DNA मराठी

Uddhav Thackeray

“मनसे-शिवसेना (उद्धव गट) एकत्र येण्याचे राजकारण : कोणाला लाभ, कोणाला तोटा?”

मुंबई – राजकारण हे संभाव्य संधींचं आणि आकड्यांचं खेळ असतो. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय पटावर मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray ) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चेने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. एकेकाळी एकाच विचारधारेतून पुढे आलेली ही दोन भाऊ वेगवेगळ्या वाटेने गेल्यानंतर पुन्हा एकत्र येणार का? आणि जर आली, तर त्याचे आगामी निवडणुकांवर पडणारे परिणाम काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एकत्र येण्यामागची पार्श्वभूमी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर एक वेगळा राजकीय प्रवास सुरू केला. मनसेने https://dnamarathi.com/monopoly-of-employees-in-zilla-parishad-ahilyanagar/सुरुवातीला जोरदार घोडदौड केली, पण पुढे ती सुसाट न राहता थांबली त्याला अनेक करणे आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ठाकरे ब्रँड आणि शिवसेना या पक्ष वाढीस लागला सत्ता मिळवली आणि सत्तेत राहिले सुधा, पण २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे (uddhav thackeray  यांना अनेक राजकीय अडचणींना सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत ठाकरे बंधूंचा संभाव्य पुनर्मिलाप हा “मराठी अस्मिता”चा नवा प्रयोग ठरू शकतो. राज आणि उद्धव एकत्र आल्याने कुनाला लाभ? या एकत्र येण्याने मराठी मतांची विभागणी थांबण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा शहरी भागात मनसेला अजूनही विशिष्ट मर्यादित पण प्रभावी मराठी मतदारांचा पाठिंबा आहे. ही मते जर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यासोबत एकत्र झाली, तर महाविकास आघाडीला (विशेषतः शिवसेना-उद्धव गटाला) अतिरिक्त बळ मिळू शकते.शिवाय, राज ठाकरे (raj thackeray speech ) यांचा भाषणातील प्रभाव, तर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची सहानुभूती आणि मुख्यमंत्री पदाचा अनुभव या दोघांचं एकत्रित राजकीय भांडवल हे भाजप विरोधात प्रभावी शस्त्र ठरू शकते. कोणाला तोटा? या एकत्र येण्याचा सर्वात मोठा धक्का भाजप-शिंदे गट युतीला बसू शकतो. शिंदे गटाने मराठी मतांवर दावा सांगितला असला, तरी त्यांना अजूनही ‘खरी शिवसेना’ म्हणून संपूर्ण जनाधार मिळालेला नाही. अशा वेळी राज-उद्धव (raj – uddhav) युतीने पारंपरिक शिवसेना मतदारांना अधिक ठामपणे आकर्षित केले, तर शिंदे (eknath shinde) गटाचे गणित कोलमडू शकते.दुसरीकडे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (NCP) यांच्यासाठीही ही युती दुधारी तलवार ठरू शकते. ठाकरे-राज बंधूंची लोकप्रियता व प्रभाव वाढला, तर या घटक पक्षांना त्यांच्या जागा गमवण्याची भीती वाटू शकते. निवडणूक परिणामांवर परिणाम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर आगामी विधानसभेच्या आणि विशेषतः मुंबई महापालिकेच्या (mumbai municipal elections) निवडणुकांमध्ये मोठा फरक पडू शकतो. मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेची पारंपरिक सत्ता केंद्र राहिली आहे. शिंदे गट आणि भाजप यांना रोखण्यासाठी ही युती निर्णायक ठरू शकते. विधानसभेच्या पातळीवर मराठी मतदार एकत्र आल्यास शहरी भागांत शिवसेना (उद्धव गट) (uddhav thackeray) अधिक बळकट होऊ शकते. राज ठाकरे (raj thackeray ) आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray)_ यांचे एकत्र येणे केवळ भावनिक पुनर्मिलन न राहता, ते महाराष्ट्राच्या राजकारणाला नव्या दिशा देऊ शकते. मात्र या युतीच्या यशस्वीतेसाठी केवळ नाव पुरेसे नाही, तर एकत्रित विचारधारा, जागा वाटपाची समन्वयता आणि मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. पुढील काही आठवडे ही चर्चा केवळ राजकीय कल्पना आहे की वास्तवात उतरलेली रणनीती, हे स्पष्ट होईल.

