DNA मराठी

राजकीय

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट

Ahmednagar News: खा.सुजय विखे पाटील यांनी आज राळेगणसिद्धी इथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा.सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ, शिरा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जात आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी सारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.  त्या अनुषंगाने आपण नगर दक्षिणेचे खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर-डाळ शिरा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खा.विखे यांनी अण्णांना दिली.  किट मध्ये साखर, डाळ, चालू वर्षाचे कॅलेंडर आदी गोष्टी आहेत. अण्णांना सदर किट यावेळी प्रदान करण्यात आले. आण्णा मी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा यासाठी साखर-डाळ शिरा भेट देत आहे, आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे असे खा. सुजय विखे यांनी सांगितले. अण्णांनीही यावेळी खा.विखे यांच्या हस्ते दिलेली साखर भेट हसत स्वीकारली. तसेच किटमध्ये काय-काय वस्तू आहेत त्याची उत्सुकतेने पाहणी केली. या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे परिवाराला  समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केली असल्याचे अण्णांनी यावेळी नमूद केले.  तसेच खा.सुजय विखे यांनी सुरू केलेल्या साखर-डाळ शिदा वाटप उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी  काशिनाथ दाते सर, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, गणेश शेळके, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट Read More »

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील

Ahmednagar News:  22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या गावामध्ये वेगवेगळे उपक्रम व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा व राम नामाचा जयघोष करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांनी नियोजन करावे असे आवाहन रणरागिणी मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांनी केले. त्या घारगाव ता. श्रीगोंदा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन आणि साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत प्रतापसिंह पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घारगाव येथील मारुती मंदिर परिसराची स्वच्छता देखील करण्यात आली. यावेळी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह विक्रमसिंह पाचपुते व ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला होता.  22 जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील मंदिराची स्वच्छता तसेच सुशोभीकरण करून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने सर्वांनी ठिकठिकाणी मंदिरांची स्वच्छता केली जात आहे.  आपणही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध उपक्रम राबवावे असे त्यांनी जनतेला संबोधताना स्पष्ट केले. तसेच आज श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याबद्दल त्यांनी नागरिकांचे मनस्वी आभार मानले व असेच प्रेम आमच्या विखे पाटील परिवारावर कायमस्वरूपी असू देत असे मत व्यक्त केले.

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील Read More »

Ahmednagar News: जामखेड तालुक्यात विकास कामांचा शुभारंभ! खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,विखे पाटील परिवार…

Ahmednagar News:  जामखेड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले, विखे पाटील परिवार कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता नेहमी समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आत्तापर्यंत खूप उपक्रम या अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील परिवाराने राबवले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, महिलांसाठी शनिशिंगणापूर शिर्डी तसेच पंढरपूर तुळजापूर अशा भक्तीपिठांची यात्रा आयोजित करून महिलांना दर्शन घडवून आणले. यासोबतच 22 जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकाने दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करावी या हेतूने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण नगर दक्षिणमध्ये साखर वाटप देखील करत आहोत असे सांगून या उपक्रमाचा हेतू म्हणजे सदरील सोहळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात पुन्हा दिवाळी साजरी केली जाईल असेही डॉ. सुजय विखेंनी स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी सांगितले की, जामखेड तालुक्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू न देता प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले आहे. याचेच फलित म्हणजे विकास कामांचा ओघ हा वाढतच आहे. आज प्रत्येक गावामध्ये जात असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा निधी देऊन त्या गावातील विकास कामांना प्राधान्य दिले जात आहे आणि ही वाटचाल यापुढेही सुरूच राहील असेही त्यांनी संगितले.  विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेपूर निधी हा जनसामान्यांना उपलब्ध होत असतो. त्यामुळे सदरील विकासकामे वेगाने मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. दरम्यान आज खासदार सुजय विखेंनी जवळा, खर्डा, शिवूर, मोहा, जामखेड शहरांमध्ये आज चार किलो साखर व चणाडाळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Ahmednagar News: जामखेड तालुक्यात विकास कामांचा शुभारंभ! खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,विखे पाटील परिवार… Read More »

Petrol- Diesel Price : डिझेल आणि पेट्रोल 10 रुपयांनी होणार स्वस्त? ‘या’ दिवशी होणार घोषणा

