DNA मराठी

राजकीय

Saif Ali Khan वर चाकूने हल्ला, खासदार वर्षा गायकवाड संतापल्या; थेट मुख्यमंत्र्यांना विचारला प्रश्न

Saif Ali Khan : जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत,जिथे हाई प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात.. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला नको का? अशी टीका काँगेस खासदार वर्षा गायकवाड यांनी अभिनेता सैफ अली खान प्रकरणावरून सरकारवर केली आहे. त्यांनी ट्विट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. अभिनेता पद्मश्री सैफ अली खान यांच्यावरील चाकू हल्ला अतिशय भयानक आणि धक्कादायक घटना आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. वांद्रेसारख्या परिसरात एका लोकप्रतिनिधीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो.. अशाप्रकारची उघड-उघड दहशत पाहण्यासाठी मुंबई सरावलेली नाही. कायद्याचे पालन करणारे राज्य म्हणून आपण नेहमीच अभिमानानं महाराष्ट्राकडे पाहत आलो. पण आता परिस्थिती खरोखरंच हाताबाहेर जात चालली आहे. गुन्हेगारांची पाठ थोपटतंय तरी कोण?कोणाचं पाठबळ मिळतंय यांना की, कायद्याचा जरा ही धाक राहिलेला नाही? महाराष्ट्रात जे घडत आहे, ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. वाढत्या गोळीबाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणं आणि सीएम व डीसीएमसोबत फोटो काढणं, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचं राजकारण वाढणं या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांच्या मनातून कायद्याची भीती नाहीशी झाली आहे. सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. राज्याचे गृहमंत्री करताहेत तरी काय? असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

Saif Ali Khan वर चाकूने हल्ला, खासदार वर्षा गायकवाड संतापल्या; थेट मुख्यमंत्र्यांना विचारला प्रश्न Read More »

Valmik Karad : बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, मंजिरी कराड यांचा खळबळजनक आरोप

Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर आता या प्रकरणात माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा डाव करण्यात येत आहे असा आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडने केला आहे. माध्यमांशी बोलताना माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच आम्हाला मुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका निवडणुकीत माझ्या नवऱ्याने तुमचे काम केले आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देता आहे. असं देखील त्या म्हणाल्या. माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाल्या की मनमानी पद्धतीने गुन्हे दाखल करत आहेत. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की हे थांबवा. घटना घडली त्यादिवशी माझे पती परळीत किंवा जिल्ह्यात नव्हते. वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाले म्हणून डोळ्यात खुपू लागले. बजरंग सोनवणे यांनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

Valmik Karad : बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, मंजिरी कराड यांचा खळबळजनक आरोप Read More »

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. भारतीय नौसेनेच्या माहितीनुसार या तीन अद्यावत युद्धनौकांमध्ये, आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्ध लोकांचा समावेश आहे. या तीन युद्धनौका म्हणजे आपल्या देशाची सागरी सुरक्षेतील एक महत्त्वाची झेप असल्याचे भारतीय नौदलाचे म्हणणे आहे. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, INS निलगिरी हे 17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने त्याची रचना केली आहे. वाढीव क्षमता, समुद्रात जास्त काळ राहणे आणि स्टेल्थ यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह ते नौदलात सामील करण्यात आले आहे. हे देशी फ्रिगेट्सच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करते. INS सूरत हे 15B वर्गाच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचे चौथे आणि अंतिम जहाज आहे. हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यात 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे, ती अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज आहे. INS वाघशिर ही P75 स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. INS वाघशिर पाणबुडी बांधणीत भारताच्या वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. हे फ्रेंच नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने बांधण्यात आले असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. देशाला देणार भक्कम सुरक्षा कवच आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या भारतीय नौदलाच्या अतिशय अद्ययावत युद्धनौका आहेत. देशाला हवाई सुरक्षा देण्यास त्या सक्षम असून शत्रूने धाडलेले क्षेपणास्त्र सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर हवेतच नष्ट करता येणार आहे. आयएनएस वाघशीर ही अद्ययावत पाणबुडी देशाच्या मारक क्षमतेत भर टाकणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा या पाणबुडीवरून करता येणार आहे. याच श्रेणीतील आयएनएस अरिघात ही पाणबुडी गेल्यावर्षी नौदलात समाविष्ट करण्यात आली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्या दरम्यान, नवी मुंबईतील इस्कॉन श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. नऊ एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात अनेक देवतांच्या देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे त्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी महायुतीतील सर्व आमदारांशी संवाद साधणार आहे.यात आमदारांचे रिपोर्टकार्ड,मतदार संघातील आढावा त्यासोबत काही प्रश्न देखील पंतप्रधान आमदरांना विचारणार असून त्यानंतर मार्गदर्शन करणार आहे.असल्याची माहिती मिळतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची मंगळवारी रात्री बैठक घेतली होती.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण Read More »

