DNA मराठी

MVA

NCP Second Candidate List: राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, वांद्रे पूर्वमधून जीशान सिद्दिकी तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे मैदानात

NCP Second Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज आपली दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 38 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. दुसऱ्या यादीमध्ये काँग्रेसचे आमदार जीशान सिद्दिकी यांच्या नावाचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जीशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व मधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता शिवसेना नेते वरून सरदेसाई विरुद्ध जीशान सिद्दिकी असा सामना रंगणार आहे. तर पक्षाकडून अनुशक्ती नगरमधून सना मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या जागी पक्षाने आता त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरुद्ध इस्लामपूर मधून निशिकांत पाटील यांना उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केली आहे. तसेच तासगाव विधानसभा मतदारसंघातून संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तासगाव विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय पाटील असा सामना रंगणार आहे. वडगाव शेरीमधून पुन्हा एकदा सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके आणि लोहमधून भाजपचे माजी खासदार प्रताप चिखलीकर यांना उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.

NCP Second Candidate List: राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, वांद्रे पूर्वमधून जीशान सिद्दिकी तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे मैदानात Read More »

MVA Seat Sharing : फॉर्मुला ठरला, मविआमध्ये काँग्रेसचं मोठा भाऊ, आज होणार घोषणा?

MVA Seat Shearing : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी रात्री उशिरा बैठक झाली आणि विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झाले असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. जाणून घ्या सीट शेअरिंग फॉर्म्युलाकाँग्रेस 105 जागा, शिवसेना (UBT) 95 आणि NCP (शरदचंद्र पवार) 84 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र आतापर्यंत या वृत्ताला कोणत्याही महाविकास आघाडीच्या नेत्याने दुजोरा दिला नाही. उर्वरित जागा महायुतीत समाविष्ट असलेल्या छोट्या पक्षांना दिल्या जातील. शिवसेना (यूबीटी) आणि काँग्रेस यांच्यातील चर्चेला भिडल्यानंतर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रथम राष्ट्रवादीचे (शारदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार आणि नंतर शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. थोरात आणि इतर एमव्हीए नेत्यांनी नंतर पुन्हा भेट घेतली. थोरात म्हणाले की, एआयसीसीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पवार आणि ठाकरे यांची भेट घेण्यास सांगितले होते.

MVA Seat Sharing : फॉर्मुला ठरला, मविआमध्ये काँग्रेसचं मोठा भाऊ, आज होणार घोषणा? Read More »

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बंडात साथ देणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर यापूर्वी मनसेकडून देखील 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांना वर्षा बंगल्यावर बोलावलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आज या आमदारांना एबी फॉर्म वाटप करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे अद्याप देखील महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा आतापर्यंत सुटलेला नाही. आज किंवा उद्या महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना महायुतीकडून एबी फॉर्म देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आतापर्यंत 17 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे तर भाजपने आतापर्यंत 99 जागांवर आपले उमेदवारांची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे उमेदवार कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदेसाक्री (अज) – मंजूळाताई गावितचोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणेजळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटीलएरंडोल – अमोल चिमणराव पाटीलपाचोरा – किशोर पाटीलमुक्ताईनगर – चंद्रकांत पाटीलबुलढाणा – संजय गायकवाडमेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकरदर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळरामटेक – आशिष जैस्वालभंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकरदिग्रस – संजय राठोडनांदेड उत्तर – बालाजी कल्याणकरकळमनुरू – संतोष बांगरजालना – अर्जून खोतकरसिल्लोड – अब्दुल सत्तारछत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वालछत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाटपैठण – विलास भूमरेवैजापूर – रमेश बोरनारेनांदगाव – सुहास कांदेमालेगाव बाह्य – दादाजी भुसेओवळा माजीवडा – प्रताप सरनाईकमागाठाणे – प्रकाश सुर्वेजोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकरचांदिवली – दिलीप लांडेकुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकरमाहिम – सदा सरवणकरभायखळा – यामिनी जाधवकर्जत – महेंद्र थोरवेअलिबाग- महेंद्र हरी दळवीमहाड- भरतशेठ मारुती गोगावलेउमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुलेपरांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंतसांगोला- शहाजी बापू पाटीलकोरेगाव- महेश शिंदेपाटण- शंभूराज देसाईदापोली- योगेश कदमरत्नागिरी- उदय सामंतराजापुर- किरण सामंतसावंतवाडी- दीपक केसरकरराधानगरी- प्रकाश आबिटकरकरवीर- चंद्रदिप नरकेखानापुर- सुहास बाबर

