DNA मराठी

Dhule Crime

Crime 1

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या

Dhule Crime : धुळे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या रागातून एका पतीने आपल्या नात्यातील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह सायकलवरून नेऊन विहिरीत फेकला. सुमारे नऊ दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र हातावरील टॅटूमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. अवधान एमआयडीसी परिसरातील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाच्या छातीवर “RAVI” आणि हातावर “Radha” असे टॅटू आढळले. यावरून मृत व्यक्ती दिवाणमळा येथील रवी मालचे असल्याचे निष्पन्न झाले. तपासात उघड झाले की, रवीचे आरोपी बापू मालचे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याच रागातून १८ मार्चच्या रात्री बापू मालचे यांनी पत्नीच्या मदतीने रवीची हत्या केली आणि कुटुंबाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास सुरू आहे.

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या Read More »

crime

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार

Dhule Crime : आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळून सलग सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापका विरोधात 41 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल रामभाऊ बोरसे, वय 53, रा. विवेकानंद नगर देवपूर धुळे, या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती. या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केला. एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पिढीत महिला सोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 59 लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार केला. अखेर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत गजाआड केले आहे. घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे.

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार Read More »