DNA मराठी

राजकीय

Ahmednagar News: विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत या : अॅड अभय आगरकर

Ahmednagar News: जिल्ह्याच्या विकासासाठी लोकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत यावे असे आवाहन अहिल्यानगरचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी केले आहे. ते नगर येथील प्रचार सभेत बोलत होते. नगर जिल्ह्यात मागील १५ वर्षापासून प्रलंबित असेलेला उड्डाणपुलाचा विषय खासदार सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला. त्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्याच्या विकासाचे उद्दिष्ट स्पष्ट असून त्यांच्या माध्यमातूनच जिल्हा विकसित होऊ शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी लोकांच्या गाठीभेटी वाढविल्या आहेत. नगर मध्ये प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुजय विखे यांचासह अनिल शिंदे, सचिन जाधव, दिलीप सातपूते, भैया गंधे, बाळासाहेब वाकडे, सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामदे, उदय कारळे, करण कराळे, मा. नगरसेविका शिंदे, संपत नलावडे, बाळासाबेह गायकवाड, नितीन शेलार, अशोक गायकवाड, प्रिया जानवे, सविता कोटा व इतर महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी नागरिकांना संबोधित करताना आगरकर म्हणाले की, विखे पाटील कुटुंबांची नाळ जिल्ह्याशी जोडली आहे. मागील ५० वर्षाच्या काळात विखे पाटील कुटुंबांनी जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. यामुळे त्यांच्या चौथ्या पिढीला लोकांनी साथ मिळत आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे तरूण असून उच्च शिक्षित आहेत. त्याच्याकडे जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार आहे. मागील पाच वर्षात त्यांच्या मार्फत जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे उभे राहिले, तरूणांना रोजगार मिळावा म्हणुन तीन एमआयडीसीची मुहुर्तमेढ रोवली आहे. बचत गटांच्या मार्फत महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तर राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या मार्फत जेष्ठ नागरिकांना सहकार्य केले आहे. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवुन देण्याचे काम त्यांनी केले आहे. यामुळे जिल्ह्यात विकास हवा असेल तर खा. सुजय विखे पाटील हे सर्वोत्तम प्रर्याय आहेत. असे आगरकर म्हणाले. लोकांनी मतदान करताना आपला नेता कसा असावा याचा विचार करावा, जिल्ह्यातील सुसंस्कृत राजकारणासाठी विखे परिवार ओळखला जातो. आणि सुजय विखे हे केवळ आपल्या विकास कामाच्या जोरावर मतदान मागत आहेत.   देशामध्ये गेल्या १० वर्षामध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न पुर्ण करायचे असेल तर खा. सुयज विखे पाटील यांना मतदान केले पाहिजेत. आपल्याला जो मताचा संविधानिक अधिकार मिळाला आहे  त्याचा योग्य वापर करा.  आणि राष्ट्रहीताचा वापर करणाऱ्या सरकारच्या मागे उभे रहा असे आवाहन अॅड. अभय आगरकर यांनी केले आहे.

Ahmednagar News: विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत या : अॅड अभय आगरकर Read More »

Maharashtra News: पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणार : खा. सुजय विखे

Maharashtra News:  अहमदनगर  जिल्हा  ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे.  ऐतिहासिक, सांस्कृतिक,  आणि धार्मिक स्थळांची परंपरा पर्यटन विकासाच्या माध्यमातून विकसित करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आपण निश्चित पाठपुरावा करू आशी ग्वाही महायुतीचे उमेदवार खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. गावोगावी कार्यकर्त्याच्या मेळाव्यातून त्यांनी मतदार संघातील विकासाच्या संकल्पना मांडून देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठे पाठबळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात भव्य किल्ल्यांपासून ते ऐतिहासिक वारसा असलेली तिर्थक्षेत्र आहेत. प्रत्येक तालुका एका तिर्थक्षेत्राची ओळख म्हणून नावलौकीक मिळून आहे. जिल्ह्याचे धार्मिक महत्त्व अधोरेखित होते. जिल्ह्यातील साहसी पर्यटनाला असलेल्या संधी विचारात घेवून जिल्ह्याचा पर्यटन विकासाला गती देण्यासाठी पाठपुरवा करणार असल्याचे डाॅ. विखे म्हणाले.   रेहेकुरी येथेही अभयारण्य घोषित करण्यात आले असून ते काळविटांसाठी राखीव आहे. अशी अनेक स्थळे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करू शकतात. यामुळे पर्यटन विकास झाल्यास त्याच्या माध्यमातून स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे प्रामुख्याने पर्यटन विकास हा आपल्या अजेंड्यावरील प्रमुख विषय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.  निवडणुकांचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात असून सुजय विखे पाटील हे आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांना साथ देण्याचे आवाहन करत आहेत. त्याच बरोबर ही देशाचे नेतृत्व ठरविणारी निवडणुक असून देशात पंतप्रधान नरेंद्र  मोदी याच्या शिवाय पर्याय नसल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. मागील पाच वर्षात मतदारसंघाच्या विकसासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकास काम मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला.युवकांच्या रोजगारा करीता श्रीगोंदा वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहती करता देण्याचा निर्णय झाल्याने मोठे उद्योग  मतदार संघात येण्यास तयार झाले असल्याचे खा.विखे यांनी सांगितले.