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी Read More »

Maharashtra Election 2024 : ठाकरेंच्या भेटीनंतर पारनेरमध्ये मोठी घडामोड, पठारे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

Maharashtra Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार कोण असणार हे थोड्याच दिवसात समोर येणार आहे. तर दुसरीकडे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर मतदारसंघातील बूथ, गण, गटनिहाय आढावा बैठका सुरु केलेल्या असून बैठकांचा धडाकाच लावला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पठारे यांनी वारंवार मातोश्री गाठत ठाकरेंच्या भेठीगाठी घेतल्या आहेत यामुळे पठारे यांनी विधानसभेचे जोरदार तयारी केली आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात 366 बूथ, 14 गण, 7 गट असून पारनेर शहरातील नगरपंचायतचाही यात समावेश आहे. त्यादृष्टीने डॉ.श्रीकांत पठारे हे मातोश्रीवरील बैठकीवरुण आल्यापासून सातत्याने मतदारसंघातील मतदारांच्या भेटीगाठी घेत असून आता गण, गटनिहाय बैठकांचे सत्रच डॉ.श्रीकांत पठारे यांनी सुरु केले आहे. मतदान घडवून आणण्यासाठी लागणारी शिवसैनिकांची फौज उभी करण्याचे काम यात सुरु असून महाविकासआघाडीतील सर्वच मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना डॉ.श्रीकांत पठारे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आहेत.

Maharashtra Election 2024 : ठाकरेंच्या भेटीनंतर पारनेरमध्ये मोठी घडामोड, पठारे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता Read More »

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील

Ahmednagar Election:  निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून  २२५-अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी तहसिल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये १ लाख ५९ हजार ७२४ पुरुष, १ लाख ५४ हजार ७४८ महिला व १०७ इतर असे एकूण ३ लाख १४ हजार ५७९ मतदार आहेत.  तसेच मतदार संघामध्ये ५७८ पुरुष, ४२ स्त्री असे एकूण ६२० सैनिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघामध्ये एकूण २९७ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.  ४६ पडदानशील मतदान केंद्रे असून आदर्श मतदान केंद्रांची संख्या ३ एवढी आहे. मतदारसंघात महिला संचलित, युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचलित आणि दिव्यांग संचलित प्रत्येकी एक मतदार केंद्र असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.   निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरूवात होणार असून  २९ ऑक्टोबर २०२४ अंतिम तारीख आहे. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ४ नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,, गोदाम क्र.६, एम.आय.डी.सी. नागापूर येथे मतमोजणी होणार असल्याची माहितीही  पाटील यांनी यावेळी दिली.    अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदारांसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा क्र. ०२४१-२३४१९५७  असा आहे. हा कक्ष २४X७  सुरू राहणार असून मतदारांनी माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले.  राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील Read More »

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये

Maharashtra Election : निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत मुंबई काँग्रेसचे मोठे नेते जावेद श्रॉफ यांना पक्ष प्रवेश दिला आहे.  जावेद श्रॉफ मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि त्यांची मुंबईत चांगली पकड असल्याचे मानले जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  नुकतच जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याने याचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे. यातच अनेक नेते आता पक्ष सोडत असल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. कधी होणार मतदान 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.  22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रात 9.63 कोटी पात्र मतदार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 100186 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये Read More »

Sanjay Raut: ‘या’ दिवशी महाविकास आघाडीची पहिली यादी येणार, संजय राऊत यांनी जाहीरचं करून टाकलं

