DNA मराठी

Maharashtra Election news

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे 

Monika Rajale : ताजनापुर योजनेवर चर्चा सुरु केली की समजून जायचे निवडणूक आली आहे. निवडणूक प्रचारात गावासाठी काय दिले, काय करणार हे न सांगता, जातीपातीचे राजकारण सुरु करायचे. त्यांच्याकडे विकासकामांचे मुद्दे नसल्याने, विकासाच्या मुद्द्याला बगल द्यायची, दहा वर्षात तालुका मागे पडला म्हणायचा, जर तुम्ही दहा वर्षात मतदारसंघात फिरले असते तर विकास कामे दिसली असती. तुमच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.    आमदार राजळे यांनी तालुक्यातील ठाकूर निमगाव, कुरुडगाव रावतळे, वरुर, भगुर, आव्हाणे, दिंडेवाडी, बऱ्हाणपुर, मळेगाव, भातकुडगाव, आखतवाडे, आपेगाव, गरडवाडी, ढोर जळगाव, सामानगाव, लोळेगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला. वरुर येथे झालेल्या कार्यक्रमात दिनकर अंचवले महाराज, भिमराव फुंदे, सचिन म्हस्के, भानुदास सोनटक्के, मारुती लव्हाट, विठ्ठल झिरपे, केशव म्हस्के, गणपत शिंदे, संजय देवडकर, संजय मोरे, बाबासाहेब धायतडक, प्रकाश म्हस्के, भागवत झिरपे, भाऊसाहेब वावरे, किसन म्हस्के, संजय मोरे, दीपक भुसारी, बापुनाना पिसोटे, रवींद्र वायकर, आशाताई गरड, मारुती खांबट, गणेश म्हस्के, अंबिका लव्हाट, अजिंक्य लव्हाट, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना राजळे म्हणाल्या, कारखान्याला मदत हवी होती, त्यावेळी अजितदादांच्या गटात आले. दिडशे कोटी रुपये निधी मिळाला, लगेच पलटी मारली. त्यांनी देखील यापूर्वी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले, त्यांच्या कार्यकाळात बसस्थानक, शहर पाणी योजना, ताजनापुर योजना, रस्ते, आदी प्रश्न होते. इतक्या वर्षापासून महिलांचे पाण्यासाठीचे सुरु असलेले हाल त्यांना दिसले नाहीत. मी महिला असल्याने त्यांचे दुःख वेदना मला जाणवल्या त्यामुळे प्राधान्याने पाणी प्रश्नावर पाठपुरावा करुन पाणी प्रश्न मार्गी लावला. बसस्थानक, विविध रस्त्यांचे कामे मार्गी लावली. त्यावेळी त्यांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणीही अडवले नव्हते. प्रत्येक गावात किमान एक कोटी निधी देऊन विविध प्रश्न मार्गी लावले. क्वचित एखाद्या गावाला कोटी पेक्षा कमी निधी मिळाला असेल. पण भेदभाव न करता जनतेचे हित लक्षात घेऊन कामे केल्याचे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे  Read More »

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. नाशिक येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. या सभेत बोलताना त्यांनी वीर सावरकर यांना काँग्रेसचे युवराज संपूर्ण देशात फिरून शिव्या देतात मात्र सावरकर यांचा वारसा जपण्याचा दावा करणारे आज काँग्रेससोबत आहे. असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच आमची सरकार आली तर राज्यातील शेतकऱ्यांना 12 ऐवजी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची घोषणा देखील मोदींनी नाशिकमधून केली. तर राज्यातील अनेक विकास कामे थांबवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सरकार आणा असा आवाहन देखील त्यांनी केला. पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जर राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली तर राज्यात सुरु असणारी लाडकी बहिण योजना बंद होणार असा दावा देखील त्यांनी केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा Read More »

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त

Maharashtra Election 2024 : राज्यात विधानसभेसाठी निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. संपूर्ण राज्यात पोलिस देखील आचारसंहिताचे पालन करत मोठी कारवाई करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काळबादेवी येथे पोलिसांनी 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री काही लोकांना अडवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2.3 कोटी रुपयांची रोकड सापडली. पैसे घेऊन जाणारे हे लोक रोख रकमेशी संबंधित कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत किंवा एवढी मोठी रक्कम घेऊन जाण्याचे कारणही सांगू शकले नाहीत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेली पथक रोख रक्कम, दारू आणि इतर संभाव्य प्रलोभनांबाबत सतर्क आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपर्यंत कागदपत्रे आणि चौकशीनंतर ही रक्कम जप्त करण्यात आली असून रोख घेऊन जाणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर ही रोकड तपासासाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त Read More »