Maharashtra News: पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणार : खा. सुजय विखे Read More »

Maharashtra News: चारशे जागांच्या यशात खा. सुजय विखे विखेंच्या नगरचा वाटा – भालसिंग

Maharashtra News:  सरकारच्या योजनांची  गॅरेंटी  देशातील जनतेला आली आहे. देशाने पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्विकारले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता येणार असून अहिल्यानगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचाही समावेश चारशे जागांच्या ऐतिहासिक  विजयात राहील असा विश्वास नगर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी व्यक्त केला आहे.  नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुती कडून सुरू असलेल्या प्रचाराची माहीती जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  भालसिंग म्हणाले की, मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगाच्या केंद्रस्थानी पोहचविले आहे. मोदींच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात भारत आर्थिक महासत्ता म्हणुन उदयास येईल यात कोणतीही शंका नाही. मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या यामुळेच देशातील ३० कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले. महिलांना अनेक योजनांच्या मार्फत बळकटी देण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय संबंधात सुधारणा झाली. यामुळे मोदींच्या नेतृत्वात भारताची विकसित देशाकडे वाटचाल होत असताना देशाने मोदींवर विश्वास ठेवला आहे लोकसभा निवडणुकीच्या निमिताने मोदीच्या नेतृत्वाखाली झालेले निर्णय मतदारपर्यत पोहचविण्याचे काम प्रचाराच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्ते करीत असल्याचे सांगितले. खा. डॉ. सुजय विखे यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निधी आणुन जिल्ह्यात विविध विकासकामे पुर्ण केली आहेत. त्याच  प्रमाणे शासनाच्या विविध योजना शेवटच्या लाभार्थ्यां पर्यंत त्यांनी पोहचविल्या आहेत. केंद्र  आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी करणारा जिल्हा म्हणून अहील्यानगर प्रथम क्रमांकावर असल्याकडे भालसिंग यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. राजकारणा पलिकडे जावून आरोग्य शिबीर कोव्हीड संकटात केलेले काम नगर जिल्ह्यातील जनतेते अनुभवले आहे. त्यामुळेच  डॉ. सुजय विखे पाटील लोकप्रिय ठरले  निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने खा.विखे पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहाता पुन्हा एखादा खासदार म्हणुन मोदींच्या टीम मध्ये असणार आहेत. नगरच्या जनतेने विखे यांना निवडून देण्याचा  निर्णय घेतला असल्याचे भालसिंग म्हणाले.

Maharashtra News: चारशे जागांच्या यशात खा. सुजय विखे विखेंच्या नगरचा वाटा – भालसिंग Read More »

Modi Government : डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीपर्वातील कामांची मांडली जंत्री

