DNA मराठी

राजकीय

Ahmednagar News: धनगर आरक्षण! …नाहीतर नदीत उड्या टाकून जलसमाधी घेणार

Ahmednagar News: धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण आरक्षण लागू व्हावे यासाठी आज  बुधवारपासून (दिनांक 18 सप्टेंबर) सात जण नेवासा फाटा येथे उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर आठ दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास हे सातही जण गोदावरी नदीत उड्या टाकून सामुदायिक जलसमाधी घेणार आहेत, असा इशारा सकल धनगर जमातने दिला आहे.  दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत धनगर समाज आरक्षणाबाबत घेतलेली बैठक आम्हाला मान्य नाही व तिथे त्या बैठकीत सहभागी झालेल्या समाजाच्या शिष्टमंडळाला आमची मान्यता नाही, असे स्पष्टीकरणही सकल धनगर समाजाने दिले आहे.  धनगर समाजाला भटके विमुक्त (एनटी) मध्ये साडेतीन टक्के आरक्षण असून एवढेच आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) मिळावे अशी त्यांची मागणी आहे. 2014 मध्ये भाजपने सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण देऊ, अशी ग्वाही दिली होती. मात्र, दहा वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सकल धनगर जमातचे म्हणणे आहे. त्यामुळे या मागणीसाठी व धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण प्रमाणपत्र मिळण्यासाठी येत्या बुधवारपासून (18 सप्टेंबर) नेवासा फाटा येथे संभाजीनगर महामार्गावर उपोषण आंदोलन केले जाणार आहे.  यात महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे उत्तर जिल्हा चिटणीस अशोक कोळेकर यांच्यासह प्रल्हाद सोरमारे, बाळासाहेब कोळसे, राजू मामा तागड, देवीलाल मंडलिक, रामराव कोल्हे व भगवान भोजने सहभागी होणार आहेत. उपोषणास बसल्यानंतर आठ दिवसात शासनाने एसटी आरक्षण निर्णय घेतला नाही व प्रमाणपत्र वाटप सुरू केले नाही तर हे सातही जण गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना कोळेकर, तागड आणि सोरमारे यांनी स्पष्ट केले.  या सात जणांपैकी राजू मामा तागड यांनी मागील वर्षी 17 सप्टेंबरला मिरी (तालुका पाथर्डी) येथील वीरभद्र मंदिरात याच मागणीसाठी तेरा दिवस उपोषण केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पन्नास दिवसात मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष झाले तरी निर्णय झालेला नाही, असा उद्वेग तागड यांनी व्यक्त केला.  दहा वर्षांपासून तेच ऐकतोय  या संदर्भात सोरमारे यांनी सांगितले की, मागील महिन्यात पुण्यात झालेल्या बैठकीत संभाजीनगर वा राहुरी येथे उपोषण करण्याचा निर्णय झाला होता. मात्र काही जणांनी अचानक पंढरपूरला उपोषण सुरू केले व आताही आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाची बैठक घेऊन धनगर आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत बसवू, असे आश्वासन दिले. मात्र मागील दहा वर्षापासून आम्ही हेच शब्द ऐकतोय, अशी खंत व्यक्त करून सोरमारे म्हणाले, महाराष्ट्रात धनगर समाज दोन नंबरचा मोठा समाज आहे व आरक्षणाच्या आशेने त्याने भाजपला एकगठ्ठा मतदान केले आहे. मात्र आरक्षणाचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे आता धनगरी हिसका दाखवला जाणार आहे व 18 सप्टेंबरपासून उपोषण आणि सामुदायिक जलसमाधी आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.  शिष्टमंडळच मान्य नाही  मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई व अन्य उपस्थित होते. सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने या बैठकीस जायलाच नको होते. या शिष्टमंडळाला समाजाची मान्यताच नाही, असा दावाही सोरमारे यांनी केला.

