DNA मराठी

क्राईम

गरीबांचं काय? – न्याय, देव आणि भेदभावाचं वास्तव; भिक्षेकरी मृत्यू प्रकरणात चौकशी करा

Maharashtra News: “न्याय आणि देव श्रीमंतांना लवकर भेटतो, गरिबाला नाही” – ही म्हण आजही आपल्या समाजाच्या वास्तवाला अगदी नेमकं व्यक्त करते. अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात नुकतीच घडलेली हृदयद्रावक घटना हेच दाखवून देते. विसापूर येथील भिक्षेकरू गृहातून उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकरूंचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना पिण्यासाठी पुरेसं स्वच्छ पाणीही मिळालं नाही, असं सांगितलं जात आहे. हा मृत्यू नुसता आजारपणामुळे झाला की व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे, हा खरा प्रश्न आहे. या घटनेनं अनेकांचे काळीज हलवले. गरिबांना वेळेवर उपचार, साधी सुविधा – अगदी पिण्याचं पाणीही मिळू नये? ही दुर्दैवी स्थिती काही नवीन नाही. याच शासकीय रुग्णालयात 2021 मध्ये 18 जणांनी जीव गमावला होता. त्यांच्याही मृत्यूमागचं कारण ‘व्यवस्थेचं अपयश’चं होतं, असं अनेक तज्ज्ञांनी म्हटलं होतं. पण त्यांनाही न्याय मिळाला नाही. ना कुणावर कारवाई झाली, ना व्यवस्थेत सुधारणा. आजही गरीब रुग्ण सरकारी रुग्णालयांच्या ओस पडलेल्या खाटा, तुटक्या सांडपाण्याच्या नळ्या आणि दुर्लक्षित वैद्यकीय यंत्रणांमध्ये अडकलेले दिसतात. दुसरीकडे, श्रीमंतांसाठी खासगी रुग्णालयं, एअर कंडिशन सुविधा, वेळेत टेस्ट्स आणि डॉक्टरांचं विशेष लक्ष हे सगळं सहज उपलब्ध असतं. मग खरंच विचारावंसं वाटतं – न्याय काय फक्त श्रीमंतांसाठीच राखून ठेवलेला आहे का? लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाला समान हक्क असतो – हे आपण शाळेत शिकतो. पण वास्तवात हा हक्क फक्त कागदावरच असतो. जेव्हा गरीब माणसाचा जीव जातो, तेव्हा त्याच्या मागे न्यायासाठी लढणारा कोणीही नसतो. ना वकिलांची फौज, ना मीडिया कवरेज, ना जनतेचा आक्रोश. पण तेच जर एखादा श्रीमंत मरण पावला, तर संपूर्ण यंत्रणा हलते. आज गरिबांना न्याय मिळावा, इतकीच माफक अपेक्षा आहे. अहिल्यानगरमधील या मृत्यूंची सखोल चौकशी झाली पाहिजे. जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं – अशा घटना पुन्हा होणार नाहीत, याची हमी सरकारने घ्यावी. अन्यथा ही ‘शासकीय’ व्यवस्था केवळ कागदोपत्री न्यायाची भाषा करणारी आणि प्रत्यक्षात गरीबांचा आवाज दाबणारी यंत्रणा ठरेल. गरीबांचं काय? – हा प्रश्न फक्त प्रश्न म्हणूनच न राहता, उत्तरांसह सन्मानाने मांडला गेला पाहिजे. कारण न्याय सगळ्यांसाठी असतो, निवडकांसाठी नाही.

गरीबांचं काय? – न्याय, देव आणि भेदभावाचं वास्तव; भिक्षेकरी मृत्यू प्रकरणात चौकशी करा Read More »

पिण्यासाठी पाणी नाही, चार भिक्षेक मृत्यू प्रकरणात नातेवाईकांचा गंभीर आरोप

Maharashtra News: अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भिक्षेकांपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या नातेवाईकांनी हा मृत्यू रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे झाल्याचा गंभीर आरोप केल्याने या प्रकरणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मृत भिक्षेकांना ना वेळेवर औषधं मिळाली, ना पिण्यासाठी पाणी, असे गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहे. 7 एप्रिल रोजी पोलिसांनी 49 भिक्षेकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना श्रीमंत तालुक्यातील विसापूर येथे ठेवण्यात आले होते. त्यापैकी दहा जणांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. उर्वरित दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असली तरी यापूर्वीच्या घटनांमुळे या चौकशीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पूर्वीही घडली होती गंभीर चूकप्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा पुनरावृत्तीस्मरणात ठेवावी अशी घटना म्हणजे, 2021 साली याच जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये लागलेल्या भीषण आगीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, मात्र शासनाने या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी चार्जशीट दाखल करण्याची परवानगी नाकारली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये बेधडकपणा वाढल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते गिरीश जाधव यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “दोन वर्षांपूर्वी 18 रुग्णांचे बळी गेले, तेव्हाही दोषींवर कारवाई झाली नाही. आता पुन्हा चार जणांचा मृत्यू. शासकीय रुग्णालयात प्रशासनाला कुणाची भीती राहिलीच नाही. सरकार दोषींना वाचवतं आहे. “पोस्टमार्टम अहवाल प्रतीक्षेत, चौकशी समितीकडून अपेक्षा अल्पसध्या मृत भिक्षेकांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, परंतु याआधी अशा चौकशी समित्यांतून ठोस निष्कर्ष किंवा कार्यवाही झाली नसल्याने या प्रकरणातही तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नागरिक व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

