DNA मराठी

राजकीय

Nilesh Lanke : “साहेबांचा आदेश मी सदैव मानेन” अजित पवारांना धक्का देत निलेश लंके शरद पवार गटात  

Nilesh Lanke : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना धक्का देत गुरुवारी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. यानंतर लंके म्हणाले, आता आपण साहेबांच्या (शरद पवार) आदेशाचे पालन करणार आहोत.   नीलेश लंके म्हणाले, “मी नेहमीच शरद पवारांच्या विचारसरणीचे पालन केले आहे. 2019 मध्ये माझा निवडणूक प्रचार त्यांनीच सुरू केला होता. त्यांची विचारधारा आणि पक्ष मी कधीही सोडला नाही.” राष्ट्रवादी काँग्रेस (पुणे) शहर कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत लंके म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, मी साहेबांच्या (शरद पवार) आदेशाचे पालन करेन, असे ते म्हणाले.   शरद पवार म्हणाले, “लंके हे कष्टाळू आहेत आणि त्यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाची पसंती होती. त्यांनी अलीकडेच काही निर्णय घेतले असतील, पण ते त्यांच्या मतदारांप्रती प्रामाणिक आहेत आणि पुढेही राहतील. जनतेसाठी काम करण्यासाठी. त्यांना काही मदत लागली तर आम्ही त्यांना जनहितासाठी मार्गदर्शन करू.” आदल्या दिवशी अजित पवार म्हणाले होते की, लंके यांनी पक्ष सोडण्यापूर्वी आपल्या निर्णयाचा विचार करावा. लंके यांनी पक्ष सोडल्यास त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लंके निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लंके हे राष्ट्रवादीचे (एसपी) लोकसभेचे उमेदवार असतील, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. ते म्हणाले, “लंके हे अहमदनगरमधील लोकप्रिय नेते आहेत. कोविड महामारीच्या काळात केलेल्या कामामुळे ते शेजारच्या जिल्ह्यातही प्रसिद्ध आहेत.  शरद पवार यांच्या विचारधारेवर त्यांचा नेहमीच विश्वास होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मागील विधानसभा निवडणूकही लढवली होती. ते शरद पवार साहेबांचा फोटो  वापरत राहतील आणि आता औपचारिकपणे NCP (SP) चा भाग आहेत.

Nilesh Lanke : “साहेबांचा आदेश मी सदैव मानेन” अजित पवारांना धक्का देत निलेश लंके शरद पवार गटात   Read More »

B.S.Yadurappa : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, गुन्हा दाखल

B.S.Yadurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा  यांच्यावर 17 वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.  त्यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण, 2012 (POCSO) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा बेंगळुरू येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यदियुरप्पा यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, पॉक्सो कायद्याच्या कलम 8 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 17 वर्षीय तक्रारदार तिच्या आईसोबत सदाशिवनगर पोलीस ठाण्यात गेली होती, जिथे एफआयआर दाखल करण्यात आला होता. सूत्रांनी सांगितले की, लैंगिक छळाची कथित घटना 2 फेब्रुवारी 2024 रोजी घडली, जेव्हा आई आणि तक्रारदार लैंगिक छळाच्या दुसऱ्या प्रकरणात मदत मागण्यासाठी येडियुरप्पा यांच्याकडे गेले होते. यदुरप्पा यांनी प्रतिक्रिया दिली नाही येडियुरप्पा यांनी अद्याप तक्रारीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. POCSO कायदा 2012 अंतर्गत किमान शिक्षा 3 वर्षे आहे. तथापि, हा गुन्हा कोणत्या कलमाखाली येतो. उदाहरणार्थ, कलम 4 अन्वये, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या लैंगिक अत्याचारासाठी न्यायालयाने निश्चित केलेली किमान शिक्षा 20 वर्षांची शिक्षा आणि दंड आहे.