Modi Government: देशात मोदींची गॅरेंटी सुरू असून पुन्हा एकादा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत यात आता कोणतीही शंका राहिली नसून तरी कुणाला वाटत असेल मोदीच का? तर मोदीपर्वात झालेल्या कामांची माहिती घ्या, आणि देश कुणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय करा. असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले.   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माणिकदौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. आमदार मोनिका राजळे, जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले तालुका अध्यक्ष मृत्यूंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, अशोक चोरमले,भिमराव फुंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यापुर्वी खासदार विखे पाटील यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी उत्फुर्त स्वागत केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.   सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, मोदी सरकारचा काळ खुप  प्रभावी आणि आव्हानात्मक होता. तरी  कारभाराचा वेग, सरकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे, मजबूत पायाभूत सुविधा आणि अनेक दशकांपासून प्रलंबित समस्यांचे निराकरण यांना उच्च प्राधान्य दिले. आज देशात निर्णय घेणारे आणि जबाबदार सरकार आहे. या देशातील सामान्य माणुस, शेतकरी, कामगार, महिला आणि युवा वर्गाला पाठबळ देण्याऱ्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी झाल्यामुळे देशातील जनतेचा विश्वास हा मोदींजींवर असल्याचे त्यांनी सांगितले.  ही निवडणूक लोकसभेची आहे. त्यामुळे देश कुणाच्या ताब्यात द्यायचा हे ठरविण्यासाठीची ही निवडणूक आहे. भविष्य घडविण्यासाठी मोदींशिवाय पर्याय नाही, ही भाावना देशातील जनतेची झाली आहे. त्यामुळेच ४०० जागा जिंकुण भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार सत्तेवर येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न या सरकार मधुनच सुटू शकतात. यापुर्वीही केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या रस्ते विकासाला मोठा निधी उपलब्ध झाला. भविष्यातही विकासाचे प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचे आहेत. युवकांच्या रोजगारासाठी काम करायचे आहे. यासाठीच सत्ताधारी पक्षाचा खासदार होणे महत्वाचे आहे. ज्यांची सत्ता येणार नाही. त्यांच्या खोट्या आश्वासनांना भुलू नका असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी यावेळी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासियांची काळजी आहे. ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, जी देशाला या आव्हानात्मक काळातून बाहेर काढण्यास सक्षम आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे सुरक्षा कवच आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनंतर भारत बलवान बनत आहे. आगामी काळात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश स्वावलंबन आणि आर्थिक विकासाच्या नवीन उंची गाठण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मोदी सरकारच्या काळात देशात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. त्यात अनुच्छेद ३७० हटविण्यात आले. नागरिकता संशोधन विधेयक आणण्यात आले. राम मंदिर पुर्ण करण्यात आले. तीन तलाकच्या मुद्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. देशातील सैन्याला बळ देण्यात आले वायुसेनेत आठ अपाचे लढावू हेलिकॉप्टर सामील झाले. ३६ राफेल विमाने भारतीय सैन्यात दाखल झाली. आयुष्यमान भारत ३ कोटी हून अधीक लोकांना आरोग्य कवच मिळाले. अटल पेंशन २ कोटी हुन अधीक लाभार्थी. प्रधानमंत्री किसान योजना, जनधन योजना,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, श्रमिक कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया अशा अनेक योजनांमुळे भारत विकसीत देशाकडे वाटचाल करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली २०४७ पर्यंत जगात भारत महासत्ता म्हणुन उदयास येईल. यामुळे मोदीशिवाय देशात कोणताही पर्याय नाही.  हे आता माध्यमांच्या सर्वेक्षणातून सिद्ध झाल्याचे खा. विखे पाटील यांनी सांगितले.

Modi Government : डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीपर्वातील कामांची मांडली जंत्री Read More »

Lok Sabha Election 2024 : ‘ते’ आपल्याला जमत नाही, विखेंचा लंकेंना टोला

Lok Sabha Election 2024 : भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही.डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही.केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत. कोणतेही सर्व्हे येवू द्या,मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त  केला. पारनेर तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.विखे पाटील बोलत याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे प्रा.विश्वनाथ कोरडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड, सोनाली चालके, बंडू रोहकले, बाबासाहेब खिलारी, सचिन वराळ, रवींद्र पूजारी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की,लोकसभा निवडणुक ही देशाची आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडून भारतीय जनता पक्ष मतदान मागत आहे.मागच्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनाचा लाभ सामान्य माणसापर्यत पोहचवला.जे  प्रामाणिकपणे केले तेच आपण लोकांमध्ये जावून सांगत आहोत.इतरांसारखी खोटी सहानुभूती आपल्याला मिळवायची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोव्हीड संकटात डॉक्टर नात्याने आपणही हजारो रुग्णांची सेवा केली.पण समोर रूग्ण मरणांशी झुंज देत असताना त्याच्यावर उपचार करतानाचे व्हीडीओ टाकण्याचा मोह आपल्याला कधी झाला नाही आणि होणारही नाही असे सांगून डुप्लीकेट व्हिडीओ करून राजकारण करण्याची पध्दत आमची नाही.विखे पाटील परीवार लोकंमध्ये जावून काम करतो.या जिल्ह्यातील लोकांच्या सुख दुखात सहभागी होवून लोकांचे पाठबळ मिळवतो.प्रेमाच्या आणि जीवाभावाच्या लोकांमुळेच विखे परीवाराला राजकारणात अनेक वर्ष संधी मिळाली.त्यामुळे आमचा सर्वे लोकांच्या मनात आहे.कोणाचेही सर्वे येवू द्यात अहिल्यानगर मतदार संघातून महायुतीचाच विजय होणार आणि पारनेर तालुक्यातून सर्वाधिक मतांची आघाडी मिळणार असल्याचा दावा खा.सुजय विखे पाटील यांनी केला. खोट्या सहानुभूतीला यापुर्वी  पारनेर तालुका फसला.आता पुन्हा ती चूक या तालुक्यातील जनता करणार नाही असा विश्वास व्यक्त करून या तालुक्यातील जनतेने आता विकास कामाची तुलना करण्याची गरज आहे.दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला.काम कमी आणि व्हिडीओच  जास्त आशी परिस्थिती तालुक्याची असल्याचा टोला लगावून पारनेर हा विचरांचा तालुका आहे. जनता सूज्ञ आहे.एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही असेही त्यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक देशाचे भवितव्य घडवविणारी आहे.तशीच पारनेर तालुक्याच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण आहे.या भागातील युवकांचे भविष्य आपल्याला घडवायचे आहे.समृध्द सुशिक्षित आणि सुरक्षित पारनेर करीता आपल्या सर्वाच्या सहकार्याने काम करायचे असल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.