Ahmednagar News: धनगर आरक्षण! …नाहीतर नदीत उड्या टाकून जलसमाधी घेणार Read More »

Ahmednagar News: आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईने रस्ते उजळले, जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन

Ahmednagar News: जामखेड गेले १० दिवस भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपले लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्ता विनायक श्रीगणेशाचे शहर व परिसरात उत्साहात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रीगणेशाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले. जामखेड शहरात मोठया मंडळाचे १४ व लहान मंडळाचे १० असे २४ तर एक गाव एक गणपती १० व ग्रामीण भागात एकुण ५५ मंडळाची म्हणजे एकुण ८९ मंडळांची श्री . ची . स्थापना करण्यात आली होती . सातव्या दिवसापासुन शहर व तालुक्यात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात झाली होती . दहाव्या दिवशी शहरातील१४ व ग्रामीण भागातील १७ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभात घेतला होता . विसर्जन मिरवणूक तब्बल ८ तास चालली. शेवटच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन रात्री १२.५ मिनिटांनी झाले . प्रचंड जल्लोषात संघर्ष तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.  मेनरोड परिसरात आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती. सायंकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकानी फुलून गेले होते बाळगणेश मंडळानी सकाळी चारचाकी हातगाड्यामधून मिरवणुका काढल्या दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीने फुलून गेले होते तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसून आला दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रमाण असून, ढोल-ताशा लेझीम फड ढोलीबाजा-बेन्जोबाजा अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लोगल्लीतील, चौकाचौकातील गणपतींची ट्रॅक्टर, टेम्पो, मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने शहर व परिसर दणाणून गेले या मिरवणुकीमुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालाने मास्थून निघाले. सार्वजनिक मंडळांनी केलेल्या मंदिराच्या कलाकुसरींनी जामखेड शहर उजळून निघाले होते गणेशमूर्ती घेऊन निघालेल्या सार्वजनिक मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी  जामखेडमधील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत मेनरोड गजबजून गेला होता. हा सारा परिसरच जणू गणपतीमय होऊन गेला होता. भगव्या टोप्या, प‌ट्ट्या, डोक्यावर मिरवणारे आणि गुलालाने माखलेले हजारो आबालवृद्ध वाद्यमेळाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे तरुण  दिसत होते. दरवर्षी प्रमाणे नगरसेवक अमित चिंतामणी व मित्र मंडळाने गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार आमदार राम शिंदे ; प्रा . मधुकर राळेभात ; सभापती शरद कार्ले ; माजी सभापती डॉ .भगवान मुरूमकर व अमित चिंतामणी यांनी केला . तसेच   मोठ्या हौसेने या वर्षी आमदार रोहित पवार यांनी मेनरोड वर स्टेज उभारून सर्व गणेश मंडळ यांचे सत्कार त्यांनी केले. गणरायाचे विसर्जन पाहण्या- साठी जामखेडकरांची मेनरोडवर गर्दीची लाट पसरलेली होती. मेनरोडमध्ये राहणारे नागरिक घराच्या गॅलरीतून एक विलोभनीय चित्र पाहत होते.  दोन्ही आमदारांनकडून संघर्ष मित्र मंडळाचे कौतुक अनेक वेळा संघर्ष मित्र मंडळाने गणेश उत्सव काळात प्रथम क्रमांकाचे पारितोषीक घेतले आहेत. या वर्षी मंडळाची पहिल्या दिवशाची आरती आमदार राम शिंदे यांनी केली तर विसर्जन मिरवणुकीची आरती आमदार रोहित पवार यांनी केली. शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या संघर्ष मित्रमंडळाची मिरवणूक आकर्षक होती. गणपती विसर्जन मिरवणुक अगदी शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली . यावेळी दोन्ही ही आमदारांनी संघर्ष मित्र मंडळांचे कौतुक केले.  दोन्ही आमदार  थिरकले !  2024 च्या विनासभेत एकचं तरी विसर्जन होणार : जामखेडकर जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे गाण्याच्या ताळावर  बेभानपणे थिरकले होते . विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचे स्वागाताचे स्टेज स्वतंत्र होते . परंतु नाचण्यात सुद्धा दोघांची स्पर्धाच दिसत होती . यावेळी ही जणू विधान सभेची विसर्जन मिरवणुक तर नाही ना ? 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत एकाचं तरी विसर्जन होणार असं जनतेतं चर्चेचा विषय चर्चीला जात होता . कोणताही गंभीर व अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस निरीक्षक श्री. महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता . गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेन व उत्साहात पार पडला .