पिण्यासाठी पाणी नाही, चार भिक्षेक मृत्यू प्रकरणात नातेवाईकांचा गंभीर आरोप Read More »

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला अटक

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सहा महिण्यापासुन फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलीसांनी अटक केली आहे. संदिप सरसे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, 25 सप्टेंबर 2024 रोजी पिडीतेला फोन करून पिडीतेच्या घराचे काही अंतरावर असलेल्या बौध्द समाज मंदीराचे आवारात भेटण्यासाठी बोलावुन पिडितेच्या आई वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन पिडीतेवर अत्याचार केला होता. या प्रकरणात शेवगांव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता कलम 64, 65(1), 351 (1) सह बा.लै.अत्या.अधि. 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी सहा महिन्यापासून फरार होता. आरोपीबाबत पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी हा सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथुन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून शेवगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला अटक Read More »

दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने वार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Jalna Crime : जालन्यात दुकानात घुसून एका व्यापाऱ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, जालना शहरातील कडबी मंडी भागात हरकाराम चेलाराम चौधरी यांची खुशी इमिटेशन नावाची ज्वेलरीची दुकान आहे. या दुकानात अज्ञात दोन तरुणांनी प्रवेश केला. यातील एका तरुणाकडे एक धारदार कोयता ही होता. यावेळी अज्ञात तरुणांनी पैसे मागत व्यापाऱ्याला कोयता मारून जखमी केलंय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकरणी अज्ञात दोन तरुणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हरकाराम चौधरी यांच्या पोटाला चाकू लागल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने वार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद Read More »

अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपी कोतवाली पोलीसांच्या ताब्यात

Ahilyanagar News : सुपा पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 18 मार्च रोजी सुपा पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, बालकांचे लैगिक संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाचा तपास सूपा पोलीस ठाण्यात सुरू होता पोलीस अधीक्षक अहिल्यानगर या प्रकरणातील आरोपीबाबुराव हरीभाऊ शिंदे याला अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अहिल्यानगर शहर विभागातील प्रभारी अधिकारी यांना अलर्ट करुन अहिल्यानगर शहरात आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना केल्या. याप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व गुन्हे शोध पथकांचे अंमलदार यांनी नमुद आरोपीचा पोलीस स्टेशनल हद्दीत शोध घेत असताना तो अमरधाम रोड, अहिल्यानगर परिसरात आला असल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकांचे अंमलदार यांना सदर परिसरात आरोपीचे शोधकामी पाठविले असता नमुद आरोपी हा गाडगीळ पटांगण, अमरधाम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी मिळुन आला. पुढील कारवाईसाठी आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन येथुन सुपा पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकरिता देण्यात आले आहे. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपी कोतवाली पोलीसांच्या ताब्यात Read More »

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरेंवर जीवघेणा हल्ला?

Pune News: स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर घडलेल्या अत्याचार घटनेत आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरे याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप वाजीद खान बिडकर यांनी केला आहे. आज्ञात लोकांनी त्यांना गाडीत उचलून नेले आणि मारहाण करून दिवेघाटात सोडून दिले असा आरोप वाजीद खान बिडकर यांच्याकडून करण्यात आला. तर दुसरीकडे पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, साहिल बबन डोंगरे वय- 25, धंदा- वकिली व समाजकार्य (वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी) यांना पहाटेच्या सुमारास काही इसमानी गाडीतळ परिसरातून जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण करून दिवे घाट येथे सोडून दिले. त्यांना डोळ्याजवळ, पायाला व शरीरावर किरकोळ जखमा दिसत असून त्यांना नेमके कुठून व कधी गाडीत बसवून नेले याबाबत व्यवस्थित माहिती सांगता येत नाही अधिक माहिती घेतली असता ते रात्री दारू पिऊन होते व मोटर सायकलवर स्लीप होऊन पडले असल्याची शक्यता वाटते. हडपसर पोलीस स्टेशन येथे ते हजर होताच , त्यांना उपचारासाठी पोलीस अंमलदार देऊन ससून रुग्णालय येथे पाठविले आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरेंवर जीवघेणा हल्ला? Read More »

