DNA मराठी

Maharashtra Election update

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण

Maharashtra Election :  निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये  निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी  कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत.  वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे  आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण Read More »

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये

Maharashtra Election : निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत मुंबई काँग्रेसचे मोठे नेते जावेद श्रॉफ यांना पक्ष प्रवेश दिला आहे.  जावेद श्रॉफ मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि त्यांची मुंबईत चांगली पकड असल्याचे मानले जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  नुकतच जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याने याचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे. यातच अनेक नेते आता पक्ष सोडत असल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. कधी होणार मतदान 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.  22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रात 9.63 कोटी पात्र मतदार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 100186 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये Read More »