DNA मराठी

राजकीय

raj uddhavs historic reunion mns shiv sena ubt alliance for best patpedi elections

“राज–उद्धव युती; BEST पाटपेडीत ऐतिहासिक क्षण”

मुंबई | प्रतिनिधी –राज – उद्धव – महाराष्ट्राच्या राजकीय पटावर नवा अध्याय लिहिला जात असल्याची चिन्हे दिसू लागले आहेत. दीर्घकाळाच्या वैचारिक व संघटनात्मक फाटाफुटीनंतर ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – प्रथमच एकाच व्यासपीठावर आले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी ‘BEST पाटपेडी’ निवडणुकीसाठी युती जाहीर केली आहे. या अनपेक्षित निर्णयाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्थानिक स्तरावरील निवडणूक असली तरी, ठाकरे बंधूंचे पुनर्मिलन हा व्यापक राजकीय संकेत मानला जात आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत, एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या दोन दशकांत उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील संबंधांमध्ये अनेक चढउतार झाले. २००६ मध्ये शिवसेनेतून वेगळे होत राज ठाकरेंनी MNS स्थापन केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा आणि शब्दयुद्ध रंगत असे. त्यामुळे या निवडणुकीतली युती हा केवळ संघटनात्मक करार नसून, ‘जुन्या जखमांवर फुंकर घालण्याचा’ प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ‘BEST पाटपेडी’च्या निवडणुकीत या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “हा पहिला पाऊल आहे, पुढे मोठ्या निवडणुकीसाठीही आपण विचार करू,” असे दोन्ही नेत्यांच्या जवळच्या सूत्रांनी संकेत दिले आहेत. या युतीचे भविष्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय गोटांत रंगली आहे.

“राज–उद्धव युती; BEST पाटपेडीत ऐतिहासिक क्षण” Read More »

img 20250812 wa0001

Kajal Guru Death : तृतीयपंथी समाजातील अध्यक्ष काजल गुरु यांचे निधन; तृतीयपंथांच्या विविध प्रश्नासाठी लढणारा योद्धा गमावला

Kajal Guru Death : तृतीयपंथी समाजाचे जिल्हा अध्यक्ष व समाजकारणात सक्रीय असणारे काजल गुरु बाबू नायक नगरवाले यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून ते साईदीप हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच तृतीयपंथी समाजासह विविध सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.काजल गुरु हे तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी व सन्मानासाठी आयुष्यभर झटणारे, निर्भीड नेतृत्व होते. व तृतीयपंथीयांसाठी दफनविधीसाठी जागा नव्हती तर काजल गुरु यांनी जिल्हाधिकारी मनपा आयुक्त यांच्याशी वारंवार पत्र व्यवहार करून जपून विधीसाठी जागा उपलब्ध करून घेतली व समाजातील तृतीयपंथींना आपले हक्काचे स्थान मिळावे, समाजात त्यांचा सन्मान वाढावा यासाठी त्यांनी असंख्य लढे उभारले. केवळ आंदोलनच नव्हे तर समाजातील सदस्यांच्या शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या प्रश्नांवरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तृतीयपंथी हक्क चळवळी यशस्वीरीत्या पार पडल्या.काजल गुरु यांचे व्यक्तिमत्व सर्वसमावेशक होते. ते फक्त तृतीयपंथी समाजापुरते मर्यादित न राहता, गरजू आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठीही नेहमी पुढे असत. त्यांच्या निधनाने एक मोठे प्रेरणास्थान हरपल्याची भावना समाजात आहे.अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण याबाबत पुढील माहिती नंतर जाहीर करण्यात येणार आहे. सध्या त्यांच्या निवासस्थानी सर्वच स्तरांतील लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत.

Kajal Guru Death : तृतीयपंथी समाजातील अध्यक्ष काजल गुरु यांचे निधन; तृतीयपंथांच्या विविध प्रश्नासाठी लढणारा योद्धा गमावला Read More »

Supreme Court On Bihar SIR: आज सर्वोच्च न्यायालयात Bihar एसआयआरवर महत्वाची सुनावणी, 65 लाख मतदारांवर होणार निर्णय?

