DNA मराठी

स्पोर्ट्स

KKR vs SRH Match Highlights: केकेआर अंतिम फेरीत! हैदराबादचा 8 गडी राखून पराभव

KKR vs SRH Match Highlights : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2024 चा पहिला क्वालिफायर सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या हैदराबादचा संघ 19.3 षटकात 159 धावा करत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात केकेआरने केवळ 13.4 षटकांत लक्ष्य गाठले आणि सामना 8 विकेटने जिंकला. कोलकाताने आयपीएल 2024 फायनलसाठी तिकीटही बुक केले आहेत. तर हैदराबादला पराभवानंतरही अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे.  कोलकाताने 160 धावांचे लक्ष्य गाठले  कोलकाता नाईट रायडर्ससमोर 160 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात केकेआरने अवघ्या 13.4 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करत सामना 8 गडी राखून जिंकला. संघासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावांची खेळी केली. याशिवाय व्यंकटेश अय्यरने 28 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. या दोघांमध्ये 97 धावांची नाबाद भागीदारीही झाली.  रहमानउल्ला गुरबाज 23 तर सुनील नारायणला 21 धावा करता आल्या. दोघांनीही डावाची सुरुवात वेगवान केली होती, जी व्यंकटेश आणि श्रेयसने पूर्ण केली. या विजयासह कोलकाता संघाने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत केकेआरचा सामना कोणत्या संघाशी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण हैदराबाद अजूनही फायनलमध्ये येऊ शकते, तर राजस्थान आणि बेंगळुरूही या शर्यतीत आहेत.  KKR विरुद्ध SRH यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात मिचेल स्टार्कने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने एकूण 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. याशिवाय वरुण चक्रवर्तीने 2, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुनील नारायण आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी 1 बळी घेतला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि पॅट कमिन्सने 1-1 विकेट घेतली.  सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा फारसा फायदा संघाला घेता आला नाही. संघ 19.3 षटकात केवळ 159 धावांवर ऑलआऊट झाला. संघाकडून राहुल त्रिपाठीने 35 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. याशिवाय ट्रॅव्हिस हेड 0, अभिषेक शर्मा 3, नितीश रेड्डी 9, शाहबाज अहमद 0, हेनरिक क्लासेन 32, अब्दुल समद 16, सनवीर सिंग 0, पॅट कमिन्स 30, भुवनेश्वर कुमार 0 आणि विजयकांत व्यासकांतने नाबाद 7 धावा केल्या.

KKR vs SRH Match Highlights: केकेआर अंतिम फेरीत! हैदराबादचा 8 गडी राखून पराभव Read More »

RCB vs CSK : बेंगळुरूमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट, सामना रद्द झाला तर RCB चं काय होणार?

RCB vs CSK : आज IPL 2024 RCB आणि CSK दरम्यान भिंडत होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्या अगोदर बेंगळुरूमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.    प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण आयपीएल 2024 च्या प्लेऑफचा चौथा संघ या सामन्याद्वारे निश्चित होणार आहे. सध्या सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्ससह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आज चौथ्या क्रमांकाच्या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी हवामानाबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे, त्यामुळे हा सामना पावसामुळे वाहून जाऊ शकतो. असे झाल्यास, कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल ते जाणुन घ्या. IMD ने 18 ते 20 मे दरम्यान बेंगळुरूमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अशा परिस्थितीत आज पावसामुळे सामना अनेक वेळा खंडित होऊ शकतो. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था इतर सर्व स्टेडियमपेक्षा चांगली असली, तरी मुसळधार पाऊस पडल्यास सामन्याची मजाच विस्कळीत होईल. आता प्रश्न असा आहे की रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला तर चेन्नई सुपर किंग्ज सहज प्लेऑफसाठी पात्र ठरेल. कारण IPL 2024 च्या गुणतालिकेत, CSK 13 पैकी 7 सामने जिंकून आणि +0.528 च्या रननेटने 14 गुणांसह अजूनही चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल जर आपण RCB बद्दल बोललो तर 13 सामन्यांमध्ये त्याचे 12 गुण आहेत, त्यामुळे आज RCB विरुद्ध CSK सामना त्यांच्यासाठी नॉकआउट सामना असेल. या शेवटच्या सामन्यात, जर आरसीबी 18 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने जिंकला किंवा 18.1 षटकात धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी झाला तर त्याला प्लेऑफचे तिकीट मिळेल.

