DNA मराठी

राजकीय

asaduddin owaisi

Asaduddin Owaisi: MIM ठरवणार नगरचा महापौर; असदुद्दीन ओवैसी विरोधकांवर भडकले

Asaduddin Owaisi : अहिल्यानगर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना नगरचा महापौर आम्ही ठरावावर असा दावा एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केल्याने शहरातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त आणि जर त्यांनी पैसे वाटले तर पैसे घ्या आणि त्या पैशातून त्यांच्याच नावाने शौचालय बांधा असा टोला देखील लावला आहे. बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या. तिथे महिलांनी एकत्र येऊन एमआयएमला मतदान केलं. पुरुषांनी मतदान दिलं नाही तरी त्यांच्या घरातील महिलाच एमआयएमला मत देणार. एमआयएमला इथवर पोहोचवण्यात महिलांचा वाटा सर्वात मोठा आहे असं देखील या सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले. महापौर नगरचा MIM च ठरवेल जर तुम्ही आमचे सहा उमेदवार जिंकून दिले तर आम्ही नगरचा महापौर ठरवणार असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तसेच या निवडणुकीत मला पूर्ण विश्वास आहे हे जालीम हरतील. घरातील महिलांनी आम्हाला लढायला शिकवलं,असं सांगत त्यांनी मतदारांना निर्भय मतदानाचं आवाहन केलं. विरोधक पैशाच्या जोरावर लढत आहेत पैसे न पाहता विकास पाहा. 15 तारखेला न घाबरता मतदान करा असा स्पष्ट संदेश दिला.

Asaduddin Owaisi: MIM ठरवणार नगरचा महापौर; असदुद्दीन ओवैसी विरोधकांवर भडकले Read More »

ganesh bidkar

Pune Election: भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…

Pune Election : भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगावर धावून जात शिवीगाळ केल्याचा आरोप असून निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. हा प्रकार 10 जानेवारी रोजी सायंकाळी मंगळवार पेठेतील सदानंद नगर परिसरात घडला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आदित्य दीपक कांबळे (वय 24) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निलेश आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंगळवार पेठेत थांबले होते. याचवेळी भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्तेही शुभेच्छा देण्यासाठी आल्याने परिसरात गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी सागर कांबळे याने गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

Pune Election: भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल… Read More »

chandrkant patil

Chandrkant Patil on Ajit Pawar: मोफत प्रवासाची घोषणा फसवी; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर थेट वार