“मनसे-शिवसेना (उद्धव गट) एकत्र येण्याचे राजकारण : कोणाला लाभ, कोणाला तोटा?” Read More »

ठाकरे बंधूंना शरद पवारांचा जाहीर पाठिंबा; 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार

Sharad Pawar: मराठीच्या समर्थनार्थ पुकारलेल्या ५ जुलै रोजीच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एक पत्र ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आपल्या पत्रात म्हटले आहेत की, महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे करत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचे योजिले आहे. ह्याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबविण्यास विविधं आक्षेप नोंदविले आहेत. पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार ‘हिंदी सक्ती’साठी हट्ट धरून बसलं आहे असे ते म्हणाले. खरं तर, महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतलात तर जाणवतं की, कुणाचाही विविधं भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही, पण इयत्ता पहिलीपासूनच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे, जो योग्य आहे. आणि, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे असे स्पष्ट करताना त्यांनी शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार, ह्याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी असा इशाराही दिला. महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020)’ अंतर्गत त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा ह्या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. म्हणूनच, मी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, येत्या ५ जुलैच्या मोर्चात प्रचंड संख्येने आवर्जून सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.

ठाकरे बंधूंना शरद पवारांचा जाहीर पाठिंबा; 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार Read More »

raj – uddhav

मोठी बातमी! हिंदी सक्तीविरोधात राज-उद्धव एकत्र?

Raj Thackeray: राज्यातील राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. खासदार संजय राऊत ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघणार आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो शेअर केल्याने हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात मनसेकडून 5 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात सर्व राजकीय पक्ष सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील या मोर्चात राज ठाकरे यांच्यासोबत सहभागी होणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्ती वरून राजकारण तापले असून मनसेसोबत इतर विरोधी पक्ष महायुती सरकारवर जोरदार टीका करत निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहे. विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून या निर्णयावरून विरोधक सरकारवर निशाणा साधत आहे.

मोठी बातमी! हिंदी सक्तीविरोधात राज-उद्धव एकत्र? Read More »

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Ajit Pawar: येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आतापासूनच जोरदार तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी पक्षाला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुण्यात उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार महादेव बाबर यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केला आहे. याशिवाय पुणे, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, नांदेड, हडपसर येथील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. महादेव बाबर यांनी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद शहरात वाढली आहे असं या वेळी अजित पवार म्हणाले. तसेच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असून त्याअगोदर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे दौरा करतील असे जाहीर करतानाच आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला ते शिकवले आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या खात्यातून जनसामान्यांची कामे आपण करत आहोत असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. पक्ष प्रवेश करणार्‍यांनी संघटना बळकट करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करायचे आहे. याशिवाय सभासद नोंदणीही मोठया प्रमाणात करायची आहे. आपल्याला राष्ट्रवादीचा परिवार म्हणून काम करायचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करायचा आहे असेही अजित पवार म्हणाले. पक्षात घेताना कुणाचे वेडेवाकडे धंदे असू नये. त्यांची प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे. महिला भगिनींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. संबंधितांनी कुठेही उर्मटपणे वागता कामा नये असे बजावतानाच शून्यातून विश्व निर्माण करता येते. कुठल्याही गोष्टीचा किंवा कामाचा कमीपणा वाटून घेता कामा नये असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray: शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थितीत होते. यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल. उबाठाची अवस्था धोकादायक आणि जिर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जिर्ण अवस्थेत आहे. 2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांंनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झालाच शिवाय मुळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश Read More »

उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर; मंत्री गिरीश महाजन भडकले

Girish Mahajan on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर असल्याची अशी टीका जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. ते आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहे. संजय राऊत संघटनात्मक बैठक घेऊन गेले. पुढच्या आठ दिवसात बघा, त्यांच्याकडे कोण राहणार कोण राहणार नाही. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे देखील परेशान असतील. पण आता तो विषय आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. त्यांच्या बडबडीमुळे हा पक्ष आता मी सांगू शकत नाही, पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत. संजय राऊत यांच्या बद्दल उत्तर देण्यासाठी काही पुरेसे नाही. अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंवर केली. माध्यमांशी पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांना तुम्ही देखील जास्त प्रसिद्धी देऊ नये आणि त्यांना जास्त मनावर घेऊ नका. कोण अनाथ झाले कोणी दत्तक घेतले, लोक मतदान करतील. तुमची बडबड तुमचे विचार काय हे बघू .निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू असं देखील यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले. तर यावेळी त्यांनी नाशिक पालकमंत्री पदाच्या वादावर देखील भाष्य केले आहे. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री महोदयांनी तुम्हाला उत्तर दिले आहे. मी त्यावर काही वेगळं बोलू शकत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे, मोठी जबाबदारी आहे त्या संदर्भात काम सुरू आहे.

उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर; मंत्री गिरीश महाजन भडकले Read More »

पहलगाम हल्ल्यानंतरही ठाकरे कुटुंब परदेशात पर्यटनात मग्न, खासदार मिलिंद देवरांची सडकून टीका

Milind Deora : काश्मीरमधील पहलगामध्ये भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्यावर सहानुभूती न दाखवणाऱ्या ठाकरे परिवाराची प्रतिमा भूमीपूत्र ते भारताची पर्यटक अशी तयार झाली असल्याची सडकून टीका शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी केली. दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनैतिक दौरा सोडून तातडीने मायदेशी परतले मात्र उबाठा कुटुंब परदेशा सहलीचा आनंद घेण्यात मग्न आहे. पार्टटाइम राजकारणाला महाराष्ट्रात यापुढे थारा नाही, अशी टीका खासदार देवरा यांनी केली. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला तातडीने गेले. त्यांनी पर्यटकांशी संवाद साधला आश्वस्त केले. महाराष्ट्रातील 500 हून अधिक पर्यटकांना शिंदे यांच्या तत्परतेने राज्यात सुखरुप आणण्यात आले. मात्र त्यावेळी ठाकरे कुटुंब युरोपात सुट्ट्यांचा आनंद घेत होते. पहलगाम हल्ल्यानंतर उबाठा परिवाराच्या सदस्यांनी सोशल मिडिया हॅंडलवरुन मेसेज केले, मात्र त्यांना मृतांच्या कुटुंबियांबाबत सहानुभूती व्यक्त करण्यास वेळ मिळाला नाही, असा टोला खासदार देवरा यांनी यावेळी लगावला. दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना स्वत:ला भूमीपूत्रांचे कैवारी समजणारे उबाठा मागील दोन आठवड्यांपासून परदेशात आहेत, असे खासदार देवरा म्हणाले. केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला देखील उबाठा गटाचा एकही खासदार उपस्थित राहिला नाही. नुकताच 1 मे रोजी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठीही उबाठा कुटुंबाला वेळ मिळाला नाही. त्यांनी यासंदर्भात साधे ट्विट देखील केले नाही. त्यामुळे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केवळ शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करत आहेत, अशी खात्री महाराष्ट्रातील जनतेला झाली आहे. पर्यटकांप्रमाणे येऊन भारतात राजकारण करणे आणि इतर वेळ परदेशात राहणे, अशा प्रकारचे पार्टटाइम राजकारण यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही, असे खासदार देवरा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार्टटाइम राजकारणाला दिल्लीतून हद्दपार केले आता महाराष्ट्रात पार्टटाइम राजकारणाला थारा नाही, असे खासदार देवरा म्हणाले.

पहलगाम हल्ल्यानंतरही ठाकरे कुटुंब परदेशात पर्यटनात मग्न, खासदार मिलिंद देवरांची सडकून टीका Read More »

“मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तींचा विरोध, ठाकरे कुटुंबाची एकत्र येण्याची वेळ!”

Rohit Pawar: महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करण्याच्या प्रयत्नांची शिदोरी पुन्हा एकदा वाढत आहे, आणि यावर ठाकरे कुटुंबाच्या एकजुटीचा विरोध होण्याची वेळ आली आहे. ‘महाराष्ट्रधर्म’ जपण्यासाठी ठाकरे कुटुंब एकत्र येत आहे. याबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी एका ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे, “शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे.” हे ट्विट हे एक महत्त्वाचं संदेश देत आहे की, एकता आणि एकजुटीच्या माध्यमातूनच मराठी अस्मितेचं संरक्षण शक्य आहे. ठाकरे कुटुंबाचे नेतृत्व आणि त्याच्या एकजुटीला यापुढे महाराष्ट्रधर्माच्या रक्षणासाठी आणखी मोठं महत्त्व दिलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाने हा संदेश ग्रहण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या राजकारणात एका मराठी माणसाच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी सर्व कुटुंबांनी एकत्र येणं आवश्यक आहे. याच एकजुटीमध्येच महाराष्ट्राचं हित आहे, असं आमदार रोहित पवार यांचे मत आहे. हे निःसंशयपणे राज्याच्या भविष्याचं एक सकारात्मक चित्र रेखाटत आहे. त्यामुळे, एकत्र येण्याची ही वेळ केवळ राजकारणाची नाही, तर मराठी अस्मितेची आहे. आणि याच कारणामुळे, या संघर्षात प्रत्येकाने आपला सहभाग द्यावा लागेल.

“मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तींचा विरोध, ठाकरे कुटुंबाची एकत्र येण्याची वेळ!” Read More »

Uddhav-Raj -उद्धव-राज युतीचा महायुतीवर ‘ठसा’: कोण उरेल? कोण पडेल?

