DNA मराठी

राजकीय

sadabhau khot

गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू; Sadabhau Khot यांचा गंभीर आरोप

Sadabhau Khot : गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू आहे यांचे कॉर्पोरेट ऑफिस आहेत मात्र शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सरकारने कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशन समोर आम्ही जनावराच्या छावण्या उभं करू असा इशारा देखील माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी दिला. माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, गाई म्हशीमध्ये शेण दूध आमची माय बहिण बाप काढतो आणि हे गोरक्षक म्हणणारे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस मधून धंदा करत आहेत. सरकारला माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांची ही मी बोलणार आहे की बाबा शेतकऱ्यांचा व्यवसाय आशाने मरून जाईल गाड्या अडवल्या जातात त्यांना मारलं जातं त्यामुळे यावर कारवाई करा. थार सारख्या कॉर्पोरेट गाड्या मधून काही लोक पुण्या मुंबईवरून येतात आणि आमच्या गोरक्षणाचा काम करत असल्याचे सांगतात. गोरे गुंठे असतात तुम्हाला कळत नाही शहरात कुत्रे मांजर बघितले यांच्याकडे गाई गोटे कुठून आले असं सदाभाऊ खोत म्हणाले. पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनाशी आम्ही चर्चा करू जे शेतकरी नेते माझ्यावर टीका करत आहेत त्यांना या बैठकीमध्ये बोलून यावर त्वरित उपाय काढण्याचा प्रयत्न करू. आम्ही आता गोसावी जाणार आहोत काल पोलिसांच्या समोर पंचनामा केला तिचे एकही जनावर नव्हतं तेच पोलीस पुन्हा म्हणतात सात जनावर होते आज परत पोलिसांना सांगितले आमचे 21 जनावर आहेत तर ते म्हणतात हा असते त्यामुळे कोणीतरी त्यांना पाठीशी घातले हे दिसतं. पोलीस खात्यामध्ये सुद्धा या संदर्भात कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. राजस्थान इतर राज्यातून दूध देणाऱ्या गाई अशा तथाकथित गोरक्षकाकडून जर गाड्या अडवल्या तर येणार नाहीत शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान होईल शेतकरी भरडला जाईल. सरकार जरी आमचा असलं तरी मी शेतकरी नेता आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं टाकण्यासाठी आम्ही आज इथं आलो आहोत आमचे जनावर आम्हाला दिली पाहिजे. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू; Sadabhau Khot यांचा गंभीर आरोप Read More »

anjali damania

नवीन वाईन शॉप परवाने, नेत्यांना गडगंज करण्यासाठी? अंजली दमानियांचा CM फडणवीसांना प्रश्न

Anjali Damania : राज्यात महसूल वाढवण्यासाठी महायुती सरकारकडून नवीन वाईन शॉप परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहे. राज्यात नवीन वाईन शॉप परवाने देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी यासाठी नवीन धोरण आणले आहे. मात्र, या धोरणातून निवडक नेत्यांचाच फायदा होत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर राज्य सरकारवर टीका होत आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या तीन पक्षांमधील अवघ्या 12 नेत्यांच्या कंपन्यांकडे तब्बल 96 परवाने जाणार आहेत. त्यापैकी भाजपच्या 5 नेत्यांकडे 40 परवाने, तर दोन्ही राष्ट्रवादी गटातील 7 नेत्यांकडे तब्बल 56 परवाने जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. “हे शासन निधीसाठी आहे की नेत्यांना गडगंज करण्यासाठी?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दमानिया यांनी यावरून सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

