MukundNagar Murder: मुकुंदनगरमध्ये वीस वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. जिशान खान असं मयत युवकाचे नाव आहे. तर आरोपी निजामुद्दीन समसुद्दीन खान फरार झाला आहे.
माहितीनुसार, 29 नोव्हेंबरच्या संध्याकाळी जिशान आपल्या इतर मित्रांसोबत जीलानी मेडिकल मुकुंदनगर येथे थांबला असता. आरोपी आणि जिशानमध्ये जुन्या वादातून बाचाबाची झाली आणि आरोपीने जिशानवर कात्रीने वार केला. रक्त थांबत नसल्याने जिशानला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहे.