DNA मराठी

राजकीय

congress

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Zilla Parishad Election: राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,  विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान,  अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत,  आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम,  अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खा. हुसेन दलवाई, आ. साजिद खान पठाण,  माजी मंत्री वसंत पुरके,  माजी आमदार धिरज देशमुख, रामहरी रुपनवर, एम. एम. शेख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, मुफ्ती हारुन नदवी, शाह आलम शेख, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, अक्षय राऊत व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर Read More »

Vijay Wadettiwar: पाच वर्ष काँग्रेसचा महापौर बसणार; चंद्रपूरबाबत विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

Vijay Wadettiwar : चंद्रपूर महापालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचे, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात पाच वर्ष काँग्रेसचा महापौर असणार,सगळ्यांचे समाधान होईल असा निर्णय काँग्रेस घेणार अस सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाला पूर्णविराम दिला. चंद्रपूर महापालिकेबाबत काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाल्याने चंद्रपुरात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भाजपचे कोणतेही नेते कितीही ओरडले तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार अस,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी आज ठासून सांगितले. नेत्यांमध्ये गैरसमज होत असतात पण कार्यकर्ता हा महत्वाचा असल्याने त्यांना समाधान वाटेल असा निर्णय घेण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी स्पष्टं केले. चंद्रपुरात महापौर बसविण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा झाली आहे. शिवसेना हा पक्ष काँग्रेस बरोबर सत्तेत असेल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. 29 महापालिका निकडवणुकांसाठी आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली.पण ही फिक्सिंग होती,पारदर्शक पद्धतीने आरक्षण प्रक्रिया पार पाडली गेलीं नाही. भाजपचे नगरसेवक निवडून त्या सोयीने आरक्षण पडल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नागपुरात खुला महिला प्रवर्ग आला त्यासाठी भाजपचे महापौर पदाच्या उमेदवार शिवानी दाणी ठरल्या होत्या आणि आज तसेच आरक्षण पडले असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला. मुंबईतील मनसे नेत्यांनी चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र असल्याचे तारे तोडले याचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र आहे हे दिव्य स्वप्न मनसे नेत्यांना कुठून पडले? लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम मनसेने करू नये. मनसे भाजपची बी टीम आहे अशी टीका काँग्रेसने केली तर चालेल का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रात भाजप आणि MIM हे पक्ष एकत्र आहेत, ते रात्री एकत्र जेवतात दिवसा भांडतात.काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.त्यांना रसद कोण पुरवते,ताकद कोण देते हे महाराष्ट्रातील जनतेला कळेल अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. वाराणसी येथील मणिकर्णिका घाट भाजप सरकारने जमीनदोस्त केला.आता भाजपचे नेते का बोलत नाही? भाजपचे हिंदुत्व हे निवडणुकी पुरता आहे ,सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करतात अशी टीकाही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Vijay Wadettiwar: पाच वर्ष काँग्रेसचा महापौर बसणार; चंद्रपूरबाबत विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले? Read More »

shevgaon municipal council

Shevgaon Municipal Council : शेवगाव नगरपरिषदेत भाजपचा मास्टरस्ट्रोक अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का