Ahmednagar News: आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईने रस्ते उजळले, जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन Read More »

Sanjay Gaikwad : ‘मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री…’, संजय गायकवाड ‘त्या’ वक्तव्यावर ठाम

Sanjay Gaikwad : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तत्वानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर काल रात्री बुलढाणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता या प्रकरणात माध्यमांशी बोलताना  मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.  यावेळी ते म्हणाले की, स्टेटमेंट मी केले, मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागतील. माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. आरक्षण संपणाऱ्या बद्दला जे वक्तव्य केले त्यावर ठाम आहे. 70 कोटी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पलानिग काँग्रेसने केले. काँग्रेसपेक्षा जास्त आंदोलन आम्ही केलीय. आम्हाला पण दहा दहा हजार आणून आंदोलन करता येतील असं ते म्हणाले.  तर माझ्या कार्यक्रममध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्याने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकीन. तुम्ही फक्त रोडवर पाय ठेऊन दाखवा. तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे. मी खरे बोलण्याचा निषेध करतात तर करा. जी जनता तुम्हाला मत पेटीतून उत्तर देईल. जे वक्तव्य केले ते माझे वयक्तिक मत आहे. असेही या वेळी ते म्हणाले.  तसेच आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही आरक्षणला विरोध करणाऱ्यांना जर धडा शिकवण्याकरता जर गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे. असेही संजय गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Sanjay Gaikwad : ‘मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री…’, संजय गायकवाड ‘त्या’ वक्तव्यावर ठाम Read More »

Who is Ryan Wesley Routh : कोण आहे रायन रुथ? ज्याने Donald Trump ला मारण्याचा प्रयत्न केला

Who is Ryan Wesley Routh : अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.   या प्रकरणी बंदूकधारी 58 वर्षीय रायन वेस्ली रुथ याला अटक करण्यात आली आहे. ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी तो एके-47 रायफल घेऊन फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच येथे आला होता. ट्रम्पवर हल्ला करण्याआधी, रुथ यांनी सोशल मीडियावर सांगितले की, यावर्षी “लोकशाहीवर मतदान केले जात आहे. आम्ही हरवू शकत नाही.” ते लोकशाही समर्थक आहेत. यापूर्वी एका मुलाखतीत त्यांनी युक्रेनचा समर्थक असल्याचा दावा केला होता. रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात लढण्यासाठी ते कीव येथे गेल्याचे सांगण्यात आले. वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्समध्ये ट्रम्प गोल्फ खेळत होते. यावेळी राऊत त्यांच्या जवळपास 400 मीटर जवळ पोहोचले. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सच्या लक्षात आले आणि त्यांनी गोळीबार केला. यानंतर रौथने एके 47 रायफल आणि दोन बॅग फेकून कारमध्ये पळ काढला. नंतर त्याला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून एक AK-47 रायफल, एक स्कोप, दोन बॅग आणि एक GoPro डिव्हाइस जप्त केले. रायन वेस्ली रुथचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे रायन वेस्ली राउथ हा नॉर्थ कॅरोलिनाचा आहे. त्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. 2019 पासून युक्रेनला अमेरिकेच्या मदतीला त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला आहे. तो डेमोक्रॅटिक उमेदवारांना पाठिंबा देतो. रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनमध्ये पोहचला  एका मुलाखतीत रुथने दावा केला होता की, रशियासोबतच्या युद्धाच्या सुरुवातीला तो युक्रेनच्या बाजूने लढायला गेला होता. त्याने कीवमध्ये पोहोचल्यानंतर लढ्यात सामील होण्यासाठी लोकांना भरती करण्यास मदत केली. तिने नॉर्थ कॅरोलिना कृषी आणि तांत्रिक राज्य विद्यापीठात शिक्षण घेतले. 2018 च्या सुमारास तो हवाईला गेला.

