DNA मराठी

Harshvardhan Sapkal

संविधान बदलणार, हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्याला सुजय विखेंचा उत्तर

Sujay Vikhe: देशात 2034 साली नवीन संविधान लागू करण्याची हालचाल सुरू असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सपकाळ यांच्या या दाव्यावर भाजपसह अनेक पक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर आता या प्रकरणात नगरचे माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेसवर सडकून टीका केली. “काँग्रेसच्या सर्व नेत्यांचा विलाज केला पाहिजे. वारंवार पराभव झाल्यामुळे ते निराशेच्या तळाला गेले आहेत. त्यामुळे त्यांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे. मला वाटतं, त्यांना मानसिक आरोग्य केंद्रात काही दिवस पाठवायला हवे, म्हणजे ते बरे होतील आणि देशासाठी काहीतरी सकारात्मक करू शकतील,” अशा शब्दांत डॉ. विखे यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. डॉ. विखे पुढे म्हणाले, “संविधानाचा विषय आता फार जुना झाला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहे. ना कुठल्याही संविधानात बदल झाला आहे, ना संविधानाला कुठलाही धक्का लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, तो संविधान पृथ्वीच्या अंतापर्यंत अबाधित राहील.” सपकाळ यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादळामुळे विरोधी पक्षांनी देखील या विषयावर अधिक माहितीची मागणी करत, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, भाजपने सपकाळ यांच्या आरोपांना अफवा आणि दिशाभूल करणारे असल्याचे ठामपणे सांगितले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे नवीन संविधानाच्या चर्चेने पुन्हा एकदा रंग घेतला असला, तरी प्रत्यक्षात सरकारने यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे यापुढे या विषयावर काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संविधान बदलणार, हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्याला सुजय विखेंचा उत्तर Read More »

माझ्या वक्तव्यावर मी ठाम, औरंगजेब- फडणवीस प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

Harshvardhan Sapkal : माझ्या वक्तव्यावर मी ठाम असून कोणतीही वयक्तिक टिका केली नाही. असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज देवेंद्र फडणवीस प्रकरणात दिले. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांना कोणताही अपशब्द वापरला नाही. मी औरंगजेबचा कारभार आणि सरकारचा कारभार असा काल म्हणालो होतो. माझं वक्तव्य सरकारच्या अनुषंगाने आलेले वक्तव्य आहे. फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातील लोक औरंगजेब ठरवू पाहत आहेत. माजी तुलना राज्य कारभाराशी असून मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून कोणतीही वयक्तिक टिका केली नाही. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे राज्य कारभार देखील औरंगजेबप्रममाणे क्रूर असल्याचं म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर चारही बाजूने टीकेला सुरुवात केली होती.

माझ्या वक्तव्यावर मी ठाम, औरंगजेब- फडणवीस प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले Read More »

अडाणी- अंबानी यांच चांगभलं करण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Harshvardhan Sapkal : सत्तेत येत असताना केलेली आश्वासने याची पूर्तता झाली पाहिजे, सत्तेत आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ हे महायुतीच्या घटक पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. आता मात्र त्याचा विसर त्यांना पडला आहे. अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते वर्धा येथे माध्यमांशी बोलत होते. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मतांचा जोगवा मागत असतांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी करावी. हीच मागणी आम्ही आज आंदोलनातून केली आहे. सोबतच शेतमालाला जो भाव आहे. अडाणी- अंबानी यांच चांगभलं करण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले. कापसाला भाव नाही आहे. बेरोजगारीचा मुद्दा आहे त्याहीपेक्षा ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांची दुरवस्था आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. सेवाग्राम येथील संगम शिबिराला भेट देण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ सेवाग्राम येथे दाखल झाले होते.

अडाणी- अंबानी यांच चांगभलं करण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप Read More »