DNA मराठी

Manoj Jarange Patil Manoj Jarange Patil News

IMG 20240120 WA0012

Sujay Vikhe News: खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित..

Sujay Vikhe News: आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाळीसगाव येथे शिवकथाकार परमपूज्य प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांची भेट घेऊन अहमदनगर शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. उन्मेष पाटील यांच्या वतीने चाळीसगाव येथे व्यास भागवत कथेचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ता प्रदिपजी मिश्रा यांचा प्रभू श्रीराम शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदरील भव्य कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातही व्हावा या अनुषंगाने सदर ठिकाणी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत सुजय विखेंनी प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिव महापुराण कथा विमोचनकर पंडित प्रदीप मिश्रा यांचा ‘प्रवचन सोहळा’ पूर्ण श्रध्देने आणि सुव्यवस्था राखून यशस्वी करणार असल्याचा निर्धार यावेळी सुजय विखे यांनी बोलून दाखविला.

Sujay Vikhe News: खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित.. Read More »

Manoj Jarange Patil

Maratha Reservation: बारा बाभळी मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा! जाणुन घ्या संपूर्ण कार्यक्रम

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.  तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम असणार आहे.  तर याच ठिकाणी पाटिल एक सभा देखील घेणार असून या सभेमध्ये तब्बल 20 ते 25 लाख लोक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. पाटील यांच्यासोबत असणाऱ्या नागरिकांच्या चहा पाण्याची , नाश्त्याची तसेच जेवणाची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली आहे.  पाटील यांच्या होणाऱ्या सभामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असा आवाहन संघटनेकडून करण्यात आला आहे.

Maratha Reservation: बारा बाभळी मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा! जाणुन घ्या संपूर्ण कार्यक्रम Read More »