Supreme Court On Bihar SIR: बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) च्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आज 12 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांचे खंडपीठा समोर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी यापूर्वी 10 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात SIR प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला होता आणि निवडणूक आयोगाला हे काम पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिली होती. परंतु असे असूनही, मतदार यादीतून लाखो नावे वगळण्याचा मुद्दा वादांनी वेढला आहे. निवडणूक सुधारणांशी संबंधित संघटना असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे ज्यामध्ये दावा केला आहे की या प्रक्रियेअंतर्गत, बिहारमधील सुमारे 65 लाख मतदारांची नावे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, प्रक्रिया नियमांनुसार उत्तरात निवडणूक आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. आयोगाचे म्हणणे आहे की प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नसलेल्या व्यक्तींची स्वतंत्र यादी प्रकाशित करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही. याशिवाय, आयोगाने स्पष्ट केले आहे की प्रारूप यादी सर्व राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली आहे आणि जर एखाद्या व्यक्तीचे नाव त्यात नसेल, तर त्याला आपला आक्षेप नोंदवण्याचा आणि संबंधित कागदपत्र सादर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आयोगाचा पलटवार, याचिका दिशाभूल करणाऱ्या निवडणूक आयोगाने याचिका फेटाळण्याची मागणी करताना याचिकाकर्त्यांना दंड ठोठावण्याची विनंतीही न्यायालयाला केली आहे. आयोगाचा आरोप आहे की या याचिका न्यायालयाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न आहेत आणि त्या गांभीर्याने घेऊ नयेत. आयोगाने असाही युक्तिवाद केला की याचिकाकर्ते मतदारांच्या नावांची यादी वगळण्याची योग्य मागणी करू शकत नाहीत कारण अशी कोणतीही प्रक्रिया कायदेशीररित्या बंधनकारक नाही. लोकशाही प्रक्रियेत उद्भवणारे प्रश्न बिहारमधील मतदार यादीशी संबंधित या वादामुळे केवळ निवडणुकीच्या राजकारणालाच नव्हे तर घटनात्मक आणि कायदेशीर चर्चांनाही जन्म मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत, एसआयआरची प्रक्रिया पारदर्शक आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकते की त्यात खरोखरच व्यापक सुधारणांची आवश्यकता आहे. हे प्रकरण केवळ बिहारमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात लोकशाही प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबत एक महत्त्वाचे उदाहरण बनू शकते.

Supreme Court On Bihar SIR: आज सर्वोच्च न्यायालयात Bihar एसआयआरवर महत्वाची सुनावणी, 65 लाख मतदारांवर होणार निर्णय? Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : खंडणीखोरांचा सरदार कोण, जनता जाणते; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule : महायुती सरकार विरोधात आज संपूर्ण राज्यात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर देत उद्धव ठाकरे जी, खंडणीखोरांचं सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. अशी टीका केली आहे. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे जी, खंडणीखोरांचं सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कोण ‘चिफ मिनिस्टर‘ आहे? आणि कोण ‘ थिफ मिनिस्टर‘ हे देखील महाराष्ट्रातील जनतेनं दाखवून दिलं आहे. वाझे काय लादेन आहे का? असे म्हणत उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटी वसुली सुरू होती हे जनता विसरली नाही. त्यामुळे आदरणीय देवेंद्रजींवर टीका करताना जरा आपला भूतकाळ आठवा आणि विचार करून बोला बाकी इंडी आघाडीत तुमची शेवटच्या रांगेतील किंमत महाराष्ट्रानं बघितली. आजही आपल्याला शेवटच्या रांगेत उभं राहावं लागेल म्हणून तुम्ही दिल्लीतील आंदोलनात गेला नाहीत आणि इथं चार टाळके घेऊन आंदोलन केलं. असं बावनकुळे म्हणाले. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तिकडं राहुल गांधींचं आंदोलन सुरू असताना आपली वेगळी चूल मांडून तुम्ही लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न केला. उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना  लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला होता. आज देवेंद्रजींसारख्या प्रामाणिक नेतृत्वावर बोट ठेवण्याआधी तुम्ही स्वतःला आरशात पाहायला हवं. देवेंद्रजी फडणवीस यांचं काम हे फक्त भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचं नाही, तर स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचं आहे. महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्रजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला लोकं कंटाळले आहेत. असं देखील यावेळी बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : खंडणीखोरांचा सरदार कोण, जनता जाणते; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल Read More »