Lok Sabha Election 2024 : ‘ते’ आपल्याला जमत नाही, विखेंचा लंकेंना टोला Read More »

Ramnavmi 2024 :  देशात मोदी नसते तर राम मंदीर झालेच नसते:  खा विखे पाटील

Ramnavmi 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात राम मंदिराची उभारणी झाली, त्यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपुजन झाले आणि प्राणप्रतिष्ठा सुद्धा त्यांच्याच हस्ते पार पडली. जर पंतप्रधान मोदी नसते तर देशाला राम मंदीराची अजूनही वाट पहावी लागली असती. मोदी नसते तर प्रभू रामचंद्राचे मंदिर झालेच नसते. असे मत नगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  राम नवमीच्या निमित्ताने देशात प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गल्लोगल्लीत रामनामाचा जयकारा सुरू होता. खा. डॉ. सजय विखे पाटील हे कर्जत तालुक्यातील भांभोरा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार राम शिंदे आणि इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.  या प्रसंगी रामभक्तांना संबोधित करताना खा. विखे म्हणाले की, देशात राममंदिरासाठी ५०० वर्षांचा संघर्ष झाला. या संघर्षात अनेकांचे जीव गेले. मात्र केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर राममंदिर पुर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. यासाठी न्यायालयातील लढाई सरकारने यशस्वी केली. यामुळे अयोध्येत राम मंदिर उभे राहण्याचे स्वप्न पूर्णत्वास गेले.   लोकसभा मतदार संघात मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर आपण नागरिकांकडे समर्थन मागत आहोत. या भागातील प्रश्नांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची उपलब्धता केली. आपल्याकडे केलेली विकासकामे सांगण्याचे काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात घेतलेल्या निर्णयांचे लोककल्याणकारी योजनांची माहिती आहे. बुथवरील प्रत्येक कार्यकर्त्याने लाभार्थी आणि मदतारांपर्यंत पोहचवायची आहे. नकारात्मक गोष्टीना थारा देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.   विरोधी उमेवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत. लोकसभा मतदार संघाचा विकास कसा करणार? विश्वासघात करून त्यांचे राजकारण सुरू आहे. केवळ दहशत आणि दादागिरी करून सुरू असलेल्या राजकारणाला जनता कधीही स्विकारणार नाही. या भागातील जनता सुज्ञ आणि विचारी आहे. विकासाच्या कामावर शिक्कामोर्तब करून लोकसभा मतदार संघातील जनता महायुतीच्या पाठीशी खंभीर उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ramnavmi 2024 :  देशात मोदी नसते तर राम मंदीर झालेच नसते:  खा विखे पाटील Read More »