Sanjay Raut:  कालच नायब सैनी सांगत होते निवडणूक जिंकून घेण्यासाठी मी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. वेबसाईटवर काँग्रेस मागे आहे असं दिसतं पण पूर्ण निकाल होऊ द्या. इथे जसा मराठी माणूस लढवायला आहे तसा तिथे हरियाणातील मतदार देखील लढला आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच हरियाणामध्ये काँग्रेसची सरकार येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.  तर महाराष्ट्रात राहुल गांधी, किंवा प्रियंका गांधीला मुख्यमंत्री व्हायचं नाही येथे स्थानिक नेतृत्व आहेत. शरद पवार ,उद्धव ठाकरे आम्हाला माहित आहे जागावाटप कसा व्हायला पाहिजे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आमचं जागा वाटपाचा टास्क पूर्ण होईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.  दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होईल. काँग्रेसचा मुख्यमंत्री हा दिल्लीत निश्चित होतो येथे बोलून काही होणार नाही. आमच्या पार्टीचा हाय कमांड महाराष्ट्र मुंबईत आहे त्यामुळे या संदर्भातील निर्णय आम्ही महाराष्ट्रात घेतो असेही ते म्हणाले.

Sanjay Raut: ‘या’ दिवशी महाविकास आघाडीची पहिली यादी येणार, संजय राऊत यांनी जाहीरचं करून टाकलं Read More »

Maharashtra Vidhansabha Election 2024 : संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात? सुजय विखेंकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

Sujay Vikhe:  येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. यातच आता अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मला जर संधी मिळाली तर मी विधानसभा निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना माजी खासदार सुजय विखे यांनी दिली त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातसह राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर किंवा संगमनेरमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवल्याने सुजय विखे  बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागू नये.  माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्‍न असणार आहे. ज्या तालुक्यात उमेदवारी बाबत समन्‍वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्‍यास मी निश्चित निवडणूक लढविण्‍यास तयार आहे असं माध्‍यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले.  तर शिर्डी विधानसभा मतदार संघातून राधाकृष्ण विखे पाटील निवडणूक लढवणार असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्‍याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्‍ट हेच आहे. पक्षाकडे सामान्‍य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्‍ये आ.राम शिंदे यांच्‍यासह अनेकजण इच्‍छुक होते. त्‍याच पध्‍दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्‍छा व्‍यक्‍त केली असेल तर, यात गैर काही नाही अशी प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.  विधानसभा निवडणूक लढविण्‍याच्‍या प्रश्‍नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, उत्‍तर भागामध्‍ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकाराण खुप क्लिष्‍ट आहे. त्‍यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्‍यात अनेकजण इच्‍छुक आहेत. त्‍यांच्‍यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फक्‍त  अर्ज करण्‍याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्‍याचे सुचक वक्‍तव्‍य यांनी केले.

Maharashtra Vidhansabha Election 2024 : संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात? सुजय विखेंकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत Read More »

Ahmednagar News : “गाढवाला गुळाची चव कशी कळणार” लंकेवर दिलीप भालसिंग यांचा घणाघात!