गोव्यातून दंगल नियोजनाचा फडणवीसांचा प्लॅन; Manoj jarang यांचा खळबळजनक दावा

Manoj jarang : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचे काम करत आहेत आणि मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हंटल आहे. सोबतच प्रशासनातील मराठा अधिकाऱ्यांना त्रास होत असेल तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याचा आवाहन जरांगे यांनी केल आहे. आपला रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का? असं विचारले असता, केवळ एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याच काम ते करत असल्याच जरांगे म्हणाले. त्यासाठी फडणवीस यांनी प्रत्येक मराठा मंत्र्यांनी सोबत त्यांचा मर्जीतील ओएसडी दिला आहे असा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती आतल्या गाठीचा असून सत्तेवर येण्यासाठी जे लोक त्यांच्याकडे कधीच जाऊ शकत नाही त्यांना देखील त्यांच्याकडे येण्यास भाग पाडले. नारायण राणे, एकनाथ शिंदे ,अजित पवार , अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांवर त्यांनी डाव टाकल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे सरकारमधील सर्व मराठा मंत्र्यांनी आणि नेत्याने देखील सावध व्हा अस जरांगे म्हणाले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसींचा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केला असल्याचा आरोप मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. फडणवीस कोणाचेच काम करत नाहीत गोरगरीब असो ओबीसी असो की मराठा कोणाचे कोणाचेही आरक्षण किंवा काम ते पटकन करत नाहीत आता त्यांनी ओबीसी साठी लढणार असल्याचं म्हटलं आहे मग मराठ्यांसाठी कोण लढणार असा सवाल उपस्थित करत गोव्यामध्ये भाजपमधील ओबीसींच्या मेळाव्यात मुंबईला येणाऱ्या मोर्चामध्ये दंगल घडवण्याची आखणी केली असल्याचा अंदाज आहे मात्र मोर्चामध्ये काही झालं तर फडणवीस जबाबदार असतील अस जरांगे यांनी म्हटलं आहे.

गोव्यातून दंगल नियोजनाचा फडणवीसांचा प्लॅन; Manoj jarang यांचा खळबळजनक दावा Read More »

aditi tatkare

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मंत्री आदिती तटकरेंची ग्वाही

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही नसल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडक्या बहिण योजनेला यशस्वी वर्षपूर्ती होत आहे. सव्वा दोन ते अडीच कोटी महिलांना आम्ही या योजनेचा लाभ देत आहोत. दोन दिवसांपूर्वीच जुलै महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक योजना ही दरवर्षी एक प्रक्रियेतून जात असते. पात्रतेचे काही नियम या योजनेसाठी आहेत.माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काही डेटा आम्हाला दिला आहे.त्यांनी दिलेल्या डेटानुसार पात्र लाभार्थ्यांना लाभ चालू राहणार, अपात्र असणाऱ्यांचा लाभ कमी होईल. 2100 रुपये देण्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री व  दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ योग्य वेळी घेईल. मात्र आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहोत. ही योजना बंद होणार नाही. असं माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी पिंक रीक्षा ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत कोल्हापुरात 700 पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना रिक्षा वाटप केले जात आहे. यावर्षी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी 400 पिंक रिक्षाचे उद्दिष्ट असल्याचीही माहिती दिली.

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मंत्री आदिती तटकरेंची ग्वाही Read More »

img 20250809 wa0001

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व”

