DNA मराठी

Gondia News

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध

Gondia News :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याला आदिवासींनी विरोध दर्शवला आहे.  त्यातच सोमवार 30 सप्टेंबर रोजी आदिवासी बहुल गोंदिया जिल्ह्यात हजारो आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत विशाल आक्रोश मोर्चा काढून विरोध दर्शवला. तर आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणारा नाही असा इशारा शासनाला दिला. त्यामुळे राज्य शासनापुढे आता मोठे पेच निर्माण झाले आहे. सकल धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जीआर काढण्याचीही तयारी दर्शवली होती. पण त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांकडून कडाडून विरोध केला जात आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आपण मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देणार, असा इशारा दिला आहे.  असे असतानाच आता आदिवासी समाजकडूनही सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे.  या अनुषंगाने सोमवारी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी आदिवासी हक्क कृती समितीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चा काढत विरोध दर्शवला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी आदिवासी हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला मार्गदर्शन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध Read More »

Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ 72 समाज आले एकत्र

Bangladesh Crisis: बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात  गोंदियामध्ये 72 समजातील हजारोच्या संख्येने महिला पुरुष रस्त्यावर उतरले व झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या जन आक्रोश मोर्चामध्ये 72 समाजांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे शहरातील मुख्य बाजारात हा मोर्चा भ्रमण करत बांगलादेशा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर आंबेडकर चौक या ठिकाणी राष्ट्रगीताने रॅलीचे समापन करण्यात आले.   काही दिवसा अगोदर  बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले तर हिंदू देवी दैवतांची मंदिरे तोडली यात काही लोकांचें दुर्दैवी मृत्यू झाले. याचे पाडसाद संपूर्ण भारतात व हिंदू समुदाय मध्ये उमटू लागले.  अनेक हिंदू संघटना देशातील राज्य पातळीवर आंदोलने केली. तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांर झालेल्या हल्ल्या करणाऱ्या संघटनेच्या विरोधात हवे तसे पाऊल न उचलल्याने देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाले.  याच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गोंदियात सकल हिंदू समाजाच्या वतीने जण आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅली मध्ये गोंदिया जिल्यातील हजारो हिंदू बांधवानी सहभाग घेत सामील झाले. ही रॅली गोंदिया शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण भ्रमण करत बांगलादेशा विरोधात नारेबाजी करण्यात आली.

Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ 72 समाज आले एकत्र Read More »

Gondia News : बिग ब्रेकिंग! दगडाने ठेचून युवकाची हत्या….

Gondia News:- गोंदिया शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गोंदिया शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुर्री येथिल शासकीय भारतीय खाद्य महामंडळ गोदामा जवळ एका अज्ञात 38 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटणा मंगळवार – बुधवार च्या मध्यरात्री दरम्यान समोर आली आहे.  या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी दोन संशयिताना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आलेली आहे. मात्र हत्या कोणत्या वादावरून करण्यात आली आहे. हे अद्याप कळू शकले नसुन हत्या झालेल्या युवकाची ओळखही अद्यापपर्यंत पटू शकली नाही.  या घटनेचा तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खडबड उडाली आहे.

Gondia News : बिग ब्रेकिंग! दगडाने ठेचून युवकाची हत्या…. Read More »

Hit And Run Law :  हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू

Hit And Run Law :  केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याचा देशभरात विरोध करण्यात आला होता. त्यामूळे केंद्र शासनाच्या वतीने तूर्तास हा कायदा लागू होणार नाही अशी घोषणा केल्यानंतर चालकांनी संप मागे घेतला होता. मात्र आता पुन्हा केंद्र शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आज बुधवार 10 जानेवारी पासून पुन्हा ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलन करत साखळी उपोषणाला  सुरू करण्यात आली आहे.  गोरेगाव तहसिल कार्यालयाच्या पुढे आज बुधवारी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने वाहन चालकांच्या विरोधात लागू केलेले हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलन व साखळी उपोषण पुकारलेले आहे.  अपघात झाल्यावर वाहन चालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कायद्याची तरतूद करा ,हीट अँड रन कायदा रद्द करा, वाहन सुरक्षा कायदा त्वरित लागू करा, इत्यादी मागण्यांना घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. आंदोलनाला जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक बिसेन विदर्भ मीडिया प्रमुख सुरेश गोंधर्य गोंदिया जिल्हा संघटक रवी पटले, जिल्हा सचिव राजेश ठाकरे गोरेगाव तालुका जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष विजय बळगे तालुका उपाध्यक्ष प्रीतीलाल बिसेन, तालुका सचिव भुमेश्वर गाते ,मयुर नदेश्वर, भारत डोंगरे, खेतराम खोब्रागडे, मुन्ना पटले,दिनेश डोहळे, अभिजीत मेश्राम, उमेश फुन्ने, विवेक शहारे, नितीन दमाहे आदी उपस्थित होते. या आंदोलनाला तालुक्यातील 500 वाहन चालकांनी समर्थन दिले आहे.

Hit And Run Law :  हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू Read More »