नवीन वाईन शॉप परवाने, नेत्यांना गडगंज करण्यासाठी? अंजली दमानियांचा CM फडणवीसांना प्रश्न Read More »

somnath suryavanshi

Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण अखेर एसआयटी स्थापन

Somnath Suryavanshi : परभणीतील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना ८ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीची घोषणा केली आहे. या विशेष तपास पथकात खालील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या एसआयटीचे अध्यक्ष म्हणून ― १. सुधीर हिरेमठ, (सीबीआयवरून नुकतेच महाराष्ट्रात रुजू झालेले विशेष पोलीस महानिरीक्षक, सीआयडी, पुणे) २. अभिजीत धाराशिवकर – सदस्य, (पोलीस अधीक्षक, सीआयडी, नागपूर) ३. अनिल गवाणकर, सदस्य ( पोलीस उप अधीक्षक, सीआयडी, नांदेड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तपास पथकात परभणी जिल्ह्यातील कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. SIT चे अध्यक्ष हे प्रत्यक्ष अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे काम पाहणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी त्यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते, त्याविरोधात पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र, सर्वोच्च न्यायालयात पीडितांच्या बाजूने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम करत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली होती, त्यानुसार न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. आगामी काळात ही एसआयटी काय चौकशी करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण अखेर एसआयटी स्थापन Read More »

sachin sawant

Sachin Sawant : खड्डे कोण बुजवणार यावरून सरकारमध्ये गोंधळ; सचिन सावंत आक्रमक

Sachin Sawant : मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत नसल्याने तिकडमबाजीचा वापर हे तिकडम सरकार करत आहे, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने मुंबईतील टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्याची अंमलबजावणी कशी करावी याबाबत पुढे कोणताही निर्णय घेतला नाही. ३ जून २०२५ रोजी शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत एसएसआरडीसीला नुकसान भरपाई शासन देईल असा निर्णय घेतला परंतु शासनाकडे ठणठण गोपाळ असल्याने टोल गोळा करणाऱ्या आयआरबी कंपीनाला २०२९ पर्यंत जड वाहनांकडून टोल वसूली करण्याची परवानगी देण्यात आली. हा कालावधी संपल्यानंतर खरे तर मुंबई महानगरपालिकडे हे सर्व उड्डाणपुल वर्ग केले जाणार होते आणि तोपर्यंत आयआरबी कंपनीने त्याची देखभाल करावी असे अपेक्षित होते. परंतु या कंपनीने टाळाटाळ सुरु ठेवली आणि आर्थिक नियोजनाचे कारण देऊन मुंबईकरांना अद्यापही खड्ड्यांमध्ये जाण्यास भाग पाडले आहे. आता सरकारने मुदतीआधीच मुंबई महानगरपालिकेकडे मुंबईतील १९ उड्डाणपुल व काही रस्ते वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टोल वसुलीच्या माध्यमातून येणारा निधी मात्र रस्ते विकास महामंडळच घेईल आणि मुंबई महापालिका देखभालीचा खर्च स्वतः करून रस्ते विकास महामंडळाकडे झालेल्या खर्चाची भरपाई मागेल असे ठरले आहे. आता यापुढे जाऊन टोलवसुलीचा कालावधी कमी करण्याचा विचार असल्याचे समजते. ही सर्व तिकडमबाजी पाहता सरकारकडे कोणतेही नियोजन नाही, आर्थिक तरतूद, प्रशासकीय कामकाजातील सुसुत्रता तसेच संपूर्ण विचार न करता मनाला वाटेल तसे निर्णय घेतले जात आहेत व त्यात बदल करण्यात येत आहेत याचे हे उदाहरण आहे. टोल वसुलीचा कालावधी वाढवणे वा कमी करणे यामागे मनमानी कारभाराचे दर्शन सरळ सरळ दिसत आहे. अद्यापही मुंबई महापालिकेने एमएसआरडीसी कडून रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी स्विकारलेली नसल्याने मुंबईकरांना मात्र खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री गडकरी म्हणतात दोन वर्षात अमेरिकेसारखे रस्ते बनवू. तर मुख्यमंत्री म्हणतात दुबईसारखे शहर बनवू, आता फडणविसांनी मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेसारखी ‘मुख्यमंत्री अमेरिका दुबई दर्शन योजना’ राबवावी जेणेकरून मुंबईतील SPACE TECHONOLOGY चे हे रस्ते अमेरिका किंवा दुबईत कुठे असतात तसेच महायुतीसारखा धोरण लकवा दुबई व अमेरिकेत आहे का, हेही जनतेला कळू शकेल, असेही सचिन सावंत म्हणाले.