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष बदलणे, आमदार फोडणे आणि सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेच रचणे हे काही नवीन राहिले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या सगळ्याला एक वेगळे आणि अधिक धोकादायक दिशा मिळालेली दिसते. शरद पवारांसारख्या थोर राजकारण्यांनीही भूतकाळात पक्ष फोडला, नवा पक्ष उभारला, सत्ता मिळवली. पण त्या काळात पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्याचा फोटो यावर असा थेट दावा कुणी केला नव्हता. तात्पर्य, राजकीय भूक होती, पण तिची एक मर्यादा होती. पण आज ती मर्यादा धूसर होत चालली आहे. “मी निवडून आलोय, म्हणजे माझीच मक्तेदारी,” असा अहंकार काही निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींच्या वागण्यात दिसतो. जनतेने मतदान पेटीतून ज्यांना विश्वासाने निवडलं, तेच प्रतिनिधी निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षांनाच कमी लेखतात. हीच का लोकशाही असा प्रश्न पडतो? या सगळ्या घडामोडींचा एक सकारात्मक पैलूही आहे. आज या अस्थिर आणि अस्वस्थ राजकारणात दोन तरुण नेते उभे राहताना दिसतात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे. या दोघांनीही आपल्या राजकीय प्रवासात पक्ष फोडणे, दबाव तंत्र, आमदारांची खरेदी-विक्री, विश्वासघात, एकनाथ शिंदें व अजित पवारांसारखे बंड आणि सत्तापालट यांचे साक्षीदार झाले आहेत. हे राजकारण त्यांनी बाहेरून पाहिलं नाही अनुभवलं आहे. आज हे दोघंही नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना, पक्ष रचनेचा गाभा कसा मजबूत करायचा, कार्यकर्त्यांशी नातं कसं टिकवायचं, जनतेचा विश्वास कसा जपायचा, आणि राजकारणात नैतिकता जिवंत कशी ठेवायची याचा धडा घेऊन पुढे येत आहेत. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांचा वारसा आणि ठाकरे बाणा जपण्याचा प्रयत्न केला. तर रोहित पवार यांनी शरद पवारांच्या परंपरेचा अभ्यास केला, तरुणाचे प्रश्न कसे हाताळायची आणि ग्रामीण भागातील जनतेशी थेट संपर्क कास रहायचं “शरद पवार जसे आज बहुतांशी गाडीने प्रवास करताय. असं रोहित पण काकांचा वारसा जपतानी दिसतंय, ग्रामीण भागात नाळ जुळून घेण्याचे त्याचे कौशल्य त्यांच्यात दिसते. हे दोघेही आज सत्तेच्या खेळात नाहीत, पण राजकारणाच्या अभ्यासातून आणि प्रत्यक्ष संघर्षातून त्यांनी आपले राजकीय स्थान मजबूत केले आहेत. म्हणूनच भविष्यकाळाकडे पाहताना वाटते आजच्या फोडाफोडीच्या राजकारणातूनच उद्याचं ठाम आणि विचारधारेशी बांधिल नेतृत्व उगम पावू शकतं आणि या बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे ही नावं नजरेआड करणं अशक्य आहे.

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व” Read More »

Congress On EVM : देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’; मतचोरीविरोधात काँग्रेस आक्रमक

Congress On EVM : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तासभर चक्काजाम करण्यात आला, या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजन भोसले, किशोर कन्हेरे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ यांच्यासह आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. या आंदोलनाआधी टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग व भाजपाचा खरपूस समाचार घेतला, राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरु आहे? हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला, उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले, हा आणखी हास्यास्पद प्रकार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या 1960 च्या नियमावलीनुसार, जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला तर नियम 17/18/19 नुसार ताबडतोब चौकशी करावी, असे कायदाच सांगत आहे, मग चौकशी का केली जात नाही? असे सपकाळ म्हणाले. देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’! निवडणूक आयोगाची पोलखोल केल्यानंतर भाजपाची पिलावळ राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे दलाल आहेत, वकील आहेत की प्रवक्ते असा प्रश्न पडतो. फडणवीस यांच्यात अहंकार दडलेला आहे, या अहंकराचा दर्प नाही तर दुर्गंधी त्यांच्या बोलण्यातून दिसली. हे ‘चिफ मिनिस्टर’ नाही चर ‘चिप मिनिस्टर’ आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोलले जाते तेव्हा तेंव्हा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व फडणवीस आयोगाचा बचाव करण्यास का येतात? कारण ‘दाल में कुछ काला है’ असे नाही तर सर्व दालच काळी आहे. राहुल गांधी यांनी जो घोटाळ दाखवला त्यातून निवडणूक आयोग बरोबरचे हितसंबंध उघडे पडतील याची भिती देवेंद्र फडणवीस यांना वाटत असावी म्हणूनच त्यांची फडफड होत असावी, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Congress On EVM : देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’; मतचोरीविरोधात काँग्रेस आक्रमक Read More »

raju shetty

माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला; राजू शेट्टी यांनी मानले अंबानी परिवार आभार

