DNA मराठी

राजकीय

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप

Jayakumar Rawal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. तर आता मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले असल्याचा आरोप शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल गोटे यांनी केला आहे. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या बुडाताखाली आपली जमीन जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे सांगून शासनाची फसवणूक केली आहे. मात्र असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला आहे. तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेटीस धरून सदर कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याचे म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारावर तक्रार देखील दिली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. मंत्री जयकुमार रावल तसेच धुळे महानगरपालिका भ्रष्टाचार विरोधात अनिल गोटे हे सातत्याने आवाज उठवत आहे व वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागत असल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनिल गोटे यांच्या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाली असून मराठवाड्यातील बीड पॅटर्न प्रमाणे धुळ्यातील राजकीय विरोधक असलेले अनिल गोटे यांचा संतोष देशमुख सारखाच बंदोबस्त केला पाहिजे अशी चर्चा झाली असल्याचे आपल्याला पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खात्रीशीर माहिती दिली असल्याचे अनिल गोटे यांनी यावेळी सांगितले.

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप Read More »

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार 2100 रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा

Ladki Behen Yojana : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरणारी लाडकी बहिण योजना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असल्याची घोषणा महायुती कडून करण्यात आली होती मात्र आतापर्यंत याबाबत सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने विरोधक महायुती सरकारवर जोरदार टीका करत आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025 – 26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे.अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेसाठी 36 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र या अर्थसंकल्पात देखील लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सभागृहात महायुती सरकारविरोधात विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राजकोषीय संतुलन साधल्यानंतर, महाराष्ट्र सरकार आपले निवडणूक आश्वासन पूर्ण करेल आणि माझी लाडकी बहीणयोजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये केला जाईल. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार 2100 रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा Read More »

Tamil Nadu ₹ Symbol : तामिळनाडूत हिंदी विरोध, सरकारने अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह काढले

Tamil Nadu ₹ Symbol : गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेचा विरोध मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तर आता तमिळनाडू सरकारने मोठा निर्णय घेत राज्याच्या अर्थसंकल्पातून ₹ हे चिन्ह काढून टाकले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सरकारने ₹ च्या जागी ‘ரூ’ (ru) चिन्ह स्वीकारले आहे, जे तमिळ लिपीतील एक अक्षर आहे. देशभरात ₹ चिन्ह बदलण्याची ही पहिलीच घटना आहे आणि तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या भाषा वादाशी याचा संबंध जोडला जात आहे. रुपया (₹) चिन्ह उदय कुमार धर्मलिंगम यांनी डिझाइन केलेल्या भारतीय तिरंग्यापासून प्रेरित होते. धर्मलिंगम हे तामिळनाडूचे आहेत आणि त्यांची रचना पाच निवडलेल्या चिन्हांमधून निवडण्यात आली. हे चिन्ह 2010 मध्ये स्वीकारण्यात आले आणि ते भारतीय चलनाचे अधिकृत चिन्ह बनले. विशेष म्हणजे, धर्मलिंगम हा तामिळनाडूतील एका माजी आमदाराचा मुलगा आहे. ₹ च्या जागी नवीन चिन्हआता, तामिळनाडू सरकारने ₹ चिन्हाऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावण्याचा निर्णय राज्यात सुरू असलेल्या हिंदी विरोधी चळवळीशी जोडला जात आहे. तामिळनाडूमध्ये हिंदीविरुद्ध बऱ्याच काळापासून राजकीय संघर्ष सुरू आहे आणि अलीकडेच मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही या मुद्द्यावर विधान केले आहे. हिंदी लादण्याच्या प्रयत्नामुळे भारतातील प्राचीन भाषा धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक स्थानिक भाषा नाहीशा होत आहेत, असे स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणच्या भाषांचे उदाहरण दिले, जिथे हिंदीच्या दबावाखाली स्थानिक भाषा मरत आहेत. त्यांच्या मते, हिंदीने अनेक भाषा आत्मसात केल्या आहेत आणि त्यामुळे त्या भाषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या निर्णयानंतर राज्यात पुन्हा भाषेबाबत वाद सुरू झाला आहे. तामिळनाडू सरकारच्या या पावलामुळे राज्याची, विशेषतः हिंदीबद्दलची भूमिका स्पष्ट होते आणि सांस्कृतिक ओळखीचे संरक्षण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

Tamil Nadu ₹ Symbol : तामिळनाडूत हिंदी विरोध, सरकारने अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह काढले Read More »

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प अन् थोरात-विखे पुन्हा आमनेसामने

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदले असून 11 विधानसभा मतदारसंघात महायुतीने बाजी मारली आहे. संगमनेरमध्ये देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर विखेंनी बाळासाहेब थोरात यांना राजकीय दृष्ट्या मोठा धक्का दिला असल्याची चर्चा सुरू झाली होती मात्र पुन्हा एकदा जिल्ह्यात थोरात विरुद्ध विखे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. या संघर्षाचे प्रमुख कारण म्हणजे नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा मुद्दा. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पनाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्यासाठी 30 टक्के जमिनीचे संपादन झाले आहे. या प्रकल्पामुळे या भागातील विकासाच्या नव्या दिशा खुल्या होतील, परंतु त्याचबरोबर राजकीय नेत्यांमधील वादही तीव्र होत आहेत. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील हा वाद केवळ प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतच नाही तर त्याच्या राजकीय फायद्यांबाबतही आहे. आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालयसंगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या मुद्द्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या कार्यालयाची स्थापना आश्वीलाच होणार असल्याची स्पष्टोक्ती केली आहे. या मुद्द्यावरून थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय शह-काटशह सुरू आहे. राजकीय परिणामया संघर्षाचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर पडतील. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हे दोन्ही दिग्गज नेते आहेत आणि त्यांच्यातील वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. या वादाचा फायदा इतर राजकीय पक्षांना घेता येऊ शकतो, ज्यामुळे राज्यातील राजकीय स्थिती अधिक जटिल होऊ शकते. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील संघर्ष हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. या संघर्षाचे परिणाम राज्याच्या राजकीय भूमितीवर पडतील आणि त्याचा फायदा घेण्यासाठी इतर राजकीय पक्षांना संधी मिळू शकते.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प अन् थोरात-विखे पुन्हा आमनेसामने Read More »

शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, कारवाई करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल

Vijay Wadettiwar : रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळला. या प्रकरणी पुरवठादार वर कारवाई करणार का? असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बालकांच्या पोषण आहाराचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. वडखळ इथे ज्या पाकिटात मृत उंदीर सापडले त्याचे नमुने दोन प्रयोगशाळा देऊन त्यांनी तपासणी केली नाही, हे गंभीर आहे. या प्रयोगशाळा या सरकारच्या असून जर ते ही नमुने तपासात नाही तर काय कारवाई करणार? अशी पाकीट जे पुरवठादार बनवतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? पोषण आहारात जर असे अन्न असेल तर तो बालकांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणाला जबाबदार धरणार, असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री यांनी केली. ही समिती झालेल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनी ही नमुने तपासले नाही, या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार यात जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अस महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या.

शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, कारवाई करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल Read More »

काँग्रेसला धक्का, माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत

Ravindra Dhangekar : हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नकली आवाजातील व्हिडिओ करण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते तर कोणी कुठे गेले नसते, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  यावेळी शिवसेना उपनेते डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, आमदार शरद सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण उचलला आणि भगवा हाती घेतला. रवींद्र धंगेकर हे पुण्यातले लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे. कामातून त्यांनी ओळख निर्माण केली. ते 25 वर्ष नगरसेवक होते. त्यापैकी शिवसेनेचे 10 वर्ष नगरसेवक होते. शिवसेनेत आल्याने आता लोकांना कळेल धंगेकर कोण, असे शिंदे म्हणाले. तुमचा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत धंगेकर यांना 4 लाख 60 हजार मते मिळाली. यातून तुमचे काम आणि लोकप्रियता दिसून येते, अशा शब्दांत शिंदे यांनी धंगेकर यांचे कौतुक केले.   उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता पण मला लोकांनी हलक्यात घेतलं. त्यानंतर जे घडलं त्याची देशाने नाही तर जगातील 33 देशांनी दखल घेतली. एक सामान्य कार्यकर्ता काय करु शकतो हे जगाने पाहिले. शिवसेनेकडून 80 पैकी 60 आमदार निवडून आले आणि खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्याला बळ देणारे आपण आहोत कपडे सांभाळणारे नाहीत, असे शिंदे म्हणाले. खुर्चीसाठी 2019 मध्ये ज्यांनी मोह केला त्यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला. आपल्याला खुर्चीचा मोह नाही महाराष्ट्राला पुढे न्यायचे हा एकच ध्यास आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालाय असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांच्या नकली आवाजातील व्हिडिओ दाखवण्यात आला. बाळासाहेबांचे जुन्या रेकॉर्ड्स जपून ठेवल्या आहेत असे ते सांगतात पण नकली लोक नकलीच कामे करणार असा टोला त्यांनी यावेळी उबाठावर लगावला. याऐवजी बाळासाहेबांचे विचार जपले असते तर फायदा झाला असता, कोणी कुठे गेले नसते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.   धंगेकर म्ङणाले की, शिवसेनेचा 10 वर्ष नगरसेवक होतो. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्राने पाहिले. कॉमन मॅन म्हणून शिंदे यांनी काम केले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करु, अशी भावना धंगेकर यांनी व्यक्त केली. धंगेकर यांच्यासमवेत सुरेश जैन, बाळासाहेब आंबरे,  प्रणव धंगेकर, गोपाळ आगरकर, मिलिंद अहेर, अजित ढोकरे, रवींद्र खेडेकर, संजय पासोलकर, सतीश ढगे, राजू नाणेकर आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी प्रवेश केला.  यामुळे पुण्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे.