Shevgaon Municipal Council : शेवगाव नगर परिषदेतील सत्तासंघर्ष आणखी तीव्र झाला आहे. तहसील कार्यालयाच्या सभागृहात  बुधवारी (ता.21) सकाळी 11 वाजता पार पडलेल्या नगरपरिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडीत भाजपने राजकीय डावपेचांचा कुशल वापर करत नगर परिषदेत आपले वर्चस्व निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट व शरदचंद्रजी पवार गटातील अंतर्गत फूट आणि सतत बदलणाऱ्या आघाड्यांचा फायदा घेत भाजपने निर्णय भूमिका घेतल्याने सभापतीच्या निवडीच्या वेळेस राजकीय गणित तयार झाले. शेवगाव शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. या निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माया अरुण मुंडे (शिवसेना) होत्या, तर मुख्याधिकारी विजय घाडगे उपस्थित होते. सभापतीपदाच्या निवडीत भाजपचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे 2 नगरसेवक भाजपसोबत आल्याने नवीन राजकीय आघाडी उदयास आली. अवघ्या आठवडाभरापूर्वी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत मात्र पूर्णतः वेगळे चित्र पाहायला मिळाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने भाजपला डावलत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) यांच्याशी आघाडी करत सिराजुद्दीन पटेल यांना उपनगराध्यक्षपदी निवडून आणले होते. या घडामोडीमुळे भाजपला राजकीय धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने समित्यांच्या निवडीत आक्रमक आणि नियोजनबद्ध पवित्रा घेतला. आमदार मोनिका राजळे यांनी या प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावत राष्ट्रवादीतील फुटीचा राजकीय लाभ घेत दोन्ही गटांना सोबत आणले. परिणामी समित्यांच्या निवडीत भाजपचे वजन अधिक ठळकपणे जाणवले. उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत एकत्र असलेली आघाडी आणि समित्यांच्या निवडीत झालेली वेगळी युती यामुळे नगरपरिषदेत नेमकी सत्ता कोणाच्या हाती, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सत्तेतील या उलथापालथीचा आगामी विकासकामांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shevgaon Municipal Council : शेवगाव नगरपरिषदेत भाजपचा मास्टरस्ट्रोक अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का Read More »

kalyan dombivli municipal corporation

Kalyan-Dombivli Municipal Corporation : महायुतीचं ठरलं, कल्याण-डोंबिवलीत महापौर महायुतीचाच होणार

Kalyan-Dombivli Municipal Corporation : कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर कुणाचा यावर सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे यांनी भाजपला मोठा धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परतल्यावर मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रित बैठक होणार आहे असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले. माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिकामध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. या बैठकीत यावर सविस्तर चर्चा देखील दोघांमध्ये झाली आहे. तीनही महानगरपालिकेमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार असल्याची देखील माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

Kalyan-Dombivli Municipal Corporation : महायुतीचं ठरलं, कल्याण-डोंबिवलीत महापौर महायुतीचाच होणार Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी

Harshwardhan Sapkal: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला आहे. घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंगही उद्धवस्त करण्यात आली आहेत. हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे. या गंभीर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेस पक्षाचे व धनगर समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन भाजपच्या बुलडोझर सरकारने केलेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे. मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र व ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकासाच्या’ गोंडस नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वीही मोदी आणि योगी सरकारने काशी परिसरातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे नष्ट करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांचा फक्त वारसाच नाही, तर धनगर समाजाचा, तसेच संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान आहे. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी Read More »

img 20260122 wa0002

Ahilyanagar Municipal Corporation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड

Ahilyanagar Municipal Corporation: महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजितदादा गट) पक्षाच्या महानगरपालिका गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विजेत्या सर्व 27 नगरसेवकांची बुधवारी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी झाली. यावेळी गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संपत बारस्कर यांनी प्रकाश भागानगरे यांचा सत्कर करून अभिनंदन केले. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार संग्राम जगताप म्हणाले,  प्रकाश भागानगरे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा शहराच्या विकासासाठी निश्चितपणे होईल. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून आणि समस्त कार्यकर्त्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी नूतन गटनेते प्रकाश भागानगरे म्हणाले, स्व.अरुणकाका जगताप यांच्या आशीर्वादाने व आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मला पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी पार पाडताना सर्व नगरसेवक तसेच पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वसात व बरोबर घेऊन काम करू. महानगरपालिकेत सर्व नगरसेवकांचे तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करू. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सागर बोरुडे, दिपाली बारस्कर, संपत बारस्कर, महेश तवले, संध्या पवार, ज्योती गाडे, गौरी बोरकर, काजल भोसले, हरप्रीतकौर गंभीर, मोहित पंजाबी, सुनिता भिंगारदिवे, कुमार वाकळे, अशा डागवाले, सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटिया, गणेश भोसले., अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, सुनिता फुलसौंदर, मीना चोपडा, पोर्णिमा गव्हाळे, गीतांजली काळे, सुनीता कांबळे, वर्षा काकडे, मयूर बांगरे व अश्विनी लोंढे आदी उपस्थित होते.

