DNA मराठी

Hit And Run Law update

Hit And Run Law :  हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू

Hit And Run Law :  केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याचा देशभरात विरोध करण्यात आला होता. त्यामूळे केंद्र शासनाच्या वतीने तूर्तास हा कायदा लागू होणार नाही अशी घोषणा केल्यानंतर चालकांनी संप मागे घेतला होता. मात्र आता पुन्हा केंद्र शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आज बुधवार 10 जानेवारी पासून पुन्हा ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलन करत साखळी उपोषणाला  सुरू करण्यात आली आहे.  गोरेगाव तहसिल कार्यालयाच्या पुढे आज बुधवारी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने वाहन चालकांच्या विरोधात लागू केलेले हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलन व साखळी उपोषण पुकारलेले आहे.  अपघात झाल्यावर वाहन चालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कायद्याची तरतूद करा ,हीट अँड रन कायदा रद्द करा, वाहन सुरक्षा कायदा त्वरित लागू करा, इत्यादी मागण्यांना घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. आंदोलनाला जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक बिसेन विदर्भ मीडिया प्रमुख सुरेश गोंधर्य गोंदिया जिल्हा संघटक रवी पटले, जिल्हा सचिव राजेश ठाकरे गोरेगाव तालुका जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष विजय बळगे तालुका उपाध्यक्ष प्रीतीलाल बिसेन, तालुका सचिव भुमेश्वर गाते ,मयुर नदेश्वर, भारत डोंगरे, खेतराम खोब्रागडे, मुन्ना पटले,दिनेश डोहळे, अभिजीत मेश्राम, उमेश फुन्ने, विवेक शहारे, नितीन दमाहे आदी उपस्थित होते. या आंदोलनाला तालुक्यातील 500 वाहन चालकांनी समर्थन दिले आहे.

Hit And Run Law :  हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू Read More »

Hit And Run Law : पेट्रोल पंपांवर अचानक वाढली गर्दी! माल वाहतूकीवर परिणाम; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Hit And Run Law : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत हिट ॲन्ड रन केस प्रकरणी 10 वर्षाची शिक्षा आणि 07 लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर अनेक वाहन चालकांनी या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ट्रक चालकांनी आंदोलन केल्याने पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची कमतरता होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  यामुळे अनेक नागरिक वाहनांमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करत आहे. अशीच काही स्थिती अहमदनगर शहरात देखील निर्माण झाली आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.   हिट ॲन्ड रन कायदा  केंद्र सरकारने या कायद्याअंतर्गत आता दहा वर्षाची शिक्षा आणि 07 लाख रुपयांचा दंड अशी तरतूद केली आहे. हा कायदा चालकांविरुद्ध असल्याची प्रतिक्रिया अनेक वाहन चालक देत आहे.  या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर अपघात करुन तिथून पण काढलं तर त्या व्यक्तीला दहा वर्षाची शिक्षा आणि 07 लाख रुपयांचा दंड होऊ शकते. मात्र जर अपघात करणाऱ्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले तर त्या व्यक्तीची शिक्षा कमी होऊ शकते. यामुळे सध्या या कायद्याविरोधात आंदोलन होत आहे.  आपल्या देशात एका अंदाजानुसार 95 लाख ट्रक आहे मात्र या नवीन कायदा विरोधात सोमवारपासून तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त ट्रक रस्त्यावर धावत नाही.

Hit And Run Law : पेट्रोल पंपांवर अचानक वाढली गर्दी! माल वाहतूकीवर परिणाम; जाणून घ्या नेमकं प्रकरण Read More »