DNA मराठी

public health

eat more vegetables fruits and whole grains

जास्तीत जास्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खा; संतुलित आहारासाठी तज्ज्ञांची जनजागृती मोहीम

मुंबई – वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या तणावामुळे महाराष्ट्रात असंतुलित आहार ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. फास्ट फूड, प्रोसेस्ड पॅकेट खाण्याचे पदार्थ आणि जास्त तेलकट-गोड पदार्थ यांच्या खाल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या दीर्घकालीन आजारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोषणतज्ज्ञ आणि आरोग्य विभागाने नागरिकांना “जास्तीत जास्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खा” असा सल्ला देत एक व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे जागृती करून जमत नाही तर आपण स्वत होऊन काही कर्तनही तोपर्यंत काही होत नसते. का आवश्यक आहे भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य? तज्ज्ञांच्या मते, हंगामी भाज्या व फळे यामध्ये विटामिन, मिनरल्स, फायबर मोठ्या प्रमाणात असते, जे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील सूज कमी करते. संपूर्ण धान्य – जसे की गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, ब्राउन राईस – यात ‘कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स’ आणि भरपूर फायबर असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवते व जास्त वेळ पोट भरल्याची भावना देते. महाराष्ट्रातील आहाराची चिंता नाशिक, पुणे, कोल्हापूर,मुंबई, अहिल्यानगर, नागपूरसारख्या शहरांत फास्ट फूड संस्कृती झपाट्याने वाढते आहे. ग्रामीण भागातसुद्धा पॅकेट नाश्ता, गोड पेये आणि पॉलिश केलेले तांदूळ यांचा वापर वाढतोय. परिणामी, पारंपरिक पौष्टिक अन्न – उदा. ज्वारीची भाकरी, भाजी, डाळ, ताक – हळूहळू आहारातून गायब होत आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन सरकारची भूमिका आरोग्य मंत्रालयाने शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत स्तरावर ‘आरोग्यदायी आहार’ जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे. यामध्ये पाककला स्पर्धा, आरोग्य शिबिरे, तसेच ‘संतुलित आहार’ विषयक कार्यशाळा आयोजित करण्याची तयारी आहे. विश्लेषण आहारातील बदल हा फक्त वैयक्तिक सवय नसून सार्वजनिक आरोग्य धोरणाचा भाग असावा लागेल. महाराष्ट्राला कुपोषणापासून स्थूलतेकडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आज भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य आपल्या ताटात नसेल, तर उद्या रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागतील.

जास्तीत जास्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खा; संतुलित आहारासाठी तज्ज्ञांची जनजागृती मोहीम Read More »

adulterated milk

adulterated milk “आरोग्याशी खेळ, सत्तेची ढाल – दोषींना संरक्षण कोण देतं?”  

लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी त्याचा थेट संबंध आहे. आणि अशा मूलभूत अन्नघटकामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक रसायने आणि पावडर मिसळून विक्रीस टाकले जाणे, हा केवळ अप्रामाणिक व्यवसाय नाही, तर तो उघडपणे हत्या करण्यासारखा गुन्हा आहे. adulterated milk – Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील दूध संकलन केंद्रांमध्ये सुरू असलेला भेसळीचा उद्योग आणि त्यामागे असलेला राजकीय वरदहस्त हा केवळ एक स्थानिक गैरप्रकार नाही, तर ही आपल्या व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या अनास्थेची आणि नैतिक दिवाळखोरीची स्पष्ट साक्ष आहे. दूधासारखा नितळ आणि पवित्र मानला जाणारा अन्नघटक जर विषारी बनवून बाजारात विकला जात असेल, तर हे केवळ एक आर्थिक घोटाळा नाही, तर मानवी आरोग्यावर, विशेषतः बालकांवर केलेले अक्षम्य अपराध आहे. धायतडकवाडी येथील संत वामनभाऊ दूध संकलन केंद्राच्या नावाने चालवला जाणारा हा बनावट व्यवहार केवळ भेसळीतच मर्यादित नाही. येथे शासनाच्या दूध पूरक प्रोत्साहन योजनेंतर्गत लाखो रुपयांचे अनुदान उचलून, प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली दुधाळ जनावरे दाखवून शासनाची फसवणूक झाली आहे. हे प्रकरण ज्या पद्धतीने उघडकीस आले, त्यावरून स्पष्ट होते की, यामागे एक संगनमत आहे आणि याला स्थानिक मोठ्या राजकारण्यांचे संरक्षण लाभले आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना ‘कारवाई करू नका’ असा आदेश स्थानिक मोठ्या नेत्याने दिला. ही घटना लोकशाहीसाठी आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेसाठी गंभीर इशारा आहे. प्रशासन जर एखाद्या मंत्र्याच्या किंवा स्थानिक नेत्याच्या दबावाखाली काम करत असेल, तर मग सामान्य जनतेचा काय? दूध हा आपल्या घराघरात दररोज वापरला जाणारा अत्यावश्यक घटक. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी त्याचा थेट संबंध आहे. आणि अशा मूलभूत अन्नघटकामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक रसायने आणि पावडर मिसळून विक्रीस टाकले जाणे, हा केवळ अप्रामाणिक व्यवसाय नाही, तर तो उघडपणे हत्या करण्यासारखा गुन्हा आहे. या प्रकरणात अमोल सखाराम धायतडक यांच्यावर झालेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे प्रत्यक्षात कोणतीही दुधाळ जनावरे नसताना, त्यांनी बनावट संकलन केंद्राच्या नावाखाली व्यवसाय उभा करून जनतेला विषारी दूध विकले आहे. हे दूध म्हणजे एका अर्थाने विषाचे घोट होते जे आपण आपल्या मुलांच्या हातात दिले. प्रश्न इतकाच आहे ही माहिती सरकारदरबारी पोहोचल्यावर खरोखर दोषींवर कारवाई होईल का? की या प्रकरणाची फाईलसुद्धा राजकीय दबावात गारद होईल? कारण ही केवळ एक घटनेची नव्हे, तर व्यवस्थेच्या भ्रष्ट पायाभरणीची कथा आहे. हा प्रकार आरोग्याच्या आणि नैतिकतेच्या दोन्ही आघाड्यांवर गंभीर धोका आहे. आज पाथर्डी, उद्या कोण? जर या विषारी धंद्यांना वेळेत आवर घातला नाही, तर शासन आणि प्रशासनाची विश्वासार्हता पार खिळखिळी होईल. दूधभेसळीप्रकरणी केवळ पोलिस चौकशी नव्हे, तर अन्न व औषध प्रशासन, दुग्धविकास विभाग, आणि लोकायुक्त यांची संयुक्त समिती नेमून सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.शेवटी, दूध विकण्याचा व्यवसाय म्हणजे सेवा आणि ती सेवा विषारी बनवणाऱ्यांसाठी कारागृह हेच योग्य ठिकाण आहे. आणि या सर्व प्रक्रियेला राजकीय वरदहस्त असेल, तर मग समाजानेच निर्धार करून, अशा नेत्यांना जनादेशातून दूर ठेवायला हवे.

adulterated milk “आरोग्याशी खेळ, सत्तेची ढाल – दोषींना संरक्षण कोण देतं?”   Read More »