Ahmednagar News: निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेतल्याने हिंदू अस्मितेला आघात केल्याची टीका अहमदनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली आहे.  लंकेच्या टीकेला परखड उत्तर देताना दिलीप भालसिंग म्हणाले की,  ५०० वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून धर्माचे कार्य केले. या कार्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला संधी मिळावी आणि गरिबातल्या गरिबाला हा आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साखर आणि डाळ वाटून सामान्य नागरिकांना प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता यावे या भावनेतून हा उपक्रम राबविला. सामाजिक आणि धार्मिक भावनेने केलेले हे कार्य कोणाच्याही डोळ्यात खुपण्याची गरज नाही. असा घणाघात भाजप नेते दिलीप भालसिंग यांनी केला.  प्रभु रामाच्या आगमनाने अवघा भारत प्रफुल्लीत झाला असताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील कोणत्याही घटकातील नागरिकाला आपल्या आर्थिक अडचणीमुळे हा आनंद साजरा करण्यास अडचण येऊ नये यासाठी हा उपक्रम राबविला.त्यात पारनेरच्या आमदाराच्या बुडाला आग लागण्याचे कोणतेही कारण नाही. अशा सनसनाटी शव्दात  दिलीप भालसिंग यांनी लंकेचा समाचार घेतला. त्याच बरोबर पाच वर्षे  ‘आपला माणूस’म्हणुन मिडियात आपली प्रतिमा झळकवणाऱ्या लंके यांनी मागील पाच वर्षात काय दिवे लावले, हे जनतेला माहित आहे.  लोकांच्या पाणीप्रश्नाबाबात विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले याची माहिती जनतेला देऊन उपकृत करावे असा टोला देखील लगावला. विखेंनी साखर आणि डाळ वाटून धार्मिक कार्यात हातभार लावला त्यासाठी त्यांना कोणत्याही सरकारी यंत्रणेची गरज नाही. त्यासाठी ते स्वत: सक्षम आहेत. सामाजिक बांधिलकी ही काय असते हे विखे पाटील परिवाराकडून लंकेनी शिकावे असा सल्ला सु्द्धा भालसिंग यांनी दिला.   गेल्या ५० वर्षात विखे पाटील परिवाराने राजकारणातील सुसंस्कृतपणा काय असतो? याचे उत्तम उदारण समाजापुढे ठेवले आहे. त्यांनी अथवा त्यांच्या कोणत्याही माणसाने गोळ्या झाडून कुणाला संपवण्याची धमकी कुणाला दिली नाही.हे खंडणीखोर आपला माणूस असल्याचा टेंबा मिरवणाऱ्याला काय कळणार? मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आणि गरिबीचे भांडवल करून माध्यमांत आपली प्रतिमा उजळ करणाऱ्या निलेश लंके यांना काय कळणार? असा खोचक सवाल दिलीप भालसिंग यांनी विचारला आहे.   विखेंनी तरी डाळ साखर वाटून लोकांचा आंनद गोड केला. पण तुम्ही सुपा एमआयडीसीतील व्यापाऱ्यांचे  खिसे कापून त्यांना दरिद्री बनवले आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना शहाणपण शिकवण्याआधी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे  तपासून घ्यावे असा सल्ला दिलीप भालसिंग यांनी निलेश लंके यांना दिला आहे.

Ahmednagar News : “गाढवाला गुळाची चव कशी कळणार” लंकेवर दिलीप भालसिंग यांचा घणाघात! Read More »

Lok Sabha Elections 2024: प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, ‘या’ उमेदवाराचे अर्ज रद्द

Lok Sabha Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी फक्त दोन आठवडे शिल्लक आहे. यामुळे सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरात प्रचार करताना दिसत आहे.  तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्ष वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. VBA च्या एका उमेदवाराचे अर्ज रद्द करण्यात आले आहे.   यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जातील त्रुटींमुळे तो रद्द करण्यात आला आहे.  यवतमाळ-वाशीममध्ये होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पाहता येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल होती. आज प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. याच प्रक्रियेत VBA उमेदवार अभिजीत राठोड यांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्याने त्यांचे नामांकन रद्द करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 4 एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिममधून उमेदवार बदलून सुभाष खेमसिंग पवार यांच्या जागी तरुण अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली होती. यानंतर अखेरच्या दिवशी अभिजीतने उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 38 उमेदवारांचे 49 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले. येथे महायुतीकडून राजश्री पाटील तर महाविकास आघाडीचे संजय देशमुख आहेत. VBA उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्याने MVA आघाडीच्या उमेदवाराला सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. यानंतर दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे आणि पाचवा टप्पा 20 मे रोजी होणार आहे.

Lok Sabha Elections 2024: प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, ‘या’ उमेदवाराचे अर्ज रद्द Read More »