Petrol- Diesel Price : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत   सर्वसामान्य जनतेला लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार डिझेल आणि पेट्रोलच्या दरात लवकरच मोठी कपात होऊ शकते. रिपोर्टनुसार, डिझेल आणि पेट्रोलच्या किमती एकाच वेळी 10 रुपयांनी कमी होऊ शकतात. डिझेल आणि पेट्रोलच्या किमती एवढ्याने कमी झाल्या तर अनेक वस्तूंच्या किमती कमी होतील कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचाही त्यांच्या किमतींवर परिणाम होतो. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत तेल कंपन्यांचा नफा 75 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. एप्रिल 2022 नंतर सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही. तेल कंपन्यांनी प्रचंड नफा कमावला आता असे बोलले जात आहे की तेल कंपन्यांच्या नफ्याचे मार्जिन 10 रुपये प्रति लीटरपर्यंत असू शकते, अशा परिस्थितीत ते आता जनतेला देखील दिले जाईल. आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तेल कंपन्यांनी प्रचंड नफा कमावला आहे. तिसऱ्या तिमाहीतही हाच ट्रेंड कायम राहील अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत तेल कंपन्या डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी करण्याचा विचार करत आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने जुलै-सप्टेंबर तिमाहीत 5826.96 कोटी रुपयांचा निव्वळ एकत्रित नफा कमावला आहे. तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने याच तिमाहीत 8244 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की आता भारतातील तेलाच्या किमती फक्त तेल कंपन्याच ठरवतात.

Petrol- Diesel Price : डिझेल आणि पेट्रोल 10 रुपयांनी होणार स्वस्त? ‘या’ दिवशी होणार घोषणा Read More »

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा

प्रतिनिधी : सय्यद शाकीर  Maharashtra Politics : भारतीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर करणार आहे. यामुळे आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्व पक्ष आता जागा वाटपावरून एकमेकांशी बोलताना दिसत आहे.  तर दुसरीकडे राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असणारे भारतीय जनता पक्षाने मुंबईसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप मुंबई सर्वाधिक लोकसभा जागा लढू शकते. यामुळे शिंदे गटाला मुंबईत लोकसभेचे किती जागा मिळणार आता हे पाहावे लागणार आहे.   राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होणार आहे. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील साही जागांवर भाजप शिवसेनेने विजय मिळवला होता मात्र आता मुंबईत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप अशी लढत होणार आहे. यामुळे भाजपने एक खास प्लॅन रेडी केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष चार जागांवर निवडणूक लढवू शकते. भाजप उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईच्या लोकसभेच्या जागेवर उमेदवार देऊ शकते. जर असं झालं तर शिंदे गटाला फक्त 2 लोकसभा जागा मुंबईमध्ये मिळणार. शिंदे गटाला भाजप उत्तर पश्चिम आणि मुंबई साऊथची जागा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा Read More »

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश…

Maharashtra News: कुकडी प्रकल्पाचे मागील १५ डिसेंबर पासून आवर्तन सुरु आहे. कुकडीतून विसापुर प्रकल्पातही २१ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी दिली.  याप्रश्नी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे विसापूर धरणार पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी दिल्याने ना.विखे आणि आ.पाचपुते यांची शिष्टाई कामी आल्याची माहिती दिली.    डाॅ. विखे यांनी बोलताना विसापुरच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी आहे. पाणी सोडण्याबाबत आमदार बबनराव पाचपुते हे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या वेळोवेळी संपर्कात होते. विसापूर धरणात पाणी सोडण्याबाबत दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली.  त्यानुसार उपमुखमंत्री पवार यांनी येत्या २१ जानेवारीपासून कुकडीच्या सुरु असणाऱ्या आवर्तनातून विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश दिले. २१ ते २३ जानेवारी दरम्यान ३०० दशलक्षघनफूट पाणी विसापुरमध्ये सोडण्यात येणार असून त्यानंतर ते लाभधारकांना आवर्तनाद्वारे देण्यात येईल.  त्यामुळे त्याभागातील शेतीचा पाणी प्रश्नही मिटण्यास मदत होणार असल्याचे सांगत विसापूर धरणाखालील घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, हंगेवाडी , शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांसह लाभधारक गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश… Read More »

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती? सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू

Maratha Reservation : आरक्षणासाठी आता मराठा समाजाकडून आंदोलन आणखी तीव्र होताना दिसत आहे. 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील मुंबईपर्यंत पायीवारी करुन अमरण उपोषण करणार आहे.  पाटील यांच्यासोबत या वारीमध्ये वीस ते पंचवीस लाख लोकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे सरकार जरांगेंची समजूत काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळत आहे.   समोर आलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्य सरकार मराठा आरक्षणावर वेळी तोडगा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आज गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिष्टमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मनोज चिवटे आणि बच्चू कडू यांचा समावेश आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती? सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू Read More »

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धमकी…, मातोश्रीवर मोठा हल्ला होणार?

