DNA मराठी

AIMIM

AIMIM ने केली ‘इतक्या’ लोकसभा उमेदवारांची घोषणा; कोणाचा खेळ बिघडवणार ?

AIMIM Lok Sabha Candidate: ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने लोकसभा निवडणूक 2024 तीन लोकसभा उमेदवारांची घोषणा केली. तर येत्या काही दिवसात आणखी काही उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे.  पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी माहिती देत सागितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी  औरंगाबादमधून इम्तियाज जलील आणि किशनगंजमधून अख्तरुल इमान हे एआयएमआयएमचे उमेदवार असतील. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी स्वतः तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.  त्यांनी सांगितले की, लवकरच बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये उमेदवार जाहीर केले जातील. AIMIM महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार एआयएमआयएम पक्ष बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात किती जागा लढवणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. ही वेगळी बाब आहे की पक्षाचे नेते सय्यद इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धुळे आणि विदर्भातील एका मतदारसंघाचा समावेश आहे. AIMIM बिहारमध्ये 11 जागांवर निवडणूक लढवू शकते एआयएमआयएम बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील पक्षाध्यक्षांशी चर्चा करत आहे. लवकरच येथेही उमेदवार जाहीर केले जातील. बिहारमध्ये पक्ष 11 जागा लढवण्याची शक्यता आहे. याशिवाय पक्ष यावेळी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवणार आहे.  काँग्रेस, समाजवादी  आणि राजद यांचं टेन्शन वाढणार ? एआयएमआयएमने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. दोन्ही ठिकाणी उमेदवार उभे केल्यास निश्चितच नुकसान होईल. कारण AIMIM चा मतांचा आधार मुस्लिम आहे.  समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि राजद यांचाही हा आधार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील औरंगाबादमधून विजयी झाले होते, तर ओवेसी हैदराबादमधून खासदार आहेत. अख्तरुल इमान हे बिहार विधानसभेचे आमदार आहेत.

AIMIM ने केली ‘इतक्या’ लोकसभा उमेदवारांची घोषणा; कोणाचा खेळ बिघडवणार ? Read More »

Asaduddin Owaisi : राज्यात ओवेसी करणार गेम! ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक

Asaduddin Owaisi: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या प्रत्येक राजकीय पक्षाने तयारी पूर्ण केली आहे. सर्व पक्ष आपल्या ताकदीनुसार लोकसभा निवडणुक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. देशात सध्या ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ युतीमध्ये थेट लढत होणार असून राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.  राज्यातील 48 पैकी 45 जागांवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगा प्लान तयार केला आहे तर MVA ने देखील जवळपास जागा वाटपाचा फॉर्मुला तयार केला आहे.   तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) देखील निवडणूक लढवणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एआयएमआयएम राज्यातील पाच लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे.  भिवंडीत पत्रकारांशी बोलताना एआयएमआयएम महाराष्ट्र युनिटचे कार्याध्यक्ष डॉ अब्दुल गफार कादरी म्हणाले की, राज्यातील उत्तर मुंबई, धुळे, नांदेड, भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहे. कादरी म्हणाले की, एआयएमआयएम निवडणुकीची प्रभावी रणनीती बनवण्यासाठी या जागांवर सर्वेक्षण करत आहे.   महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा आणि अविभाजित शिवसेनेने 23 जागा लढवल्या. यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले. काँग्रेसला एक तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. AIMIM चे एकमेव औरंगाबादचे उमेदवार इम्तियाज जलील सय्यद विजयी झाले होते.

Asaduddin Owaisi : राज्यात ओवेसी करणार गेम! ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक Read More »