DNA मराठी

Congress

Congress News: काँग्रेसला बसणार मोठा धक्का! बडा नेता सोडणार काँग्रेसची साथ

Congress News:  मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत आहेत. यामुळे राज्यातील पक्षांना आणि जनतेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षाचा बडा नेता काँग्रेसची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  शुक्रवारी छिंदवाडा येथील जनतेसमोर भाषण करताना कमलनाथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले, “माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सत्याचे समर्थन करा. सत्याला साथ द्या.” कमलनाथ यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्तावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंह यांचे वक्तव्यही समोर आले असून त्यांनी आजवर संघटनेत ज्या पद्धतीने काम केले आहे, ज्या प्रकारे त्यांचे काँग्रेसशी दीर्घ संबंध आहेत, ते पाहता ते काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात जातील, असे मला वाटत नाही. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री मोहन यादव आणि कमलनाथ दोन महिन्यांत तीन वेळा बंद दाराआड भेटले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री मोहन यादव रात्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दोघांची भेट सुमारे तासभर चालली होती. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.  तर दुसरीकडे, कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्यांदरम्यान भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांचेही मोठे वक्तव्य चर्चेत आले आहे. ते म्हणाल्या की, “कमलनाथांनी रामाचा आशीर्वाद घेऊन यावे. विकासावर विश्वास ठेवणाऱ्यांनी भाजपमध्ये जावे,” असा सल्ला यांनी दिला आहे.  कमलनाथ काँग्रेसवर नाराज आहेत? काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याने कमलनाथ संतापले होते. खासदार संघटनेतील बदलांवर कमलनाथ खुश नव्हते. राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेसने हजर राहण्यास नकार दिला असताना कमलनाथ यांना ते आवडले नाही.त्यांनी छिंदवाड्यात प्रभू रामाच्या नावाने पत्रके वाटली आणि काँग्रेसच्या मोठ्या कार्यक्रमांपासूनही अंतर ठेवले होते. कमलनाथ यांनी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अशोक सिंह यांच्या उमेदवारीपासूनही स्वतःला दूर केले होते. नकुल नाथ यांनी घेतला ‘हा’ निर्णय  कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाईलवरुन काढून टाकले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नकुलनाथ हे छिंदवाड्याचे खासदार असून मागील अनेक दिवसांपासून ते त्यांच्या परिसरात जाऊन लोकांशी संपर्क साधत आहेत.

Congress News: काँग्रेसला बसणार मोठा धक्का! बडा नेता सोडणार काँग्रेसची साथ Read More »

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव

Priyanka Gandhi :  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमीन खरेदीशी संबंधित प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात प्रियांका गांधींचाही उल्लेख आहे. मात्र या प्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. काय प्रकरण आहे हे संपूर्ण प्रकरण हरियाणातील फरीदाबाद येथील जमीन खरेदीशी संबंधित आहे. माहितीनुसार, 2005-2006 दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी फरिदाबादच्या अमीपूर गावात प्रॉपर्टी डीलर एचएल पाहवा (थम्पीच्या जवळ) मार्फत सुमारे 40.8 एकर जमीन खरेदी केली होती, जी डिसेंबर 2010 मध्ये पाहवा यांना परत विकली गेली. त्याचप्रमाणे एप्रिल 2006 मध्ये याच अमीपूर गावात प्रियंका गांधी वड्रा यांच्या नावावर घर खरेदी करण्यात आले होते, जे फेब्रुवारी 2010 मध्ये पाहवा यांना परत विकण्यात आले. ईडीचे म्हणणे आहे की वाड्रा आणि थंपी यांचे दीर्घ संबंध आहेत आणि समान व्यवसाय करण्याव्यतिरिक्त दोघेही अनेक गोष्टी एकत्र करतात. हा एक मोठा खटला आहे, जो फरारी शस्त्र विक्रेता संजय भंडारीशी संबंधित आहे. रॉबर्ट वड्रा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका नवीन प्रकरणात आरोपी केले आहे ज्यात त्यांनी लंडनमधील एका घराचे नूतनीकरण केले आणि त्यात वास्तव्य केले. संजय भंडारी विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात हे घर कथितपणे ‘गुन्ह्याच्या कमाईचा’ भाग आहे. संजय भंडारी 2016 मध्ये ब्रिटनमध्ये पळून गेला आणि यूके सरकारने ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या कायदेशीर विनंतीवर कारवाई करत, या वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली. या प्रकरणात वाड्रा यांचे नाव प्रथमच समोर आले असून ईडीने निवेदन जारी करून ते सार्वजनिक केले आहे. परदेशात कथित अघोषित संपत्ती असलेल्या व्यक्तींवरील मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी करणे हा या तपासाचा मुख्य उद्देश आहे.  ईडीने या प्रकरणी यूएईस्थित अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यापारी सीसी किंवा चेरुवथुर चकुट्टी थम्पी आणि यूकेचे नागरिक सुमित चड्ढा यांच्याविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले आहे.

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव Read More »