DNA मराठी

election 2024

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान

Election 2024- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान प्रक्रिया विभागात शांततेत सुरळीतपणे पार पडली.नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील  69 हजार 368 मतदानापैकी  64 हजार 846 इतके मतदान झाले असून 93.48  टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा व अपर आयुक्त निलेश सागर यांनी दिली. विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 25 हजार 302 मतदारापैंकी हजार 23 हजार 184  इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 91.63 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदारापैंकी 16 हजार 327 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान झाले आहे.  धुळे जिल्ह्यात एकूण 8 हजार 159 मतदारापैंकी  7 हजार 651 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 93.77 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 13 हजार 122 मतदारापैंकी 12 हजार 500 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 95.26 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण  5 हजार 393 मतदारापैंकी 5 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 96.12 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान Read More »

Ahmednagar Lok Sabha: तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा

Ahmednagar Lok Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेची सेवा करण्याचे दायित्व खांद्यावर घेतले आहे.आपली भारतामाता मोदींच्या भक्तीयोगातून, कर्मयोगातून, आणि ज्ञानयोगातून पुन्हा एकदा विश्वरूपदावर आरूढ झाल्या शिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.  यामुळे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ते जामखेड येथील महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते.  अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून डॉ. सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपण केलेल्या विकास कामे घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत. जामखेड मधील मुंगेवाडी येथे मंगळवारी महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. राम शिंदे, रवी सुर्वसे, बाळासाहेब भोसले, योगेश सुर्वसे, राजू भोसले, अण्णा सुर्वसे यासह स्थानिक पदाधिकारी  उपस्थित होते.  यावेळी डॉ. विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्व, कार्यशैली निर्णयक्षमता, दूरदृष्टी,विकासाचा ध्यास आणि देशाप्रती असलेली कळकळ देशाने पाहिली आहे. यामुळे तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान पदाची धुरा सांभाळण्याची संधी जनतेकडून दिली जाणार आहे. मोदींची तिसऱ्या पर्वाकडे दमदार वाटचाल सुरू आहे. त्याचा आपल्याला हिस्सा व्हायचा आहे. असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.    यावेळी सभेला उपस्थित असणारे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, खासदार डॉ. सुजय विखे यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासात कोणतीही कसर सोडली नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोहचविला आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरूणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. विखे यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यातील दळण वळणाच्या सेवा सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे.  बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोगार देण्याचे काम केले आहे. त्यांनी जिल्ह्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वाधिक निधी आणण्याचे काम केले. यामुळे असा खासदार येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी काम करेल. यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणे गरजचे आहे. असे आवाहन त्यांनी दिले.

Ahmednagar Lok Sabha: तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा Read More »

Nilesh Lanke: मुकुंदनगर येथे आमदार निलेश लंके यांची इफ्तार पार्टीला हजेरी

Nilesh Lanke :  गेल्या 20 दिवसांपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिना आहे.  याच पार्श्वभूमीवर रविवारी आमदार निलेश लंके यांनी मुस्लिम बांधवांसमवेत इफ्तार केला.  रविवार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुस्लिम बांधवांसमवेत पवित्र रमजानचा उपास सोडविण्यात आमदार लंकेंनी हजेरी लावली. यावेळी मज्जू भाई फ्रेंड सर्कल व उम्मीद फाउंडेशनच्या वतीने  इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार निलेश लंके यांचा या इफ्तार पार्टी दरम्यान सत्कार देखील करण्यात आला तर अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.  यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, अलफेज खान, रियाज शेख, शाहरुख  शेख, मुजाहिद बंदेअली, सलमान मणियार, वाहिद सय्यद, फैजअली शेख, संदेश पाटोळे, अरबाज शेख, अमन शेख, मोहिद खान आदी उपस्थित होते.

Nilesh Lanke: मुकुंदनगर येथे आमदार निलेश लंके यांची इफ्तार पार्टीला हजेरी Read More »