DNA मराठी

Sujay Vikhe latest Speech

IMG 20240415 WA0003

Sujay Vikhe latest Speech : राजकारण करताना व्हिडीओ नव्हे,कर्तृत्व दाखवावे लागते-खा.विखे

Sujay Vikhe latest Speech : राजकारण करायला कर्तृत्व दाखवावे  लागते,त्याग करावा लागतो.केवळ व्हिडीओ काढून जनता बरोबर येत नसल्याचा टोला महायुतीचे उमेदवार खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी लगावला. तालुक्यातील गोठण येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा डॉ सुजय विखे पाटील बोलत होते.आ.मोनिका राजळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या कामाची चर्चा लोकांमध्ये जावून करा.कोण काय बोलतो कोणते व्हिडीओ टाकतो यावर राजकारण होत नाही.राजकारण करण्यासाठी कर्तृत्व लागते त्याग लागतो.इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करणारा आहे.तीस चाळीस वर्ष त्याग केला त्यामुळेच जिल्हयातील जनता वर्षानुर्षे साथ आणि पाठबळ देत असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार दिड वर्षापुर्वी आले.शक्य तेवढा निधी उपलब्ध करून प्रत्येक गावात विकास काम कशी होतील असा प्रयत्न केला.हेच सरकार पाच वर्षासाठी आले असते तर अधिक निधीची उपलब्धता करता आली असती.पण सरकार का आले नाही हे आपण सर्वजण जाणता.आता महायुती आहे.तेवढ्याच गतीने निर्णय होत असून काम मार्गी लागत असल्याचे विखे यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी आहे.देशाला प्रगती पथावर नेतानाच देश सुरक्षित कसा राहीला याचे धोरण ठरविणारी निवडणूक असल्याने निवडणुकीकडे तेव्ढ्याच गांभिर्याने पाहाण्याचे आवाहन करून राजकारण प्रेमाने कमावलेल्या लोकांना बरोबर घेवून करायचे असते.

Sujay Vikhe latest Speech : राजकारण करताना व्हिडीओ नव्हे,कर्तृत्व दाखवावे लागते-खा.विखे Read More »

IMG 20240409 WA0015

Gudi Padwa 2024 : मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Gudi Padwa 2024 : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार असा विश्वास विद्यमान खासदार आणि दक्षिण अहमदनगर मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पारिजात पार्क येथील गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभा यात्रेत ते बोलत होते. देशाचा निकाल ठरला असून, नरेंद्र मोदीच हे पुन्हा देशाचे पंतप्रधान असतील असेही त्यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले.  गुढीपाडव्याच्या निमित्त अहिल्यानगर येथील प्रोफेसर चौक ते पारिजात चौक येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पांरपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांना विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गुढीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिशा दिली असून, हा केवळ ट्रेलर आहे. पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात मोदींच्या माध्यमातून भारत आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल. भारतातील जनतेने मोदींचे नेतृत्व स्वीकारले असून या निवडणुका केवळ औपचारिकता आहे. येत्या ४ जूनला ४०० पारचे ध्येय सहज गाठता येणार आहे. मोदींच्या माध्यमातून ५०० वर्षापासून रखडलेलल्या प्रभूरामचंद्राच्या मंदिराची निर्मिती झाली यामुळे देशात हिंदुत्वाला मोठे बळ आले आहे.  साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढी पाडव्याचा सण हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो. रामायण काळात गुढी पाडव्याच्या दिवशी रावणाच्या अत्याचारातून रामाने लोकांना मुक्त केले. तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकावला होता. त्याचप्रमाणे मोदींच्या नेतृत्वात देशातून भ्रष्टाचार, दडपशाही आणि हिंदू विरोधी शक्तींचे उच्चाटन होऊन देशात हिंदूत्वाचा पाया मजबूत होईल असा आत्मविश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सुजय विखे यांनी आपल्या प्रचारातून लोकांचा संपर्क वाढविला आहे. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Gudi Padwa 2024 : मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार: खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

IMG 20240408 WA0009

Sujay Vikhe: भूमीपुत्राच्या स्वागतास लोटला जनसागर, विखेंना जबरदस्त रिस्पॉन्स

Sujay Vikhe: डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे काल आयोजन  करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय पाटील यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला.  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी  आम्ही पारनेरकर, विजुभाऊ औटी मित्र परिवार व कोमोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आगमनाने कामोठे नगरी दुमदुमली होती. सर्वत्र सुजय विखे यांच्या नावाचा जयघोष सुरू होता. मोठ्या थाटामाटात कामोठे पुलापासून ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पारनेरकर सहभागी झाले होते.  सदर सभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुजय विखे पाटील यांच्या स्वरूपाने लोकसभेचा निकाल लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीम मध्ये पारनेरकर आणि अहिल्यानगर मधील जनतेच्या वतीने सुजय विखे पाटील येणाऱ्या काळात नेतृत्व करतील, असा विश्वास व्यक्त केला.  तर विजय औटी यांनी व्हिजन असलेला नेता जनतेला मिळणार असून, विखे पाटील कुटुंबीयांनी मागील 50 वर्षांपासून जनतेची सेवा केली असून डॉ. सुजय विखे पाटील, ही परंपरा अखंड चालवत आहेत. यामुळे जनता त्यांच्या पाठीशी उभी असून त्यांच्या चौथ्या पिढीला सत्तेत बसविले आहे. विरोधकांवर ताशरे ओढताना औटी यांनी सुपा midc च्या मध्ये स्थानिकांना डावलून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम पारनेर मधील लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  या दहशतिला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरंग लागणार असून, त्यांच्या व्हिजनमुळे येणाऱ्या काळात स्थलांतरणाला आळा बसणार असून स्थानिक तरुणांना आपल्या परिसरात काम मिळेल, मागील पाच वर्षांच्या त्यांच्या विकास कामामुळे  जनतेचा नेता म्हणून डॉ. सुजय विखे पाटील लोकांच्या पसंतीला उतरत आहेत.  खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी पारनेरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करत सदरची निवडणूक ही परिवर्तनाची असून दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी आहे. यामुळे लोकांनी विचार करून मतदान करावे. विखे परिवार सदैव पारनेरकरांच्या पाठीशी आहे. मी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार असून येणाऱ्या काळात फक्त विकासाचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पारनेर,अहिल्यानगर, आणि नवी मुंबईतील सर्व भाजप आणि महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

Sujay Vikhe: भूमीपुत्राच्या स्वागतास लोटला जनसागर, विखेंना जबरदस्त रिस्पॉन्स Read More »