काँग्रेसला धक्का, माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत Read More »

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025 – 26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे महसुली तूट ही 20 हजार कोटी वरून वाढून 45 हजार 892 कोटी दाखवली आहे. मागच्या वर्षी 20 हजार कोटींची तूट दाखवलेली ती 26 हजार 536 कोटींवर सुधारित अंदाजाने पोहोचली. म्हणेज एकूण तूट 60 हजार कोटींपर्यंत जाईल. राजकोषीय तूट देखील 1 लाख 10 हजार कोटीवरून आज ती 1 लाख 36 हजार कोटींवर गेली आहे. हा आकडा सुद्धा दीड लाख कोटींपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. असं जयंत पाटील म्हणाले. तसेच अधिक्याचे बजेट करण्याची परंपरा या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे. त्याचा फटका सर्वांनाच विशेषता आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील योजनांवर होत आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना सेव्हन हेवन सारख्या आहेत. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. असेही यावेळी ते म्हणाले. शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाहीया अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनीशिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ती बंद करण्याचा सरकारचा दृष्टिकोन दिसतोय अशी आमची शंका आहे. तसेच आनंदाचा शिधा यावर देखील भर देण्यात आलेला नाही. कारण आता निवडणुका नाहीत. त्यामुळे या योजनांची गरज फारशी राहिलेली नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली. निवडणुकीत केल्या गेलेल्या कुठल्याही घोषणेची पूर्तता या बजेटमध्ये केली गेलेली नाही. लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 वरून 2100 होण्याची अपेक्षा होती पण तेही घडले नाही. 25 लाख रोजगार निर्माण करू अशी घोषणा केली होती प्रत्यक्षात फक्त 90 हजार रोजगार निर्मितीचे अर्थसंकल्पात नमूद केल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल Read More »

Pankaj Asia : नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू

Pankaj Asia : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

Pankaj Asia : नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू Read More »

मोठी बातमी! शेतकऱ्यांना आकारी पड जमिनी परत मिळणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय

Maharashtra News : शेतकऱ्यांनी आकारी पड जमिनीच्या चालू वर्षाच्या प्रचलित बाजारमूल्याच्या प्रस्तावित २५ टक्के रक्कम ऐवजी ५ टक्के रक्कम शासनास जमा केल्यास, हस्तांतरणास निर्बंध या अटीवर ही जमीन त्यांना परत करण्यात येईल. याचा लाभ राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना मिळणार आहे. आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतूदीत सुधारणा करण्याबाबतचे विधेयक विधीमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात मान्यतेसाठी आज सादर करण्यात आले. तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या आकारी पड म्हणून शासन जमा करण्यात येतात. राज्यात अशा ४ हजार ८४९ एकर जमिनी शासन जमा झाल्या होत्या. अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज १२ वर्षांच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे. तथापि, १२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती. ही तरतूद बदलण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे आकारीपडची कार्यवाही तातडीने होऊन शासनाकडे जमा झालेल्या एकूण १०९३ आकारीपड प्रकरणांत साधारण ४ हजार ८४९.७१ एकर क्षेत्र आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना तसेच त्यांच्या वारसांना माफक दरात परत मिळणार आहेत. आकारीपड जमिनी म्हणजे काय?शेतजमीन मालकांनी शेतसारा भरला नाही, पिके घेतली नाहीत, अशा जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारने मालकी हक्क लावला. मात्र, या जमिनी मूळ मालकाकडेच ठेवण्यात आल्या. त्यामुळे जमिनी मालकाची वहिवाट असली, तरी या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारी मालकी असल्यामुळे त्यांना आकारीपड जमीन म्हटले जाते. पड जमिनींचा तपशील कलम २२० अन्वये कारवाई झालेली एकूण प्रकरणेकोकण विभाग : ३१पुणे विभाग: ५९७नाशिक विभाग: ४६५ सरकारचा ताबा असलेली प्रकरणेकोकण विभाग :१७पुणे विभाग: ६९नाशिक विभाग: ४४ माझी सुरूवातच माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याने झाल्याचा मला आनंद आहे. दुष्काळ अथवा अनेक अडचणींनी ज्या शेतकऱ्यांनी सरकारला महसूल दिला नाही, त्यामुळे या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या होत्या. किमान पन्नास वर्षांपासून याबाबतचा निर्णय प्रलंबित होता. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतल्यावर आज कायद्यात सुधारणा करणे शक्य झाले. शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. असं यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना आकारी पड जमिनी परत मिळणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय Read More »

Satyajeet Tambe : नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा, सत्यजीत तांबे आक्रमक

Satyajeet Tambe : संगमनेर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला जात असून, याला आमदार सत्यजीत तांबे यांनी विरोध केला असून हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी सभागृहात केली आहे. आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे सोयीचे नसून, अनेक गावांतील नागरिकांसाठी ते गैरसोयीचे ठरणार आहे. या कार्यालयाला जोडण्यात येणाऱ्या गावातील नागरिकांना शहर ओलांडून पुढे 20-25 किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्वी बुद्रुकला जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जाणार असून, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रस्तावाला सभागृहात तीव्र विरोध केला आहे. “जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित करणे, हे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे. प्रस्तावावर नागरिकांची नाराजीसंगमनेर तालुक्यातील नागरिकांनी या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “प्रशासनाने जनतेच्या सोयीसुविधांचा विचार न करता हा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Satyajeet Tambe : नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा, सत्यजीत तांबे आक्रमक Read More »