Sachin Sawant : खड्डे कोण बुजवणार यावरून सरकारमध्ये गोंधळ; सचिन सावंत आक्रमक Read More »

img 20250823 wa0002

Maharashtra Politics: येणाऱ्या निवडणुकीसाठी MIM ची मोठी खेळी ; डॉ. परवेज अशरफी

Maharashtra Politics : महाराष्ट्रात सर्वत्र जातीय तणाव निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न होत आहे. धार्मिक कार्यक्रमा मध्ये धर्म प्रसारण बाजूला ठेऊन राजकारण आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम काही दंगलखोर संघटना आणि सत्ताधारी पक्षाचे लोक प्रतिनिधी करत आहे. यांना कोणीही जाब विचारायला तयार नाही. प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक प्रश्न करत आहे.  मुस्लिम समाजाचे दर्गा मशीद मदरसावर हल्ले होत आहे. काही जातीवादी संघटन लोकांना आव्हान करत आहे. प्रशासनाला याची माहिती दिली तरी प्रशासन काही करत नाही. न्यायालयाचे मनाई आदेश प्रशासनाला दिल्यानंतर ही प्रशासन कोणतीच प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही. दर्ग्यात दरोडे घातल्याची फिर्याद घेत नाही. तक्रार करायला गेल्यावर फिर्यादीलाच दम देऊन हाकलून देतात. असे अनेक बेकायदेशीर प्रकार घडत असताना मुस्लिम समाजाने ज्यांना लोकसभेत आणि विधानसभेत मतदान केले किंवा ज्या पक्षासाठी खुलेआम प्रचार केला, त्याचे आज आवाज बसले आहे. दररोज जिल्ह्यात मुस्लिम समाजावर अत्याचार होत आहे. अल्पसंख्याक समाज सुरक्षित नाही. मागास्वर्गीय समाजावर शुल्लक कारणाने घरात घुसून सर्व कुटुंबाला जीव जाऊ पर्यंत मारतात. तसेच गऊ रक्षकांच्या नावाखाली हल्ले करतात, जनावरे चोरून दुसरीकडे विकतात. असे अनेक समस्यांच्या चर्चा करण्यासाठी आणि आगामी काळात येणाऱ्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्याचे उद्देशाने व एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वात अहमदनगर महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक समद खान आणि सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख हे आपल्या असंख्य मान्यवर कार्यकर्तयां सोबत एम आय एम मध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश महा सचिव समीर साजिद बिल्डर,प्रदेश सहसचिव शफीउल्लाह काझी यांची मुलाखत औरंगाबाद येथील पक्ष कार्यालय दारुसलाम येथे घेतली. इम्तियाज जलील यांनी पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले.आणि आपल्या सारखे ज्येष्ठ नगरसेवक पक्षात आल्याने पक्षाला ताकद मिळेल आणि आगामी निवडणुकीत महानगर पालिकेत पक्षाची महत्त्वाची भूमिका राहील असे सांगितले. समद खान यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की आपल्या शहरात अल्पसंख्याक समाजावर खालची पातळीवर टीका होत असताना एम आय एम व्यतिरिक्त कोण्ही बोलायला तयार नाही.जर पक्ष यांना बोलायची किंवा विरोध करायची परवानगी देत नसेल तर मी त्या पक्षात राहुन काय करू. म्हणून इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमचा समाधान झाल्याने आम्ही निर्णय घेतला आहे. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी आणि प्रदेश अध्यक्ष  इम्तियाज जलील यांची सभा अहमदनगर मध्ये होणार असून विरोधकांना ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत उत्तर देऊ. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, नगरसेवक समद खान, अंजर खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, यूथ अध्यक्ष अमीर खान, आवेज काझी,जावेद शेख,नवीद शेख सनाउल्लाह खान, समीर खान, वाहिद हुंडेकरी, सज्जाद शेख, अजीम राजे, मोसिन शेख, मतीन खान आदी उपस्थिती होते. येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असल्याचे संकेत जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी दिले.

