DNA मराठी

latest news

Ramdas Athawale : मोठी बातमी! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात,  कंटेनरने दिली धडक

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला.   केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला.  सातारा जिल्ह्यातील वाई येथे हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांच्या गाडीला अचानक ब्रेक लागल्याने कंटेनरला धडकली. या धडकेने कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आठवले यांची गाडी पुढे जाणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक लावल्याने कंटेनरला धडकली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सातारा एसपी समीर शेख यांनी केंद्रीय मंत्री आठवले सुरक्षित असून या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची पुष्टी केली. त्यानंतर आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईला रवाना झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Ramdas Athawale : मोठी बातमी! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात,  कंटेनरने दिली धडक Read More »

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्याकडून अवैध हातभट्टी चालकावरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.  नगर तालुका पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतील साकत गाव व या परिसरात हातभट्टी दारू उत्पादन करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना   मिळाली होती.  मिळालेल्या माहितीवरून तत्काळ पथकासह स्वतः पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते साकत गावच्या शिवारातील 13/15 सुमारास छापा टाकून हातभट्टी चालक सोमनाथ नारायण पवार (राहणार साकत ताजी अहमदनगर) याच्या कब्जात 36000 किमती चा गावठी हातभट्टी तयार करण्याची कच्चे रसायनसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला व सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई साकत गावच्या शिवारात 14/30 छापा टाकला असता आरोपी हरिभाऊ मौला पवार (गाव-साकत खुर्द ता .जि.अहमदनगर) याच्या कब्जात 38 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला  तिसरी कारवाई  साकत गावाच्या शिवारात सीना नदी पात्रात   छापा टाकला असता आरोपी सोपान हरिभाऊ पवार (गाव- साकत खुर्द ता.जि. अहमदनगर) याच्या कब्जात 42 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले व सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ )(क) (ड) (ई)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला चौथी कारवाई साकत गावच्या शिवारात 16.30 पास्ता छापा टाकला असता आरोपी आकाश महिपती पवार (गाव,रा साकत ता, जि अहमदनगर) याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 46000 रू हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कच्चे रसायन व गावठी हातभट्टी तयार दारू साहित्य मिळून आल्याने ते नष्ट करण्यात आले सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर चार कारवाई मध्ये एकूण एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट करून चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट Read More »

Maharashtra Politics : भाजपला ‘राज ठाकरे’ ची गरज का?, एका क्लीकवर समजून घ्या संपूर्ण राजकीय खेळ 

Maharashtra Politics : गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगमी लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत शामिल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.   सध्या महायुतीमध्ये भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. मात्र तरीही देखील भाजपला राज ठाकरेंच्या मनसेची गरज का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदू नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंची ही प्रतिमा भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेशी जुळते. चुलतभाऊ उद्धव ठाकरे सत्तेत असताना राज यांनी मशिदींमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यानंतर टोलवरून एकनाथ शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना-राष्ट्रवादी असूनही भाजपला मनसेची गरज का? भाजपला एकच आमदार असलेल्या पक्षासोबत युती का करायची आहे? विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असले तरी तिन्ही पक्षांमधील जागावाटपाचा प्रश्न सुटत नसताना भाजप मनसेला बरोबर घेण्यास उत्सुक आहे. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘ठाकरे ब्रँड’. मुंबईत ‘ठाकरे ब्रँड’ गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षांना 3-3 जागा मिळाल्या. मात्र यानंतर भाजप आणि शिवसेना वेगळे झाले. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली. तीनपैकी दोन खासदारांनी शिवसेनेची (एकनाथ शिंदे) बाजू घेतली. पण पक्षाचे नाव आणि त्याचे चिन्ह गमावलेले उद्धव ठाकरे आजही मुंबईच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत आहेत.  उद्धव यांचा पराभव करण्यासाठी भाजपला ‘ठाकरे ब्रँड’ हवा आहे. राज ठाकरेंच्या मनसेला मुंबईशिवाय ठाणे आणि नाशिकमध्येही चांगला पाठिंबा आहे. ‘ठाकरे’ विरुद्ध ‘ठाकरे’ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडली, त्यामुळे शिवसेनेच्या मूळ मतदारांचा उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.  मुंबई, ठाण्यासह राज्यातील कोकणपट्ट्यात उद्धव ठाकरे यांना मोठा समर्थन दिसून येत आहे. सहानुभूतीच्या जोरावर ठाकरे पुन्हा एकदा मुंबईत विजयी होऊ शकतात आणि याचा फायदा त्यांना आगामी बीएमसी निवडणुका आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही मिळेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपला राज ठाकरेंचा ढाल म्हणून वापर करायचा आहे. मराठी अस्मिता आणि मराठी माणूस हिंदुत्वाचा मुद्दा बनवून शिंदे सेना आणि भाजप उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आहेत, तर उद्धव प्रत्युत्तरात भ्रष्टाचार, कुशासन, मराठी अस्मिता, उद्योग गुजरातमध्ये नेण्याचे मुद्दे उपस्थित करत आहेत. या प्रश्नांची उत्तरे राज ठाकरेंनी दिली तर भाजपसाठी ते अधिक फायदेशीर ठरेल.  कारण बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ‘नेता’ बनलेल्या राज ठाकरेंना महाराष्ट्राचा धर्म, मराठी अस्मिता यांसारख्या मुद्द्यांवर प्रभावीपणे मुकाबला कसा करायचा हे चांगलंच माहीत आहे. राज्यात आपला पाया भक्कम करणाऱ्या मराठी माणसाचा मुद्दा मनसेने सुरुवातीलाच उचलून धरला होता. विचारधारांची लढाई काँग्रेससोबतच्या महाविकास आघाडीत सहभागी होऊन बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा सोडून दिल्याचे सांगत शिंदे यांची शिवसेना आणि भाजप सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत.  दुसरीकडे, गेल्या काही वर्षांपासून मनसे आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वत:ला सादर करत आहे. त्यामुळे भाजपसोबत गेल्यास त्यांना विचारसरणीची अडचण येणार नाही. उलट राजबाबत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मार्ग अवलंबत असल्याचा मेसेज मतदारांमध्ये देण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