RCB vs CSK : बेंगळुरूमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट, सामना रद्द झाला तर RCB चं काय होणार? Read More »

MS Dhoni च्या नावावर आणखी एक विक्रम! क्रिकेट जगात धोनी पुन्हा चर्चेत

MS Dhoni : आयपीएल 2024 चा 13 वा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभव केला मात्र भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा  यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने एक मोठी कामगिरी केली.  या सामन्यात पृथ्वी शॉचा झेल घेत त्याने टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील 300 बाद पूर्ण केले. या सामन्यात पृथ्वी शॉने 27 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. शॉचा चेंडू रवींद्र जडेजावर कट करण्याच्या प्रयत्नात असताना धोनीने विकेटच्या मागे झेल घेतला आणि धोनीने नवा विक्रम रचला.  चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या नेतृत्वाखाली 5 वेळा चॅम्पियन बनवणारा धोनी यंदाच्या मोसमात फक्त यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. धोनीने आतापर्यंत 213 झेल आणि 87 स्टंपिंग केली आहे. धोनीने आज T20 मध्ये 300 बाद पूर्ण केले असतील पण तो दीर्घकाळ T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाद करणारा खेळाडू होता. धोनीच्या मागे पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल आहे, ज्याने 264 बाद घेतले आहेत.  भारताच्या दिनेश कार्तिकने 274 ची शिकार केली आहे. क्विंटन डी कॉकच्या नावावर 270 विकेट आहेत आणि जोस बटलरच्या नावावर 209 विकेट आहेत.

MS Dhoni च्या नावावर आणखी एक विक्रम! क्रिकेट जगात धोनी पुन्हा चर्चेत Read More »

Ranji Trophy Final: मुंबई पुन्हा चॅम्पियन! ‘हे’ खेळाडू ठरले गेम चेंजर

Ranji Trophy Final:  मुंबईने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत विदर्भ विरोधात खेळण्यात आलेल्या रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम सामन्यात विजेते पटकावले आहे.    मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने विदर्भाचा 169 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत 42 व्यांदा विजेतेपद पटकावले.  मुंबईसाठी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि सरफराज खानचा भाऊ मुशीर खान यांनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. या सामन्यात मुंबईने शार्दुल ठाकूरच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ अवघ्या 105 धावांत आटोपला. दुसऱ्या डावात मुंबईने शानदार फलंदाजी करत मुशीर खानच्या 136 धावा, श्रेयस अय्यरच्या 95 धावा, कर्णधार रहाणेच्या 73 धावा आणि शम्स मुलानीच्या 50 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर 418 धावा केल्या. मुंबईची एकूण आघाडी 537 धावांची असून विदर्भाला 538 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात 368 धावांत सर्वबाद झाला. विदर्भाकडून कर्णधार अक्षय वाडकरने 103 धावांचे शतक झळकावले. त्यांच्याशिवाय करुण नायरने 74 आणि हर्ष दुबेने 65 धावा केल्या. करुण नायर आणि अक्षय वाडकर यांनी पाचव्या विकेटसाठी 173 चेंडूत 90 धावांची भागीदारी केली. मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुष कोटियनने सर्वाधिक चार बळी घेतले. तर मुशीर खान आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. धवल कुलकर्णी आणि शम्स मुलाणी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. यासह मुंबईने हा सामना 169 धावांनी जिंकला.

Ranji Trophy Final: मुंबई पुन्हा चॅम्पियन! ‘हे’ खेळाडू ठरले गेम चेंजर Read More »

Dhruv Jurel :  ध्रुव जुरेल चमकला, थेट महेंद्रसिंग धोनीच्या यादीत स्थान मात्र …….

