DNA मराठी

क्राईम

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra News: नगर शहरातील कॅफे कोर्ट गल्लीत कोतवाली पोलिसांनी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या कॅफे चालक व मालक यांचेवर कारवाई केली आहे. कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. द परफेक्ट कॅफे, कोर्ट गल्ली, कर्डीले डायग्नोस्टीक समोर प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करुन पडदे लावुन अंधारकरुन शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक दराडे यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन तात्काळ छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले. कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी पंचा समक्ष पथकाने छापा टाकला. तेव्हा सदर ठिकाणी प्लाऊड बोर्डचे पार्टीशन करुन वेगवेगळे कंपार्टमेंट केलले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले व मुली अश्लील चाळे करताना मिळुन आले. या कारवाईत पोलिसांनी शिवप्रसाद कुमार (वय 20 वर्ष), कॅफे मॅनेजरला ताब्यात घेतला आहे. तसेच सदर कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नाव, गाव विचारुन खात्री करुन त्यांचे वय व ओळख पत्राची पाहणी करुन त्यांना तोंडी समज देवुन सोडण्यात आले. तर दुसरीकडे सदर कॉफी शॉपचे चालक व मालक यांचे विरुध्द पोकॉ/ सतिष शिंदे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129.131 (क) (क) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय? Read More »

NIA Raids in Human Trafficking Case : मानवी तस्करी प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, 22 ठिकाणी छापे

NIA Raids in Human Trafficking Case: एनआयएने मोठी कारवाई करत मानवी तस्करी प्रकरणात देशभरात छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 6 राज्यांमध्ये 22 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. एनआयएने विदेशी सहभागाच्या संशयावरून ही मोठी कारवाई केली आहे.हे छापे 6 राज्यांमध्ये सुरू असून अनेक देशांशी त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता. सायबर फसवणूक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही मोठी कारवाई केली आहे. सायबर फ्रॉडच्या माध्यमातून बिहार गोपालगंज येथील तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून परदेशात गेल्यावर त्यांना बनावट कॉल सेंटरमध्ये बंधक बनवून सायबर फसवणूक करण्यात आली. या रॅकेटचा म्यानमार आणि लाओसशी संबंध असण्याची शक्यता आहे. यापूर्वी, 5 ऑक्टोबर रोजी एनआयएने दहशतवादी कट आणि दहशतवादी फंडिंगच्या संशयावरून 5 राज्यांतील 22 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. एनआयएने महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली येथे छापे टाकले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणांबाबत ही कारवाई करण्यात आली. एनआयएने जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि इतर भागातही छापे टाकले होते. बारामुल्ला येथील मौलवी इक्बाल भट यांच्या घराची एनआयएने सुरक्षा दलांच्या मदतीने झडती घेतली. 1 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. 1 ऑक्टोबर रोजी एनआयएच्या पथकाने दक्षिण 24 परगणा, आसनसोल, हावडा, नादिया आणि कोलकाता येथे 11 ठिकाणी छापे टाकले होते.

NIA Raids in Human Trafficking Case : मानवी तस्करी प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, 22 ठिकाणी छापे Read More »

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Hit And Run : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात 25 नोव्हेंबर संध्याकाळी सातच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून 4 ते 5 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रविंद्र रमेश कानडे (वय 32, राहणार कानडे मळा, सोलापूर रोड, अहिल्यानगर) असं मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात संध्याकाळी 7 च्या सुमारास XUV 500 कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे तर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल Read More »