Who is Ryan Wesley Routh : कोण आहे रायन रुथ? ज्याने Donald Trump ला मारण्याचा प्रयत्न केला Read More »

Nanded News : दिव्यांग खोकले यांना आधार कार्ड नसल्याने जगण्याचा आधार मिळेना…

Nanded News: हदगाव तालुक्यातील डोंगरी आणि आदिवासीबहुल धन्याचीवाडी गावातील 65 वर्षीय किशन सयाजी खोकले हे पत्नीसोबत अत्यंत हलाखीचे जीवन जगतात. दोन मुलं आहेत. मात्र मुलांकडून जगण्याचा कसलाच आधार नाही.  किशन खोकले हे 1976 मध्ये कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा साखर कारखान्यावर मजूरीला होते. त्यांचा उजवा हात मशीनमध्ये जाऊन अपघातामध्ये खांद्यापासून नाहीसा झाला. डाव्या हाताची तीन बोटे तुटल्याने त्यांचे जीवनच अर्थहीन झाले आहे. कारखान्याने त्यांना वॉचमन म्हणून कामावर ठेवले. तेही करता आले नसल्याने खोकलेंना एक हजार रुपये पेन्शन देत घरी पाठवले.  पूर्णतः अपंग आणि उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसलेल्या खोकलेंनी एक हजार रुपये पेन्शन आणि पत्नीच्या मजुरीतून जगण्याचा आधार बनवला. बैंक खात्यात पेन्शन जमा होत होते, परंतु आधारकार्डची सक्तीआली अन् पेन्शन मिळणे बंद झाले.  आधारकार्ड नसल्याने खोकलेचा जगण्याचा ‘आधार’च संपला. हे विशेष ! तामसा येथील आधार केंद्रावर आधारकार्ड निघत नसल्याचे स्पष्ट झाल्याने खोकले शासन दरबारी खेटे मारतात. तहसीलदार हदगाव व जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन आधारकार्ड काढून देण्याची भीक मागतात. परंतु त्यांच्या मदतीला आजपर्यंत कोणीही भीक घातली नाही.  दोन्ही हात निकामी झाल्याने कोणतेही काम करून पोट भरण्याचा मार्ग बंद झाला. शासनाच्या अनेक लाभाच्या योजना आहेत. मात्र त्या योजना अपंग खोकलेसाठी निरर्थक आहेत. त्यामुळे किशन खोकलेचे जीवन म्हणजे ‘आधार’ विना निराधार बनली आहे.  निराधार योजनेसाठी अर्ज केला तर आधारकार्ड मागतात. ‘आधारकार्डा शिवाय शासनाच्या लाभाच्या योजना घेता येत नसल्याने जीवन जगणे असहा झाल्याचे किशन खोकले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Nanded News : दिव्यांग खोकले यांना आधार कार्ड नसल्याने जगण्याचा आधार मिळेना… Read More »

Maharashtra Gas Leak: मोठी बातमी! अंबरनाथमधील रासायनिक कारखान्यातून गॅस गळती

Maharashtra Gas Leak: अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखान्यात गॅसची गळती होत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. गॅस गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  गॅस गळतीमुळे लोकांना डोळ्यात जळजळ आणि घसादुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकांनी गुदमरल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. दरम्यान, अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. अंबरनाथ अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री उशिरा त्यांना गॅस गळतीची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. गॅस गळतीमुळे रस्त्यावर अंधार असून लोक नाक-तोंड झाकून बाहेर पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. B. केबिन रोड हा धुरासारखा झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनवणे यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. गॅस गळतीनंतर लोकांनी डोळ्यांना जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या. माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. ते म्हणाले, आता कंपनीतील गळती कमी झाली आहे. गॅस गळतीमुळे कोणतीही जीवितहानी किंवा रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.

