DNA मराठी

Lok Sabha Election

Lok Sabha Election : तरूणांमध्ये सुजय विखे पाटील बनतात सेल्फी आयकॉन

Lok Sabha Election : या वर्षीच्या निवडणुकीत तरुण नवमतदार महत्वाची भूमिका बजावणार आहेत. यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकारणी सोशल मीडियाचा वापर करत त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात अहमदनगरचे दक्षिण मतदार संघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे अग्रेसर स्थानी आहेत. तरुणांमध्ये त्यांचे क्रेज वाढत असून त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी तरुणांची मोठी झुंबड पहायला मिळत आहे. तरुणांमधील डॉ. सुजय विखे यांचे क्रेज ही विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत.   लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नव मतदार मतदान करणार आहेत. तरुणांमध्ये सेल्फीचे मोठे क्रेज आहे. आपल्या आवडत्या नेत्याबरोबर सेल्फी काढण्याचा उत्साह वेगळाच असल्याचे अनेक तरुण विविध उमेदवाराबरोबर सेल्फी काढून सोशल मिडियाच्या खात्यावर प्रसारित करत आहेत. नगरमध्ये ही हे क्रेज तरुणाईमध्ये पहायला मिळत आहे. त्यात सुजय विखे पाटील यांना मोठी पसंती मिळत आहे.  सुजय विखे यांनी प्रचाराच्या निमित्त प्रचार सभा आणि गाठी भेटींचा सपाटा लावला आहे. दररोज विविध ठिकाणी डॉ. सुजय विखे पाटील  मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. यावेळी सभा संपल्यावर मोठ्या प्रमाणात तरुण सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या भोवती गरडा घालत आहेत.     प्रचाराच्या दरम्यान लोकांशी संवाद साधताना ठिकठिकाणी त्यांच्या भोवती तरुणांचा वेढा निर्माण होऊन सेल्फी काढण्याची मागणी करतात. सुजय विखे पाटील ही तरुणांच्या मागणीला हसून प्रतिसाद देतात. यामुळे समाज माध्यमावर सर्वत्र त्यांचे फोटो दिसत आहेत. यामुळे सुजय विखे यांना आता सेल्फी आयकॉन म्हणुन ओळख मिळत आहे. तरुणामध्ये सुजय विखेची वाढती पसंती ही विरोधकांसाठी धोकादायक असल्याने त्यांना काऊंटर करण्यासाठी विरोधकांकडून विविध युक्त्या आखल्या जात आहेत.  पण त्याचाही फायदाच सुजय विखे यांना होताना दिसत आहे. कारण कोणतेही विरोधात्मक विधाने न करता, केवळ विकास कामाचे मुद्दे घेऊन सुजय विखे प्रचार करत असल्याने त्यांच्या विरोधात व्ययक्तिक स्वरुपाच्या होणाऱ्या टिकांना तरुणच उत्तरे देताना दिसत आहेत. यामुळे तरुणाईमध्ये सोशल मीडियाच्या पडद्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय झाल्याचे दिसून येत आहे.

Lok Sabha Election : तरूणांमध्ये सुजय विखे पाटील बनतात सेल्फी आयकॉन Read More »

Lok Sabha Election Dates 2024 : लोकसभेसाठी तुमच्या जिल्ह्यात कधी होणार मतदान? एका क्लिकवर जाणुन घ्या संपूर्ण माहिती

