Health Tips: लवकर राग येतो का? ‘ह्या’ टिप्स फॉलो करा आणि रागावर नियंत्रण मिळवा

Health Tips: राग ही एक फार वाईट गोष्ट आहे ज्यामुळे तुमचा सर्वनाशही होऊ शकतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा तुमचा उत्कर्षच होईल.  परंतु कोणाकोणाचा राग इतका वाढतो की त्याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या व इतरांच्या जीवनावर पडू लागतो, काही लोक त्यांना कधी राग येतो हे मान्यच करत नाहीत आणि त्यांना जेव्हां राग येतो तो नियंत्रणाबाहेर होऊन जातो अशातच ते आपल्या जवळच्या लोकांना नुकसान पोहोचवतात.  आपल्यामधील काहीच मान्य करतात की त्यांचा स्वभाव रागीट आहे. आज आपण जाणणार आहोत की राग येण्यास कसे ओळखावे. राग कसा नियंत्रित करावा यासाठी टिप्स  राग येण्याचे संकेत  जीवनात प्रत्येक क्षण समान नसतो. कधी आनंद तर कधी दुःख सुध्दा येतात जेव्हां नात्यांच्या धाग्यांना रागाने ओढतोड केली जाते त्यात अनेक नात्यांची धागी मात्र तुटून जातात. ती जोडण्यास बराच वेळ लागतो. नातं जितकं मजबुत तितकाच वेळ लागतो तो जोडण्यासाठी. रागाची लक्षणे  धैर्याचा बांध तुटणे. चिडचिडेपणा. अस्वस्थता वाढणे. शंका व संशयी भाव वाढणे. प्रत्येक कारणास दुसऱ्यांना दोषी ठरविणे. अपमान करणे. संबधीत व्यक्तीस कमी लेखणे. वर्तमानात सभोवतालचे भान नसणे. पत्नी मूलबाळ आणि नातेवाईक तुमच्याशी बोलण्यास घाबरतात. हे राग येण्याची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय परिस्थितीनुरूप अनेक कारणांनी राग वाढू शकतो, आपला परिवार, मित्रसंघ, कार्यक्षेत्र आणि आपल्या जवळच्या लोकांमुळे काही विशेष कारणास्तव रागाची निर्मीती होऊ शकते.  रागाच्या उत्पत्तीचे मुळ हे स्वभावात म्हणजेच आपल्या मानसिक तारतम्यांवर अवलंबून असते. त्यामुळे जर तुम्हाला असे वाटते की तूम्हाला राग येतो आहे यासाठी तुम्हास स्वतःच स्वतःवर नियंत्रणासाठी विशेष पाउलं उचलावी लागतील. तर मग हा प्रश्न उठतो की रागाचे नियंत्रण कसे करावे. राग नियंत्रित करण्याचे काही महत्वाचे उपाय  1) 10 पर्यंत अंकांची गणना जर तुम्हास समोरच्या व्यक्तीवर राग येत असल्यास त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी नजर मिळवू नका व मनात 10 पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना खात्रीने सुरू ठेवा.आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. बघा तुमचा राग शांत हातो की नाही यामुळे तुम्हाला रागाबाबत योग्य निर्णय घेण्यास वेळ मिळेल. 2) एक ब्रेक घ्यावा  जर तूम्हाला अशांत करणारा जोरदार राग येत असेल तर ज्याच्याशी तुम्ही वाद घालता आहात त्यापासून दूर जावे व शांत बसून आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसेल. समोरचा व्यक्ती शांत झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा किंवा वाटत असेल तर चर्चाही न करता त्याच्याशी बोलणे व संपर्क करणे टाळा. 3) प्राणायाम करून राग घालवा  प्राणायाम व पहाटेचा व्यायाम तसेच पहाटेचे चालणे सुध्दा तुमचा मुड दिवसभरासाठी चांगला करू शकतो, प्राणायामात मन केंद्रीत करण्याचा सराव होतो.  तसेच श्वास केंद्रीत करण्याचा सराव आपणांस राग घालवण्यास मदत करेल. पोहणे, हास्य व्यायाम व चर्चां मुळे तुमचा राग येण्यास बऱ्याच प्रमाणात आळा बसतो. 4) निवांत झोप  कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते त्यामुळे राग लवकर येणे साहजिकच आहे, पण त्याचा फायदा कोणताच नाही सर्व नुकसानच आहे. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदूला शांत करणे फार जरूरी आहे. त्याकरीता निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामूळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार ही होतो किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक मानली जाते. रागीट स्वभाव सर्वांनाच अप्रिय आणि व्देषाचा भागी बनतो. रागास दाबून ठेवणे हे फार चुकीचे ठरते व त्यामुळे कोणत्याच समस्येचा उपाय निघत नाही त्याकरीता स्वतःच्या मनातील विचार सर्वांशी जुळवून घ्या तरच रागाचे प्रमाण कमी होईल.  प्रत्येकाचे बोलणे ऐका व त्यास आपली बाजू प्रेमाने समजावून सांगा, न पटल्यास चर्चा करा त्याने नक्कीच कोणता ना कोणता योग्य पर्याय समोर येईल. तर ह्या काही सोप्या आणि छोट्याश्या टिप्स जे आपल्याला मदत करतील रागावर नियंत्रण ठेवायला.

Health Tips: लवकर राग येतो का? ‘ह्या’ टिप्स फॉलो करा आणि रागावर नियंत्रण मिळवा Read More »