DNA मराठी

राजकीय

Ahmednagar News: खा.डॉ विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय वयोश्री योजनेचा जेष्ठांना लाभ- नागवडे

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून राष्‍ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी नगर जिल्‍ह्यात झाली. जिल्‍ह्यातील ४५ हजार जेष्‍ठ नागरीकांना या योजनेचा थेट लाभ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे झाला.या सर्व जेष्‍ठ  नागरीकांचे पाठबळ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभे राहील असा विश्‍वास भाजपाचे तालुका अध्‍यक्ष संदीप नागवडे  यांनी व्‍यक्‍त केला.   लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना समाजातील सर्व घटकांचे मोठे पाठबळ मिळत असून, यामध्‍ये केंद्र सरकारने जेष्‍ठ नागरीकांसाठी सुरु केलेल्‍या राष्‍ट्रीय वयोश्री योजनेची जिल्‍हयात झालेली अंमलबजावणी ही महायुतीच्‍या दृष्‍टीने जमेची बाजु ठरणार आहे. समाजातील दुर्लक्षीत झालेला घटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीत करुन, त्‍यांच्‍यासाठी आवश्‍यक असलेली साधन साहित्‍याची मोफत उपलब्‍धता करुन दिली.   लोकसभा मतदार संघामध्‍ये खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्‍याकरीता विशेष परिश्रम घेतले. प्रत्‍येक तालुक्‍यात शिबीरं आयोजित करुन लाभार्थ्‍यांची नोंदणी  करण्‍यात आली. यामध्‍ये नोंदणी झालेल्‍या पात्र लाभार्थ्‍यांना मोफत साहित्‍य मिळाल्‍याने जेष्‍ठ नागरीकांमध्‍ये समाधान आहे. कोव्‍हीड संकटातही खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केलेले कसम हे नागरीकांच्‍या डोळ्यासमोर आहे. डॉ.विखे पाटील रुग्‍णालयातून कोव्‍हीड सेंटर उभे करुन, त्‍यांनी उपचारांची सुविधा उपलब्‍ध करुन दिली.  केंद्र सरकारच्‍या प्रत्‍येक योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्‍ये मोफत धान्‍य योजने पासून ते आयुष्‍मान भारत योजनेचीही कार्यवाही मतदार संघात सर्वच स्‍तरावर सुरु असल्‍याने या योजनेचाही मोठा दिलासा नागरीकांना मिळाला असल्यांचे नागवडे म्हणाले.  यासर्व पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्‍या  सर्व योजनेचे लाभ सामान्‍य माणसापर्यंत  पोहोचल्‍याने महायुतीला हे मोठे पाठबळ निश्चित मिळेल असा विश्‍वास संदीप नागवडे यांनी व्‍यक्‍त केला.

Ahmednagar News: खा.डॉ विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय वयोश्री योजनेचा जेष्ठांना लाभ- नागवडे Read More »

Sharad Pawar : नगर जिल्‍ह्यासाठी एकही काम जेष्‍ठ नेते करु शकले नाही, विखेंकडून शरद पवारांना टोला