Anmol Bishnoi ला भारतात आणण्याची तयारी, FBI -भारतीय अधिकाऱ्यांची भेट

Anmol Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. तर आता त्याला भारतात आण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने त्याला गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियातून ताब्यात घेतले होते. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एफबीआयच्या नवी दिल्लीतील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी अनमोल बिश्नोईचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली. अनमोल बिश्नोई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी वॉन्टेड आहे. एनआयए आणि मुंबई पोलीस बऱ्याच दिवसांपासून अनमोल बिश्नोईचा शोध घेत होते. एनआयएने अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचे बक्षीसही ठेवले आहे. एफबीआय आणि भारतीय अधिकाऱ्यांमध्ये 45 मिनिटे बैठकइंडियन एक्स्प्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाबाबत एफबीआय आणि भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये 45 मिनिटे बैठक झाली. यामध्ये त्याच्यावरील खटले आणि पुराव्यावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान अनमोलचा बाबा सिद्दीकी हत्याकांडातील कथित सहभाग आणि सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारावरही चर्चा झाली. अनमोलचे एक प्रवासी कागदपत्र बनावट असल्याचे यूएस इमिग्रेशन विभागाला आढळून आल्याचेही सूत्रांनी सांगितले. अनमोल 15 मे 2022 रोजी भानू नावाच्या व्यक्तीच्या नावाने बनावट पासपोर्ट मिळवून अमेरिकेत पळून गेला होता, परंतु अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाला त्याच्या प्रवासाशी संलग्न असलेल्या एका कंपनीचे संदर्भ पत्र आढळून आल्याने त्याचा पर्दाफाश झाला. कागदपत्रे बनावट होती. अमनोल बिश्नोई कॅनडात राहतातअनमोल कॅनडामध्ये राहणारा असून तो नियमितपणे अमेरिकेत जात असल्याचे समजते. तो लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. तुरुंगात असूनही लॉरेन्सवर जागतिक गुन्हेगारी टोळी चालवल्याचा आरोप आहे. सूत्रांनी अनमोलच्या ताब्यात घेण्याबाबत अधिक माहिती दिली नाही. सूत्रांनी सांगितले की, अनमोल अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, मुंबई पोलिसांनी एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नाव असलेल्या अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना अनमोल बिश्नोईच्या त्यांच्या देशात उपस्थितीची माहिती दिल्यानंतर हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले होते.

Anmol Bishnoi ला भारतात आणण्याची तयारी, FBI -भारतीय अधिकाऱ्यांची भेट Read More »

Utter Pradesh Crime: अखेर ‘सायको किलर’ला अटक, काळे कपडे घालून महिलांची करायचा हत्या

Utter Pradesh Crime: आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिला सुरक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत एका साईको किलरला अटक केली आहे. याबाबत गोरखपूर एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी माहिती दिली आहे.आरोपी घरात चोरी करून महिलांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या करत होता. परिसरात गेल्या चार महिन्यांपासून आरोपीची दहशत पसरली होती. गोरखपूरच्या झांघा पोलीस स्टेशन हद्दीतील राजधानी गावातील मंगलपूर टोला येथील राहणारा 20 वर्षीय अजय निषाद असे या सायको किलरचे नाव आहे. चार महिन्यांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होती. माहितीनुसार आरोपी रात्री काळे कपडे घालून महिलांची हत्या करत होता. आरोपीने गेल्या चार महिन्यात पाच महिला व मुलींची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी रात्री 1 ते 4 च्या दरम्यान महिलांची आणि मुलींची हत्या करून चोरी करत होता. सीसीटिव्हीच्या मदतीने पोलिसांनी अखेर आरोपीला अटक केली आहे. या सायको किलरने 4 महिन्यांत 5 महिलांना आपला बळी बनवला आहे. एवढेच नाही तर तो इतका हिंसक आहे की अगदी पोलिसांच्या प्रत्येक हालचालींवर त्याची नजर असते. रात्री 1 ते 4 च्या दरम्यान फिरून बाहेर पडणारा हा मारेकरी महिलांची हत्या आणि अत्याचार करण्यात मजा घेतो. चोरीच्या वेळी एका मुलीचा मृत्यू झाला की, पोलिसांनी तिच्या शोधात गस्त वाढवली, पण तीही त्यांच्यापासून दूर गेली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्याला अटक केली आहे. असा खुलासा पोलिसांनी केला. पोलिसांच्या चौकशीत त्याने सर्व घटनांची कबुली दिली. एवढेच नाही तर 2022 मध्ये तो एका बलात्कार प्रकरणात तुरुंगात गेल्याचेही त्याने सांगितले. यानंतर तो जामिनावर बाहेर असताना एकतर सुरतला गेला होता. येथून परतल्यानंतर त्याने किरकोळ चोरी करण्यास सुरुवात केली. तुरुंगात गेल्यामुळे तो महिलांचा तिरस्कार करू लागला, त्यामुळे तो सायको किलर बनला अशी देखील पोलिसांनी माहिती दिली.

Utter Pradesh Crime: अखेर ‘सायको किलर’ला अटक, काळे कपडे घालून महिलांची करायचा हत्या Read More »

Maharani Laxmi Bai Medical College : शॉर्टसर्किटमुळे रुग्णालयात भीषण आग, 10 मुले जिवंत जाळली, 16 जखमी

