DNA मराठी

राजकीय

Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री, दिल्लीतून मिळाला ग्रीन सिग्नल?

Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री कोण होणार याकडे लागले आहे. माहितीनुसार भाजप केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सहमती दर्शवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे आता देखील भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून सध्या ते काळजीवाहक मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्यामुळे बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याने भाजपकडून एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्री पद देण्याची तयारी आहे मात्र एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पुढील एक-दोन दिवसात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपने 131 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकले आहे.

Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री, दिल्लीतून मिळाला ग्रीन सिग्नल? Read More »

Maharashtra Politics: मोठी बातमी! पुन्हा एकदा रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येताच पोलीस विभागातील मोठी बातमी समोर आली आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत काल रात्री उशिरा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने त्यांना पदमुक्त केले होते. आता पुन्हा एकदा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने सातत्याने रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत.काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती त्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यांच्या जागेवर संजयकुमार वर्मा यांची निवडणुक कालावधी पुरती पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात अली होती. 30 जून 2024 रोजी शुक्ला या सेवा निवृत्त झाल्या होत्या परंतु महायुती सरकारने त्यांना पोलीस महासंचालक पदी बसवून दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! पुन्हा एकदा रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी Read More »

Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची मान्यता होणार रद्द, ‘हे’ आहे कारण

Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहे. राज्यात पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने महायुतीची सरकार स्थापन होणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार निवडणूक आयोग राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्याचा विचार करत आहे. प्रत्यक्षात त्यांच्या पक्षाचा एकही आमदार विधानसभा निवडणुकीत जिंकू शकला नाही. त्याच वेळी, पक्षाची मतांची टक्केवारीही खूप कमी होती, त्यामुळे निवडणूक आयोग पक्षाची मान्यता रद्द करण्याचा विचार करत आहे. विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला किमान एक विधानसभेची जागा किंवा 8 टक्के मते मिळणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 125 जागांसाठी उमेदवार उभे केले होते, पण एकही जागा जिंकता आली नाही. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही निवडणुकीत पराभव झाला. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता रद्द केल्यास तो राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जाईल. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1.55% मते मिळाली आहेत. पक्षाला एकूण 1,002,557 मते मिळाली. या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी पक्षश्रेष्ठींची आत्मपरीक्षण बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीतील खराब कामगिरी आणि पुढील रणनीतीवर चर्चा होऊ शकते. भाजपने 132 जागा जिंकल्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकण्यात यश मिळवले. 149 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपने 132 जागा जिंकल्या. त्याचवेळी शिवसेनेने 57 तर राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. त्या तुलनेत महाविकास आघाडी केवळ 49 जागांवर मर्यादित राहिली. या निवडणुकीत भाजपची मते 26.77 टक्के होती. तर काँग्रेसला 12.4 टक्के मते मिळाली.

Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची मान्यता होणार रद्द, ‘हे’ आहे कारण Read More »

Maharashtra Election: देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे कोण होणार मुख्यमंत्री? जाणून घ्या सर्वकाही…

Maharashtra Election: संपुर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. राज्यात पुन्हा एकदा प्रचंड बहुमतासह महायुती सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येत आहे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने निवडणुकीत 131 जागांवर बाजी मारली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. तसेच पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे अशी इच्छा देखील आरएसएसकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीला फक्त 49 जागा मिळाले आहे आणि 3 जागांवर इतरांनी बाजी मारली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभासह झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने बाजी मारली असून पुन्हा एकदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार आहे. त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा देखील केला आहे.

Maharashtra Election: देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे कोण होणार मुख्यमंत्री? जाणून घ्या सर्वकाही… Read More »

Maharashtra Election Result : मतमोजणीसाठी जिल्ह्यात 1 हजार 259 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सकाळी 8 वाजता होणार सुरुवात