नगर एमआयडीसीमध्ये अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढली, पोलिसांची भूमिका संशयास्पद

Maharashtra News: नगर एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत आहे, ही बाब केवळ स्थानिक नागरिकांसाठीच नव्हे तर पोलीस व्यवस्थेसाठीही मोठी आव्हाने निर्माण करत आहे. या परिसरात टोळी युद्धाची घटना वाढत आहेत, ज्यामध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केला जात आहे. स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे आरोप आहेत. अवैध धंद्यांचे परिणामनगर एमआयडीसी हा औद्योगिक क्षेत्र असून, येथे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. या धंद्यांमध्ये अवैध दारू विक्री, सावकारी आणि इतर गैरकायदेशीर कारवाया समाविष्ट आहेत. यामुळे या परिसरातील गुन्हेगारी वाढत आहे आणि टोळी युद्धाच्या घटना घडत आहेत. या टोळी युद्धात अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक पोलिसांची भूमिकास्थानिक पोलिसांची भूमिका या संदर्भात संशयास्पद असल्याचे आरोप आहेत. पोलिसांकडून योग्य प्रमाणात कारवाई न झाल्याने अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे अनेकदा तक्रारी नोंदवल्या असताना, त्यांना योग्य न्याय मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. सामाजिक परिणामया अवैध धंद्यांमुळे स्थानिक समाजावरही वाईट परिणाम होत आहेत. अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याने त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे आणि समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. या समस्येवर तातडीने उपाय केले नाही तर भविष्यात ही समस्या आणखी वाढू शकते. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या असल्याचे सांगितले. “पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्याने ही समस्या वाढत आहे. आम्ही अनेकदा तक्रारी नोंदवल्या आहेत, पण काहीच बदल होत नाही,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. नगर एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांवर तातडीने नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. यासाठी पोलिसांनी सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. अल्पवयीन मुलांचा वापर होऊ नये म्हणून त्यांच्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. या समस्येवर उपाय केल्याशिवाय समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबणार नाही.

नगर एमआयडीसीमध्ये अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढली, पोलिसांची भूमिका संशयास्पद Read More »

मुकुंदनगरमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, परिसरात तणावाचे वातावरण

Maharashtra News: मुकुंदनगर येथील मौलाना आझाद शाळेजवळ काल (दि. 13 मार्च) सायंकाळी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नाझीम नामक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर काही काळ मुकुंदनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

मुकुंदनगरमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, परिसरात तणावाचे वातावरण Read More »

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक

Stock Market Scam: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना बारा तासाच्या आता अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख सिताराम वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी क्लासिक ब्रीज वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक करण्यात आली असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात तपास करत असताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुन्ह्यातील आरोपी संदीप मधुकर थोरात (वय-35 रा.पाईपलाईन रोड अहिल्यानगर, दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय-35 रा.घोगरगाव ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर) यांची गुप्त माहीती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांचे पथके तयार करून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोपी संदीप मधुकर थोरात याला त्याचे रहाते घरी जात असताना अटक केली तर आरोपी दिलीप तात्याभाऊ कोरडे याला सुपा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. वरील आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी पोलिसांनी केले आहे.

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक Read More »

Maharashtra News: खोटे गुन्हे दाखल करून ग्रामस्थांना वेठिस धरणाऱ्यावर कारवाई करा

Maharashtra News: शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील ग्रामस्थ पांडुरंग श्रीधर कोरडे हा गावातील सामाजिक, राजकीय व सांप्रदायिक कार्यक्रमांमध्ये वारंवार हस्तक्षेप करून ग्रामस्थांना वेठीस धरून त्रास देत असुन येथीलच वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या कुटुंबीयांवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्याने आणी गावातील कोणत्याही सामाजिक व विकास कामात अडथळा निर्माण करून खंडणी सारखे प्रकार करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी गावातील किमान ३० ते ३५ ग्रामस्थांनी शेवगाव पोलिसात निवेदन दिले आहे. कोरडे यांच्यावर कारवाई न झाल्यास येत्या सोमवार दिनांक १० मार्च रोजी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर सुकळी फाट्यावर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख, जनशक्ती विकास आघाडीचे तालुका उपाध्यक्ष हरिश्चंद्र फाटे, जगन्नाथ महाराज गरड, शिवदर्शन गरड, वंचित बहुजन आघाडीचे गणेश बोरुडे, श्रीकिसन काकडे , अंकश गरड आदींसह ग्रामस्थ गावकरीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra News: खोटे गुन्हे दाखल करून ग्रामस्थांना वेठिस धरणाऱ्यावर कारवाई करा Read More »