Sharad Pawar: दहा वर्षे मुख्‍यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्‍ह्यासाठी एकही काम जेष्‍ठ नेते करु शकले नाही आता त्‍यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. माझ्याकडे सांगण्‍यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्‍त दहशत असल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.  पारनेर येथे भारतीय जनता पक्षाच्‍या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथ प्रमुखांच्‍या संवाद कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी जेष्‍ठ कार्यकर्ते खिलारी गुरुजी, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्‍य विश्‍वनात कोरडे, काशिनाथ दाते, तालुका अध्‍यक्ष राहुल शिंदे उपसस्थित होते. आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, देशात पुन्‍हा  भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे सरकार सत्‍तेवर येणार आहे. परंतू ज्‍यांनी फक्‍त राज्‍यात दहा उमेदवार उभे केले आहेत असे जेष्‍ठ नेते मोठमोठे स्‍वप्‍न पाहात आहेत. असा टोला लगावून ज्‍यांच्‍या मतदार संघातील साठ टक्‍के निधी परत गेला अशा खासदारांना संसदरत्‍न  पुरस्‍कार मिळतो हे आश्‍यर्चकारक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.    या तालुक्‍यातील दहशत आता जनताच संपवेल असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन, माझ्याकडे सांगण्‍यासाठी फक्‍त विकासकामे आहेत, इतरांसारखी गुंडगीरी आणि दहशत नाही, मागील पाच वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी सुरु केलेल्‍या प्रत्‍येक योजनेचा लाभ मी सामान्‍य माणसांपर्यंत पोहोचविण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत. कोणी कितीही धमक्‍या दिल्‍या तरी, आपण त्‍याला घाबरत नाही. या तालुक्‍यातील जनताच या धमक्‍यांना आता उत्‍तर देईल असा इशाराही त्‍यांनी दिला.  ही निवडणूक फक्‍त विकासाच्‍या मुद्याची आहे. परंतू केवळ विरोधासाठी काहीजन एकत्रित आले आहेत, ज्‍यांचे नेतृत्‍व घेवून समोरचे उमेदवार उभे आहेत त्‍यांनी जिल्‍ह्यासाठी काय केले हा प्रश्‍न  उपस्थित करुन, अनेक वर्षे राज्‍यात मुख्‍यमंत्री आणि केंद्रात मंत्रीपद भोगणा-यांनी जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी कोणतेही योगदान दिलेले नाही. संरक्षण मंत्री असतानाही के.के रेंजचा प्रश्‍न सोडविला नाही. जिल्‍ह्यातील माजी महसूल मंत्री यांनीही के.के. रेंजच्‍या जमीनींबाबत ठाम भुमिका घेतली नाही. मात्र राधाकृष्‍ण विखे पाटील महसूल मंत्री झाल्‍यानंतर के.के. रेंजला जमीन देणार नाही असे ठामपणे लिहून दिले. त्‍यामुळेच शेतक-यांच्‍या जमीनींना संरक्षण मिळू शकले याकडेही त्‍यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

Sharad Pawar : नगर जिल्‍ह्यासाठी एकही काम जेष्‍ठ नेते करु शकले नाही, विखेंकडून शरद पवारांना टोला Read More »

Lok Sabha Election: सामान्‍य माणसाचे पाठबळ मोदीजींच्‍या पाठीशीच – खा.डॉ.सुजय विखे पाटील

Lok Sabha Election:  राज्‍यात महायुतीचे ४५ हुन अधिक जागांवर मोठ्या मताधिक्‍याने विजयी होणार आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत अद्यापही जागा वाटपावरुन वाद सुरू आहेत. विकासाच्‍या मुद्यावर तिस-यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्‍यासाठी सामान्‍य माणूस महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार राहील असा विश्‍वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. तालुक्‍यातील माळी बाभूळगाव येथील “मेरा बुथ सबसे मजबूत” या कार्यक्रमात खा.विखे पाटील बोलत होते.  अहिल्यानगर मधील लोकसभेच्या प्रचाराला आता रंग चढत चालला आहे. “मेरा बुथ सबसे मजबूत” कार्यक्रमाच्या माध्‍यमातून त्‍यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते   आणि बुथ प्रमुखांशी त्‍यांनी संवाद साथला. याप्रसंगी आ.मोनीकाताई राजळे यांच्‍यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ.सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात केवळ महायुतीच्याच उमेदवाराला लोकांची पसंती मिळणार असून राज्यात ४५ हुन अधिक जागेवर मोठ्या मताधिक्याने कार्यक्रत्यांच्या जोरावर आपले उमेदवार निवडून येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला पुन्हा एकदा सक्षम आणि कतृत्‍ववान पंतप्रधान मिळणार आहे. त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.  डॉ.सुजय विखे म्हणाले महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही, देशाचा पंतप्रधान कोण? यांचा चेहरा नाही. आणि त्यांच्यातील वादच हे त्यांच्या नष्ट होण्याचे कारण असणार आहे. त्याच प्रमाणे येत्या ४ जूनला राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडी आघाडीचा जनता दारुण पराभव करेल.  कार्यकर्त्यांनी विरोधकांचा विचार न करता केवळ देशाचे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकास कामांची माहिती घरोघरी पोहचविण्याचे आवाहन त्‍यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.

