DNA मराठी

Bank of Baroda

Creadit Card Rules: ग्राहकांनो, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलणार, एका क्लिकवर जाणुन घ्या सर्वकाही…

Creadit Card Rules: आज अनेक जण आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करताना दिसत आहे. क्रेडिट कार्डच्या मदतीने ग्राहक शॉपिंग तसेच इतर आर्थिक कामे मोठ्या प्रमाणात करत आहे मात्र आता अनेक बँका क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहेत. या यादीत बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट बँक, येस बँक आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे. Yes Bank  ही खाजगी क्षेत्रातील बँक क्रेडिट कार्ड युटिलिटी व्यवहारांवरील अतिरिक्त शुल्काशी संबंधित नियम बदलणार आहे. खाजगी क्रेडिट व्यतिरिक्त, सर्व क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. IDFC First Bank  या बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त युटिलिटी बिल पेमेंटवर 1% फी + GST भरावा लागेल. एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्ड, फर्स्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड आणि एलआयसी क्लासिक क्रेडिटवर कोणताही अधिभार लागणार नाही. Bank Of Baroda  सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने आपल्या BOB CARD ONE शी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता ग्राहकांना को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील व्याजदरासह विलंब शुल्क भरावे लागणार आहे. 26 जूनपासून नवीन नियम लागू होणार आहेत. इतकेच नाही तर, जर एखाद्या वापरकर्त्याने पेमेंट केले किंवा मर्यादेपेक्षा जास्त कार्ड वापरले तर त्याला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. HDFC Bank  स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डशी संबंधित नियम देखील बदलणार आहेत, जे 21 जूनपासून लागू होऊ शकतात. ग्राहकांना पूर्वीपेक्षा चांगला कॅशबॅक मिळू शकतो, जो स्विगी ॲपवर “Swiggy Money” म्हणून दिसेल.

Creadit Card Rules: ग्राहकांनो, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलणार, एका क्लिकवर जाणुन घ्या सर्वकाही… Read More »

Education Loan: आनंदाची बातमी! ‘या’ बँका कमी व्याजदरात देत आहे शैक्षणिक कर्ज; आजच अर्ज करा

Education Loan:  या महागाईच्या काळात तुम्ही देखील तुमचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी देशातील काही बँका अगदी कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र, या बँकांच्याही अनेक अटी आहेत. आपण या अटी पूर्ण केल्यास, आपण सहजपणे कर्ज घेऊ शकता. या बँका स्वस्त दरात शैक्षणिक कर्ज देत आहेत Indian Bank  इंडियन बँक दरवर्षी 8.6 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देत आहे. यामुळे तुम्ही कर्ज घेताना इंडियन बँकचा विचार करु शकता. IDFC First Bank  IDFC फर्स्ट बँक 9 टक्के वार्षिक व्याजदराने शैक्षणिक कर्ज देत आहे.   Union Bank Of India  युनियन बँक दरवर्षी 9.25 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देते.   Bank Of Baroda  तर बँक ऑफ बडोदा परदेशात शिक्षणासाठी 9.7 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहे.   ICICI Bank  तर ICICI बँक दरवर्षी 10.25 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देत आहे. 

Education Loan: आनंदाची बातमी! ‘या’ बँका कमी व्याजदरात देत आहे शैक्षणिक कर्ज; आजच अर्ज करा Read More »