Dnamarathi.com

Lok Sabha Elections 2024 :  देशाच्या राजकारणाची एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी मोठा राजकीय खेळ होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,लोकसभा निवडणुकीपूर्वी बसपा प्रमुख मायावतींना मोठा धक्का बसू शकतो. 

या माहितीनुसार, पक्षाचे सर्व 10 खासदार बसपा सोडण्याच्या तयारीत आहेत. यापैकी काही खासदार भारतीय जनता पक्ष तर काही सपा आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी राज्यात देखील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणसह आणखी काही नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे आता लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी देशाच्या राजकारणात आणखी काय काय खेळ होणार हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *