DNA मराठी

Jitendra award

jitendra awhad

Jitendra Awhad यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या; विधान भवनात रात्री घडलं काय?

Jitendra Awhad : विधानभवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनात अटक केली. मात्र, ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले. जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी दीड वाजता आंदोलकांची धरपकड केली. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली, पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढले आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मकोकाचा आरोपी पसार होतो, जो मार खातो त्यांना पोलीस घेऊन जातात. विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता नितीनला सोडणार. मात्र, त्यांनी शब्द फिरवला, आम्हाला फसवलं. रात्री 1 वाजता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे दाखल झाले. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही नितीन देशमुखला पाठिंबा देतो. विधिमंडळात आव्हाड यांच्यावर हल्ला करायला मकोकाचे 4 माणसं तुम्ही घेऊन येतात. इथे बॉस अध्यक्ष आहेत, त्यांनी दिलेला शब्द जर ते पळत नसतील तर ही लोकशाहीची चेष्टा होत आहे. यांचा हा माज उतरवावं लागेल नाहीतर हे एवढे पुढे जातील , तुमच्या जमिनी घेतील आणि तुमच्या आया बहिणीला हात लावतील अशा विचारसरणीचे काही नेते आहेत. असं रोहित पवार म्हणाले. यानंतर जितेंद्र आव्हाड, रोहित पवार तसेच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते हे मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला गेले, मात्र तिथे नितीन देशमुख हे नव्हते. पोलिसांनी आव्हाडांना सांगितले नितीन देशमुख यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला ठेवण्यात आलय. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे पोलीस स्टेशनला पोहचले. मात्र, तिथेही नितीन देशमुख नसल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आव्हाड यांना कळले की नितीन देशमुख यांना मेडिकलसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्यानंतर आव्हाड, पवार कार्यकर्यांसह रुग्णालयात पोहोचले आणि नितीन देशमुख यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.

Jitendra Awhad यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या; विधान भवनात रात्री घडलं काय? Read More »

Suresh Dhas : जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सुरेश धसांचा टोला

Suresh Dhas: मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये असा टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांना लावला आहे. माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही.या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांनाही बोललो पाच लाखाची मदत दहा लाखाची करून दिली. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे प्रकरणात माझी भूमिका एकच आहे. असं सुरेश धस म्हणाले. तसेच माझ्यासोबत दलित बांधव असतात, मला कळवळा दाखवायची गरज नाही. माझ्या मतदारसंघातला 95 टक्के दलित बांधव माझ्यासोबत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये. आव्हाड साहेब तुम्ही एकदा तरी सूर्यवंशी कुटुंबीयांशी संपर्क केला का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे माझ्या भगिनी आहेत त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही.  सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यावर मी काहीही बोलणार नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. असेही धस म्हणाले. परळी सोडून गेलेले व्यापारी बोलायला घाबरत आहेत. पंकजा मुंडेंना माझी  विनंती आहे जास्तीत जास्त लक्ष राखेवर द्या.परळीत द्या गायरान जमिनी हडप केले आहेत तिथे द्या. असेही या पत्रकार परिषदेत सुरेश धस म्हणाले.

Suresh Dhas : जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सुरेश धसांचा टोला Read More »

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार

Loksabha Election :  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे. तर ऑक्टोंबर – नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी आता महायुतीने तयारी केली आहे.   मुंबईत महायुतीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाआघाडीत सामील तिन्ही पक्ष-भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी निवडणुकीच्या योजना सांगितल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.  राज्यातील लोकसभेच्या 45 हून अधिक जागांवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगाप्लॅन केला असून, त्यादृष्टीने कामालाही सुरुवात केली आहे. 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे होणार आहेत. भाजपचे नेते बावनकुळे म्हणाले, आम्ही 45 हून अधिक जागा जिंकण्याची तयारी केली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला यश मिळेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.  जिल्हा, तालुका आणि बूथ स्तरावर रॅली, सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये तिन्ही पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा जाहीर सभा घेणार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला राज्यात मोठे यश मिळेल. राज्यातील 48 पैकी 45 हून अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार आहोत. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला 51 टक्के मते मिळणार आहेत, महायुती आणखी मजबूत करू, असे आमच्या तिन्ही पक्षांनी ठरवले आहे. अनेकांना आमच्या आघाडीत सहभागी व्हायचे आहे. 47 हजार 412 लोकांनी आमच्याशी संवाद साधला असून त्यांना मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायचे असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. विधानसभेतही विजय निश्चित – बावनकुळे पक्षात येण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. आगामी काळात महाविकास आघाडीत फक्त नेतेच असतील, कार्यकर्ते उरणार नाहीत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार उभे राहतील. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत महायुती मोठा विजय मिळवेल आणि आम्हाला 225 पेक्षा जास्त जागा मिळतील. अजित पवार गटाचा प्लॅन तयार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गेली 10 वर्षे देशाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. आज राज्यात महायुतीचे सरकार आहे. जानेवारीपासून महायुतीच्या बैठकांना सुरुवात होणार आहे. यासाठी एक हजार प्रमुख कार्यकर्ते असतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही (अजित पवार गट) जाहीर सभा घेणार आहोत. शिवसेना नेते व मंत्री दादा भुसे म्हणाले, देशपातळीवर अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. महायुतीचे सर्व मोर्चे आम्ही विभाग स्तरावर, गावपातळीवर आयोजित करत आहोत. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी बंड पुकारले आणि भगवा पक्ष दोन गटात विभागला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार पडले होते. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच वेळी, गेल्या वर्षी जुलैमध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हेही राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत आपला गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. सध्या दोन्ही गट निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वर्चस्वासाठी लढत आहेत.

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार Read More »

Maharashtra Politics : जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही- कुणाल भंडारी

Maharashtra Politics : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामवर केलेल्या विधानावरून आता चांगलेच राजकारण तापलं आहे.  त्यांनी केलेल्या विधानाविरुद्ध आज अहमदनगर शहरात हिंदुत्ववादी नेते कुणाल भंडारी यांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जितेंद्र आव्हाडावर कठोर कारवाई करण्याचे मागणी केली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असे देखील म्हटले आहे.  याच बरोबर जितेंद्र आव्हाड यांची नार्कोटिक्स डिपार्टमेंट करून तपासणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.  माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम हे मांसाहारी होते असं म्हंटले होते. मात्र हा प्रकरण वाढल्यानंतर त्यांनी माफी मागितली.

Maharashtra Politics : जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही- कुणाल भंडारी Read More »