Maharashtra Politics: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर काही लोक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.  पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात फोनवरून ही माहिती देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मातोश्रीवर हल्ला करण्याबाबत उर्दूमध्ये 4 ते 5 लोक बोलत असल्याचे त्याने स्वतः ऐकले. वृत्तानुसार, महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला  एक फोन आला, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की काही लोक उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर मोठा हल्ला करणार आहेत. मात्र, फोन करणाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘मुंबईत भाड्याने घर घेणार’ नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने संशयितांचे संपूर्ण संभाषण ऐकल्याचा दावा केला. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण प्रवास करत होते आणि मातोश्रीबाहेर हल्ला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  संशयितांचे संभाषण ऐकून त्यांनी तत्काळ महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन केला, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण उर्दू भाषेत बोलत होते. ते मुंबईतील भायखळा परिसरातील मोहम्मद अली रोडवर भाड्याने खोली घेणार असल्याचे बोलत होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे उद्धव गटनेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.  राऊत म्हणाले, “मला माहित आहे की फोन करणारे कोण होते… विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिर उडवण्याची धमकी दिली होती. त्यांनी मुस्लिमांची नावे घेतली आणि राम मंदिर उडवण्याची धमकी दिली. या देशात लोकसभा जिंकण्याची भाजपची तयारी आहे किंवा निवडणुकीपूर्वी धार्मिक फूट पाडून निवडणूक लढवा, हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे. ‘राज्यातील सरकार संशयास्पद’ पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. ते महाराष्ट्र सरकारचे नाही कारण इथे साशंक सरकार आहे. ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबीयांची सुरक्षा काढण्यात आली, तशीच शिवसेना नेत्यांची सुरक्षाही काढण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात काही घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार आणि महाराष्ट्राच्या गृहविभागावर असेल.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धमकी…, मातोश्रीवर मोठा हल्ला होणार? Read More »

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.  तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. जिल्ह्यात या वारीचा मुक्काम बाराबाभळी मदरसा येथे असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या वारीमध्ये तब्बल तीन ते चार लाख लोकांचा सहभाग राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.  ही वारी अहमदनगर शहरातून भिंगार माळीवाडा बस स्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळायला पुष्पहार अर्पण करून केडगाव मार्गे पुणेकडे जाणार आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट Read More »

Ahmednagar News: दर्गामध्ये बसविण्यात आलेली मूर्ती हटवा; पोलीस, तलाठी तहसीलदारवर कारवाई करा नाहीतर…

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील गुहा या ठिकाणी रमजान बाबा दर्गामध्ये बसविण्यात आलेली मूर्ती हटविण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त मुस्लिम समाजच्या वतीने निदर्शने करण्यात आली तसेच दर्गामध्ये मूर्ती बसविण्यासाठी संबंधित पोलीस, तलाठी आणी तहसीलदार यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील गुहा या गावांमध्ये एकाच जागेवर असलेले दैवत दर्गा की मंदिर यावरून वाद चालू आहे हा वाद सध्या कोर्टात चालू आहे व  या जागेवर कोणताही धार्मिक विधी करू नये असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले असताना देखील पोलीस अधीक्षकांसह संबंधित पोलीस अधिकारी तलाठी व तहसीलदार यांनी काही जातीयवादी संघटनांना मिळून वादग्रस्त असलेल्या जागेतील रमजान बाबा दर्गामध्ये अनधिकृतपणे मूर्ती बसवली आहे. त्यामुळे बसविण्यात आलेले मूर्ती ही त्वरित हटवण्यात यावी तसेच जातीयवादी संघटनेला मदत करणाऱ्या पोलीस तलाठी तसेच तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत बसविण्यात आलेली मूर्ती ही येत्या पंधरा दिवसात काढावी अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता आंदोलन करण्यात येईल असा इशाराच मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला आहे .

Ahmednagar News: दर्गामध्ये बसविण्यात आलेली मूर्ती हटवा; पोलीस, तलाठी तहसीलदारवर कारवाई करा नाहीतर… Read More »