Lok Sabha Election: सामान्‍य माणसाचे पाठबळ मोदीजींच्‍या पाठीशीच – खा.डॉ.सुजय विखे पाटील Read More »

Maharashtra News: ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडकवण्याची घटना गंभीर, खरे सुत्रधार शोधा

Maharashtra News : रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडविण्यात आल्याची घटना अतिशय गंभीर असून, या प्रकाराची सखोल चौकशी करुन, घटनेमागील खरे सुत्रधार पोलिसांनी शोधून काढण्याची आवश्यकता असल्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.    मंत्री ‍विखे पाटील  यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करुन राज्यात व जिल्हयात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा होत असताना काही अपप्रवृत्तीनी गालबोट लावण्याच्या हेतूने प्रार्थनेच्या दरम्यान पॅलेस्टाईनचा झेंडा फडविला. ही अतिशय गंभीर बाब आहे. या बाबत पोलिसांनी तातडीने दखल घेवून गुन्हा दाखल केला असला तरी, या घटनेमागील खरे सुत्राधार शोधून काढणे अतिशय गरजेचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.   या गंभीर घटनेच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा न करता पोलीस प्रशासनाने झेंडा फडकवीणारे आणि त्यांना पाठबळ देणारे सुत्रधार कोण आहेत याची कसून चौकशी करावी. कारण अशी देशद्रोही वृत्ती कार्यरत असेल तर, प्रशासनाने ती मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे. अशा देशद्रोही वृत्तीला कोणीही आश्रय देण्याची चुक करु नये असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.  दुर्दैवाने काही राजकीय पक्ष आपल्या जाहिरनाम्यातच फुटरतावादी वृत्तीला प्रोत्साहन देत आहे. पण अशा घडणा-या घटनांमधून आत्मरिक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे मत ना.विखे पाटील यांनी शेवटी व्यक्‍त केले.

Maharashtra News: ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडकवण्याची घटना गंभीर, खरे सुत्रधार शोधा Read More »

Lok Sabha Election : रोजगाराच्या संधी जिल्ह्यात निर्माण करणार : खा. विखे पाटील

Lok Sabha Election: राज्‍याच्‍या राजकारणात महत्वाची भुमिका बजाविणारा जिल्हा म्हणुन अहमदनगरकडे पाहिले जाते. जिल्ह्यात आता रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी चांगले उद्योग यावे हाच प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करून देण्याचे आश्वासन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले. निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुशंगाने पिंपळगाव लांडगा येथे जिल्‍हा बॅकेचे अध्‍यक्ष शिवाजीराव कर्डीले यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्‍यात खा.विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले की, सध्या तरुणांसाठी जिल्ह्याला सर्वात मोठी समस्या रोजगारासाठी बाहेर जावे लागणे ही आहे. यासाठी स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष ठेऊन मी पहिली निवडणुक लढविली होती. पण कोरोना काळ आणि हप्ता वसूली सरकार असल्याने फारसे प्रयत्न करता आले नाहीत. मात्र मागील दोन वर्षाच्या काळात महायुतीचे सरकार आल्याने जिल्ह्यात औद्योगिक वसाहती उभारण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. वडगाव गुप्‍ता व शिर्डी येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी मिळाल्‍याने  तरुणांना रोजगार मिळणार आहे. श्रीगोंदा तालुक्‍यातील बेलवंडी येथे शासनाची ६१८ एकर जमीन विनामुल्य मिळवत औद्योगिक वसाहतीचा पाया रचला असून, लवकरच त्यांचे काम सुरू होईल. यामुळे जिह्यात अधिक रोजगार निर्मीती होऊन हजारो तरूणांच्या हाताला काम मिळणार असून त्यांना जिल्ह्यातच राहता येणार आहे. स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्याने तरुणांचे मनोबल वाढणार आहे. याचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला होणार असल्याचे मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.  उद्योग धद्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हजारो रुपायाचा निधी मिळवत गावा गावातील रस्ते, महामार्ग, अशी दळण वळणाची साधने उभी केली. एन.एच.आय तर्फे ४ हजार २७७.५० कोटी रुपयांचा निधी मिळवत जिल्ह्यात सुसज्य, जलद अशा रस्त्यांची निर्मीती केली. १४५४ कोटी रुपयांचा निधी मिळवत सहा राष्ट्रीय महामार्गाचा विकास केला. तर गावागावात वाहतुकीच्या सुविधा पोहचाव्यात यासाठी १३६.१३ कोटी रुपयांचा निधी मिळवत २९ गावांत रस्त्यांचे जाळे उभे केले. दळणवळणाची साधने वाढल्याने उद्योजकांसाठी अहमदनगर हे मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे जिल्ह्यात येणार असून स्थानिकांचा रोजगाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Lok Sabha Election : रोजगाराच्या संधी जिल्ह्यात निर्माण करणार : खा. विखे पाटील Read More »