B.S.Yadurappa : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, गुन्हा दाखल Read More »

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय मंत्री भाजपमध्ये दाखल

Loksabha Election 2024 : पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.   पटियाला काँग्रेस लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रनीत कौर यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघ, विनोद तावडे आणि अरुण सिंग, पंजाब भाजपचे प्रभारी विजय भाई रुपाणी आणि पंजाब प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या उपस्थितीत काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रनीत कौर यांचे भाजपमध्ये स्वागत करताना सांगितले की, त्यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे, त्या परराष्ट्र राज्यमंत्रीही राहिल्या असून त्यांच्या येण्याने निश्चितपणे पंजाबमध्ये भाजप मजबूत होईल आणि पंजाबच्या जनतेलाही फायदा होईल.  भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रनीत कौर म्हणाल्या की आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे याचा मला आनंद आहे. ते म्हणाले की, गेल्या 25 वर्षांत त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत काम केले, पंजाबसाठी काम केले आणि लोकशाहीसाठी काम केले. आता वेळ आली आहे जेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाला पुढे नेऊ शकतील, जगात भारताची प्रतिष्ठा वाढवू शकतील. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा विकास करण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी करत असलेले काम आणि धोरणे पाहून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पक्षात समाविष्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. प्रनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत प्रनीत कौर या पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंगसह आधीच त्यांचा मुलगा आणि मुलगी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  प्रनीत कौर यांनी पंजाबच्या पटियाला मतदारसंघातून चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत गेल्या वर्षीच त्यांना निलंबित केले होते. पंजाबमध्ये आपला जनाधार वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असलेली भाजप प्रनीत कौर यांना लोकसभेची उमेदवार बनवू शकते, असे सांगण्यात येत आहे.

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय मंत्री भाजपमध्ये दाखल Read More »

Maharashtra News: ​​अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का! ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय

Maharashtra News : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय होणार आहे? याची कोणालाच कल्पना नाही.  तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना शरद पवार यांचे फोटो निवडणूक प्रचारामध्ये वापरल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढले आहेत.   शरद पवार यांच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर केल्याचा आरोप करणाऱ्या अर्जावर आज  सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विचारले की, वेगळे झाल्यानंतरही अजित पवार गट शरद पवारांचे फोटो का वापरत आहे? निवडणूक प्रचारासाठी शरद पवार यांच्या फोटोचा वापर का? करत आहे, असा सवाल सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केला.  न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले की, आता तुम्ही वेगळा राजकीय पक्ष आहात. तुम्ही त्यांच्यासोबत (शरद पवार) न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मग तुम्ही त्यांचे (शरद पवार) फोटो का वापरता… आता तुमची ओळख घेऊन निवडणुकीत जा…”   उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी आली आहे. अजित पवार गट मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवारांच्या नावाचा, फोटोचा गैरवापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने करून याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  त्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने अजित पवार गटाला शनिवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.  जुलै 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा एक गट सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाला तेव्हा राष्ट्रवादीचे दोन गट झाले. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला.  अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने 23 फेब्रुवारीला अजित पवार गटाला  राष्ट्रवादीचा दर्जा देत घड्याळाचे चिन्ह दिले.  तर पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ आणि निवडणूक चिन्ह ‘तुतारी’ असे नाव देण्यात आले.

Maharashtra News: ​​अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का! ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय Read More »

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी!

Ahmednagar News:  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा  व जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मा. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन बुधवारी मंत्रालयातील दालनात केले होते.  यावेळी महसूलमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. यामुळे या प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तानां शासनाने जमिनी देण्याचे सोपास्कार केले मात्र अद्यापही अनेक जमिनी या भोगवाटा २ मध्ये असून त्यात वन विभागांच्या जमिनींचा सुद्धा समावेश आहे.   यामुळे त्यांना घरकुल योजना आणि इतर शासकीय योजना राबविताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या जमिनी ह्या १९७३ पुर्वीच्या दिल्या गेल्याने त्यातील अनामत रकमा रखडल्यामुळे या जमीन शासन जमा केल्या जाणार आहेत. यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसूल मंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठऊन अशा जमिनीवरील तत्कालीन धोरणातील १०० टक्के, ७५ टक्के अनामत रक्कम भरण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खासदारांनी केली.  वन अधिनियम १९८० अस्तितवात येण्यापुर्वी वाटप केलेल्या जमिनी भोगवाटा २ वर्गातील जमिनी सरकट वर्ग १ मध्ये करण्यात याव्यात. तसेच रहिवाशी प्रयोजनातील वाटप करण्यात आलेले भुखंड आणि पुनर्वसन गावठाणातील जमिनी नियमाकुल करण्याबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी यावेळी खासदार डॉ. विखे पाटील यांनी केली. या सर्व मागण्याच्या बाबतीत सखोल चर्चा होऊन दोन्ही मंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी महसलू, मदत व पुनर्वसन आणि वन विभागाला निर्देश दिले.  या बैठकीला मंत्रालयातील दालनात महसूल व मदत व पुनर्वसन विभागांच्या मंत्र्यांसह आमदार श्रीमती मोनिका राजळे आणि महसूल, मदत पुनर्वसन व वन विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.  तर दृकश्राव्य माध्यमातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील,अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दिराम सालीमठ आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी! Read More »

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम

आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Rohit Pawar : जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन आमदार रोहित पवार यांनी कैफियत ऐकून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळले. आंदोलनस्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, रत्नदीपबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   रत्नदीप फौंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक, आर्थिक, माणसिक, शाररीक पिळवणूकमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आ. रोहीत पवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली.  चार मुद्दयावर विद्यापीठ प्रतिनिधीनी कुलगुरू समवेत होणाऱ्या मिटींग नंतर निर्णय घेतले जातील असे अश्वासन दिले परंतु विद्यार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला डॉ. भास्कर मोरे याला 24 तासात अटक करण्याची मुदत संपली 100 घंटे झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.   महिला आयोगाकडून दखल रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षाकडून मुलींचे माणसिक, अर्थिक शाररीक, अत्याचारामुळे सुरू असलेल्या  अंदोलनाची राज्य महिला आयोगाने स्वता:हून दखल घेतली आहे.  आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जामखेडमध्ये सुरु असलेल्या या प्रकरणाबाबत पत्र लिहीले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, 1993 अंतर्गत कलम 10(1) (फ) (एक) व (2) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे व माहीती कळवण्यास सांगितले आहे.

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Read More »

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असुन तिच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे तिने कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे.  आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील तितक्याच काळजीने पार पडत आहे.  महिलांच्या अतुलनीय योगदानामुळे समाजाची व राष्ट्राची चौफेर प्रगती होईल असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या लाडजळगाव येथील उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तहकिक, अमोल तहकिक, चंद्रकांत खरात, भाऊसाहेब क्षीरसागर, जगदीश जंगम यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  प्राध्यापिका संजीवनी नवल यांचे व्याख्यानाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शोभा तहकिक, मोनिका छाजेड, मनीषा कळसाई, मयुरी परदेशी, अस्मिता मराठे, पूजा मुळे, रेखा परदेशी, सुमनबाई कुलकर्णी, कांताबाई राठोड, रुख्मिणी कुलकर्णी आदींसह  महिलांचा सन्मान करण्यात आला होता. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील Read More »

Uddhav Thackeray : शिंदे गटाला धक्का! ‘त्या’ प्रकरणात होळीनंतर होणार निर्णय

Uddhav Thackeray: राज्यात पुन्हा एकदा खरी शिवसेना कोणाची या प्रश्नावर चर्चा सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती.  मात्र राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला होता. या याचिकेवर आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या नोटिशीला 01 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सभापती राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या (यूबीटी) गटाने दाखल केलेल्या याचिकेवर   सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, उद्धव गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात पाठवण्याची मुख्यमंत्री शिंदे यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच होळीनंतर या प्रकरणाची सुनावणी होऊन निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हाच ‘खरा’ शिवसेना पक्ष असल्याच्या सभापतींच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाने नुकतीच याचिका दाखल केली होती. यापूर्वी, CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने CM शिंदे आणि इतर 38 शिवसेना आमदारांना नोटीस बजावली होती आणि शिवसेनेच्या UBT च्या याचिकेवर त्यांचे उत्तर मागितले होते. मात्र अद्याप उत्तर दाखल झालेले नाही. या खंडपीठात CJI चंद्रचूड व्यतिरिक्त न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही समावेश आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे उद्धव गटाचा  म्हणणे आहे. कारण सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर लवकर निर्णय न घेतल्यास संपूर्ण प्रकरण निरर्थक ठरणार आहे. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने सांगितले की, “आम्ही होळीच्या सुट्टीनंतर सुनावणीसाठी या प्रकरणाची  सुनावणी करून प्रकरण निकाली काढू.”  अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिकरणाच्या (स्पीकर) कार्यालयातून मूळ रेकॉर्ड मागवण्यात येईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात होईल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. . काय आहे उद्धव गटाच्या याचिकेत? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, विधानसभा अध्यक्षांच्या 10 जानेवारीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना आहे, कारण विधानसभेत आणि पक्षाची सत्ता त्यांच्याकडे आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुमत आहे. याशिवाय शिंदे आणि त्यांच्या गटातील शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळण्यालाही याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.