Maharani Laxmi Bai Medical College : उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या एनआयसीयू (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. त्यामुळे 10 मुलांचा मृत्यू झाला. अन्य 16 मुले जखमी झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी रुग्ण इकडे तिकडे धावू लागले. कुटुंबातील सदस्य मुलांना हातात घेऊन धावताना दिसत होते. यावेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. आगीच्या वेळी एनआयसीयूमध्ये 54 मुलांना दाखल करण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयातून 37 मुलांची सुटका करण्यात आली. आग लागली तेव्हा रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये 54 रुग्ण दाखल होते. डीएम अविनाश कुमार यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. आग कशी लागली याचा तपास करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 12 तासांत अहवाल मागवलाउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घटना हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे. जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त आणि डीआयजींकडून 12 तासांत अहवाल मागवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि आरोग्य सचिव पार्थ सारथी सेन शर्मा मदतकार्यात समन्वय साधण्यासाठी झाशीला पोहोचले आहेत. बचाव आणि मदत कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी डीएम, एसएसपी आणि डीआयजी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले. जखमी 16 मुलांची प्रकृती चिंताजनकएसएसपी सुधा सिंह यांनी सांगितले की, 16 जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत. त्याचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व डॉक्टर आणि पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. आग लागल्यानंतर काही पालक आपल्या मुलांना घरी घेऊन गेल्याचीही माहिती मिळाली आहे. पंतप्रधानांनी घोषणा केली – मृत मुलांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये मिळणारझाशी मेडिकल कॉलेजला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया रक्कम जाहीर केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Maharani Laxmi Bai Medical College : शॉर्टसर्किटमुळे रुग्णालयात भीषण आग, 10 मुले जिवंत जाळली, 16 जखमी Read More »

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त

Maharashtra Election 2024 : राज्यात विधानसभेसाठी निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. संपूर्ण राज्यात पोलिस देखील आचारसंहिताचे पालन करत मोठी कारवाई करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काळबादेवी येथे पोलिसांनी 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री काही लोकांना अडवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2.3 कोटी रुपयांची रोकड सापडली. पैसे घेऊन जाणारे हे लोक रोख रकमेशी संबंधित कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत किंवा एवढी मोठी रक्कम घेऊन जाण्याचे कारणही सांगू शकले नाहीत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेली पथक रोख रक्कम, दारू आणि इतर संभाव्य प्रलोभनांबाबत सतर्क आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपर्यंत कागदपत्रे आणि चौकशीनंतर ही रक्कम जप्त करण्यात आली असून रोख घेऊन जाणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर ही रोकड तपासासाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त Read More »

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक

Maharashtra Crime News: स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर लोकांचा विश्वास संपादन करून मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची शेवगाव येथे शाखा उघडून फिर्यादी व इतर लोकांचे एकुण 67,40,000 रूपये ठेवी स्विकारुन, ठेवी परत न करता स्वत:चे फायदयाकरीता वापरून फिर्यादी व इतरांची आर्थिक फसवणुक केली होती. याबाबत शेवगावमध्ये भादंवि कलम 420, 406, 409, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. गजानन उत्तमराव कोहिरे, (वय 45, रा.सुलसगाव, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), मोहन रूस्तम माघाडे, (वय 32, रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), निता मोहन माघाडे, (वय 27, रा. रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा) असे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक Read More »

Shrirampur News : गुन्हे शाखेची मोठी कारवाई, गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह जेरबंद

Shrirampur News : श्रीरामपूर शहरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला मुद्देमालासह अटक केली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्राबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला  श्रीरामपूरमध्ये एक व्यक्ती बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगत असून सध्या तो दत्तनगर, श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकाचे पोलीस अंमलदार मनोज गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार व महादेव भांड अशांचे पथक तयार करून संशयीतवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास पथकाने  29 ऑक्टोबर रोजी सुतगिरणी फाटा, रेल्वे फाटकजवळ, दत्तनगर, श्रीरामपूर येथे संशयीत आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले. इम्तीयाज उर्फ बबलू अजीज शहा (वय 32, रा.काझीबाबा रोड, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर) असं आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून 30,000 रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्टल व 1,000 रुपये किंमतीचे 2 काडतुस असा एकुण 31,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 1038/2024 आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Shrirampur News : गुन्हे शाखेची मोठी कारवाई, गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह जेरबंद Read More »

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त

Maharashtra Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध मद्य, रोकड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी अहमदनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी चेकपोस्ट, आठ भरारी व स्थाई पथके नेमण्यात आली आहेत. भरारी पथकाने नगर शहरात दोन ठिकाणी वाहतूक करण्यात येत असलेली रोकड पंचनामा करुन ताब्यात घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. भरारी पथकाने 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता नालेगाव भागातील अमरधाम येथे 3 लाख 84 हजार 300 रुपये एवढी रोख रक्कम दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतली. याबाबतचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षककरीत आहेत. कायनेटीक चौक येथे 24 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे वाहन क्र.  एमएच 19 ईजी 6311 हे संशयित वाटल्याने वाहनास थांबविण्यात आले. झडती नंतर वाहनाचे चालक आणि सोबतच्या व्यक्तीकडून 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचेही कळविण्यात आले आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त Read More »