Ahilyanagar Municipal Corporation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड Read More »

img 20260121 wa0007

Ahilyanagar Municipal Corporation : भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवण यांना गटनेतेपद

Ahilyanagar Municipal Corporation :  अहिल्यानगर महापालिकेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने नवा अध्याय सुरू केला असून पक्षाच्या नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत भाजपच्या नगरसेविका शारदा दिगंबर ढवण यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली आहे अहिल्यानगर नामांतरानंतर धनगर समाजाला मिळालेले हे सर्वोच्च पद मानले जात असून स्वर्गीय दिगंबर ढवण यांना ही निवड श्रद्धांजली ठरत आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने महापालिकेत प्रथमच एका महिलेला गटनेतेपदाची संधी देत महिला नेतृत्वालाही ठोस व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. भाजप पक्षाने पहिल्यांदाच धनगर समाजातील प्रतिनिधीस हे महत्त्वाचे पद देत शहरातील विविध समाजघटकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचण्याचा दिला आहे. ही निवड केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. शारदा दिगंबर ढवण या दिवंगत दिगंबर ढवण यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. त्या माजी खासदार डॉ  सुजय विखे पाटील यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. दिगंबर ढवण यांच्या निधनानंतर निवडणुकीच्या काळात स्वतः मैदानात उतरून केलेल्या प्रचारामुळे शारदा ढवण यांना मिळालेला जनसमर्थनाचा पाया आज गटनेतेपदाच्या रूपाने अधिक दृढ झाल्याचे दिसते. अहिल्यानगर महापालिकेत भाजपचे 25 नगरसेवक निवडून आले असून नामांतरानंतर हे पहिलेच गटनेतेपद आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णयक्षम आणि स्पष्ट नेतृत्व उभे राहत असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या धोरणात्मक भूमिकांना महापालिकेत प्रभावीपणे मांडण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation : भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवण यांना गटनेतेपद Read More »

karnataka dgp viral video

Karnataka DGP Viral Video :  कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण, कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव निलंबित

Karnataka DGP Viral Video : कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोठी कारवाई करत कर्नाटकचे पोलीस महासंचालक के. रामचंद्र राव निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे के. रामचंद्र राव यांनी व्हायरल व्हिडिओ फेक असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या व्हिडिओची फॉरेन्सिक चौकशीची मागणी केली आहे. नेमकं प्रकरण काय? के. रामचंद्र राव यांच्यावर व्हिडिओमध्ये महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये के. रामचंद्र राव इतर महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत खुर्चीवर बसलेले दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राव कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांना भेटण्यासाठीही गेले होते, परंतु बैठक अयशस्वी झाली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला. वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ कोणत्या परिस्थितीत रेकॉर्ड करण्यात आला आणि तो कोणी प्रसारित केला याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, व्हिडिओचा स्रोत आणि सत्यता निश्चित करण्यासाठी प्राथमिक चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. हे फुटेज डिजिटल पद्धतीने हाताळण्यात आले आहे का हे शोधण्यासाठी सायबर गुन्हे तज्ञांचीही मदत घेतली जाईल. या घटनेने राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Karnataka DGP Viral Video :  कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण, कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव निलंबित Read More »

bmc election

BMC Election: आरक्षणाची चिठ्ठी ठरवणार मुंबईचा महापौर; नेमकं घडणार काय?

