ट्रम्पने दिला जगाला धक्का, भारतावर 26% टॅक्स, जाणून घ्या कोणत्या देशावर किती टॅक्स लावला

Trump Tariffs Rules : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजपासून नवीन टॅरिफ नियम लागू केले आहे. त्यामुळे आता याचा जगाच्या अर्थव्यस्थेवर काय परिणाम होणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. नवीन नियमांनुसार भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 26% कर लावण्यात आला आहे. ट्रम्प यांनी या निर्णयाचे वर्णन अमेरिकेच्या “आर्थिक स्वातंत्र्या”कडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून केले आहे.या नवीन धोरणांतर्गत, चीन आणि पाकिस्तानसह अनेक देशांवर कठोर आयात कर लादण्यात आले आहेत. चीनवर 34%, बांगलादेशवर 37% आणि पाकिस्तानवर 29% कर लादण्यात आला आहे. तर युरोपियन युनियन, जपान, तैवान, व्हिएतनाम आणि इतर देशांवर वेगवेगळ्या दराने शुल्क लादण्यात आले आहे. भारतावर 26% कर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिकेला बऱ्याच काळापासून व्यापार पातळीवर तोटा सहन करावा लागत आहे. त्यांनी आरोप केला की भारत अमेरिकन वस्तूंवर 52% कर लादतो, म्हणून अमेरिकेने भारतावर 26% कर लादून प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या देशांवर किती शुल्क आकारले गेले? ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या चार्टनुसार, हे नवीन शुल्क वेगवेगळ्या देशांवर लादण्यात आले आहे. चीन: 34% युरोपियन युनियन: 20% दक्षिण कोरिया: 25% भारत: 26% व्हिएतनाम: 46% तैवान: 32% जपान: 24% थायलंड: 26% स्वित्झर्लंड: 31% इंडोनेशिया: 32% मलेशिया: 24% कंबोडिया: 49% युनायटेड किंग्डम: 10% दक्षिण आफ्रिका: 30% ब्राझील: 10% बांगलादेश: 37% सिंगापूर: 10% इस्रायल: 17% फिलीपिन्स: 17% चिली: 10% ऑस्ट्रेलिया: 10% पाकिस्तान: 29% तुर्की: 10% श्रीलंका: 44% कोलंबिया: 10% कॅनडा आणि मेक्सिकोसाठी विशेष सूट या नवीन टॅरिफ धोरणात कॅनडा आणि मेक्सिकोला विशेष सूट देण्यात आली आहे. व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की हे दोन्ही देश आधीच USMCA करारांतर्गत येतात, ज्यामुळे त्यांना या नवीन शुल्कातून सूट देण्यात आली आहे. ट्रम्प म्हणाले, “आपण अनेक देशांना सबसिडी देतो, पण आता आपल्याला आपल्याच देशाचा विचार करावा लागेल.”

ट्रम्पने दिला जगाला धक्का, भारतावर 26% टॅक्स, जाणून घ्या कोणत्या देशावर किती टॅक्स लावला Read More »