Maharashtra Politics: येणाऱ्या निवडणुकीसाठी MIM ची मोठी खेळी ; डॉ. परवेज अशरफी Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Nilesh Lanke : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टीसमान पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. खा. लंके यांनी पत्रात नमुद केले आहे की, तूर कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरिपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या. विशेषतः शेवगांव तालुक्यातील खामगांव, हिंगणगांव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगांव तसेच राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असल्याचे खा. लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे की, शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. तातडीने पंचनामे करा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खा. लंके यांनी स्पष्ट केले आहे की, महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करावेत व शासनस्तरावरून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र Read More »

Eknath Shinde: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

Eknath Shinde: यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे. यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. ते शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे.

Eknath Shinde: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय Read More »

imtiaz jaleel

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ

Imtiaz jaleel : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा चर्चेत आला आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर महानगर पालिकेतील माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची साथ सोडत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षात दाखल होणार आहे.  माजी नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक समद खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेत एमआयएममध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील महिन्यात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेत एका विशेष समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज असून एआयएमआयएममध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा आता नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एआयएमआयएमला नगर शहरात मोठी ताकद मिळत असून पुढील काही दिवसात आणखी काही नेते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याचा विश्वास एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी व्यक्त केला आहे.

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ Read More »

raj thackeray

Raj Thackeray: राज ठाकरे अन् CM फडणवीस यांची भेट; अर्धातास चर्चा, पुन्हा राजकीय भूकंप?

Raj Thackeray : पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार असून यासाठी राजकीय पक्षांकडून देखील वेगाने हालचाली पहायला मिळत आहे. यातच राज्यातील राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या या भेटीमागचे कारण आतापर्यंत गुलदस्त्यात असल्याचे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये तब्बल अर्धातास चर्चा झाली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याच दरम्यान राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राज ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीसोबत जाणार का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिका निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका महत्वाची असणार असल्याची देखील सध्या चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

Raj Thackeray: राज ठाकरे अन् CM फडणवीस यांची भेट; अर्धातास चर्चा, पुन्हा राजकीय भूकंप? Read More »

sanjay kumar

Sanjay Kumar : CSDS चे संजय कुमार यांच्या अडचणी वाढल्या, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

Sanjay Kumar: निवडणूक विश्लेषक आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) चे प्राध्यापक संजय कुमार यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल चुकीची आकडेवारी दिल्याने त्यांच्याविरुद्ध नागपूरनंतर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर मतदारांचा डेटा शेअर करताना खोटी विधाने केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी नागपूर जिल्ह्यात आणि नाशिकमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संजय कुमार यांच्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत राज्य विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर मतदारांची संख्या प्रचंड घटली आहे. या दोन्ही निवडणुका सुमारे सहा महिन्यांच्या अंतराने घेण्यात आल्या. नंतर त्यांनी मंगळवारी ही पोस्ट हटवली आणि दुसऱ्या पोस्टमध्ये चुकीचा डेटा पोस्ट केल्याबद्दल माफी मागितली. नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या तहसीलदारांनी हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येतील फरकाबाबत केलेल्या दाव्याबाबत तक्रार दाखल केली आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 175 (निवडणुकीसंदर्भात खोटे विधान), 353 (1) ब (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने), 212 (सार्वजनिक सेवकाला खोटी माहिती देणे) आणि 340 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या नायब-तहसीलदारांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून नाशिक शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कुमार यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजीच्या पोस्टमध्ये नमूद केले होते की (2024) लोकसभा निवडणुकीदरम्यान देवळाली मतदारसंघात मतदारांची संख्या 4,56,072 होती, तर प्रत्यक्षात मतदारांची संख्या 2,76,902 होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, संजय कुमार यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देवळालीतील मतदारांची संख्या 2,22,141 असल्याचे कथितपणे सांगितले होते, जे दिशाभूल करणारे आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणुकीशी संबंधित दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबद्दल बीएनएसच्या संबंधित कलमांखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sanjay Kumar : CSDS चे संजय कुमार यांच्या अडचणी वाढल्या, नाशिकमध्ये गुन्हा दाखल Read More »