DNA मराठी

dna marathi

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त

Maharashtra Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध मद्य, रोकड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी अहमदनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी चेकपोस्ट, आठ भरारी व स्थाई पथके नेमण्यात आली आहेत. भरारी पथकाने नगर शहरात दोन ठिकाणी वाहतूक करण्यात येत असलेली रोकड पंचनामा करुन ताब्यात घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. भरारी पथकाने 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता नालेगाव भागातील अमरधाम येथे 3 लाख 84 हजार 300 रुपये एवढी रोख रक्कम दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतली. याबाबतचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षककरीत आहेत. कायनेटीक चौक येथे 24 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे वाहन क्र.  एमएच 19 ईजी 6311 हे संशयित वाटल्याने वाहनास थांबविण्यात आले. झडती नंतर वाहनाचे चालक आणि सोबतच्या व्यक्तीकडून 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचेही कळविण्यात आले आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त Read More »

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये

Maharashtra Election : निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत मुंबई काँग्रेसचे मोठे नेते जावेद श्रॉफ यांना पक्ष प्रवेश दिला आहे.  जावेद श्रॉफ मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि त्यांची मुंबईत चांगली पकड असल्याचे मानले जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  नुकतच जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याने याचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे. यातच अनेक नेते आता पक्ष सोडत असल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. कधी होणार मतदान 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.  22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रात 9.63 कोटी पात्र मतदार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 100186 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये Read More »

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक

Ahmednagar News – ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होत. सध्या ते राज्यभर दौरे करत असून जनतेची भेट घेत आहे. दरम्यान ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतल्याने आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव येथे सकल मराठा समाजाने एका कुत्र्याला छगन भुजबळांचे नाव देत बिस्कीट खाऊ घालत आंदोलन केलं. सध्या राज्यात ओबीसी व मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याच मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे व छगन भुजबळ हे एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. यामुळे राजकारण तापू लागले आहे. दरम्यान नेत्यांची भाषा खालावू लागल्याने आता मराठा समाज देखील आक्रमक होऊ लागला आहे. नुकतेच भुजबळ यांनी टीका करताना मेंदूने दिव्यांग, टाकीवर चढलेले गाढव एवढ्या वर कोणी नेले असे म्हणत जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली. यांच्या निषेधार्थ कोपरगाव सकल मराठा समाज आक्रमक झाला असून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी आंदोलन स्थळी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी चक्क एका कुत्र्याला प्रतिकात्मक छगन भुजबळ याचे नाव देत त्याला बिस्किट खाऊ घालत भुजबळ यांची कान उघडणी करण्यात आली आहे. त्यांना या कुत्र्यप्रमाणे इमानदार राहण्याचा व शांत राहण्याचा सल्ला मराठा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सदर अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक Read More »