Raju Shetty : कोल्हापूरच्या जनतेचे महादेवीशी असलेले भावनिक नाते आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, वनताराने एक अभूतपूर्व उपाय सुचवला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात, खास करून कोल्हापूरच्या जवळच नांदणी परिसरात हत्तींसाठी देशातील पहिलं अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे केंद्र आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. वनताराने प्रस्तावित केलेल्या या केंद्रात महादेवीसाठी सर्व अत्याधुनिक आणि वैज्ञानिक सुविधा असतील. ज्यामुळे तिला उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल. लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्ही गोष्टींचा आदर करत वनताराने हा एक अनोखा तोडगा काढला काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत करत आपली भूमिका जाहीर केली आहे. राजू शेट्टी यांनी अंबानी परिवार आणि विशेषतः अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. आम्ही जैन समाजाचे असून जिओ और जिने दो या तत्वाने जगत असतो. माधुरी हत्तीची काळजी घेत नसल्याचा व तिचा छळ करण्याचा आरोप पेटाने आमच्यावर लावला. हा आरोप आम्हाला सहन नाही झाला. जीव, जंतू आणि जनावर यांच्यावर प्रेम असल्यामुळे आम्हाला त्रास झाला. यामुळे थोडा रोष निर्माण झाला होता. मात्र आता शेवट छान होत असून यामध्ये अनंत अंबानींची विशेष भूमिका राहिल्याने राजू शेट्टी यांनी अंबानी परिवाराचे आभार मानले.

माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला; राजू शेट्टी यांनी मानले अंबानी परिवार आभार Read More »

Vijay Wadettiwar on Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्या ; विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीन नसणार अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिल्यानंतर विरोधक याचा विरोध करत आहे. एक प्रभागात जास्त उमेदवार असणार, मतदारांना एकावेळी चार मते द्यावी लागणार त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागेल आणि मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिले आहे. तर आता निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी VVPAT ची आवश्यकता आहे. मतदाराने कुणाला मत दिले हे त्यांना समजले पाहिजे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशीन शिवाय घेऊ नये, या मशीन नसतील तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी हे सरकार जैन समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. भाजप आमदाराने कबुतरखाने याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, मुंबई महापालिकेने कारवाई केली. जैन समाज रस्त्यावर उतरला तेव्हा भाजपचे मंत्री या निर्णयाविरोधात जातात. म्हणजे निर्णय हेच सरकार घेणार आणि मग यू टर्न पण घेणार. नसलेले प्रश्न आणि समस्या हे सरकार निर्माण करत आहे आणि जैन समाजाचे तारणहार हे सरकार आहे असा दिखावा तयार करत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका समोर ठेवून मतांसाठी भाजप आपली राजकीय पोळी भाजत आहे ,भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. आपल्या देशाबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आहे. चीनच्या आक्रमणाबाबत त्यांनी प्रश्न विचारले तर न्यायाधीशांनी सच्चा भारतीय अस विधान करू शकत नाही, अशी टिपण्णी केली, हे योग्य नाही. देशात घडणाऱ्या घटनांबाबत सरकारला प्रश्न विचारण्याचे कर्तव्य विरोधी पक्ष नेत्यांचे आहे. पण कोण खरा भारतीय, कोण नाही याचे प्रशस्तीपत्रक न्यायाधीशांनी देऊ नये अशी स्पष्ट भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. एकीकडे भाजप प्रवक्तेपदी असलेली व्यक्ती उच्च न्यायालयात न्यायाधीश होणार दुसरीकडे न्यायाधीश विरोधी पक्ष नेते यांच्यावर टिपण्णी करतात याने न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडून जाईल. त्यामुळे देशातील लोकशाहीला गालबोट लागेल अशी विधान किमान न्यायाधीशांनी करू नये, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar on Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्या ; विजय वडेट्टीवार Read More »