Chandrkant Patil on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात पीएमपीएमएल आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवास करण्याची केलेली घोषणा फसवी असून, ती राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात न घेता केली आहे. ही घोषणा स्वागताहार्य जरी असली तरी ती राज्य सरकारशिवाय अमलात येऊ शकत नाही. अजित पवार यांना एकट्याने ही घोषणा जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केला.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. पाटील म्हणाले, बिहार निवडणुकीत काँग्रेसने अशा अनेक फसव्या घोषणा केल्या होत्या. मात्र, सरकारच येणार नसल्याचे माहीत असल्याने अशा घोषणा करण्यात आल्या. अजित पवार यांनाही महापालिकेत आपली सत्ता येणार नसल्याचे माहीत असल्याने अशा घोषणा करण्यात येत आहेत. ‘ही योजना चांगली असली तरी तिची अंमलबजावणी करण्यासाठी महायुती सरकारला हा एकत्रित निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे केवळ क्रेडिट घेण्यासाठी पवार यांनी आपल्या मित्र पक्षांना विश्वासात न घेता अशा घोषणा करू नये, पाटील म्हणाले. यापूर्वी 1999 ला अजित पवार यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. सरकार आल्यानंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा बचाव त्यांनी केला होता. असाच प्रकार या घोषणेबाबतही होण्याची दाट शक्यता आहे,’ असा चिमटाही पाटील यांनी काढला. मुख्यमंत्रीपदाकडे संपूर्ण राज्याचे अधिकार असतात. केवळ एक बटण दाबून मोफत बस योजना लागू होऊ शकत नाही. महायुती हे तिघांचे सरकार असून कोणताही एक नेता स्वतंत्रपणे अशा प्रकारच्या घोषणा करू शकत नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हमीपत्र जाहीर केले असून घोषणापत्रावरून त्यांचा प्रवास हमीपत्राकडे आला आहे, कारण अनेक घोषणा पूर्ण करणे त्यांना शक्य नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. मेट्रो आणि पीएमपीएमएल बसमध्ये मोफत प्रवास देण्याची घोषणा करताना त्यामागील प्रक्रिया, आर्थिक तरतूद आणि अंमलबजावणी याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. पीएमपीएमएल बससेवा सध्या तोट्यात असून, पुण्याचा पालकमंत्री असताना बससेवेचा सुमारे एक हजार कोटी रुपयांचा तोटा होता, अशी आठवण त्यांनी करून दिली. अद्याप एमएनजीएलचे 65 कोटी रुपये मनपाकडे थकीत असताना मोफत बस योजना कशी राबवणार? त्यासाठी राज्य सरकारच्या मदतीची आवश्यकता असून हा निर्णय महायुती सरकारला घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले. महिलांना उच्च शिक्षणासाठी 50 टक्के शुल्क माफीचा निर्णय घेण्यासाठी अजित पवार यांनी सहा महिने लावले होते. राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याची त्यांची भूमिका होती. अखेरीस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर तो निर्णय घेण्यात आला. अशी भूमिका अजित पवार हे केवळ महापालिका निवडणुकीच्या तोंडावर करत असलेल्या घोषणा आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत, असे ही पाटील म्हणाले. दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अंतर्गत सर्व्हेनुसार सध्या 115 जागा मिळत असून भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या मायक्रो प्लॅनिंगमुळे हा आकडा 125 पर्यंत जाईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. निवडणुकीनंतर पुण्यात भाजपचाच महापौर होईल आणि त्या पदासाठीची विविध प्रवर्गानुसार नावेही अंतिम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Chandrkant Patil on Ajit Pawar: मोफत प्रवासाची घोषणा फसवी; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर थेट वार Read More »

ajit pawar

Pune Election : ‘1 अलार्म, 5 काम’: गतिमान पुण्यासाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Pune Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा पुणेकरांसमोर मांडला.  ‘अष्टसूत्री प्रगती’ (विकासाचे आठ स्तंभं) आणि ‘अष्टावधानि नेतृत्व’ (आठ दिशेचं सजग नेतृत्व) या तत्त्वांवर आधारित हा जाहीरनामा पुण्याच्या सुयोग्य आणि जबाबदार विकासाची दिशा दर्शवतो.   सहा महिन्यांचे सखोल सर्वेक्षण, प्रभागनिहाय संवाद आणि जनसंवाद मोहिमेतून तयार झालेल्या या जाहीरनाम्याने पुणेकरांच्या अपेक्षा आणि स्थानिक समस्यांचा सखोल अभ्यास केला आहे. यामधून जनता घोषणेपेक्षा खात्रीशीर अंमलबजावणीची अपेक्षा ठेवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ‘अष्टसूत्री–अष्टावधानि’ हा आराखडा अजितदादांच्या तीन दशकांच्या प्रशासकीय अनुभवावर आधारित आहे. सतत जागरूक राहणे, प्रशासनाचा सखोल अभ्यास आणि कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावा ही त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख आहे. वेळेत निर्णय घेणे, नियोजन आणि शिस्तबद्ध काम आणि कामात विलंबाला शून्य सहनशीलता हे त्यांच्या कामाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. अष्टसूत्री प्रगती – पुण्याच्या पुनर्बांधणीसाठी आठ स्तंभ दररोज पाणीपुरवठा: सर्व 41 प्रभागांमध्ये उच्च दाबाने नियोजित वेळापत्रकानुसार पाण्याचा पुरवठा, टँकरची आवश्यकता संपविणे, पाईपलाईन गळती पूर्णपणे बंद करणे आणि भामा–मुळा–मुठा प्रकल्पांतून अतिरिक्त पाणी उपलब्ध करणे.   वाहतूककोंडीमुक्त, खड्डेमुक्त रस्ते: अपूर्ण लिंक रस्त्यांची जोडणी, मुख्य 150 किमी रस्त्यांचा दर्जा सुधारणे, एचसीएमटीआरची अंमलबजावणी, ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करणे आणि नव्याने समाविष्ट गावांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे.   स्वच्छतेचा विज्ञाननिष्ठ आराखडा: 100% कचरा वर्गीकरण आणि कंपोस्टिंग, अपयशी प्रकल्पांचं पुनरुज्जीवन, हरित सोसायट्यांना प्रोत्साहन आणि 2029 पर्यंत पुणे ‘स्वच्छ सर्वेक्षण’मधील अग्रगण्य तीन शहरांत समावेश करणे. हाय-टेक आरोग्य सेवा: 200 ‘राजमाता जिजाऊ क्लिनिक’, या नव्या रुग्णालयांची उभारणी, परवडणारी तपासणी सेवा (PPP पद्धतीने), टेलिमेडिसिनचा उपयोग आणि गरीब रुग्णांसाठी वाढीव आर्थिक सहाय्य.   प्रदूषणमुक्त, उत्तम हवामानयुक्त पुणे: पूर नियंत्रण, ड्रेनेज नियोजन, नाल्यांचे संरक्षण, हरित विस्तार, पर्यावरण सक्षमीकरण आणि हवामान बदलास सज्ज असा शाश्वत विकास आराखडा.   झोपडपट्टी पुनर्वसन व सुरक्षित पुनर्विकास: मूळ जागेवर पुनर्वसन, कायदेशीर धारकांना संरक्षण, पारदर्शी कारभार, उपजीविकेची हमी आणि जुन्या इमारतींच्या रहिवाशांच्या नेतृत्वात पुनर्विकास प्रक्रिया.   पुणेकरांसाठी जबाबदार प्रशासन निर्मिती: मोफत मेट्रो व बस प्रवास, छोट्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत, विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट, व्याजमुक्त स्वयंरोजगार कर्ज आणि तातडीची प्रतिसादक्षमता असलेलं प्रशासन.   पुणे मॉडेल शाळा: CBSE/ICSE दर्जानुसार 150 आधुनिक शाळा, प्रशिक्षित शिक्षक, विज्ञान- संगणक प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा, मराठी माध्यमावर आधारलेली इंग्रजी शिक्षण पद्धती आणि पालकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार नसणार.  