Sujay Vikhe News: विकास कामे लोकांपर्यंत पोहचवा – खा.सुजय विखे पाटील

Sujay Vikhe News: अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, दक्षिण मतदार संघाचे उमेदवार खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदार संघात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. मागील पाच वर्षात केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचवा! असा संदेश कार्यकर्त्यांना देवून,विजय महायुतीचा होणार असल्याने विरोधकांच्या भूलथापांकडे दुर्लक्ष करा असे आवाहन त्यांनी केले.   खासदार डॉ. सुजय विखे पाटील पुन्हा रिंगणात आहेत,  त्यांची उमेदवारी जाहीर होण्या अगोदरपासून लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांची सोबत मिळाल्याने त्यांच्या या निवडणुकीतील प्रभाव वाढला आहे. महायुतीतील घटक पक्षांना जोडीला घेत डॉ.विखे पाटील यांनी लोकांशी थेट संपर्क सुरु केला असून, त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.विरोधकांच्या टिकेकडे दुर्लक्ष करुन केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहीती ते जनतेला सांगत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार डॉ.विखे पाटील यांनी कार्यकर्ते ‍पदा धि कारी यांच्याशी संवाद साधला. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश  उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. विरोधकांवर कोणतीही टीका टिप्पणी न करता, केवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत जिल्ह्यासाठी केलेल्या कामांची माहीती लोकांना द्या, त्यात कोणतेही खोटी अथवा वाढवून सांगू नका, आपण केलेली कामे अधिक असून मतदार सुज्ञ आहेत. त्यामुळे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करून विरोधकांचा कोणताही विचार करू नये. देशाचा निकाल लागला असून लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणुन स्विकारले आहे. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम करायचे आहे. असा संदेश सुजय विखे पाटील यांनी आपल्या कार्यकत्यांना दिला. सुजय विखे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री मोदींच्या माध्यमातून देशाचा झालेला विकास, शेतकरी, गोरगरीब,महिला आणि तरूणांच्या जिवनात विविध योजनांच्या माध्यमातून झालेले बदल यामुळे ३० कोटीहून अधिक लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. गेल्या काही वर्षांत देशात सरकारी योजनांचा मोठा परिणाम झाला आहे. पोषण अभियान आणि अॅनिमिया मुक्त भारत यांसारख्या प्रमुख कार्यक्रमांनी आरोग्यविषयक कमतरता दूर करण्यात योगदान दिले आहे. त्याच वेळी, स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन सारख्या उपक्रमांमुळे देशभरातील स्वच्छता सुधारली आहे. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जन धन योजना आणि नवीन शिक्षण धोरणामुळे  समाजातील प्रत्येक घटकविकासाच्या मुख्य प्रवाहात आला असल्याचे त्यांनी सांगितले.  मागील पाच वर्षात लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी केंद्र आणी राज्य सरकारच्या माध्यमातून निधीची उपलब्धता केली. राज्य आणी राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न मार्गी लागले.‍ व्यक्तीगत योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली. त्यामुळे प्रत्येक योजनेचा लाभ मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण पुढाकार घेतला. तालुक्यात आता औद्योगीक वसाहती करीता जागेची उपलब्धताही झाल्याने या भागात नवीन उद्योग येवून रोजगार  निर्मीतीला संधी असल्याचे डॉ.विखे पाटील म्हणाले.

Sujay Vikhe News: विकास कामे लोकांपर्यंत पोहचवा – खा.सुजय विखे पाटील Read More »

Ahmednagar News : मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता काॅग्रेस पक्ष गहाण ठेवला :ना. विखे पाटील

Ahmednagar News: मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता क्रॉंग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काॅग्रेस मधील काही नेते स्वताचे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली. ज्या ठिकाणी पक्षाचे प्राबल्य आहे अशा जागा सोडून द्यायचा स्वताच्या फायद्यासाठी नको तिथे उमेदवार देण्याचे काम राज्यातील काॅग्रेसी नेत्यांनी केले असल्याकडे लक्ष वेधून, बाळासाहेब थोरात स्वताला जेष्ठ नेते समजतात पण थोरातांची आता किव येते कारण त्यांना स्वताच्या जिल्ह्यात एकही जागा मिळवता आली नाही. उत्तर महाराष्ट्रात ८ जागा असताना तिथे ही काॅग्रेसला एकही जागा मिळाली नाही.यामुळे थोरातांनी काय काम केले? असा सवाल विखे पाटील यांनी केला. नगर जिल्ह्यात काॅग्रेसला का जागा मिळाली नाही याची कारणे लोकांना आणि कार्यकर्त्यांना थोरातांनी सांगितली पाहिजेत असे थेट आव्हान देवून,सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणाऱ्या थोरातांनी स्वताच्या नगर जिल्ह्यात पक्षाचे काय चालले आहे याकडे लक्ष द्यावे असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी थोरातांना दिला.

Ahmednagar News : मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता काॅग्रेस पक्ष गहाण ठेवला :ना. विखे पाटील Read More »

Raj Thackeray : … म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश टाळला, ‘हे’ आहे कारण

Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा करत महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला होता त्यामुळे महायुतीमध्ये जाण्याबाबतची बोलणी फिसकटली असं म्हणाले होते. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राज ठाकरे यांच्या महायुतीमध्ये प्रवेश भाजपमुळे नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला नाही.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढावी असा प्रस्ताव राज ठाकरे यांना दिला होता. मात्र राज ठाकरे आपला चिन्ह इंजिन सोडून दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या कालच्या भाषणाबाबत उल्लेख देखील केला होता. सूत्रांनुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासबोत ताज लँड्समधील बैठकीत राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हा प्रस्ताव देण्यात आला होता.  तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत यापूर्वी स्पष्टीकरण देत सांगितले होते की, भाजपकडून राज ठाकरे यांना त्यांच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी, असा कुठलाही प्रस्ताव देण्यात आला नव्हता.    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेमध्ये राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. पक्षाचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला.

Raj Thackeray : … म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश टाळला, ‘हे’ आहे कारण Read More »

Sujay Vikhe News: धाक दडपशाहीने उद्योजकांना पिटाळून लावऱ्यांनी विकासाची नौटंकी करू नये : विश्वनाथ कोरडे