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित झाले असून, संकल्‍प पत्रातून जाहीर करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा भाव भाजपाच्‍या संकल्‍प पत्राचा आत्‍मा असल्‍याचा विश्‍वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केला. लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍या  वतीने प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या संकल्‍प पत्राची माहीती मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांना दिली. भाजपाच्‍या संकल्‍प पत्रासाठी देशातील लोकांच्‍या काय अपेक्षा आहेत, यासाठी सुचना पाठविण्‍याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्‍यांच्‍या आवाहानाला प्रतिसाद देवून, संपुर्ण देशातून १६ लाख सुचना यासाठी प्राप्‍त झाल्‍या. नगर जिल्‍ह्यातूनही १० हजार सुचना संकल्‍प पत्रासाठी पाठविण्‍यात आल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले. नागरीकांच्‍या सुचनांमधून तयार झालेल्‍या या संकल्‍प पत्रात भारताच्‍या अंतरराष्‍ट्रीय संबधापासून ते देशाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेपर्यंत. समृध्‍द भारत, सुशासन, स्‍वस्‍थ भारत, शिक्षण, क्रिडा अशा सर्वच क्षेत्रांच्‍या विकासाबरोबरच इनोव्‍हेशन, टेक्‍नॉलॉजी आणि पर्यावरण यांना विशेष प्राधान्‍य देण्‍यात आल्‍याचे सांगून ना.विखे पाटील म्‍हणाले की, २०४७ सालापर्यंत विकसीत भारत निर्माण करण्‍याचे उदिष्‍ठ पुर्ण करण्‍यासाठी युवाशक्‍ती, नारीशक्‍ती, शेतकरी आणि गरीब यांना सशक्‍त करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला असून, रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करतानाच स्‍टार्टअप योजनेला प्रोत्‍साहन देण्‍याचा प्रयत्‍न  केला जाणार आहे. भारताला प्रक्रीया उद्योगाचे हब बनवून प्रक्रीया उद्योग ग्रामीण अर्थकारणाचे ग्रोथ इंजिन ठरेल असे उदिष्‍ठ या संकल्‍प पत्रातून ठेवण्‍यात आले असून, संस्‍कृती आणि परंपरेची जोपासणा करतनाच देशातील पर्यटन विकासाला गती देण्‍याचा मानस संकल्‍प पत्रातून व्‍यकत करतानाच मागील दहा वर्ष देशातील महिलांना संधीचे होते. आता भविष्‍यातील पाच वर्षे हे महिलांच्‍या भागीदारीचे असतील. याकरीता नारीशक्‍ती वंदना अधिनियम पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्‍या  सरकारची मोठी उपलब्‍धी ठरली असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले .   भाजपाच्‍या संकल्‍प पत्राच्‍या अनुषंगानेच लोकसभा मतदार संघांचा वचननामाही लवकरच प्रकाशित करण्‍यात येणार असून,  जिल्‍ह्यात रोजगार निर्मिती, तिर्थक्षेत्र पर्यटन तसेच जिल्‍ह्यातील प्रलंबित  पाणी योजनांच्‍या सोडवणूकीसाठी प्राधान्‍य देण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्‍हा ध्‍यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, धनंजय जाधव, निखील वारे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित Read More »

Modi Government : महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध

Modi Government:  पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची निर्मिती करून महिलांना प्रगतीपथावर आणण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यामुळे महिला सर्वच क्षेत्रात आपली छाप पाडत आहे. महिलांना सामाजिकदृष्ट्या समान हक्क मिळवून सामाजिक न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.  “मेरा बुथ सबसे मजबूत” कार्यक्रमाचेआयोजन बेलवंडी येथे करण्यात आले होते. यावेळी विक्रमसिंह पाचपुते, अण्णासाहेब शेलार व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत विकसनशील अर्थव्यवस्थेकडे चमकदार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे. एक काळ असा होता की महिलांसाठी घराबाहेर पडणेही फार कठीण होते. पण आता काळ बदलला आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात चुरशीची स्पर्धा करत आहेत. व्यवसाय, शिक्षण, मनोरंजनापासून ते आयटी आदी अनेक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. महिलांना बळ देण्याचे सर्वाधिक  काम मोदी सरकारच्या काळात झाले असल्याचे खा. विखे पाटील म्हणाले.  मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यामातून लाखो महिला स्वयंरोगारात आल्या, सुकन्या समृद्धी योजनेतून मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम मोदी सरकारने केले.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात आली.हिला शक्ती केंद्र योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना,लखपती दीदी योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,जननी सुरक्षा योजना अशा विविध योजनांची प्रभावीपणे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे मागील १० वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वाधिक महिला विकासाच्या योजना राबवत देशातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम केले. यामुळे यावेळी सुद्धा महिलांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंसती आहे. पुन्हा देशात मोदी सरकार येईल आणि आतापर्यंत ज्या पध्ततीने महिलांचा विकास झाला त्याहुन अधिक गतीने महिलांचा विकास होईल असा विश्वास खा. विखे यांनी बोलून दाखवला.   जिल्ह्यात महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार, महिला बचत गटाच्या माध्यातून जिल्ह्यातील महिलांना स्वंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यात महिलांसाठी विविध माध्यमातून रोजगार उभा करण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाच्या महिलांसाठी असेलेल्या योजना प्रत्येक लाभार्थांपर्यंत पोहचविल्या जातील. असे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Modi Government : महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध Read More »

