DNA मराठी

Ahmednagar update

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 20 मे रोजी अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या विळद पंपीग स्टेशन येथील विज पुरवठा दुपारी चार वाजले पासुन सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन वेळा खंडीत झाल्याने पाणी वाटप सुरू असलेल्या स्टेशन रोड परिसर व काही उपनगर भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. तर दुसरीकडे बूधवार 21 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट , झेडीगेट ,सर्जेपुरा, रामचंद्र खुंट , दाळमंडई , जुने कलेक्टर ऑफिस परिसर , हातमपूरा, धरतीचौक , बंगाल चौकी , कोठी व तसेच गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी परिसर , सिव्हील हडको, प्रेमदान हडको , टी.व्ही . सेंटर परिसर , म्युसिपल हाडको इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. या भागास गुरुवार 22 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर 22 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट , नालेगांव, चितळे रोड , आनंदी बाजार , तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर , पंचपीर चावडी , कापड बाजार खिस्त गल्ली , इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास शुक्रवार 23 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी सदय स्थितीत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने व त्यामुळे शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अहिल्यानगर महानगर पालिकेने केलेले आहे.

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा Read More »

Arunkaka Death : नगरचे ‘काका’ हरपले… जाणून घ्या अरुण जगतापांचा राजकीय प्रवास

Arunkaka Death – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील तसेच माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना पाच एप्रिल रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी विविध स्तरातून प्रार्थना सुरू होत्या. मात्र आज पहाटे त्यांचे प्राणज्योत मालवली. अरुण काकांचा राजकारणातील प्रवास नगराध्यक्ष ते आमदार अरुण काका जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केली. ते अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगराध्यक्ष होते, तसेच सलग दोन वेळा विधान परिषदेचे आमदार, तसेच जिल्हा बँकेचे संचालक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. काकांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावलं होत मात्र नगर शहर मतदारसंघातून त्यांना दोनदा पराभवला समोरे जावे लागले. पराभवाने खचून न जाता त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच संग्राम जगताप यांना महापौरपदावर विराजमान करून आपली राजकीय वारसा पुढे नेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांनी अहमदनगरच्या राजकारणाला दिशा दिली. काही काळासाठी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी सहा महिन्यांतच त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत परत येऊन आपली निष्ठा सिद्ध केली. राजकारणाबरोबरच क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील ठसा अरुण काका हे केवळ राजकारणी नव्हते, तर क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे, गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपली छाप पाडली. काकांच्या इतर आवडी निवडी एक अभ्यासू व संयमी राजकारणी अशी ओळख असलेल्या अरुण काका यांची राजकारणाबाहेर देखील एक वेगळीच छाप आहे. काकांना घोडेस्वारीची विशेष आवड होती. शेती, उद्योग, आणि हॉटेल व्यवसायात त्यांची खास रुची होती, ज्यामुळे ते केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील लोकांशीही घट्ट नातं निर्माण करू शकले. मुलांना दिला राजकीय वारसा माजी आमदार राहिलेले अरुण जगताप यांचे चिरंजीव संग्राम जगताप हे सलग तीन वेळा नगर शहर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांच्या सूनबाई शितल संग्राम जगताप या नगरसेविका, तर काकांचे दुसरे सुपुत्र सचिन जगताप हे माजी जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. तर सचिन यांच्या अर्धांगिनी सुवर्णा सचिन जगताप जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. अरुण काका यांच्या कुटुंबाने त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा यशस्वीपणे पुढे चालवला आहे.

Arunkaka Death : नगरचे ‘काका’ हरपले… जाणून घ्या अरुण जगतापांचा राजकीय प्रवास Read More »

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील

Ahmednagar Election:  निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून  २२५-अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी तहसिल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये १ लाख ५९ हजार ७२४ पुरुष, १ लाख ५४ हजार ७४८ महिला व १०७ इतर असे एकूण ३ लाख १४ हजार ५७९ मतदार आहेत.  तसेच मतदार संघामध्ये ५७८ पुरुष, ४२ स्त्री असे एकूण ६२० सैनिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघामध्ये एकूण २९७ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.  ४६ पडदानशील मतदान केंद्रे असून आदर्श मतदान केंद्रांची संख्या ३ एवढी आहे. मतदारसंघात महिला संचलित, युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचलित आणि दिव्यांग संचलित प्रत्येकी एक मतदार केंद्र असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.   निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरूवात होणार असून  २९ ऑक्टोबर २०२४ अंतिम तारीख आहे. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ४ नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,, गोदाम क्र.६, एम.आय.डी.सी. नागापूर येथे मतमोजणी होणार असल्याची माहितीही  पाटील यांनी यावेळी दिली.    अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदारांसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा क्र. ०२४१-२३४१९५७  असा आहे. हा कक्ष २४X७  सुरू राहणार असून मतदारांनी माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले.  राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील Read More »

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंद नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचरा गाडी बंद असल्याने घाणीचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा आहे आणि कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  पावसाळा सुरू झाला असून अहमदनगर शहरात मागच्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा आगमन झालं आहे.  कचरा गाडी बंद असल्याने परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असल्याने आणि पाऊस सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात महापालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ठेकेदार देखील लक्ष देत नाही आहे.  तर दुसरीकडे 17 जूनला बकरा ईद असल्याने महापालिका आणि ठेकेदारने लक्ष घालून परिसरात जमा झालेल्या कचऱ्याचे ढीग उचलावे अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे तसेच पुन्हा एकदा लवकरात लवकर परिसरात कचरा गाडी सुरू करावे असे देखील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष Read More »