Maharashtra Politics : भाजपला ‘राज ठाकरे’ ची गरज का?, एका क्लीकवर समजून घ्या संपूर्ण राजकीय खेळ  Read More »

Pune News : धक्कादायक! मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॅनेजरला अटक

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू  असणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा सातत्याने पर्दाफाश होत आहे.    पुन्हा एकदा हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेट पर्दाफाश झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.  पोलिसांनी या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत चार मुलींना वाचवले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निगडी परिसरातील फिनिक्स स्पामध्ये वेश्याव्यवसायाचा काळा धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून पोलिसांनी  कारवाई करत चार मुलींची सुटका केली असून स्पाच्या महिला व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, अनैतिक वाहतूक प्रतिबंध विभागाला निगडीतील इन्स्पिरिया मॉलमधील फिनिक्स नावाच्या स्पामध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली.  त्यानंतर पोलिसांनी त्या स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवले. वेश्याव्यवसायाची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ‘स्पा’वर छापा टाकला. या प्रकरणात चार मुलींना वाचवण्यात पोलिसांना यश आले. महिला व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी दिनेश गुप्ताचा ते शोध घेत आहेत. पैशाचे आमिष दाखवून मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस चारही मुलींना पुनर्वसन केंद्रात पाठवू शकतात. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Pune News : धक्कादायक! मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॅनेजरला अटक Read More »

Mobile Blast: पँटच्या खिशातून अचानक येऊ लागला धूर, मोबाईल बाहेर काढताच त्याने घेतला पेट….!

Mobile Blast : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य ( वय वर्षे ४७ ) यांच्या पॅंटीच्या खालच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलने अचानक पेट घेतल्याने अंगावरील पॅन्ट जळून मांडीला व हाताला भाजल्याने किरकोळ इजा होऊन ते जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बालमटाकळीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य ( वय ४७ वर्षे ) हे सोमवार दि. १८ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी नऊच्या दरम्यान आपली दुकान उघडून आतमध्ये बसले होते अचानक दुकानात त्यांना सर्वत्र धूर दिसू लागला त्यामुळे त्यांनी इकडे तिकडे पाहताच त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या पँटच्या खिशातून धूर निघत आहे व खिसा देखील गरम होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे त्यांनी सर्तकता ठेऊन लगेच खिशात ठेवलेला मोबाईल पटकन बाहेर काढला.  तोपर्यंत त्यांच्या पँटने पेट घेतला होता तसेच त्यांच्या हाताला व मांडीला देखील भाजले होते. खिशातील मोबाइल हातात घेतल्यानंतर हँडसेटने लगेच पेट घेतला त्यांनी तो मोबाईल खाली फेकून देताच तो जळून खाक झाला अशी माहिती दत्तात्रय दामोदर वैद्य यांनी दिली आहे.  दत्तात्रय दामोदर वैद्य यांनी पाच वर्षापूर्वी एम.आय. कंपनीचा रेडमी सेवन हा मोबाईल खेरदी केला होता. मोबाईल जळत असल्याचे लगेच त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र कशामुळे मोबाईलचा स्फोट झाला हे अजून कळालेले नाही.  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वैद्य यांनी सतर्कता दाखवत मोबाइल दूर फेकला मात्र, तरी सुद्धा या घटनेत ते जखमी झाले आहे. यामुळे मोबाईल हाताळणे किती धोकादायक असू शकते हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Mobile Blast: पँटच्या खिशातून अचानक येऊ लागला धूर, मोबाईल बाहेर काढताच त्याने घेतला पेट….! Read More »

