Weather Update Today: ‘या’ भागात आज धो धो पाऊस, जाणून घ्या ताजे अपडेट
Weather Update Today: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी म्हणजेच आज किनारपट्टी कर्नाटक, केरळ आणि माहे, लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे. देशातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पुराने कहर केला आहे. तर आज दिल्ली-एनसीआर, पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात, छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात अरुणाचल प्रदेश, बिहार, ओडिशा येथेही पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये पावसाची शक्यता याशिवाय कोस्टल आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, आसाम आणि मेघालय, अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, झारखंडमध्ये हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हिमाचलमधील 6 जिल्ह्यांमध्ये अलर्ट उत्तराखंड, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील किन्नौर, कुल्लू, मंडी, शिमला, सोलन आणि सिरमौर या सहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने सांगितले की, हिमाचल प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग 5 (हिंदुस्थान-तिबेट रोड) सह एकूण 76 रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहेत. शिमल्यात 34, मंडीत 26, कांगडामध्ये 10, कुल्लूमध्ये दोन आणि किन्नौर, उना, सिरमौर आणि लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात प्रत्येकी एक रस्ते बंद आहेत.
Weather Update Today: ‘या’ भागात आज धो धो पाऊस, जाणून घ्या ताजे अपडेट Read More »