Sujay Vikhe News: जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रश्नावरून विरोधकांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा पारनेर भाजपचे विधानसभा प्रमुख विश्वनाथ कोरडे यांनी चांगलाच समाचार घेतला.  धाक दडपशाहीने उद्योजकांना पिटाळून लावऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये. निलेश लंके यांनी सुपा एमआयडीत किती कंपन्या आणल्या सांगावे अथवा त्यांच्या जाचाला कंटाळून किती कंपन्या सोडून गेल्या याची यादी जाहीर करतो असे सरळ आव्हान लंके दिले. आहे.  विरोधकांनी मागील आठवड्या विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यावर आरोप केला होता. त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी पारनेर भाजपचे विधानसभा प्रमुख  विश्वनाथ कोरडे पुढे आले असून त्यांनी लंकेंना खडेबोल सुनावले. लंके यांनी रोजगारासाठी कोणतेही कामे केली नसून उलट सुपा एमआयडीसीतून खंडणी आणि हप्ते गोळा करण्याचे काम केले. संरक्षणाच्या नावाखाली त्यांच्या माणसांच्या मार्फत धमकावून त्यांना वेठीस धरून केवळ आपला आर्थिक फायदा करून घेतला. त्यांच्या माणसांकडून व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो.  कंपनीच्या मालकांकडे बसून जबरदस्ती भंगारचे ठेके, लेबर कॉंट्रक्ट मिळविण्याची कामे त्यांनी केली आहेत. वसाहतीत राहणाऱ्या लोकांना पाव सप्लाय करण्यांना कोणी त्रास दिला हे सुद्धा जनतेला माहीत आहे.यामुळे लंके यांनी सुजय विखे यांच्यावर आरोप करताना विचार करावा. लंके यांचे कारणामे लोकांसमोर आले तर त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही, असा घणाघात कोरडे यांनी केला. त्यांच्या जाचामुळे अनेक कंपन्या सोडून गेल्या. त्याचे उदारण म्हणजे तोशीबा कंपनी, कंपनीने पत्राव्दारे कंपनी हलविण्याचा निर्णय जाहीर केला होता.   विश्वनाथ कोरडे म्हणाले की, लंके यांनी सुपा एमआयडीसीचा इतिहात पहावा. खासदार  सुजय विखे आणि पालमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत एकूण १ हजार ८८० कोटींच्या गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले. पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी नुकतेच महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना या एमआयडीसीत आणले. याची माहिती लंके यांनी घ्यावी.  लंकेनी कोणत्या कंपनी आणण्यासाठी कुणाला भेट दिली यांची माहिती सांगावी. विखे यांच्या प्रयत्नातून सुपा जापनिझम मध्ये १३ जापनीज कंपन्यांचे काम सुरू केले आहे. तर अंबर, मायडिया, मिंडा, एक्साईड, मिस्तुबुशी, वरूण ब्रेवरेज, बीएमआर, क्लोराईड मेटल्स, अथर्व फार्मा,बोक्सोविया, अशा विविध कंपन्यांच्या मार्फत हजारो तरुणांना काम दिले आहे. तर लंके यांनी केवळ हप्तेखोरी करत सुपा एमआयडीसीतील उद्योजकांना त्रास देण्याचे काम केले. यामुळे विखेंच्या विकासकामापुढे लंके ठेंगणे असून त्यांनी आपली पात्रता तपासून पाहवी असे कोरडे यांनी सांगितले.  सुजय विखे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याने लंके यांचे धाबे दणाणले आहेत. पराभवाच्या भितीने ते वायफळ बडबड करत असल्याचा आरोप कोरडे यांनी केला.

Sujay Vikhe News: धाक दडपशाहीने उद्योजकांना पिटाळून लावऱ्यांनी विकासाची नौटंकी करू नये : विश्वनाथ कोरडे Read More »

Ahmednagar News : राज ठाकरे यांच्यामुळे महायुती अधिक बळकट होईल : खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News:  राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त शिवतिर्थीवर आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता महायुतीचा घटक पक्ष झाल्याने महायुतीला अधीक बळकटी मिळेल असा विश्वास अहमदनगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व्यक्त केला आहे.  राज ठाकरे यांनी काल मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना आपला जाहिर पाठिंबा दिल्याने महायुतीत आणखी एका पक्षाची भर पडली, तर महविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत. कारण राज ठाकरे यांचे तरुणांमध्ये मोठे क्रेज आहे. त्याच बरोबर मराठी माणसांचा आजही राज ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. यामुळे राज्यभर त्यांचा कार्यकर्ते महायुतीला मदत करणार असल्याने निवडणुकीत त्याचा मोठा फायदा होईल असे खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.  राज ठाकरे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. यामुळे देशात फक्त मोदींची गॅरेंटी सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावेळी ४०० पारचे उद्दीष्ठ आता सहज गाठता येणार आहे. तर इंडी आघाडीची हवा देशातून मिटत चालली असल्याचा दावा सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Ahmednagar News : राज ठाकरे यांच्यामुळे महायुती अधिक बळकट होईल : खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »