DNA मराठी

Pratap Sarnaik News

आनंदाची बातमी, एसटीत लवकरच नोकरभरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik : एसटीत विभागात लवकरच मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदा बरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन. 2024 पर्यंत मनाई केली होती. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची लक्षणिय संख्या लक्षात घेता, नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एस टी महामंडळाच्या 307 व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अभियंत्यांची रिक्त पदे भरणार सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार आहेत. नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

आनंदाची बातमी, एसटीत लवकरच नोकरभरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा Read More »

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा गळ्यात सातारी कंदी पेढाची माळ घालून वेगळ्या पद्धतीने सत्कार

Pratap Sarnaik : गेली अनेक वर्षे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीच्या आर्थिक स्थितीवर श्वेत पत्रिका काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्या बद्दल एसटीचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सातारी कंदी पेढ्याचा हार व शिवनेरीची प्रतिकृती भेट देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात आज “महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या”वतीने सत्कार करण्यात आला. एसटी आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून दहा हजार कोटी रुपयांचा संचित तोटा व सात हजार कोटी रुपयांची देणी थकली असून त्यातून निश्चित मार्ग काढण्यासाठी श्वेत पत्रिका काढण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. या मागणीला यश मिळाले असून एसटीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत चांगला असून गोर गरिबांची व सामान्यांची एसटी सक्षम करायची असेल तर त्यावर मार्ग काढण्यासाठी श्वेत पत्रिका काढण्याचा निर्णय हा महत्वपूर्ण असून यातून अपेक्षित यश मिळून एसटीचे प्रवासी व कर्मचारी या दोघांचे प्रश्न सुटतील असा विश्वास एसटी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला असून एसटीत सर्वात यशस्वी ठरलेल्या “शिवनेरीची” प्रतिकृती व एसटीच्या दृष्टींने पुढे सर्व काही गोड व्हावे यासाठी सातारी कंदी पेढ्याचा हार देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने मंत्री सरनाईक यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्काराला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असलेला सात टक्के महागाई भत्ता तत्काळ देण्यात येणार असून त्या साठी अपेक्षित उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाला देण्यात येणार आहे .येत्या पाच वर्षात 25 हजार नव्या स्व मालकीच्या बसेस खरेदी करण्यात येतील. या शिवाय या पुढे भाडे तत्वावरील एकही बस घेतली जाणार नसून पाच वर्षात एसटीला चांगले दिवस येतील असा विश्वासही त्यांनी या वेळी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला. या वेळी भारतीय कर्मचारी कामगार महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, कार्याध्यक्ष विजय बोरगमवार, कोशाध्यक्ष संतोष गायकवाड,उपाध्यक्ष वसंत बोराडे, संजीव चिकुर्डेकर, दीपक जगदाळे, प्रादेशिक सचिव बालाजी ढेपे,राजेश गोपनवार, समीर डांगे, मनीष बत्तुलवार, पदाधिकारी सर्वश्री सचिन जगताप,राजेश सोलापान,मनीषा कालेशवार, संतोष भराड, संतोष भिसाडे, राजेंद्र वहाटूळे, बालाजी जाधव, अनिता वळवी, अरविंद निकम, सुधाकर कांबळे, संदीप गोसावी, सुमन ढेंबरे, धनंजय पाटील, सुगंधा हिले, विनोद दातार, जहीर खान, किशोर पाटील, सुनील घोरपडे, नवनाथ गुंड, हरीश बन्नगरे, जयंत मुळे, प्रवीण चरपे, संदीप मुळे,विष्णू म्हस्के, कमलाकर जोशी, जयश्री कंचकटले, विधी पवार, सोमनाथ पांढरे, किशोर सावंत, गजानन पूकळे,तुकाराम पुंगळे, प्रताप शेळके,आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा गळ्यात सातारी कंदी पेढाची माळ घालून वेगळ्या पद्धतीने सत्कार Read More »

Pratap Sarnaik : व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात बसपोर्ट; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik : बसस्थानक हे त्या शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना, ते अशा मोक्याच्या ठिकाणी असते की जिथे व्यापार- उदीम विकसित होत असतो, हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी ” व्यापारी संकुल ” आणि त्यामधून येणाऱ्या महसूलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी – सुविधा युक्त असलेले ” बसपोर्ट ” निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी दळणवळणचा सुंदर मिलाफ असल्याचे मत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. ते गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेताना बोलत होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) दिनेश महाजन (महाव्यवस्थापक बांधकाम) हे अधिकारी देखील दौऱ्यात सहभागी होत आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान गुजरात राज्याचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबत देखील मंत्री सरनाईक यांची बैठक झाली . या बैठकीत दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नागार्जन यांनी शिष्टमंडळाला त्यांच्या परिवहन सेवेची माहिती दिली. त्यामध्ये गुजरात परिवहन महामंडळ मार्फत चालवण्यात येणारी एकात्मिक नियंत्रण प्रणाली अत्यंत चांगली असुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये देखील अशा प्रकारची सुविधा असणे गरजेचे आहे. असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. यावेळी गुजरात मधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची पाहणी मंत्री सरनाईक व त्यांच्या शिष्ठमंडाळाने केली. यावेळी बसस्थानकावरील वेगवेगळ्या सोयी-सुविधा कशाप्रकारे प्रवाशांना दिल्या जातात, याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळात दिली. विशेष करून तेथील प्रशासनाने बसस्थानकावर थोडेशा विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांना ” प्रवासी विश्रांतीगृह ” कमी किंमतीमध्ये बस स्थानकावर उपलब्ध करून दिले आहेत, त्याचे कौतुक मंत्री सरनाईक यांनी केले .तसेच गुजरात परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक बसेसची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा, जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती. इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का? याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली आहे.

Pratap Sarnaik : व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात बसपोर्ट; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक Read More »