BMC Election: मुंबई महापौरपदाची निवड आता फक्त निवडणुकीनंतरची औपचारिक बाब राहिलेली नाही. आरक्षणाच्या सोडतीने सत्तेची दिशा बदलण्याची वेळ आली आहे. गुरुवारी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११ वाजता २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून, या एका प्रक्रियेवर मुंबईच्या सत्तासमीकरणाचा भविष्यातील आराखडा अवलंबून असल्याचे चित्र आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. याचे कारण स्पष्ट आहे. मुंबई महापौरपदाचे आरक्षण जर अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात गेले, तर सत्ताधारी भाजप–शिवसेना महायुतीकडे बहुमत असूनही महापौरपदासाठी योग्य उमेदवार उरणार नाही. याच वेळी, सत्तेबाहेर असलेले उद्धव ठाकरे यांच्या गटाला अनपेक्षित राजकीय संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एसटी आरक्षण आणि महायुतीची कोंडी महापालिकेतील विद्यमान संख्याबळ पाहता, भाजप–शिवसेना महायुतीकडे एसटी प्रवर्गातील एकही निवडून आलेला नगरसेवक नाही. याउलट, एसटीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक ५३ आणि १२१ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे विजयी झाले आहेत. त्यामुळे एसटी आरक्षण पडल्यास ठाकरे गटाचा महापौर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता बळावते. हीच शक्यता सध्या सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सत्तेचे अंकगणित हाताशी असतानाही महापौरपद विरोधकांकडे जाण्याची भीती महायुतीच्या अंतर्गत चर्चांना धार देत आहे. चक्राकार पद्धत: नियम की राजकीय कवच? सरकारकडून दिलासा देणारा मुद्दा म्हणजे महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाणार आहे. या प्रक्रियेनुसार, सुरुवातीला खुला प्रवर्ग निश्चित केला जाईल आणि त्यानंतर पुढील आरक्षणे ठरतील. त्यामुळे यंदा लगेचच एसटी आरक्षण येण्याची शक्यता कमी असल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. मात्र, राजकीय जाणकार वेगळे चित्र मांडतात. त्यांच्या मते, “नियम जरी स्पष्ट असले, तरी सोडतीचा क्रम बदलला तर राजकीय समीकरणे एका क्षणात उलटू शकतात.” एससी–ओबीसी आरक्षणात फारसा संघर्ष नाही अनुसूचित जाती (एससी) किंवा इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण पडल्यास मात्र सत्तासंघर्षाची तीव्रता कमी राहील. भाजप–शिवसेना महायुती, ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) — सर्वच आघाड्यांकडे या प्रवर्गांतील नगरसेवक उपलब्ध आहेत. त्यामुळे या दोन प्रवर्गांमध्ये महापौरपदाबाबत फारसा राजकीय पेच निर्माण होणार नाही. तथापि, एससी प्रवर्गातील प्रभावी नगरसेवकांची संख्या ठाकरे गटाकडे अधिक आहे, ही बाब त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारी ठरत आहे. संयमित भाषा, पण स्पष्ट संकेत अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या भाषणांत दिसणारी संयमित पण सूचक भाषा अनेक अर्थांनी घेतली जात आहे. “देवाच्या मनात असेल तर…” अशा वाक्यांमागे दडलेली राजकीय अपेक्षा आजच्या घडीला अधिक ठळकपणे जाणवते आहे. सत्तेपासून दूर असतानाही महापौरपदाची संधी चालून येणे, हे ठाकरे गटासाठी केवळ पदप्राप्ती नसून राजकीय पुनरुज्जीवनाचे संकेत मानले जात आहेत. एक सोडत, अनेक शक्यता गुरुवारची सोडत म्हणजे केवळ नावांची चिठ्ठी नाही, तर मुंबईच्या सत्तेचा कौल आहे. महायुतीला चक्राकार पद्धतीचा आधार आहे, तर ठाकरे गटाची आशा एसटी आरक्षणाच्या शक्यतेवर टिकून आहे. शेवटी प्रश्न तोच राहतो कि महापौरपदाचा निर्णय लोकशाही बहुमत ठरवणार की आरक्षणाची चिठ्ठी? उत्तर काही तासांत समोर येईल; पण या उत्तराचे पडसाद मुंबईच्या राजकारणात दीर्घकाळ घुमत राहणार, हे नक्की.

BMC Election: आरक्षणाची चिठ्ठी ठरवणार मुंबईचा महापौर; नेमकं घडणार काय? Read More »

jaykumar gore on praniti shinde

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार?

Jaykumar Gore on Praniti Shinde : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचतारांकित हॉटेल ‘बालाजी सरोवर’ येथे खासदार प्रणिती शिंदेंबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. प्रणिती शिंदें यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या शेवटी हिंदीतून “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं, पर सिर्फ अगली छलांग लगाने” असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा शेलक्या आणि आक्षेपार्ह शब्दांत प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार” असा नारा दिला. यानंतर त्यांनी खासदार प्रणिती शिंदेंच्या भावनिक पत्रावर वादग्रस्त टिप्पणी केली. “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून विरोधी पक्ष म्हणून एमआयएम भूमिका बजावणार आहे.

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार? Read More »