Ahmednagar News:  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील ३ गावांमध्ये तसेच राहुरी, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका गावी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  कर्जत तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी, मौजे सितपूर आणि मौजे म्हाळंगी येथे तसेच राहुरी तालुक्यातील मौजे चेडगाव, श्रीगोंदा तालुक्यातील मौजे मुगुंसगाव आणि जामखेड तालुक्यातील मौजे जवळके येथे नवीन उपकेंद्र इमारतीचे बांधकाम करण्याच्या कामासाठी प्रत्येकी ५५.५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सदरील विविध प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्माणासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली असता त्यांनी शासन स्तरावर याबाबतीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या नवीन उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध झाला आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि नागरिकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार असल्याचे स्पष्ट केले.  आरोग्याच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मत सुजय विखेंनी मांडले. आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याकडे अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल सुरू झाली असून येणाऱ्या काळात सर्वांनाच आपल्या जवळील उपकेंद्रात उपचार घेणे शक्य होईल असे मत खासदार विखे पाटील यांनी मांडले.  तसेच त्यांनी सदरील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्दिले, आमदार राम शिंदे व आमदार बबनदादा पाचपुते, यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Ahmednagar News:  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Ahmednagar News : लोकांची कामे करण्‍यात तालुक्‍याच्‍या नेत्‍यांना कोणतेही स्‍वारस्‍य नाही, विखेंची नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका

Ahmednagar News: मंत्रीपद असूनही तालुक्‍यात रोजगाराची कोणतीही साधनं निर्माण करता आली नाहीत, लोकांची कामे करण्‍यात तालुक्‍याच्‍या नेत्‍यांना कोणतेही स्‍वारस्‍य नाही, हेलपाटे मारायला लावण्‍यातच त्‍यांना स्‍वारस्‍य  वाटते. तालुक्‍यातील जनतेने आता पर्याय शोधला पाहीजे. गावगुंडाच्‍या  राजकारणापेक्षा विकासाचा मंत्र घेवून येणा-यांना पाठबळ द्या असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.  तालुक्‍यातील खांबा येथे ना.विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत सुमारे २५ कोटी रुपयांच्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्‍यात आला. खांबा ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातिर यांच्‍यासह सर्व सदस्‍य आणि गावातील युवक कार्यकर्त्‍यांनी भाजपामध्‍ये प्रवेश केला. याप्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.  मंत्री विखे पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, संगमनेर तालुक्‍याला १४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. महायुती सरकारमुळे मिळालेल्‍या निधीचे श्रेय कोणी घेत असले तरी जनता जागरुक आहेत. कारण वर्षानुवर्षे या भागाला रस्‍ते मिळाले नाहीत, पाण्‍याचा प्रश्‍न सुटला नाही. अनेक वर्षे मंत्रीपद मिळूनही रोजगारची कुठलीही साधनं तुम्‍हाला निर्माण करता आली नाहीत. मग तुमचा तालुका नेमका कशात पुढे आहे असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला.  दुष्‍काळी भागाला वरदान ठरणा-या निळवंडे धरणाचे कामही महायुती सरकारमुळे मार्गी लागले असून, भोजापूर चारीचा प्रश्‍नही लवकरच मार्गी लागेल. पठार भागातील पाणी प्रश्‍नाबाबतही आपण गांभिर्याने सरकारच्‍या माध्‍यमातून प्रयत्‍न करु अशी ग्‍वाही देतानाच युवकांच्‍या रोजगारासाठी आता जिल्‍ह्यात तीन औद्योगिक वसाहती विकसीत होत आहेत. यापुर्वी असे निर्णय होवू शकले नव्‍हते. अनेक उद्योजक आता जिल्‍ह्यात येण्‍यास तयार झाले आहेत.  जिल्ह्यातील युवकांना जिल्‍ह्यातच रोजगार उप‍लब्‍ध करुन देण्‍याचे उदिष्‍ठ आपण ठेवले असून, जिल्‍ह्यामध्‍ये संत गाडगे बाबा कौशल्‍य प्रशिक्षण प्रबोधि‍नी स्‍थापन करण्‍याचा निर्णय केला आहे. संगमनेर तालुक्‍यातही ही कौशल्‍य प्रबोधिनी स्‍थापन करण्‍यास आपण प्राधान्‍य देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.   पशुसंवर्धन विभागाच्‍या माध्‍यमातून धनगर समाजाकरीता मेंढी व शेळी सहकार विकास महासंघाची स्‍थापना करण्‍यात आली असून, या माध्‍यमातून रोजगार निर्मिती करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. दूध उत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्‍यासाठी ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली मात्र अनेक दूध संघानी शेतक-यांची माहीती उपलब्‍ध न करुन दिल्‍यामुळेच शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत. अनुदान मिळत नाही म्‍हणून सरकारच्‍या विरोधात ओरडणा-यांनीच अनुदान मिळण्‍यापासून शेतक-यांना वंचित ठेवल्‍याचा आरोप विखे पाटील यांनी केला.   मंत्री विखे पाटील यांची भव्‍य मिरवणूक काढण्‍यात आली. रणखांब आणि परिसरातील गावांमध्‍ये भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. श्रीक्षेत्र बाळेश्‍वर येथेही विकास कामांचा भूमीपुजन समारंभ संपन्‍न झाला. श्रीक्षेत्र बाळेश्‍वर येथे पर्यटन विकास योजनेच्‍या माध्‍यमातून अधिक निधी उपलब्‍ध करुन देण्‍याचे त्‍यांनी सांगितले. याबाबत महसूल व वन विभागाच्‍या आधिका-यांना त्‍यांनी पर्यटन विकासाचा प्रकल्‍प आराखडा तयार करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या. खांबा येथील पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे स्‍मारक हे एक प्रेरणास्‍थान आहे. जिल्‍ह्याला त्‍यांचे नाव द्यावे ही अनेक वर्षांची मागणी महायुती सरकारने पुर्ण केल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले. खांबा येथील जोगींदरा तलाव, जवळटेक तलाव दुरुस्‍तीसाठी निधी देण्‍याचे आश्‍वासन देतानाच आता संपूर्ण गाव आणि ग्रामपंचायतच भाजपमय झाल्‍यामुळे या गावाच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याचे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.

Ahmednagar News : लोकांची कामे करण्‍यात तालुक्‍याच्‍या नेत्‍यांना कोणतेही स्‍वारस्‍य नाही, विखेंची नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका Read More »

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी!

Ahmednagar News:  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा  व जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मा. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन बुधवारी मंत्रालयातील दालनात केले होते.  यावेळी महसूलमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. यामुळे या प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तानां शासनाने जमिनी देण्याचे सोपास्कार केले मात्र अद्यापही अनेक जमिनी या भोगवाटा २ मध्ये असून त्यात वन विभागांच्या जमिनींचा सुद्धा समावेश आहे.   यामुळे त्यांना घरकुल योजना आणि इतर शासकीय योजना राबविताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या जमिनी ह्या १९७३ पुर्वीच्या दिल्या गेल्याने त्यातील अनामत रकमा रखडल्यामुळे या जमीन शासन जमा केल्या जाणार आहेत. यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसूल मंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठऊन अशा जमिनीवरील तत्कालीन धोरणातील १०० टक्के, ७५ टक्के अनामत रक्कम भरण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खासदारांनी केली.  वन अधिनियम १९८० अस्तितवात येण्यापुर्वी वाटप केलेल्या जमिनी भोगवाटा २ वर्गातील जमिनी सरकट वर्ग १ मध्ये करण्यात याव्यात. तसेच रहिवाशी प्रयोजनातील वाटप करण्यात आलेले भुखंड आणि पुनर्वसन गावठाणातील जमिनी नियमाकुल करण्याबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी यावेळी खासदार डॉ. विखे पाटील यांनी केली. या सर्व मागण्याच्या बाबतीत सखोल चर्चा होऊन दोन्ही मंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी महसलू, मदत व पुनर्वसन आणि वन विभागाला निर्देश दिले.  या बैठकीला मंत्रालयातील दालनात महसूल व मदत व पुनर्वसन विभागांच्या मंत्र्यांसह आमदार श्रीमती मोनिका राजळे आणि महसूल, मदत पुनर्वसन व वन विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.  तर दृकश्राव्य माध्यमातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील,अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दिराम सालीमठ आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी! Read More »