Maharashtra News: समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

Maharashtra News: समग्र शिक्षा अभियानातील सर्वच उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात यावेत. या अभियानात राज्याची उल्लेखनीय कामगिरी व्हावी, या दृष्टीने विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण सुधारणा, तंत्रशिक्षणाचा प्रसार, डिजीटल शिक्षणाचे आयोजन, शिक्षकांसाठीच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण प्रभावीपणे राबवावेत, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. मंत्री भुसे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य प्रकल्प समन्वयक गोविंद कांबळे, उपसंचालक (वित्त) शार्दुल पाटील, उपसंचालक (प्रशासन) संजय डोर्लीकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) हेमंतकुमार सावंत आदी उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी समग्र शिक्षा अभियानातील उपक्रम, योजनांचा लाभ प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्याला झाला पाहिजे. शाळांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न केले जावेत. समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे संदेश ध्वनी रेकॉर्डद्वारे किंवा व्हीडिओ स्वरूपात मुलांना ऐकवावेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढेल. शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करावा. यातून त्यांच्या कामाला नवी ऊर्जा मिळेल. या बरोबरच काही संस्थाही उल्लेखनीय काम करीत आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची दखल शिक्षण विभागाने घेऊन त्यांचाही गौरव करावा. शिक्षण क्षेत्रात वेगळे काम करणाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करावी, अशा सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या. मंत्री भुसे म्हणाले की, शाळेत आवश्यक भौतिक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. यामध्ये शुद्ध पाणी, शौचालये, लाइटिंग, संगणक, ग्रंथालय आदी बाबींचा समावेश असावा. प्रत्येक शाळेत खेळ व क्रीडासाहित्य उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी. इमारत दुरुस्ती, कंपाउंड वॉल यासारख्या कामांचे वर्गीकरण करावे. कंपाउंड वॉलचे काम एमआरईजीएस मधून घेण्याबाबतही व शाळा दुरुस्तीची काही कामे सामजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यासाठी त्यांनी सूचना केल्या. शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी बैठकीतून बोर्डी ता. अकोला शाळेतील मुख्याध्यापक उमेश चोरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून लर्निंग साहित्य वापराबाबत माहिती जाणून घेतली. शिक्षण विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या साहित्याचा मुलांना शिकवताना चांगला उपयोग होत असल्याचे उमेश चोरे यांनी यावेळी सांगितले. सर्व शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहात. शिक्षण विभाग शिक्षकांच्या सर्व अडचणी सोडवण्यास प्राधान्य देत आहे, असे मंत्री भुसे यांनी या संवादावेळी सांगितले.

Maharashtra News: समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे Read More »

Mohan Bhagwat: ‘भारत राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या दिवशी स्वतंत्र झाला अन्…’, RSS प्रमुख मोहन भागवत पुन्हा चर्चेत

Mohan Bhagwat : आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठानच्या दिवसापासून भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे. असं आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले. मंदिरासाठी सुरू झालेल्या चळवळीबद्दल ते म्हणाले की, ही भारताच्या ‘स्व’साठी सुरू झालेली चळवळ होती. यामुळे भारताला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आणि जगाला मार्ग दाखवण्याचे धाडस मिळाले आहे. राम मंदिराचा अभिषेक देशभरात प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. खऱ्या अर्थाने भारत या दिवशी स्वतंत्र झाला. राम मंदिराच्या अभिषेकाचा दिवस भारतात द्वादश प्रतिष्ठा म्हणून साजरा केला पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले. राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारी रोजी झाला. हिंदू कॅलेंडरनुसार, 11 जानेवारी हा दिवस या वर्षी पहिला वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. आरएसएस प्रमुख म्हणाले, ‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशात कुठेही संघर्ष झाला नाही. सर्वत्र आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण होते. इंदूरमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे सांगितले. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा ही राष्ट्राची शान असल्याचे वर्णन करताना, आरएसएस प्रमुख म्हणाले की, हा क्षण संपूर्ण देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. या दिवशी देशभर उत्साह होता. गेल्या वर्षी 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनीही हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आणि भारतभूमीच्या प्रत्येक कणात राम उपस्थित असल्याचे सांगितले. राम हा वाद नाही तर तोडगा आहे.

