DNA मराठी

Solapur Crime

solapur triple murder

Solapur Crime: सोलापूरमध्ये तिहेरी हत्याकांड; जमीन वादातून आई, मुलगी आणि 17 वर्षीय मुलाचा तलवारीने खून

Solapur Crime: सोलापूर जिल्ह्यातील बोरामणीजवळील मस्के वस्तीत जमीन वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत आई, मुलगी आणि १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री मस्के (३६), त्यांची मुलगी प्रियंका मस्के (२०) आणि मुलगा शिवराज मस्के (१७) हे उन्हाळ्यामुळे घराच्या गच्चीवर झोपले होते. याचाच फायदा घेत मध्यरात्री अज्ञात हल्लेखोर गच्चीवर चढले आणि तिघांवर तलवारीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गायत्री आणि प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, शिवराजने आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न करत हल्लेखोरांना प्रतिकार केला. मात्र हल्लेखोरांनी त्याच्या हातावर वार करत त्याचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी तो खाली पळाला, पण आरोपींनी त्याला घरात गाठून त्याच्यावर पुन्हा वार करत त्याचा खून केला. नेमकं कारण काय? प्राथमिक माहितीनुसार, मस्के कुटुंबाची सुमारे दीड एकर जमीन असून तिची किंमत अंदाजे ७५ लाख रुपये आहे. याच जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात गायत्री मस्के यांचा दीर पप्पू मस्के हा संशयित असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी सोलापूर तालुका पोलिसांनी सहा पथके तयार केली असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Solapur Crime: सोलापूरमध्ये तिहेरी हत्याकांड; जमीन वादातून आई, मुलगी आणि 17 वर्षीय मुलाचा तलवारीने खून Read More »

Solapur Crime : धक्कादायक, प्रेमसंबंधातून तरुणाने स्वतःवर घेतली गोळी झाडून

Solapur Crime : बार्शी तालुक्यातील सासुरे गावात एका कारमध्ये तरुणाचा गोळ्या झाडून स्वतः ला संपावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमसंबंधातील वादातून ही धक्कादायक झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, मृत तरुणाच्या नातेवाईकांची चौकशी तसेच घटनास्थळी सापडलेल्या शस्त्रच्या तपासणीचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ग्राम पोलिस पाटील यांनी याबाबत वरा पोलिसांना माहिती दिली की, गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक लाल रंगाची कार बराच वेळ बंद अवस्थेत उभी आहे. कार पूर्णपणे लॉक असून, आत एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसत आहे. कारच्या बाजूलाच पिस्तूल पडलेले असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक गावडे, एपीआय जगदाळे यांच्यासह पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख गोविंद जगन्नाथ बरगे (रा. मसला, ता. गेवराई, जि. बीड) अशी पटली. चौकशीत समोर आले की, गोविंद बरगे आणि प्रशांत गायकवाड यांची बहीण पूजा यांच्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.मात्र अलीकडेच हे संबंध बिघडल्याने वाद सुरू होता. नातेवाईकांकडून डुप्लिकेट चावी मागवून कार उघडण्यात आली.आत गोविंद बरगे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत होता. त्याच्या डोळ्या कानाजवळ गोळ्यांच्या दोन जखमा होत्या.गोळ्या आरपार गेल्याने अगदी जवळून गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. या प्रकरणाचा तपास एपीआय जगदाळे करीत आहेत. पिस्तुलावरील परवाना आहे की नाही, याची तपासणी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांची व गायकवाड कुटुंबीयांची चौकशी केली आहे. प्रेमसंबंध तुटल्याने वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असला तरी इतर सर्व शक्य कोनातून तपास सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले. डीवायएसपी सायकर म्हणाले, “प्रेमसंबंधातील वादामुळे ही घटना घडल्याची शक्यता आहे; मात्र आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल.” सध्या कोणालाही अटक झालेली नाही. बार्शी पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन अशोक सायकर उपविभागीय पोलीस अधिकारी,बार्शी यांनी केले आहे.

Solapur Crime : धक्कादायक, प्रेमसंबंधातून तरुणाने स्वतःवर घेतली गोळी झाडून Read More »