DNA मराठी

land Scam Sawedi

Sawedi land Scam सावेडीतील १०० कोटींच्या जमिनीवर डाव; तलाठी आणि निबंधक कार्यालयातील कर्मचारी कोण ?

Sawedi land Scam १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या या जमिनीवर भूमाफियांकडून मोठा डाव खेळण्यात आल्याचा आरोप Sawedi land Scam अहिल्यानगर, – सावेडी भागातील अत्यंत मोलाची समजली जाणारी सर्वे नंबर २४५/ब १ (०.७२ हेक्टर आर) व २४५/ब २ (०.६३ हेक्टर आर) या एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीची तब्बल ३५ वर्षांनंतर झालेली नोंदणी सध्या शहरात प्रचंड चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरली आहे. बाजारभावानुसार अंदाजे १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या या जमिनीवर भूमाफियांकडून मोठा डाव खेळण्यात आल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात सावेडी तलाठी कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील काही कर्मचारी थेट सहभागी असल्याचा संशय गडद होत आहे. या नोंदणीसाठी सादर करण्यात आलेले दस्तऐवज आणि अर्ज अपूर्ण, संशयास्पद आणि विसंगत आहेत. दस्तात उल्लेख करण्यात आलेल्या रकमेपासून ते साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्यांपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, १९९१ मध्ये खरेदीखत झाल्याचा दावा असला, तरी त्या वेळी संबंधित गटाचे विभाजन झालेलेच नव्हते. हे विभाजन प्रत्यक्षात १९९२ मध्ये झाले, यामुळे १९९१ मध्ये खरेदीखत वैधपणे होणे शक्यच नव्हते. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे ३५ वर्षांपूर्वीचे दस्त इतक्या सहजतेने कसे मिळाले? कोणत्या कर्मचाऱ्याने जुने पेपर शोधून देण्यासाठी मदत केली? या प्रश्नांमुळे प्रशासनातील “अंदर की सेटिंग” आणि भूमाफियांच्या संगनमताचा संशय अधिकच बळावला आहे. सध्या या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरत असून, संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणात निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी न केल्यास तीव्र जनआक्रोश उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sawedi land Scam सावेडीतील १०० कोटींच्या जमिनीवर डाव; तलाठी आणि निबंधक कार्यालयातील कर्मचारी कोण ? Read More »

Sawedi land Scam गुजरातच्या खरेदीदाराची जमीन, स्थानिक हात? संशय गडद

Sawedi land Scam अहिल्यानगर –  नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या समोर असलेल्या तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीची नोंदणी तब्बल ३५ वर्षांनंतर गुपचूप पद्धतीने पार पडल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या व्यवहारामागे प्रशासकीय हलगर्जीपणा, राजकीय वरदहस्त आणि गुप्त हेतू असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. या जमिनीचा व्यवहार सर्वसामान्य खरेदी-विक्रीचा नसून, प्रशासनातील ढिसाळ कारभार आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आढावा घेतला पाहिजे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. गुप्त नोंदणी, गूढ कामकाज सदर जमीन सर्वे नंबर २४५/ब १ आणि २४५/ब २ या गटात असून काही वर्षांपूर्वी या जागेवर हाडांचा कारखाना होता, अशी माहिती समोर आली आहे. सध्या मात्र त्या ठिकाणी जुन्या भिंती तोडून नव्याने उभारणीचे काम वेगाने सुरू असून, तेही रात्रीच्या वेळी आणि अत्यंत गोपनीयतेने, ज्यामुळे नागरिकांचा संशय अधिकच बळावला आहे. स्थानिक हात, परराज्यातील खरेदीदार? सदर जमीन गुजरात येथील खरेदीदाराच्या नावावर असल्याचे सांगितले जात असले तरी, स्थानिक काही लोकांच्या सहाय्याशिवाय हे काम अशक्य असल्याचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी याच जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत तो प्रयत्न हाणून पाडला होता. चुकीचे दस्तऐवजीकरण? कोणतीही जाहिर नोटीस न देता पार पडलेला हा व्यवहार, नागरिकांच्या मते पारदर्शकतेच्या सर्व निकषांना हरताळ फासणारा आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार झाला का? याबाबत चौकशीची मागणीही वेग घेऊ लागली आहे. या व्यवहारामुळे केवळ जमीनच नव्हे तर शासनाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जर चौकशी योग्य पद्धतीने झाली नाही, तर हा प्रकार राजकीय हस्तक्षेप व प्रशासकीय अपयशाचे ठळक उदाहरण म्हणून पुढे राहील.

Sawedi land Scam गुजरातच्या खरेदीदाराची जमीन, स्थानिक हात? संशय गडद Read More »