DNA मराठी

Amit Shah News

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील होते. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते. तत्पूर्वी शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ ) राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन Read More »

Amit Shah On UCC : प्रत्येक राज्यात UCC लागू करणार, अमित शहांची मोठी घोषणा

Amit Shah On UCC : राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील प्रत्येक राज्यात समान नागरी कायदा लागू करणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शहा म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने देखील अनेक वेळा समान नागरी कायदा लागू करण्यास सांगितले आहे परंतु काँग्रेसने मुस्लिम वैयक्तिक कायद्यासह हिंदू कोड बिल आणले आहे परंतु समान नागरी कायदा आणू इच्छित नाही. यूसीसीबाबत शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाराज्यसभेत अमित शहा यांनी मुस्लिम वैयक्तिक कायद्यावरून काँग्रेसला धारेवर धरले. देशात कायदा असावा की नाही हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. तुष्टीकरणाचे धोरण स्वीकारत काँग्रेसने मुस्लिम वैयक्तिक कायद्यासोबत हिंदू कोड बिलही आणले. हिंदू कोड बिलामध्ये कोणताही जुना नियम नाही. त्यांनी समान कायद्याला हिंदू कोड बिल असे नाव दिले. असं अमित शहा म्हणाले. उत्तराखंडमध्ये यूसीसी आणण्याचे काम आम्हीच केले आहे. आम्ही ते इतर राज्यांमध्येही आणू. समाजात परिवर्तनासाठी कायदा आणू आणि चर्चा करून त्याची अंमलबजावणीही करू. बदलाच्या सूचनांचा विचार करून भाजप सरकार प्रत्येक राज्यात आणणार आहे. शहा म्हणाले की, आम्ही तीन फौजदारी न्याय कायदे आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे आणून फौजदारी न्याय व्यवस्थेचे भारतीयीकरण केले. देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्यासाठी कोणी काम केले असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत. राज्यसभेत अमित शहा म्हणाले की, काँग्रेसने 77 वेळा, तर भाजपने केवळ 22 वेळा घटनादुरुस्ती केली. 18 जून 1951 रोजी प्रथमच संविधानात दुरुस्ती करण्यात आली. काँग्रेस पक्षाला सार्वत्रिक निवडणुकांची वाट पहायची नसल्यामुळे घटना समितीने ही दुरुस्ती केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यासाठी संविधानात कलम 19A जोडण्यात आले. असं देखील अमित शहा म्हणाले.

Amit Shah On UCC : प्रत्येक राज्यात UCC लागू करणार, अमित शहांची मोठी घोषणा Read More »

Amit Shah : महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार? अमित शहा आज घेणार मोठा निर्णय

Amit Shah : सत्ताधारी भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरात तयारी सुरू केली आहे. भाजपने आगामी लोकसभे निवडणूकसाठी आपली पहिली उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. या यादीमध्ये 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.   मात्र या यादीमध्ये राज्यातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. यावरून अद्याप महायुतीमध्ये जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झालं आहे.   भाजप,  शिवसेना (एकनाथ शिंदे गट)आणि  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 30 हून अधिक जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागांवर निवडणूक लढवायची आहे. मात्र भाजप त्यांना 04 जागा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे  अजित गटाचा 16 जागांवर डोळा असल्याच्या बातम्या येत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 22 जागांवर निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे भाजपच टेन्शन वाढला असून जागावाटपाचा मुद्दा गुंतागुंतीचा बनत चालला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यापूर्वी 10 जागांवर निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र आता त्यात आणखी 6 जागांची भर पडली आहे. आज आणि उद्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर, नाशिक आणि भाजपच्या अहमदनगर दक्षिण, भंडारा, गोंदिया, नाशिक, दिंडोरी या जागांचा समावेश आहे. अजित पवार गटला अहमदनगर दक्षिणची जागा हवी आहे. तेथून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय पाटील हे सध्या खासदार आहेत. अजित पवार यांचे समर्थक आमदार नीलेश लंके यांना या जागेवरून निवडणूक लढवायची असून त्यांना तिकीट न मिळाल्यास ते पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर भंडारा गोंदिया हा प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे ती जागाही राष्ट्रवादीला हवी आहे. तर दिंडोरीतून विद्यमान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जागी अजित पवारांना आपल्या गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांना संधी द्यायची आहे. सध्या नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत, मात्र येथे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. 2019 मध्ये ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. त्या जागेचाही राष्ट्रवादी आढावा घेणार आहे. शिवसेनेचे संजय मंडलिक हे सध्या कोल्हापुरात खासदार आहेत. 2014 ते 2019 दरम्यान ही जागा राष्ट्रवादीकडे होती. या सहा जागांव्यतिरिक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी दहा जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या धाराशिव, परभणी या जागेचा समावेश आहे. तर, गडचिरोली, माढा या जागा भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या हिंगोली, बुलढाणा या जागांचा समावेश आहे. याशिवाय बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांचाही समावेश आहे. अमित शहा आज निर्णय घेणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (5 मार्च) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न सुटू शकतो. भाजप आपल्या मित्रपक्षांना जास्त जागा देऊ शकेल, अशी चर्चा आहे, पण कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट असेल.

Amit Shah : महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार? अमित शहा आज घेणार मोठा निर्णय Read More »

Amit Shah : अमित शहांचा अचानक महाराष्ट्र दौरा रद्द, अनेक चर्चांना उधाण

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द करण्यात आला आहे. भाजपकडून   या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू होती. मात्र शहा यांचा 15 फेब्रुवारीचा प्रस्तावित दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा हे 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार होते. शाह राज्यातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या 15 लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेणार होते. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य दिग्गज नेते उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा तीन जिल्ह्यांतील प्रमुख अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार होते आणि त्यांना निवडणूक जिंकण्याचा मंत्र देणार होते. 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी अकोल्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीला सर्वप्रथम संबोधित केले. अकोला बैठकीत अमित शहा अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार होते. अकोल्यातील बैठकीनंतर अमित शहा उत्तर महाराष्ट्रातील पाच विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी जळगावात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार होते. यानंतर सायंकाळी ते छत्रपती संभाजीनगर येथे दर्शनासाठी जाणार होते. यादरम्यान शाह एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करणार होते, असे सांगण्यात येत आहे.

Amit Shah : अमित शहांचा अचानक महाराष्ट्र दौरा रद्द, अनेक चर्चांना उधाण Read More »