Dhruv Jurel : भारतीय संघाने रांची कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा पराभव केला आहे. या सामन्यात भारताला आणखी एक स्टार खेळाडू मिळाला आहे. होय, आपल्या पदार्पणापासूनच यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल सोशल मीडियावर चर्चेत आहे.   रांची कसोटीच्या पहिल्या डावात त्याला शतक झळकावण्याची संधी होती मात्र तो 90 धावांवर बाद झाला. यामुळे त्याने आता असा विक्रम केला आहे जो त्याला  लक्षात ठेवायला आवडणार नाही.  रांची कसोटीमध्ये भारतीय संघाने पहिल्या डावात 307 धावा केल्या होत्या. या डावात 171 धावांच्या स्कोअरवर भारताने 7 विकेट गमावल्या होत्या पण ध्रुव जुरेलने चमकदार कामगिरी करत  इंग्लंडच्या मोठ्या आघाडीच्या आशा संपुष्टात आणल्या. ध्रुव जुरेलमुळे इंग्लंडला फक्त 46 धावांची आघाडी घेता आली.  महेंद्रसिंग धोनीच्या यादीत ध्रुवचा समावेश  2012 मध्ये नागपूर कसोटीत महेंद्रसिंग धोनी 99 धावा करून धावबाद झाला होता. तर 2007 मध्ये ओव्हल कसोटीमध्ये तो 92 धावावर बाद झाला होता. तर आता रांची कसोटीमध्ये ध्रुव जुरेल देखील 90 धावांवर बाद झाला आहे.  रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लडचा 5 विकेटने पराभव करत पाच सामन्याच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं आहे.  रांची येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकामुळे संघाने पहिल्या डावात 353 धावा केल्या. भारत पहिल्या डावात अडचणीत सापडला होता आणि संघाने 177 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या पण येथे कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांच्या भागीदारीने भारताला 307 धावांपर्यंत नेले.  दुसऱ्या डावात 46 धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ अवघ्या 145 धावांवर गारद झाला. आर अश्विनने 5 तर कुलदीपने 4 विकेट घेतल्या आणि भारताचा विजय निश्चित केला.

Dhruv Jurel :  ध्रुव जुरेल चमकला, थेट महेंद्रसिंग धोनीच्या यादीत स्थान मात्र ……. Read More »

Maharashtra News: अहमदनगर येथील विशेष मुलांचे राष्ट्रीय पातळीवर निवड

Maharashtra News : अहमदनगरमध्ये  स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर यांच्या मार्फत दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी  जिल्हास्तरीय स्पर्धेतून १० विद्यार्थ्यांची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.   दि. ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्पेशल ओलंपिक भारत  राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धा ही नागपूर येथिल “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ” येथे पार पडल्या असून या  राज्यस्तरीय स्पर्धेत ०४ सुवर्ण, ०५ रोप्य व २ रजत असे एकून ११ पदकांची कमाई केली.  त्यामध्ये वयोगट २२ ते २९  चि. बाबू यांनी ५० मी. व २५  मी फ्रीस्टाईल स्विमिंग या क्रीडा प्रकारात, प्रथम क्रमांक मिळवून 2 सुवर्ण पदकांची कमाई केली.  चि.जयसिंग यादव यांनी वयोगट २२ ते २९ मध्ये २०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले. चि. दिपक पावरा याने १९  ते २१ या वयोगटात १००  मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळविले. तसेच त्याने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकाची कमाई केली. चि. वैभव जाधव यांनी २२ ते २९ या वयोगटात २०० मी. धावणे या  क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाची कमाई केली.  चि. कृष्णा याने १६ ते १८ या वयोगटात १०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून रजत पदकांची कमाई केली. चि. दिपेंद्र ढमाले याने २२ ते २९ या वयोगटातील २५ मी. फ्रीस्टाईल जलतरण या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाचा मानकरी ठरला. कुमारी मादुरे महंडुळे हिने २२ ते २९ या वयोगटातील १०० मी. धावणे या क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकाची मानकरी ठरली.  चि. अजय काकडे याने २२ ते २९ या वयोगटातील २०० मी. धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाचा मानकरी ठरला. चि. रज्जाक गोच्चू याने १६ ते २१ या वयोगटात २०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून रजत पदकाचा मान मिळवला. कुमारी प्रेरणा भाटिया हिने १०० मी. धावणे स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवून सहभाग नोंदवला.  या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, स्विमिंग, फुटबॉल, हॉलीबॉल, यांसारख्या विविध क्रीडा स्पर्धा होत्या. या स्पर्धेत एकूण ३६ जिल्ह्यांतील एकूण ६००   विद्यार्थ्यांनी व १५० प्रशिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.  या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे बक्षीस वितरण करण्यासाठी  डॉ. सौ. मेधा सोमय्या (अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र), मा. श्री. डॉ. सिद्धार्थ गायकवाड (प्रादेशिक आयुक्त समाजकल्याण विभाग नागपूर), मा. श्री. भगवान तलवारे (क्षेत्र संचालक महाराष्ट्र), मा. श्री. जितेंद्र ढोले (क्रीडा संचालक SOB), मा. श्री. उदय गोजमगुंडे (संचालक) आदि मान्यवर उपस्थित होते.     अहमदनगर येथील सर्व विजेत्या खेळाडूंचे दक्षिण अहमदनगरचे खासदार मा. डॉ. सुजय विखे पाटील, तसेच मा. श्री. राधाकिसन देवढे  (समाज कल्याण अधिकारी अहमदनगर)     सौ. धनश्रीताई विखे पाटील (अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर) व मा. श्री. डॉ. अभिजीत दिवटे (उपाध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर), यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.   मार्गदर्शन करणारे मा. श्री. डॉ. दिपक अनाप, मा. श्री. डॉ. अभिजीत मेरेकर, व मा. श्री. डॉ. किरण आहेर यांनीदेखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.  तसेच या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी या स्पर्धक खेळाडूंना त्यांचे  क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक श्री संदीप राहणे सर, श्री हर्षल वाणी, श्री. अमोल चौधरी,  श्री शिरसाट सर, श्री. दत्तात्रेय कोलते सर, सौ. सुशीला जाधव मॅडम इ. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही खेळाडूंचे  अभिनंदन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Maharashtra News: अहमदनगर येथील विशेष मुलांचे राष्ट्रीय पातळीवर निवड Read More »