Pune Election : ‘1 अलार्म, 5 काम’: गतिमान पुण्यासाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध Read More »

sanjay shirsat

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील खोटारडा आणि ब्लॅकमेलर; संजय शिरसाट स्पष्ट बोलले

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील हा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेल करण्यात तो एक नंबरचा माहीर आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, ते कार्यकर्ते याच्यासाठी जीव ओवाळून टाकणारे होते. मात्र इम्तियाज जलीलने पैसे घेऊन तिकीटे विकली आणि त्या कार्यकर्त्यांना देशोधडीला लावले. त्यामुळेच आज कार्यकर्ते आपला संताप व्यक्त करत आहेत. “जैसी करणी, वैसी भरणी” हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळाले आहे. जे “शेर आया, शेर आया” म्हणत होते, त्याच इम्तियाज जलीलला आज पळावे लागत आहे. “जनता मेरे साथ है” म्हणणारा आज शेपूट घालून पळत आहे, आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. इम्तियाज जलीलने जे केले, त्याची किंमत त्याला मोजावी लागत आहे. पोलीस संरक्षणात गुंड पाठवण्याची गरज नाही. ज्यांनी दगडफेक केली किंवा हल्ला केला, त्यांना पोलिसांनी पकडून का मारले याची चौकशी केली पाहिजे. “माझे कोणी वाकडे करू शकत नाही, ओवेसी माझ्यासोबत आहे,” अशी जी इम्तियाज जलीलची मस्ती होती, त्याचे उत्तर आज त्याला मिळाले आहे. ओवेसी भडक भाषण करून मुस्लिम समाज माझ्यासोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत, मात्र त्याला उत्तर कार्यकर्त्यांनी आधीच दिले आहे.