Mohan Bhagwat: ‘भारत राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या दिवशी स्वतंत्र झाला अन्…’, RSS प्रमुख मोहन भागवत पुन्हा चर्चेत Read More »

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील होते. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते. तत्पूर्वी शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ ) राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन Read More »

PM Modi: ‘प्रत्येकजण चुका करतो, मी देव नाही…’; पंतप्रधान मोदींनी सर्वकाही सागितलं

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय उद्योजक, गुंतवणूकदार आणि स्टॉक ब्रोकर निखिल कामथ यांच्या ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ या पॉडकास्ट शोमध्ये येणार आहे. निखिल कामथ यांनी प्रदर्शित केलेल्या ट्रेलरमधून ही माहिती मिळाली. यापूर्वी, झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी एका गेस्टसशी हिंदीमध्ये संवाद साधतानाची एक क्लिप शेअर केली होती, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली होती. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर असे अनुमान लावले जात होते की ते पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून पंतप्रधान मोदी होते. पॉडकास्टचा दोन मिनिटांचा ट्रेलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रिलीज करण्यात आला.आता निखिल कामथने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या भागाचा दोन मिनिटांचा ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरचे शीर्षक “पीपल विथ पीएम नरेंद्र मोदी | एपिसोड 6 ट्रेलर” आहे. या ट्रेलरमध्ये पंतप्रधान मोदी आणि निखिल कामथ यांच्यातील एक मनोरंजक संभाषण दाखवण्यात आले आहे. “मी इथे तुमच्या समोर बसून बोलत आहे, मी घाबरत आहे. हे माझ्यासाठी कठीण संभाषण आहे,” कामथ व्हिडिओमध्ये म्हणतात. यावर पंतप्रधान मोदी हसत हसत उत्तर देतात, “हा माझा पहिला पॉडकास्ट आहे, तुमच्या प्रेक्षकांना तो कसा आवडेल हे मला माहित नाही.” पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये काय लिहिले?ट्रेलर पोस्ट करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले, “मला आशा आहे की तुम्हालाही ते बनवण्यात आम्हाला जितका आनंद झाला तितकाच आनंद तुम्हालाही मिळाला असेल!” ट्रेलरमध्ये, कामथ पॉडकास्टचा उद्देश स्पष्ट करतात, जो राजकारण आणि उद्योजकता यांच्यातील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी पंतप्रधान मोदींना जगातील सध्याच्या परिस्थितीबद्दल, विशेषतः युद्धांबद्दल प्रश्न विचारले.

PM Modi: ‘प्रत्येकजण चुका करतो, मी देव नाही…’; पंतप्रधान मोदींनी सर्वकाही सागितलं Read More »

Nilesh Lanke: अजित पवार गटात प्रवेश करणार? खासदर लंकेंनी स्पष्ट सांगितलं

Nilesh Lanke: राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार पक्षाचे खासदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. खासदार सुनील तटकरे यांनी खासदारांना संपर्क केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर आता खासदार निलेश लंके यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, पक्ष प्रवेशबद्दल चर्चा खोटी आहे. मी किंवा माझ्याबरोबर असलेल्या खासदारासोबत अशी चर्चा झाली नाही.आम्ही सर्वजण संसदेमध्ये आदरणीय सुप्रिया ताई सोबत काम करत आहोत. चर्चा फक्त माध्यमांमध्ये होत आहे. बीड प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी ही चर्चा असू शकते. असं निलेश लंके म्हणाले. तसेच आमचे खासदार संपर्क कोणाशी करणार नाही असं देखील ते म्हणाले. तर विधानसभेला पक्षाला जे अपयश आलं त्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता व पक्ष संघटना कशी मजबूत करायची यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पक्ष संघटनेतच्या नेतृत्वात बदल किंवा खांदेपालट असे संकेत दिले गेले नाहीत. सर्वांना सोबत घेऊन घराघरात पक्ष संघटनेचे पोहोचवण्याचा काम करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तर दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. जर मुंडेंचा तो जवळचा कार्यकर्ता आहे. नैतिकता म्हणून त्यांनी आपली भूमिका अधिकृत केली पाहिजे. असं खासदार लंके म्हणाले. याच बरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका एकत्र लढवण्याचा प्रयत्न केला जाईल. अशी देखील माहिती त्यांनी दिली.