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिबच्या ऐतिहासिक तलावाला प्रदूषण व अतिक्रमणाचा विळखा

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिब वसमतनगर येथील ऐतिहासिक तलाव परिसरामध्ये अतिक्रमण वाढले असून त्यांच्याकडून ड्रेनेजचे पाणी तलावामध्ये सोडल्याने घाणीचे साम्राज्य वाढले असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याने त्याचा बंदोबस्त करून कारवाई करावी अशी मागणी हजुरी पाठी संघटनेने हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापीलवार यांना केली आहे.   नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली चालणारा हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर येथील गुरुद्वारा दमदमा साहिब येथील तलावाशेजारी मागील दहा ते बारा वर्षांपासून अतिक्रमण वाढले आहे.  अतिक्रमणधारकांनाकडून तलावामध्ये ड्रेनेजचे घाण पाणी सोडले जात असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दमदमा साहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. प्रदूषित तलावाच्या पाण्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.         ऐतिहासिक तलावातील दुर्गंधी व घाणीमुळे आजारांचा धोका निर्माण झाल्याने या परिसरातील अवैधरित्या करण्यात आलेले अतिक्रमण हटवून तलावाला प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करून तलावाची पावित्र्य कायम ठेवावे अशी मागणी हजूरी पाठी संघटनेचे अध्यक्ष दलजीतसिंघ बिशनसिंघ हजूरीपाठी, परदीपसिंघ जितसिंघ रागी, जगदीपसिंघ नंबरदार, महेंद्रसिंघ पैदल, हुकुमसिघ काराबिन यांनी हिंगोली जिल्हाधिकारी, वसमत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी , सचखंड गुरद्वारा बोर्ड अधिक्षकांसह नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिबच्या ऐतिहासिक तलावाला प्रदूषण व अतिक्रमणाचा विळखा Read More »

Ahmednagar News: चार धारदार तलवारी जप्त, 2 आरोपी ताब्यात, शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई

Ahmednagar News: शेवगाव पोलीसांनी धडाकेबाज कारवाई शेवगाव शहरातुन दोन आरोपींकडुन चार धारदार तलवारी जप्त करुन त्यांना अटक केली आहे.   09 मार्च 2024 रोजी आपले पोस्टे हद्दीत कोम्बींग ऑपरेशन राबवुन अवैध धंद्यावर कारवाई, अग्निशस्त्रे व हत्यारे याबाबत मोहीम राबवावी याबाबत  पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे आदेश प्राप्त झाले होते.   त्याअनुषंगाने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने दोन पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक  शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत 06.30 वा. चे सुमारास शेवगाव शहरात कोरडे वस्ती येथील दोन इसम यांनी स्वतः जवळ तलवार बाळगली असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून  विशाल संपत भाकरे (वय-२३ वर्षे रा. कोरडेवस्ती ता. शेवगाव जि. अहमदनगर) व संतोष अशोक घोंगडे (वय-२५ वर्ष रा. कोरडेवस्ती ता. शेवगाव जि. अहमदनगर) यांना पोलीस पथकाने ताब्यात घेवुन सदर तलवारी बाबत विचारपुस केली असता त्यांनी प्रथम उडवडीचे उत्तरे दिली परंतु पोलीस पथकाने अधिक विश्वासामध्ये घेऊन विचारले असता त्यांनी सांगितले की, सदरच्या तलवारी ह्या घरामध्ये लपवून ठेवल्या आहेत. तुम्ही आमच्या सोबत चला त्या आम्ही काढून देतो.  तेव्हा आमचे कडिल पोलीस स्टाफ व पंचासमक्ष वरिल दोन्ही आरोपींनी त्यांचे ताब्यातील चार तलवारी काढुन दिल्यानंतर शेवगाव पोलीस स्टेशन भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाने वरिल दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक  राकेश ओला सो.अ.नगर,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अ.नगर, मा.उपविभागिय पोलीस अधिकारी  सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोसई अमोल पवार, पोहेकॉ नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोना उमेश गायकवाड, पोकों शाम गुंजाळ, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों एकनाथ गर्कळ, पोकों कृष्णा मोरे, पोकों संतोष वाघ, पोकों संपत खेडकर यांनी केली असून पुढील तपास पो.नि. दिंगबर भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकाँ दराडे हे करत आहेत.

Ahmednagar News: चार धारदार तलवारी जप्त, 2 आरोपी ताब्यात, शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई Read More »