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वळण घेत असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav-Raj) यांच्या एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण आणि त्यांच्या दोन्ही वारसदारांनी घेतलेल्या वेगवेगळ्या वाटा… या पार्श्वभूमीवर जर हे दोन ठाकरे पुन्हा एकत्र आले, तर महायुतीचं गणित पूर्णपणे ढासळण्याची चिन्हं आहेत. राजकारणात ‘कधी कोण मित्र होईल आणि शत्रू होईल’ हे सांगता येत नाही, हे पुन्हा सिद्ध होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या मनसेची (Uddhav-Raj) युती झाली, तर ठाणे, मुंबई, नाशिकसारख्या शहरांमध्ये भाजप-शिंदे गटाला जबर झटका बसू शकतो. कारण या भागांमध्ये दोन्ही पक्षांचे मिळून एक भक्कम मराठी मतदार संघ आहे. शिंदे गटाची अडचण वाढणार? एकनाथ शिंदे यांची शिवसेना मराठी मतांच्या जोरावरच उभी आहे. मात्र, हे मतबळ मूळ शिवसेनेचे आहे, हे नाकारता येणार नाही. राज आणि उद्धव जर एकत्र आले, तर शिंदे गटाकडे उरलेली मराठी ओळख धूसर होण्याची शक्यता आहे. परिणामी, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व टिकवणे कठीण होऊ शकते. भाजपचं गणित कोलमडेल का? भाजपने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात एक मजबूत युती उभी केली होती — शिंदे ( SHIANDE) गट, अजित पवारांची राष्ट्रवादी, आणि स्वतःचा मजबूत संघटनात्मक पाया. मात्र, राज आणि उद्धव एकत्र आल्यास, भाजपच्या मतांच्या वाटणीत मोठा फेरफार होऊ शकतो. विशेषतः शहरी आणि उपनगरी भागांतील मराठी मतदार भाजपपासून दूर जाऊ शकतात. शिवाय, विरोधकांकडून ‘मराठी अस्मिता’चा नवा नारा भाजपला अडचणीत आणू शकतो. अजित पवार यांना झटका? अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे परंपरागत मतदार हे ग्रामीण भागात अधिक आहेत, परंतु काही ठिकाणी मुस्लिम आणि आघाडी समर्थक वर्गाचे मत मिळवण्यासाठी अजितदादांना जोर द्यावा लागतो. ठाकरे-राज एकत्र आले, तर विरोधकांची एकत्रित ताकद अजित पवार यांच्यासाठी देखील आव्हान उभी करू शकते. राजकारणात काहीही होऊ शकतं सध्याच्या घडामोडी पाहता, 2028 च्या निवडणुकांपूर्वी राज्यात अनेक समीकरणं बदलू शकतात. उद्धव आणि राज ठाकरे यांची भेट, चर्चा, आणि त्यातून उद्भवणाऱ्या शक्यता – या सगळ्यांकडे राज्यातील राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.

Uddhav-Raj -उद्धव-राज युतीचा महायुतीवर ‘ठसा’: कोण उरेल? कोण पडेल? Read More »

आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले अन्…, राऊतांचा PM मोदींवर गंभीर आरोप

Sanjay Raut on PM Modi: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी आडवाणी यांची तुलना मुघल सम्राट शहाजहान यांच्याशी केली असून, त्यांना जिवंत असताना सत्तेपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप केला. यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले – राऊतांचा आरोपसंजय राऊत म्हणाले, “लालकृष्ण आडवाणी जिवंत असताना त्यांना शहाजहानाप्रमाणे कोंडून ठेवण्यात आले आणि नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले. मुघली संस्कृतीप्रमाणे त्यांना सत्तेपासून बेदखल करण्यात आले. तेव्हा आम्ही विचारले होते की, मुघली संस्कृतीप्रमाणे का वागले? आडवाणी यांचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदावर हक्क होता. तो त्यांना का दिला नाही?” राऊत यांनी हा सवाल उपस्थित करत भाजपच्या अंतर्गत धोरणांवर टीका केली. मोदींची निवृत्ती आणि फडणवीसांचे मतराऊत यांनी पुढे नरेंद्र मोदी यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “17 सप्टेंबर 2025 रोजी नरेंद्र मोदी वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कितीही वाटत असले तरी त्यांना निवृत्त व्हावे लागेल.” राऊत यांचे हे वक्तव्य फडणवीस यांच्या त्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे, ज्यात त्यांनी मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील, असे म्हटले होते. राऊत यांनी यावरून भाजपच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचा दावा केला. भाजप-संघ संबंधांवर मौनभाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यातील संबंधांबाबत राऊत यांनी भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले, “भाजप आणि संघ यांच्यातील संबंध कसे असावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाने बोलण्याची गरज नाही.” राऊत यांनी यावर तटस्थ भूमिका घेतली असली तरी त्यांच्या इतर वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा तापली आहे. राजकीय वादाला तोंडराऊत यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा भाजप आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होण्याची शक्यता आहे. आडवाणी यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा मुद्दा आणि मोदी यांच्या निवृत्तीचा प्रश्न यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, या विधानांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झाले आहे.

आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले अन्…, राऊतांचा PM मोदींवर गंभीर आरोप Read More »