठी नामफलकावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश काढला आहे. आता हा विषय राजकीय राहीलेला नाही आता न्यायालयाचा आदेश पाळून आपण तात्काळ ८ दिवसांच्या आत आपल्या आस्थापनेचे नाव मराठी भाषेत करून घ्यावे. अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन हातात घेतले जाईल. असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अहमदनगर शहरातील बाजारपेठेतील इंग्रजी भाषेत पाट्या असलेल्या व्यावसायिकांना दिले आहे. व्यावसायिकांनी ८ दिवसांत इतर भाषेतील पाट्या बदलून मराठी भाषेत लावाव्यात अन्यथा आठ दिवसांनंतर मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल. असा इशारा मनविसेने दिला आहे.

Raj Thackeray : मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, आठ दिवसांचा वेळ नाहीतर रस्त्यावर… Read More »

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक

Ahmednagar News – ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होत. सध्या ते राज्यभर दौरे करत असून जनतेची भेट घेत आहे. दरम्यान ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतल्याने आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव येथे सकल मराठा समाजाने एका कुत्र्याला छगन भुजबळांचे नाव देत बिस्कीट खाऊ घालत आंदोलन केलं. सध्या राज्यात ओबीसी व मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याच मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे व छगन भुजबळ हे एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. यामुळे राजकारण तापू लागले आहे. दरम्यान नेत्यांची भाषा खालावू लागल्याने आता मराठा समाज देखील आक्रमक होऊ लागला आहे. नुकतेच भुजबळ यांनी टीका करताना मेंदूने दिव्यांग, टाकीवर चढलेले गाढव एवढ्या वर कोणी नेले असे म्हणत जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली. यांच्या निषेधार्थ कोपरगाव सकल मराठा समाज आक्रमक झाला असून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी आंदोलन स्थळी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी चक्क एका कुत्र्याला प्रतिकात्मक छगन भुजबळ याचे नाव देत त्याला बिस्किट खाऊ घालत भुजबळ यांची कान उघडणी करण्यात आली आहे. त्यांना या कुत्र्यप्रमाणे इमानदार राहण्याचा व शांत राहण्याचा सल्ला मराठा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सदर अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक Read More »

Sharad Pawar On Onion Farmer Protest : राज्यात पुन्हा कांद्यावरून संघर्ष; शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग केला बंद; शरद पवार म्हणाले … 

Sharad Pawar On Onion Farmer Protest : मोदी सरकारने काही दिवसापूर्वी मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान तापले आहे. आज कांदा निर्यात पुन्हा सुरू करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील सहभागी झाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला करत कांदा निर्यातीवरील बंदी लवकरात लवकर उठवण्याची मागणी केली तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमवारी दुपारी पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह नाशिकच्या चांदवड शहरातील कांदा उत्पादकांच्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी हजारो स्थानिक शेतकरी उपस्थित होते. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला आहे. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे कांदा निर्यातीवर घातलेली बंदी तात्काळ हटवण्याची मागणी केली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड गावात केंद्राच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणाऱ्या कांदा उत्पादकांना संबोधित करताना पवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी संघटित होऊन त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची गरज आहे. ते म्हणाले, नाशिक सर्व शेतकऱ्यांना या दिशेने मार्ग दाखवू शकते. पवार म्हणाले, कांदा उत्पादक हे छोटे शेतकरी आहेत जे चांगले पीक घेण्यासाठी कष्ट करतात. ते म्हणाले की, ते केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी कधीही कांद्याचे भाव कमी केले नाहीत किंवा त्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी घातली नाही. कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवावी, असे ते म्हणाले. केंद्र सरकार कांदा खरेदी करेल- फडणवीसदरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधान परिषदेत सांगितले की, ज्या शेतकऱ्यांचा कांदा विकला गेला नाही किंवा ज्यांच्या बोली मिळालेल्या नाहीत, त्यांच्याकडून केंद्र कांदा खरेदी करण्यास तयार आहे. सोमवारी त्यांनी सांगितले की, कांदा निर्यातबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्ग शोधले जात आहेत. याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. केंद्र सरकारने अलीकडेच पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढवून भाव नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. याविरोधात राज्याच्या काही भागात शेतकरी आंदोलन करत आहेत.

Sharad Pawar On Onion Farmer Protest : राज्यात पुन्हा कांद्यावरून संघर्ष; शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग केला बंद; शरद पवार म्हणाले …  Read More »