Maharashtra Gas Leak: मोठी बातमी! अंबरनाथमधील रासायनिक कारखान्यातून गॅस गळती Read More »

Manipur Violence: मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा बिघडली, इंटरनेट बंद, ‘या’ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती बिघडल्याने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.   माहितीनुसार, मणिपूरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि राज्याच्या सुरक्षा सल्लागारांना हटवण्यासाठी राजभवनाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली.  पोलिसांनी सांगितले की हजारो विद्यार्थी आणि महिला आंदोलकांनी येथील बीटी रोडवरील राजभवनाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा दलांनी त्यांना काँग्रेस भवनाजवळ रोखले. आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगड आणि मार्बल फेकले, पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या वापरण्यास प्रवृत्त केले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मणिपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही निषेध रॅली काढून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन केले. ते नंतर राज्य सचिवालयाकडे निघाले, परंतु त्यांना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील काकवा येथे थांबविण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.  मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात त्यांच्या कथित अक्षमतेसाठी डीजीपी आणि राज्य सरकारच्या सुरक्षा सल्लागारांना हटवण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. या चकमकीमध्ये 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. इंफाळमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्याच वेळी, थौबलमध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 163 (2) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.  दरम्यान, मणिपूर सरकारने मंगळवारी उग्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान राज्यभरातील इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद केली. फोटो, द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याच्या गृह विभागाने एका अधिसूचनेत म्हटले आहे. केंद्राने जातीय संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये सुरक्षा कर्तव्यांसाठी सुमारे 2,000 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या आणखी दोन CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल) बटालियन तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत, अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Manipur Violence: मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा बिघडली, इंटरनेट बंद, ‘या’ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू Read More »

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा, अजित पवारांची अमित शहा यांच्याकडे मागणी

Ajit Pawar: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करा आणि राज्यात बिहार पॅटर्न राबवा अशी मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आणि चर्चांना उधाण आले आहे.   द हिंदू वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्यातून दिलेल्या बातमीमुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे पुढच्या आठवड्यात दिल्लीत महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.  माहितीनुसार, राज्यातील किमान 25 जागेवर मैत्रीपूर्ण लढत करावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी अमित शहांकडे  केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मागील पंधरा-वीस दिवसापासून अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे. या चर्चेत जवळपास 40 जागांसाठी चर्चा झाल्याची माहिती आहे.  त्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येणाऱ्या जागा सोडण्यास तयार नसून तीन ते चार जागा संदर्भात अदलाबदल करण्यास तयार आहे. त्याचबरोबर काँग्रेस जिथं लढत आहे अशा दहा ते बारा जागा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्याची माहिती आहे.  त्याचबरोबर महायुतीमध्ये आता महामंडळ वाटपासंदर्भात सुद्धा एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागच्या दोन दिवसात नक्की कुणाला कोणत महामंडळ देणार यासंदर्भात एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुती मधील नाराज नेत्यांचा सुर नरमण्याची शक्यता आहे.  राज्यपाल नियुक्त 12 जागा संदर्भात देखील निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजप 6, शिवसेना 3, आणि राष्ट्रवादी 3 असं सूत्र ठरलं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापर्यंत हे नाव जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा, अजित पवारांची अमित शहा यांच्याकडे मागणी Read More »

Israel Strikes : मोठी बातमी! इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, 40 लोकांचा मृत्यू

Israel Strikes : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या इस्रायल आणि हमास युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झालाय. यातच आता पुन्हा एकदा इस्लायने गाझापट्टीवर मोठा हल्ला केला आहे.   माहितीनुसार इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर 60 जण जखमी झाले आहेत. गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने ही माहिती दिली.  मंगळवारी इस्रायलने पॅलेस्टाईनच्या दक्षिणेकडील भूभागावर हल्ला केला. इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की त्यांनी या भागातील हमास कमांड सेंटरला टार्गेट केले आहे. गाझामधील खान युनिस शहरातील अल-मवासी भागात इस्रायली लष्कराने हा हल्ला केला. हा असा भाग आहे की इस्त्रायली सैन्याने युद्ध सुरू झाल्यावर सुरक्षित क्षेत्र घोषित केले होते. हजारो पॅलेस्टिनींनी येथे आश्रय घेतला आहे. स्थानिक आणि डॉक्टरांनी सांगितले की, खान युनिस जवळील अल-मवासी येथील तंबूच्या छावणीला चार क्षेपणास्त्रांनी मारले. हा छावणी विस्थापित पॅलेस्टिनींनी भरलेला आहे. गाझा सिव्हिल इमर्जन्सी सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, 20 तंबूंना आग लागली. इस्रायली क्षेपणास्त्रांनी 30 फूट खोल खड्डे तयार केले आहेत. 60 जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. 40900 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे खान युनिसमधील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ला केल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. हमासने इस्रायलचे आरोप फेटाळले आहेत. हे खोटे असल्याचे हमासने एका निवेदनात म्हटले आहे.   7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर मोठा हल्ला केला. यामध्ये 1200 इस्रायली मारले गेले आणि 250 लोकांना ओलिस बनवण्यात आले. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 40,900 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.