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील खोटारडा आणि ब्लॅकमेलर; संजय शिरसाट स्पष्ट बोलले Read More »

mns

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक

BMC Election: नवी मुंबईत भाजपच्या उमेदवारांकडून प्रचार पत्रके गुजराती भाषेतून वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रचार पत्रकाला मनसेने विरोध दर्शवला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत भाजपवर टीका केली आहे. भाजपकडून मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिल्याचे सांगितले जाते, मात्र नवी मुंबईत त्यांचेच उमेदवार गुजराती भाषेचा वापर करून नेमकं कोणाला आकर्षित करत आहेत? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. “हे प्रचार पत्रक मराठी भाषेत का वाटले गेले नाही? मराठी भाषेला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय?” असा थेट प्रश्न गजानन काळे यांनी विचारला आहे. नवी मुंबई शहराची ओळख ही आगरी-कोळी भाषा आणि संस्कृतीची ओळख असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक Read More »

imtiaz jaleel

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा

BJP MIM Alliance: राज्यातील राजकारणात चर्चेत आलेल्या अकोट नगरपालिकेत आज मोठी राजकीय घडामोडी घडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष अकोटकडे लागले आहे. अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने शहरातील विकासासाठी अकोट विकास आघाडीची स्थापना करत भाजपने एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह युती केली आहे. भाजपने थेट एमआयएमशी युती केल्याने विरोधक भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर युती झाली असून स्थानिक पातळीवर ज्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपसोबत युती मान्य नसून युती तोडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना अकोटमध्ये भाजपशी युती होणार नाही. युती तोडण्याचे आदेश दिले आहे. असं इम्तियाज जलील म्हणाले. तसेच जाती जातीत भांडण लावणे तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असेही यावेळी इम्तियाज जलील म्हणाले. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र

Maharashtra Politics : एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून 29 महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे नुकतंच अकोट पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. अकोट येथे नुकतंच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकले होते मात्र बहुमतपासून पक्ष दूर होता. तर आता अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या पुढाकाराने एक आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीमध्ये एमआयएमला देखील स्थान देण्यात आल्याने विरोधकांकडून आता भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने या आघाडीत एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला स्थान दिले आहे. तर वंचित आणि काँग्रेसला या आघाडीपासून दूर ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे आता या आघाडीवर एमआयएम आणि भाजपच्या वरिष्ठांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अकोट नगरपालिका एकूण जागा : 35 निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार) पक्षीय बलाबल : भाजप : 11 काँग्रेस : 6 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 वंचित : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3 एमआयएम : 5 भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या ‘अकोट विकास मंचा’चे पक्षीय बलाबल : भाजप : 11 एमआयएम : 5 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र Read More »

thackeray

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध

Raj Uddhav Thackeray Interview : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत नुकतीच चित्रित झाली आहे. ही ‘दणदणीत आणि खणखणीत’ मुलाखत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली. या मुलाखतीचा टीझर ‘सामना’च्या अधिकृत X हँडल (@SaamanaOnline) वर शेअर करण्यात आला आहे. टीझरमध्ये राज ठाकरे म्हणतात, “राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे, सत्तेवर असता कामा नये!” तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नयेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीला विशेष महत्त्व आहे. मुलाखतीचा पहिला भाग गुरुवार, 8 जानेवारी 2026 रोजी ‘सामना’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित होणार आहे. ही संयुक्त मुलाखत ठाकरे बंधूंच्या राजकीय एकत्र येण्याचे प्रतीक मानली जात आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने तसेच भाजप – शिवसेना शिंदे गट युतीसह आणि काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध Read More »

suresh kalmadi

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन

Suresh Kalmadi  passed away  : माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 82 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. त्यांनी अगदी कमी वेळेत पुण्यातील राजकारणा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुरेश कलमाडी काही काळापासून ते आजाराशी झुंज देत होते. कोण होते सुरेश कलमाडी ? सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. त्यांनी पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1960 साली त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर 1964 मध्ये हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी ते जोधपूर येथील फ्लाइंग कॉलेजमध्ये दाखल झाले. 1964 ते 1972 या कालावधीत त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली. राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत 1978 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. अवघ्या 38 व्या वर्षी, 1982 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकत खासदार म्हणून प्रवेश केला. त्यानंतर जवळपास तीन दशके त्यांनी संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2010 नंतर मात्र त्यांच्या राजकीय वाटचालीला उतरती कळा लागली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले. या प्रकरणामुळे त्यांना मोठ्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले तसेच सुमारे नऊ महिने कारावासही भोगावा लागला.

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन Read More »