Lok Sabha Election Dates 2024: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी तारखा जाहीर केले आहे.  पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी प्रथम सांगितले की, निवडणुका हा एक सण, देशाचा अभिमान आहे.त्यांनी सांगितले की यावेळी 96.8 कोटी मतदार मतदान करणार आहेत. म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी लोक मतदान करतील.  आगामी लोकसभा निवडणुकीत सुमारे 1.8 कोटी मतदार आहेत जे पहिल्यांदाच कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार आहेत. याशिवाय 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 19.47 कोटी आहे. एकूण मतदारांमध्ये 49.7 कोटी पुरुष, 47.1 कोटी महिला आणि 48 हजार ट्रान्सजेंडर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील मतदार लिंग गुणोत्तर 948 आहे, 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत.  मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “आमच्या मतदार यादीत 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 82 लाख आणि 100 वर्षांवरील 2.18 लाख मतदारांचा समावेश आहे.” मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, देशाला खऱ्या अर्थाने उत्सवपूर्ण, लोकशाही वातावरण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ जून 2024 मध्ये संपणार आहे. जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात मतदान कधी…. पहिला टप्पा – 19 एप्रिल  रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे  रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे  नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे  धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ यावेळी अहमदनगर जिल्ह्यात 4 थ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी मतदान होत आहे. यावेळी अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघात एकाच दिवशी मतदान होणार असून मतमोजणी 4 जूनला होणार आहे.

Lok Sabha Election Dates 2024 : लोकसभेसाठी तुमच्या जिल्ह्यात कधी होणार मतदान? एका क्लिकवर जाणुन घ्या संपूर्ण माहिती Read More »

Lok Sabha Election : लोकसभेसाठी राज्यात महायुती की महाविकास आघाडी? जनतेची पसंती कोणाला? जाणून घ्या ताजे सर्वेक्षण

Lok Sabha Election : येणाऱ्या काही महिन्यात लोकसभेसाठी निवडणुका होणार आहे. मात्र त्यापूर्वी अनेक सर्वेक्षण समोर आले.   राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेस आणि भाजपा मध्ये लढत पाहिला मिळत होती.  तर आता आणखी एक नवीन सर्वेक्षण समोर आला आहे. या सर्वेक्षणात राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये कोणता पक्ष वर्चस्व गाजवू शकतो याचा अंदाज लावण्यात आला आहे.  राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. राज्याची राजकीय स्थिती जाणून घेण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्याचे निकाल धक्कादायक आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) जिंकण्याची शक्यता आहे. तसेच, महायुतीपेक्षा एमव्हीएला चार टक्के जास्त मते मिळतील, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती कशी बदलली? राज्यातील ‘महायुती’मध्ये सत्ताधारी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) अजित पवार गट यांचा समावेश आहे.   MVA आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव गट) यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील बंडखोरीनंतर गेल्या वर्षी जूनमध्ये पक्ष फुटला होता, तर या वर्षी 2 जुलै रोजी अजित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर आठ आमदार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी देखील दोन गटात विभागली गेली. 2019 मध्ये शिवसेनेने (उद्धव गट) काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एमव्हीएची स्थापना केली आणि राज्यात सरकार स्थापन केले. परंतु 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एमव्हीए सरकार पडले आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) सत्तेवर आले. दरम्यान, जून 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली.  शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गट एकत्र आल्याने भाजपची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. पण, सर्वेक्षणातून काही वेगळीच समीकरणे समोर आली आहेत. या निवडणूक सर्वेक्षणात 2 लाखांहून अधिक नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. एबीपी-सी वोटरनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला लोकसभेत 26 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे.  तर महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, इतर पक्षांना 2 जागा मिळतील, असे सर्वच्या आकडेवारीत म्हटले आहे. कोणाला किती टक्के मते मिळतात? मतांच्या टक्केवारीतही महायुती मागे राहील. महाविकास आघाडीला 41 टक्के मते मिळू शकतात. त्यामुळे महायुतीला 37 टक्के आणि इतर पक्षांना 22 टक्के मते मिळतील, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.  या सर्वेक्षणाची आकडेवारी महाविकास आघाडीसाठी दिलासा देणारी आहे. त्यामुळे भाजपसोबतच शिवसेना आणि अजित पवार गटाची चिंता वाढणार आहे.

Lok Sabha Election : लोकसभेसाठी राज्यात महायुती की महाविकास आघाडी? जनतेची पसंती कोणाला? जाणून घ्या ताजे सर्वेक्षण Read More »