Uddhav Thackeray : शिंदे गटाला धक्का! ‘त्या’ प्रकरणात होळीनंतर होणार निर्णय Read More »

Loksabha Election: भाजप देणार ‘या’ विद्यमान खासदारांना धक्का; कापले जाणार तिकीट

Loksabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच सत्ताधारी ‘महायुती’ मध्ये अद्याप जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला नसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.   तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप राज्यातील काही विद्यमान खासदारांना धक्का देणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार भाजप आगामी लोकसभा विद्यमान निवडणुकीमध्ये तब्बल डझनभर खासदारांना तिकीट नाकारणार आहे. यामुळे आता कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला पुढील आठवड्यामध्ये ठरू शकतो.  यानंतर भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील आपल्या उमेदवारांची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुतीच्या जागावाटपात विजय हा एकमेव निकष आहे. महायुतीमध्ये समाविष्ट सर्व पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सुरुवातीची चर्चा सकारात्मक झाली असून 11-12 मार्चपर्यंत जागावाटपाचा निर्णय होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकसभेच्या 45 जागा कशा जिंकायच्या, याशिवाय जागावाटपाचा दुसरा कोणताही फॉर्म्युला नाही. पंतप्रधानांच्या विजयासाठी तिन्ही पक्ष एकत्र काम करतील. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. अनेक बैठका होऊनही महायुती आघाडी किंवा विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीने महाराष्ट्रात जागावाटपाचा निर्णय घेतलेला नाही. राज्यातील विद्यमान खासदारांची कार्यपद्धती आणि परिणामकारकता जाणून घेण्यासाठी भाजपने पक्षांतर्गत तीन सर्वेक्षण केल्याचे वृत्त आहे. डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या खासदारांचा स्ट्राइक रेट चांगला नाही अशा खासदारांना हटवले जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांची निवड करताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गेल्या पाच वर्षांतील विद्यमान खासदारांची कामगिरी हा सर्वोच्च निकष ठेवला आहे. याशिवाय सामाजिक समीकरणाबरोबरच स्थानिक पातळीवरील राजकारणातील त्या नेत्याचा प्रभावही तपासण्यात आला आहे. भाजपने राज्यातील 32 ते 37 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजप येत्या दोन-तीन दिवसांत लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करू शकते. ज्यामध्ये डझनभर नवीन नावांचा समावेश अपेक्षित आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या खासदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात. 1. उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन 2. उत्तर मुंबई- गोपाळ शेट्टी 3. सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी 4. सांगली- संजय काका पाटील 5. लातूर- सुधाकर श्रृंगारे 6. जळगाव- उन्मेष पाटील 7. धुळे- सुभाष भामरे 8. बीड- प्रीतम मुंडे 09. नांदेड- प्रतापराव चिखलीकर 10. रावेर- रक्षा खडसे 11. वर्धा- रामदास तडस.

Loksabha Election: भाजप देणार ‘या’ विद्यमान खासदारांना धक्का; कापले जाणार तिकीट Read More »

Maharashtra News: अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डीले थिरकले!!