Israel Strikes : मोठी बातमी! इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, 40 लोकांचा मृत्यू Read More »

Rahul Gandhi : ‘भाजप आणि पंतप्रधानांना कोण घाबरत नाही’, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.   रविवारी टेक्सास विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आरएसएस आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला.   राहुल गांधी म्हणाले, ‘आरएसएसचा विश्वास आहे की भारत ही एक कल्पना आहे आणि आम्ही मानतो की भारत हा अनेक विचारांचा देश आहे. आम्हाला विश्वास आहे की प्रत्येकाला सहभागी होण्याची परवानगी दिली पाहिजे, स्वप्न पाहण्याची परवानगी दिली पाहिजे आणि त्यांची जात, भाषा, धर्म, परंपरा किंवा इतिहास याची पर्वा न करता त्यांना स्थान दिले पाहिजे. हा लढा आहे आणि हा लढा निवडणुकीत अधिक स्पष्ट झाला जेव्हा भारताच्या कोट्यवधी जनतेला स्पष्टपणे समजले की भारताचे पंतप्रधान भारतीय संविधानावर हल्ला करत आहेत. राहुल गांधी अमेरिकेत काय म्हणाले? ते पुढे म्हणाले, ‘मी तुम्हाला जे काही सांगितले ते संविधानात आहे. आधुनिक भारताचा पाया संविधान आहे. निवडणुकीत लोकांना जे स्पष्टपणे समजले आणि मी पाहिले की मी संविधानाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा लोकांना मी काय म्हणतो ते समजले. भाजप आमच्या परंपरेवर हल्ला करत आहे, आमच्या भाषेवर हल्ला करत आहे, आमच्या राज्यांवर हल्ला करत आहे, आमच्या इतिहासावर हल्ला करत आहे, असे ते सांगत होते. ‘भाजपला हे सहन होत नाही’ राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जे समजले ते म्हणजे जो कोणी भारतीय संविधानावर हल्ला करत आहे तो आपल्या धार्मिक परंपरेवरही हल्ला करत आहे. म्हणूनच संसदेतील माझ्या पहिल्या भाषणात जेव्हा मी अभयमुद्राचे वर्णन केले तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की ते निर्भयतेचे प्रतीक आहे आणि ते प्रत्येक भारतीय धर्मात आहे. मी हे सांगत होतो तेव्हा भाजपला ते सहन होत नव्हते. त्यांना समजत नाही आणि आम्ही त्यांना समजावणार आहोत. ‘भाजपची भीती नाहीशी झाली’ भाजपवर निशाणा साधत विरोधी पक्षनेते म्हणाले, ‘दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे भाजपची भीती नाहीशी झाली. निवडणूक निकालानंतर लगेचच, काही मिनिटांतच, भारतात कोणीही भाजप किंवा भारताच्या पंतप्रधानांना घाबरत नाही, हे आपण पाहिले. त्यामुळे हे मोठे यश आहे, राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाचे नाही. लोकशाही समजून घेणाऱ्या भारतीय जनतेचे हे मोठे यश आहे, ज्यांना हे समजले आहे की आम्ही आमच्या संविधानावर हल्ला स्वीकारणार नाही. आमच्या धर्मावर, राज्यावर झालेला हल्ला आम्ही मान्य करणार नाही. भारत जोडो यात्रेवर काय म्हणाले? राहुल गांधी म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेने माझ्या कामाबद्दल विचार करण्याची पद्धतच बदलली. मी म्हणेन की राजकारणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन, आमच्या लोकांकडे पाहण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांचे ऐकण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. या प्रवासात फक्त मीच नाही तर अनेकांचा सहभाग होता.

Rahul Gandhi : ‘भाजप आणि पंतप्रधानांना कोण घाबरत नाही’, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल Read More »