Dnamarathi.com

Maharashtra News:  विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी, आपले उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाच्या त्रीसूत्रीचा अवलंब केल्यास कुठलेही यश आपल्यापासून दूर राहू शकत नाही. 

येणाऱ्या संकटांना आपण न डगमगता मार्गक्रमण केल्यास यशाला गवसणी घालता येते. क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये ध्येय हे सातत्य ठेवून कष्ट व प्रामाणिक प्रयत्न केल्यास हमखास यश प्राप्ती होते असे प्रतिपादन सुकळी गावचे सामाजिक कार्यकर्ते लहूराव भवर यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील सुकळी येथील सर्वसामान्य कुटुंबातील भक्तराज बबनराव चोथे यांची नुकतीच नाशिक येथील सार्वजनिक आरोग्य विभागात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये औषध निर्माण अधिकारी या पदावर नियुक्ती खल्याहे भक्तराज चोथे यांचा सुकळी ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात सुकळी गावचे सामाजिक कार्यकर्ते लहूराव भवर हे बोलत होते.

यावेळी संदीपराव गालफाडे, ग्रामसेवक रामेश्वर जाधव, संतोष पवार, ऋषिकेश राऊत, सिसोदिया सर, रावसाहेब वाघ, भानुदास भवर, अनिल देशमुख, खंडू चोपडे, बद्रीनाथ देशमुख, अनिल देशमुख, लक्ष्मण गरड, सुंदर भवर, बळीराम भवर, ताराचंद भवर, अकील शेख, मसुदेव शेळके, नंदू बामदले, सचिन गरड, सर्जेराव काळे, अरुण गरड, सतीश देशमुख यांच्यासह आदी गावकरी, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *