DNA मराठी

Siddharam Salimath News

Siddharam Salimath : ‘मिशन 100 दिवस’ अंतर्गत नागरिकांना किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Siddharam Salimath : ‘इज ऑफ लिव्हिंग’ या संकल्पनेवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध विभागांच्या सेवांचे सुसूत्रीकरण करत 100 दिवसांमध्ये सर्व विभागांनी मिळून किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असलेल्या 7 कलमी कार्यक्रमांची ‘मिशन 100 दिवस’ उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमबजावणी करण्यात यावी. महसूल विभागामार्फत विद्यार्थी-विद्यार्थींनींना विविध प्रकारचे एक लाख दाखले देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे इतर शासकीय विभागांनीही त्यांच्या सेवा देण्याचे नियोजन करावे. प्रत्येक कार्यालय, कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. कार्यालयातील दस्तऐवज सहागठ्ठे पद्धतीनूसार ठेवण्यात यावे. अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेटी देण्यासाठी दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावा. भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व विभागांनी त्यांच्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करावी. जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळ अधिक माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्यावा. जिल्ह्याच्या विकासामध्ये विभागाचे योगदान असलेल्या ब्लॉगची निर्मिती करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या. जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे ऑनलाईन सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम तयार करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गतची कामे प्राधान्याने करत नागरिकांना विहित मुदतीमध्ये सेवा देण्यात याव्यात. डॅशबोर्डवर एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. जिल्ह्यात विविध विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांची माहिती अभिनव पहल या पोर्टलवर अपलोड करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Siddharam Salimath : ‘मिशन 100 दिवस’ अंतर्गत नागरिकांना किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ Read More »

Siddharam Salimath: ग्राहकांचे प्रश्न समन्वयातून सोडवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Siddharam Salimath : ग्राहकांच्या असलेल्या अडी-अडचणी व प्रश्न जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून समन्वयाने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत नाही ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले,दैनंदिन जीवनामध्ये ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्राहकांच्या विद्यूत विषयक समस्या सोडविण्यासाठी तालुका व जिल्‍हा पातळीवर ऊर्जामित्र बैठकांचे आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने या तारांची तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात यावी. अहिल्यानगर शहरामध्ये गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयामध्ये रुग्णहक्क सनद तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबतचे फलक लावण्यात यावेत. ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांचे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत. रिफ्लेक्टर न बसविलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचनाही सालीमठ यांनी यावेळी केल्या. बैठकीस अशासकीय सदस्य अतुल कुऱ्हाडे, विलास जगदाळे, रणजित श्रीगोड, गजेंद्र क्षीरसागर, बाबासाहेब भालेराव, डॉ. मंगला भोसले, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. विलास सोनवणे, डॉ. गोरख बारहाते, प्रकाश रासकर उपस्थित होते.

Siddharam Salimath: ग्राहकांचे प्रश्न समन्वयातून सोडवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ Read More »