Nilesh Lanke: अजित पवार गटात प्रवेश करणार? खासदर लंकेंनी स्पष्ट सांगितलं Read More »

Maharashtra News: मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, वैद्यकीय शिक्षण,अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभागांचा घेतला आढावा

Maharashtra News: शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्यावत करून त्या अधिक दर्जेदार द्या. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या बळकटीकरण करा. औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करा. भविष्यातील आव्हाने ओळखुन प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभाग यांना पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बैठक झालीया बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत रक्त दान मोहीम, अवयव दान,स्तनाचा कर्करोग जनजागृती आणि उपचार, लठ्ठपणा जनजागृती आणि उपचार, मिशन थायरॉईड, अंधत्व प्रतिबंधात्मक उपाय योजना,मिशन मौखिक आरोग्य मोहीमांची प्रभावी अंमलबजावणी करा. वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि परिसर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कार्यान्वित करणे, आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत प्रकृती परीक्षण अभियान, योगा सेंटरची स्थापना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या छतावरती सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करणे, वैद्यकीय संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करणे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करा व योजनेत सुधारणा करणे, वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते उत्तीर्ण होईपर्यंतच्या शैक्षणिक प्रक्रियेचे व्यवस्थापन पुढील शंभर दिवसात प्राधान्याने करा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन विभागात ऍलोपॅथी औषध निर्माते, रक्तपेढ्या, शासकीय रुग्णालयातील सर्व औषधांच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासणी,फूड टेस्टिंगसाठी लॅबोरेटरी सुरू केली आहे तेथील कामकाज सुरू करणे या सर्व बाबी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. दुध भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा,अन्न व औषध अंतर्गत नोंदणी व परवाने तपासणी,मंदिर व देवस्थाने येथील प्रसाद गुणवत्ता तपासणी ही कामे प्राधान्याने करा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,राज्यात कार्यरत अधिकारी व कर्मचारी कर्मचाऱ्यांशी निगडित सेवा अधिक सुलभ होण्यासाठी भर देण्यात यावा. कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी वेगवेगळे प्रशिक्षण व उपक्रम राबवा.विभागांतर्गत परीक्षा, नियुक्ता वेळेत देणे, बदल्या, गोपनीय अहवाल, स्थायित्व लाभ, सेवानिवृत्ती प्रकरणाबाबतची कार्यपद्धती सुलभता आणणे,वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती आणि पदोन्नतीचा मानिव दिनांक देणे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावी.भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि प्रशासन गतिमान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता,ब्लॉकचेन सायबर सुरक्षितता, सांख्यिकीय माहिती गोळा करणे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांना द्या असेही त्यांनी सांगितले. बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनीक, अपर मुख्य सचिव (वित्त) विभाग ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे,अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा,प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, आयुक्त राजीव निवतकर, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते.

Maharashtra News: मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, वैद्यकीय शिक्षण,अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभागांचा घेतला आढावा Read More »

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, आता राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’

Devendra Fadanvis : राज्यात ‘ई कॅबीनेट’ आणि या बैठकीत होणारे निर्णय पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कारभार गतीमान आणि पारदर्शी करण्यावर भर दिला असून मंत्रिमंडळातील निर्णय लोकांपर्यंत तातडीने पोहचणे, त्यातून शासकीय कामकाजाला गती देणे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. याबाबतचे सादरीकरण आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केले. राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ई कॅबीनेटचा निर्णय घेतला आहे. ‘ई-कॅबिनेट’ हा राज्य शासनाचा पर्यावरणपूरक उपक्रम आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी कागदांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर कमी करण्यासाठी हे संपूर्ण आयसीटी (ICT) सोल्यूशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या हरित उपक्रमांतर्गत स्मार्ट टॅब्लेट्सद्वारे कागदविरहीत मंत्रिमंडळ बैठक सहज पार पडू शकेल. या प्रणालीमुळे मा. मंत्र्यांसाठी अत्यंत सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध होईल. त्याचबरोबर आवश्यक संदर्भ शोधणे, कृती बिंदू (ॲक्शन पॉइंट) पाहणे आणि घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत पुनरावलोकन करणे सोपे होईल. ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचे, निर्णयांचे व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचे जतन होईल. मंत्रिमंडळ निर्णय आणि त्यासंबंधीचे संदर्भ शोधणे सहज शक्य होईल. ही प्रणाली पूर्णपणे डीजिटल स्वरूपात असून याद्वारे प्रत्येक टप्पा सहज पार पाडला जाईल. आतापर्यंत होत आलेल्या पारंपरिक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येईल. मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणारा प्रस्ताव ऑनलाईन अपलोड करणे, तो मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठी आणि निर्णयासाठी सादर करणे, त्यावर अंतिम निर्णय व त्याबाबतच्या सर्व नोंदी ठेवणे, ही सर्व प्रक्रिया सहजरित्या पार पडणार आहेत. हा सुशासनाच्या पूर्ततेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रणालीमुळे कागदांचा वापर कमी होण्यासोबतच मंत्रिमंडळाचा आणि या प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ वाचणार आहे.

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, आता राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ Read More »