PM Modi : खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे

PM Modi: अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांना १ लाख मतांची आघाडी देणार आहेत, त्या अनुषंगाने श्रीगोंदा मधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा असून श्रीगोंदाकरांची जबाबदारी वाढली आहे,  असे सांगतानाच खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी केले आहे. नागवडे ताई यांनी पुढे बोलताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार यांच्या राज्य सरकारने चांगले काम केले आहे, लोककल्याणकारी कार्य करत आहे. खासदार विखे यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून लोकांना अपेक्षित विविध कामे केली आहेत, रस्त्यांचे अनेक प्रश्न खासदार सुजय विखे पाटील मार्गी लावले, पुन्हा एकदा त्यांना मतदार संसदेत पाठवणार आहे पण मतांची आघाडी जास्त झाली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघात घरोघरी कमळ निशाणी पोहोचवा, असे सांगून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. मोदीजींनी केलेली कामे आणि जगाचा त्यांनी जिकंलेला विश्वास हि आपल्या देशासाठी जमेची बाजू आहे. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार हा संपूर्ण जगाला विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक दिग्गज उद्योग भारतात येण्यासाठी आतुर आहेत. यामुळे आपल्या देशाची ख्याती जगात उंचाविण्याचे काम यापुढेही होणार असून अबकी बार ४०० सौ पार होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

PM Modi : खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे Read More »

PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्याची माहीती मतदारांपुढे कणखरपणे मांडा -खा.विखे पाटील

PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगर मधून खा डॉ सुजय विखे पाटील निवडून जाणार एवढाच प्रचार करून महायुतीची बाजू मतदारासमोर कणखरपणे मांडा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा.सुजय विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील गुहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले.जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की,केलेले काम आपण जनतेत जावून सांगत आहोत.कारण वर्षानुर्षे समाजासाठी  काम करण्याची परंपरा विखे पाटील परीवाराची आहे.सुसंसकृत राजकारण आजपर्यत झाल्यामुळे जनतेचे पाठबळ सातत्याने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोणत्याही कार्यक्रमाला गेले की निवडणुकीची चर्चा होते.पण चर्चेत सहभागी होताना देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आणि नगर मधून सुजय विखे पाटील खासदार होणार एवढेच उतर देण्याचे आवाहन करून फार नकारात्मक वातावरणात जाण्याची गरज नाही.महायुतीला साथ देण्याची मतदारांची भूमिका ठाम असल्याने महायुती करीता ही निवडणूक फक्त मताधिक्यासाठी उरली असल्याचे विखे पाटील म्हणाले. समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आपण उतर शोधले आहे.दुधाचे अनुदान शेतकार्यांच्या खात्यात वर्ग झाले. अनुदानापासून कोणीही वंचित राहाणार नाही याची काळजी घेतली जाईल आशी ग्वाही देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निर्णयाची योजनांची माहीती गावात आणि आपल्या बुथवर देण्याचे आवाहन करून आपले गाव आणि बुथ याचाच विचार करा उगाच बाकीच्या  तालुक्यात काय चालले याचा  विचार  करू नका असे आवाहन खा.विखे यांनी केले. राहुरी तलुक्यातील जनता सूज्ञ आहे.विखे पाटील परीवाराला नेहमीच या तालुक्याने पाठबळ दिले.एक परीवार म्हणून या तालुक्याकडे आपण पाहातो.मागील पाच वर्षात तालुक्यात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा सर्वाच्या समोर आहे.निळवंडे धरणाचे पाणी देण्याचा शब्द महायुती सरकारने पूर्ण केला.अद्यापही काही काम बाकी आहेत ही काम महायुती सरकारच पूर्ण करणार असल्याचे विखे पाटील याप्रसंगी शिवाजीराव कर्डीले यांनीही मार्गदर्शन केले. खा.विखे यांचे मोटार सायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले.अनेक मतदारांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या.सर्वच ठिकाणी कार्यकर्ते नागरीकांनी स्वागत केले.

PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्याची माहीती मतदारांपुढे कणखरपणे मांडा -खा.विखे पाटील Read More »