DNA मराठी

Satyajit Tambe news

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे

Ahmednagar News: विधान परिषदेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात होते. यापैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. मात्र यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला.  शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा   विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.  लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागून होते, लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तर महायुतीला धक्का बसला होता. यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकून आले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  तांबे नेमकं काय म्हणाले? शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. भाई जयंत पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल. पाटलांचा पराभव हा शरद पवारांना धक्का जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते. मात्र निवडणुकीच्या निकालात ते सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नव्हता. विजयासाठी जयंत पाटील यांना 23 संख्यापर्यंत पोहचायचं होतं. पण जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली.

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे Read More »

Ahmednagar News: 31 डिसेंबरपर्यंत शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश: आ. सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

Ahmednagar News:  निरोगी आणि सकारात्मक आयुष्य जगण्यासाठीचा महत्त्वाचा क्रीडाप्रकार अशी ओळख असलेल्या योगविद्येचा समावेश आता शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीतही होणार आहे.  गेल्या दोन अधिवेशनांपासून आमदार सत्यजीत तांबे यांनी योगाला क्रीडाप्रकाराचा दर्जा द्यावा व या खेळाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. आता हिवाळी अधिवेशनातही त्यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी 31 डिसेंबरच्या आत नियमावली तयार करून शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश केला जाईल, असं आश्वासन दिलं. त्यामुळे आ. सत्यजीत तांबे यांनी आणखी एक प्रश्न तडीला लावल्याची भावना व्यक्त होत आहे.  भारतीय संस्कृतीत उगम झालेली योगविद्या ही निरोगी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे. योगविद्येचा अभ्यास करणाऱ्यांना शारीरिक फायद्यांसोबतच मानसिक स्वास्थ्यही लाभते. त्यामुळे योगासनांचा समावेश क्रीडाप्रकारांत व्हावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी आमदार झाल्यानंतरच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. तसंच योगासनं करणाऱ्यांचा विचार शिवछत्रपती पुरस्कारांसाठी व्हावा व या पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश व्हावा, याबाबतही ते आग्रही होते. त्यानुसार योगविद्येला क्रीडाप्रकाराचा दर्जा याआधीच मिळाला होता. आता हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा आ. तांबे यांनी योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, याबाबत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 31 डिसेंबरच्या आधीच याबाबत नियमावली तयार केली जाईल, अशी ग्वाही सभागृहाला दिली. 9 खेळांचा शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश व्हावा! स्कुल फेडरेशन ऑफ इंडियाने रोलबॉल, आट्यापाट्या, बॉल बॅडमिंटन, सिकई-मार्शल आर्ट, थ्रो बॉल, डॉज-बॉल, टेनिक्वाईट, शूटिंग बॉल आणि कॅरम हे खेळ शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून वगळले होते. त्यामुळे हे खेळ खेळणारे खेळाडू ग्रेस मार्क, सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण अशा सुविधांपासून वंचित झाले होते. हा या खेळाडूंवर अन्याय आहे.  परिणामी स्कुल फेडरेशन ऑफ इंडियाने हे नऊ खेळ वगळण्याच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली. या मागणीची दखल घेत खेळाडूंच्या अडचणींचा आणि भवितव्याचा विचार करून या खेळांचा समावेश शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं.

Ahmednagar News: 31 डिसेंबरपर्यंत शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश: आ. सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश Read More »