DNA मराठी

Maharashtra Accident

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर पुन्हा अपघात, ट्रक पुलावरून पलटी

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाणपुलावर गाडीवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रात्री 8.30 ते 9 वाजेच्या दरम्यान अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. सदरचे वाहन ऊसमाल वाहतूक ट्रक असून उड्डाण पुलाच्या तीव्र वळणावर ट्रक चालकाला वेगावर नियंत्रण मिळविता न आल्याने ट्रक पुलावर पलटी होऊन गाडीतील काही माल पुलावरून थेट खाली कोसळला. दरम्यान थंडी तसेच रात्रीची वेळ असल्याने पूलाखालील वाहतूक कमी होती त्यामुळे पुन्हा एकदा मोठी जीवितहानी टळली. गेल्या वर्षभरात याच बहुचर्चित उड्डाणपुलावर अनेक अपघात घडले असेल तरी अद्याप प्रशासनाकडून कुठलेही ठोस उपाययोजना करण्यात आले नाही.

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर पुन्हा अपघात, ट्रक पुलावरून पलटी Read More »

Maharashtra Accident: भीषण अपघात! टेम्पो आणि कंटेनरमध्ये धडक, दोघांचा मृत्यू

Maharashtra Accident:  सातारा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आयशर टेम्पो आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक झाली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला. सातारा-लोणंद महामार्गावर कोरेगाव तालुक्यातील आंबवडे वाघोलीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनरने पेट घेतला. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी (12 ऑगस्ट) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात कंटेनरला आग लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींना पोलिसांनी तात्काळ सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक पूर्ववत केली. या दुर्दैवी घटनेत कंटेनर जळून खाक झाला असून आयशर टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे.  आयशर टेम्पो किंवा कंटेनर चालक झोपी गेल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा तपास वाठार पोलीस करत आहेत.

Maharashtra Accident: भीषण अपघात! टेम्पो आणि कंटेनरमध्ये धडक, दोघांचा मृत्यू Read More »

Maharashtra Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यात पडली, 3 ठार, 25 जखमी

Maharashtra Accident  :  राज्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याने एकच खरबड उडाली आहे. रविवारी अमरावती येथे एक भीषण अपघात झाला.  रोडवेज बसचे नियंत्रण सुटले आणि खड्ड्यात पडली. या अपघातात एका अल्पवयीनासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत.  घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासन मदतकार्यासाठी हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीहून मेळघाटमार्गे मध्य प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला. तर बसमधील 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले. परतवाडा सेमाडोह घाटांग रस्त्यावर हा अपघात झाला. वळणदार रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. जखमींवर सध्या सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. परतवाडा आगारातून मध्य प्रदेशातील तुकैथडला जाणाऱ्या बसला आज सकाळी 11.30 च्या सुमारास अपघात झाला. बस जवाहर कुंड येथील घाट वळणावर असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस 30 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. इंदू समाधान गंत्रे (65) आणि ललिता चिमोटे (30) अशी मृत महिलांची नावे आहेत. मृत निष्पापाची ओळख पटवली जात आहे. दरम्यान, जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून इतर रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. चिखलदरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिवहन महामंडळाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

Maharashtra Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यात पडली, 3 ठार, 25 जखमी Read More »

Maharashtra Accident

Maharashtra Accident: मोठी बातमी! फायर कँडल कंपनीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

 Maharashtra Accident :  पिंपरी-चिंचवड शहरातील मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तळवडे, पिंपरी चिंचवड येथे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात किमान सहा जण जखमी झाले आहेत. केकवर लावल्या जाणार्‍या मेणबत्त्या कारखान्यात बनवल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात एका कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या सात जणांपैकी बहुतांश महिला आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने सात जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. चिखली व देहूरोड पोलीस तसेच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीत फायर कँडल कंपनी जळून खाक झाली. अजूनही काही लोक अडकले असण्याची भीती आहे. मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच आगीने संपूर्ण कॉम्प्लेक्सला वेढले. अशा परिस्थितीत तिथं काम करणा-या लोकांना पळून जाण्यास वेळ मिळाला नाही. सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Maharashtra Accident: मोठी बातमी! फायर कँडल कंपनीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू Read More »