Virat Kohli : भारताला धक्का! तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळणार नाही विराट कोहली; ‘हे’ आहे कारण

Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान 5 कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने चमकदारी कामगिरी करत इंग्लंडचा पराभव केला आहे. त्यामुळे आताही मालिका 1-1 ने बरोबरीत आहेत. तर दुसरीकडे पुढील तीन सामन्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे, मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.  असे मानले जात आहे की विराट कोहली भारताचे आणखी दोन आगामी सामने गमावू शकतो. यामुळे यजमान संघाच्या अडचणी वाढणार हे नक्की.  कोहली तिसरा आणि चौथा सामनाही खेळणार नाही  कसोटी मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने भारतीय संघ 15 फेब्रुवारीला तिसरा सामना खेळणार आहे. हा सामना राजकोटच्या मैदानावर खेळला जाईल. हा कसोटी सामना सुरू होण्याआधी टीम इंडियाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत.  म्हणून कोहली खेळू शकणार नाही भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंपैकी एक विराट कोहली आगामी दोन सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही, ज्याचे कारण जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.  बीसीसीआयने ही माहिती दिली. बीसीसीआयने सांगितले होते की, किंग कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर पडला आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने खुलासा केला होता की कोहली दुसऱ्यांदा पिता होणार आहे आणि त्यामुळे तो संघासोबत नाही.  सध्या भारतीय संघ स्वतःच्या होस्टिंग अंतर्गत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. आता सगळ्यांचे लक्ष शेवटच्या तीन सामन्यांवर लागले आहे.

Virat Kohli : भारताला धक्का! तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळणार नाही विराट कोहली; ‘हे’ आहे कारण Read More »

WTC Point Table: न्यूझीलंडने दिला भारत-ऑस्ट्रेलियाला धक्का! WTC गुणतालिकेत मोठा बदल

WTC Point Table : न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. दक्षिण आफ्रिकेवर 281 धावांनी शानदार विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलच्या ताज्या अपडेटमध्ये, न्यूझीलंडच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोरदार विजयाने त्यांना प्रतिष्ठित अव्वल स्थानावर नेले आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील त्यांच्या प्रभावी कामगिरीने त्यांना केवळ दणदणीत विजय मिळवून दिला नाही तर चॅम्पियनशिपमधील त्यांच्या स्थितीत लक्षणीय वाढही झाली. दरम्यान, न्यूझीलंडच्या यशामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांना धक्का बसला. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर डब्ल्यूटीसी गुणतालिकेत आधी दुसऱ्या स्थानावर असलेला भारत आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे, तर न्यूझीलंडच्या वाढीमुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. न्यूझीलंडच्या उत्कृष्ट विक्रमामध्ये या चक्रात खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांपैकी दोन विजयांचा समावेश आहे, परिणामी गुणांची टक्केवारी 66.66 इतकी आहे. ऑस्ट्रेलियाने दहा सामन्यांतून सहा विजयांसह 55.00 गुणांची टक्केवारी राखली आहे. तर भारताने सहा कसोटी सामन्यांमध्ये तीन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत आणि एक अनिर्णित आहे, परिणामी गुणांची टक्केवारी 52.77 आहे. इतरत्र क्रमवारीत बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे त्यांची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे तर वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि श्रीलंका अनुक्रमे सहाव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. नुकत्याच झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पहिल्या डावात 511 धावांची मजबूत धावसंख्या उभी राहिली, ज्यात दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 162 धावांवर आटोपला.  दुसऱ्या डावात 178/4 वर डाव घोषित केल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव 247 धावांवर संपुष्टात आल्याने आणखी एका प्रभावी कामगिरीसाठी मजल मारली.

WTC Point Table: न्यूझीलंडने दिला भारत-ऑस्ट्रेलियाला धक्का! WTC गुणतालिकेत मोठा बदल Read More »

IND vs ENG: भारताला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर! ‘हे’ आहे कारण

IND vs ENG: 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड दरम्यान कसोटी मालिका सुरू होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बाहेर पडला आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. हे जाणुन घ्या की, दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. बीसीसीआयने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. मात्र, विराटच्या बाहेर पडल्यानंतर संघाला अनुभवी खेळाडूची गरज भासणार आहे, त्यासाठी संघ लवकरच विराटच्या बदलीची घोषणा करणार आहे. विराट वैयक्तिक कारणांमुळे बाहेर  विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. विराटने बीसीसीआयला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, विराटने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशीही चर्चा केली. यानंतर बीसीसीआयमध्ये त्याच्या निर्णयाचा पूर्ण आदर करण्यात आला आणि बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने या स्टार फलंदाजाला पाठिंबा दिला आहे. बीसीसीआयचे मीडिया आणि चाहत्यांना आवाहन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मीडिया आणि चाहत्यांना विनंती केली आहे की त्यांनी विराट कोहलीच्या वैयक्तिक कारणास्तव गोपनीयतेचा आदर करावा आणि त्याच्या निर्णयावर अंदाज लावणे टाळावे. बीसीसीआयने विराटच्या या निर्णयाशी पूर्णपणे सहमत असल्याचे स्पष्ट केले असून मीडिया आणि चाहत्यांना विनंतीही केली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांनंतर विराट कोहली संघात सामील होऊ शकतो. बीसीसीआयने विराट कोहलीच्या बदलीची घोषणा अद्याप केलेली नाही. बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ते लवकरच विराटच्या बदलीची घोषणा करतील. विराटच्या जागी चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे यांची निवड होऊ शकते, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. कारण विराट कोहलीच्या जागी एखाद्या अनुभवी खेळाडूलाच संधी मिळायला हवी, जो विराटसारख्या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडिया रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद कुमार सिराज, मुहम्मद कुमार. , जसप्रीत बुमराह आणि आवेश खान.

IND vs ENG: भारताला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर! ‘हे’ आहे कारण Read More »

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण

IPL 2024 : आयपीएल 2024 साठी तयारी सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये मिनी लिलाव देखील झाला होता.  या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महाग विकला गेला. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार 22 मार्चपासून आयपीएल 2024 सूरू होणार आहे.  आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करून आपल्या संघात समाविष्ट केले  आणि त्याला कर्णधार बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले.  आता अशी चर्चा आहे की, हार्दिक पांड्याचा आयपीएलच्या पुढील मोसमातील सहभाग धोक्यात आहे. जर असा झाला तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा एक जोरदार धक्का असेल. गुजरात टायटन्सकडून ट्रेड झालेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची फारशी शक्यता नाही. तो अजूनही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे आयपीएलच्या मोसमातही त्याला तंदुरुस्त होणे कठीण जाईल, असे मानले जात आहे. असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असेल.  मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती, परंतु मुंबई फ्रँचायझीच्या काही लोकांनी हा सर्वांच्या संमतीने घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे. हार्दिक पंड्या खेळणार की नाही याबाबत अधिकृतरित्या अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये हा मोठा दावा केला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सचा दोन हंगाम कर्णधार आहे. पांड्याने कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. दुसरीत उपविजेती ठरली. दोन्ही वेळा पांड्याने घेतलेले निर्णय आणि त्याची फलंदाजी चमकदार होती.

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण Read More »