Maharashtra News: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे.  कला,मनोरंजन, गायन,संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होत असल्याने या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, मुलं-नातवंड असलेल्या आजीबाईंपर्यंत या रंगारंग कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे.  याबाबत बोलताना फाउंडेशनच्या धनश्री विखे आणि खा.सुजय विखे यांनी सांगितले की, भारतीय समाजात घरामध्ये स्त्री ला निश्चितच मानाचे आणि आदराचे स्थान दिले जाते. अनेक युवती-महिला शिक्षण आणि त्यांच्यातील कलागुण कौशल्याने नोकरी-व्यवसायात स्थिरावत असल्या तरी एकूणच स्त्रीला आजही घरातील सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सार्वजनिक जीवनात घेता येईल असा मनोरंजन, छंद आदींचा आनंद घेता येत नाही. घरातील कामांची व्यस्तता आणि समाज काय म्हणेल म्हणून महिलांची व्यक्ती म्हणून घुसमट होत असते. त्यामुळे आम्ही महिला दिनाचे औचित्य साधून सर्व घटकांतील युवती-महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. इतर कोणी मंडळी कार्यक्रम घेताना वेग वेगळे इप्सित डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम घेत असतील, मात्र आम्ही जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता आणि याची उगाच जास्तीची प्रसिद्ध न करता केवळ महिलांच्या मनाचा विचार करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरण्याच्या हेतूने कार्यक्रम घेत आहोत.  विशेष म्हणजे आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमांना महिला,युवतीं बरोबर अगदी नातू-पणतू असलेल्याआजीबाई देखील आवर्जून उपस्थिती लावत आहेत हे आमच्या कार्यक्रमांचे यश असल्याचे धनश्री विखे म्हणाल्या. शेवगाव, पाथर्डी,कर्जत,जामखेड नंतर राहुरी इथे आयोजित कार्यक्रमास तर रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचे दिसून आले. असंख्य महिलांची उपस्थिती, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिलखेचक लावणी नृत्यासाठी ओळख निर्माण केलेल्या मानसी नाईक यांचे प्रेक्षकांवर भुरळ घालणारे नृत्य, प्रसिद्ध धम्माल गायक, परीक्षक अवधूत गुप्ते यांचा प्रेक्षकांची मने जिंकणारा आवाज, महिलांसाठी पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसांची लयलूट आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा केलेला सन्मान असा अनोखा आणि दैदिप्यमान सोहळा काल राहुरी येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीसह संपन्न झाला.  जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून काल राहुरी येथील केशर मंगल कार्यालय,(मल्हारवाडी रोड) येथे महिला दिनाच्या अनुषंगाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते. माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले आणि धनश्री विखे पाटील यांची सदरील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.  या कार्यक्रमात महिलांच्या गर्दीने परिसर अगदी फुलून गेला होता. दरम्यान विविध क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देऊन आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या महिलांकडून सर्वांनी प्रेरणा घेऊन त्यांच्या पायावर पाय ठेवत वाटचाल करावी असे आवाहन सुजय विखेंनी उपस्थित महिलांना केले. या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. भव्य लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करून महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली.  तसेच दिग्गज कलाकार, जसे की अवधूत गुप्ते यांनी आपल्या गोड आवाजात आणि मानसी नाईक यांनी आपल्या नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शशिकलाताई पाटील, शेती व व्यवसाय क्षेत्रातील पुष्पलताताई येवले, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. दिपा कुसळकर, 32 वर्षांपासून ईश्वरीय सेवेत असणाऱ्या ब्रह्मशांती पद्मादेवी, कृषी क्षेत्रातील कविता जाधव, वैद्यकीय क्षेत्रातील श्रीम. डॉ. केतन साळवे, अध्यात्मिक कार्य करणाऱ्या ह.भ.प. वंदना आंधळे, क्रीडा व कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या ज्योती खेडेकर/ धामोरे, दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील ज्योती शिंदे, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील सोनाली बर्डे, सामाजिक कार्यकर्त्या सविता मगर, फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काजल शर्मा, बालक संगोपन सेवा क्षेत्रातील सखुबाई जाधव, उद्योजिका रोहिणी कुसमुडे, बचत गट संघटन करणाऱ्या उमा जैन, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वंदना कांडेकर, बचत गट क्षेत्रात कार्य करणाऱ्या वैशाली धसाळ, अध्यात्मिक कार्य करणाऱ्या ह.भ.प. सोनालीताई गावडे/ तागड, शैक्षणिक क्षेत्रातील प्रमिला ढोकणे आदी कर्तृत्ववान महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले. रेकॉर्ड ब्रेक गर्दी.. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी येथे आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 साठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या या महोत्सवाला जी गर्दी पाहायला मिळाली त्यापेक्षा अधिक गर्दी कालच्या या भव्य सोहळ्यात दिसून आली. खरंतर हा एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा क्षण होता.. आपल्या खास धमाल गाण्यांच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या गाण्यांवर गुप्ते यांनी खा.सुजय विखे यांना नाचायला भाग पाडलेच. आपल्या अवखळ स्वभावामुळे अवधूत गुप्ते कार्यक्रमात मोठी रंगत आणतात. अरे दिवानो, मुझे पाहचानो..  में हु डॉन.. या गाण्यावर खा.सुजय विखे चांगलेच नाचले. यावेळी समर्थक चाहत्यांनी खा.विखे आणि माजीमंत्री कर्डीले यांनी खांद्यावर घेत नाचत एकच जल्लोष केला. यावेळी काळा गॉगल घालून कर्डीले आणि विखे यांनीही खांद्यावर नाचत गाण्याचा आनंद घेतला.

Maharashtra News: अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डीले थिरकले!! Read More »