Maharashtra Election Result : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होणार असून मतमोजणीसाठी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी टपाली मतदानाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएम यंत्राची मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मतमोजणीसाठी एकूण उपलब्ध १ हजार ३८५ मनुष्यबळापैकी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्षात मतमोजणी कामासाठी नियुक्त असणार आहेत. या मनुष्यबळाची पहिली सरमिसळ १६ नोव्हेंबर, दुसरी २१ नोव्हेंबर रोजी झाली असून तिसरी सरमिसळ मतमोजणीच्या दिवशी पहाटे ५ वाजता करण्यात येईल. अकोले विधानसभा मतदार संघासाठी मिटींग हॉल तहसील कार्यालय नवीन इमारत ता. अकोले, संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, ता. संगमनेर, शिर्डी – प्रशासकीय इमारत, तळमजला, तहसील कार्यालय राहाता, कोपरगाव – सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, तळमजला, ता. कोपरगाव, श्रीरामपूर – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, पहिला मजला, ता. श्रीरामपूर येथे मतमोजणी होईल. नेवासा मतदारसंघासाठी न्यू गव्हर्नमेंट ग्रेन गोडाऊन, उत्तर बाजू खोली क्र.२ संथ मेरीस् स्कुल रोड, मुंकुदपुरा नेवासा फाटा, ता.नेवासा, शेवगाव – शासकीय इमारत तळमजला तहसील कार्यालय शेवगाव, राहुरी – लोकनेते रामदास पाटील धुमाळ न्यु आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज राहुरी इनडोअर स्पोर्ट्स हॉल राहुरी, पारनेर – औद्यागिक प्रशिक्षण संस्था वर्कशॉप पारनेर, अहमदनगर शहर – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन नं.६ एम.आय. डी.सी. नागापूर अहिल्यानगर, श्रीगोंदा – गव्हर्नमेंट ग्रेन गोडाऊन नं.३, पेडगाव रोड श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी बॅडमिंटन हॉल, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मतमोजणी होईल. अकोले मतदारसंघातील ३०७ मतदान केंद्रांसाठी मतमोजणीच्या २२ फेऱ्या होतील. संगमनेर २८८ आणि २१ , शिर्डी २७१ आणि २०, कोपरगाव २७२ आणि २०, श्रीरामपूर ३११ आणि २३, नेवासा २७६ आणि २०, शेवगाव ३६८ आणि २७, राहुरी ३०८ आणि २२, पारनेर ३६६ आणि २७, अहमदनगर शहर २९७ आणि २२, श्रीगोंदा ३४५ आणि २५, तर कर्जत जामखेड मतदारसंघातील ३५६ मतदान केंद्रांसाठी मतमोजणीच्या २६ फेऱ्या होतील. प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात येणार असून प्रत्येक टेबलसाठी त्यासाठी प्रत्येकी १ पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. टपाली मतदानासाठी अकोले मतदारसंघात ७ टेबल, संगमनेर आणि कर्जत जामखेड ९, शिर्डी आणि कोपरगाव ४, नेवासा आणि अहमदनगर शहर ६, श्रीरामपूर ५, शेवगाव १०, पारनेर १२, श्रीगोंदा मतदारसंघात ११ टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर १ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १ पर्यवेक्षक, २ सहाय्यक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असतील. ईटीपीबीएस स्कॅनिंगसाठी अकोले, शिर्डी, कोपरगाव आणि श्रीरामपूर मतदारसंघात २ टेबल, संगमनेर, पारनेर अणि श्रीगोंदा मतदारसंघात प्रत्येकी ५, नेवासा, अहमदनगर शहर आणि कर्जत जामखेड मतदरसंघात प्रत्येकी ३, शेवगाव ४ आणि राहुरी मतदारसंघात ६ टेबलवर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर १ पर्यवेक्षक आणि १ सहाय्यकांची नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय मतमोजणीच्या वेळी प्रत्येक निवडणूक मतमोजणी निरीक्षकांच्या मदतील दोन सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची आकडेवारी तपासण्यासाठी हे सूक्ष्म निरीक्षक सहकार्य करतील.

Maharashtra Election Result : मतमोजणीसाठी जिल्ह्यात 1 हजार 259 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सकाळी 8 वाजता होणार सुरुवात Read More »

Prakash Ambedkar : महायुती की मविआ, वंचित कोणाबरोबर जाणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

Prakash Ambedkar : राज्यात विधानसभेसाठी मतदाप्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सस्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आम्ही आम्हाला जर युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महायुती की महाविकास आघाडी कोणाला समर्थन देण्यात याकडे आता सर्वांचे लक्ष लागू नये. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने भाजप विरोधात प्रचार केला होता त्यामुळे निकालानंतर वंचित बहुजन आघाडी महायुतीमध्ये प्रवेश करणार का? याची देखील चर्चा आता सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Prakash Ambedkar : महायुती की मविआ, वंचित कोणाबरोबर जाणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं Read More »

Maharashtra Election: महायुती – मविआमध्ये ‘काटे की टक्कर’, जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज

Maharashtra Election: राज्यात विधानसभेसाठी मतदाप्रक्रिया पूर्ण झाली असून आता यावेळी राज्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे मात्र त्यापूर्वी काही एक्झिट पोल समोर आले आहे. या एक्झिट पोल नुसार राज्यात पुन्हा महायुतीची सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65.11 टक्के मतदान पूर्ण झाले होते मात्र बहुतांश ठिकाणी 6 नंतर ही मतदाप्रक्रिया सुरू असल्याने या आकडेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वाढलेला मतदानाचा फायदा कोणाला होणार हे देखील पहावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरमध्ये झाला आहे. गडचिरोलीमध्ये 73.68 तर मुबई शहरमध्ये 52.07 टक्के मतदान झाला आहे. Maharashtra Exit Polls 2024 :इलेकोट्ल एज : महायुती – 121, मविआ- 150, अपक्ष – 20 पोल डायरी : महायुती- 122-176, मविआ – 69-121, इतर 12-19 चाणक्य स्ट्रॅटजीस : महायुती -152-160, मविआ – 130-138, इतर- 6-8 मॅट्रिझ : महायुती 150-170, मविआ -110-130, अन्य 8-10 पीपल्स पल्स : महायुती 175-195, मविआ-85-12, अपक्ष-7-12

Maharashtra Election: महायुती – मविआमध्ये ‘काटे की टक्कर’, जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज Read More »

Maharashtra Election: विधानसभेसाठी राज्यात 65.11 टक्के मतदान, कोण मारणार बाजी?

Maharashtra Election: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ६५.११ टक्के मतदान झाला असल्याची माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार यावेळी सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरमध्ये झाला आहे. गडचिरोलीमध्ये ७३.६८ तर मुबई शहरमध्ये ५२.०७ टक्के मतदान झाला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. २३ नोव्हेंबर रोजी आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारीअहमदनगर – ७१.७३ टक्के,अकोला – ६४.९८ टक्के,अमरावती – ६५.५७  टक्के,औरंगाबाद- ६८.८९ टक्के,बीड – ६७.७९ टक्के,भंडारा – ६९.४२ टक्के,बुलढाणा – ७०.३२ टक्के,चंद्रपूर- ७१.२७ टक्के,धुळे – ६४.७० टक्के,गडचिरोली – ७३.६८ टक्के,गोंदिया – ६९.५३  टक्के,हिंगोली – ७१.१० टक्के,जळगाव – ६४.४२ टक्के,जालना – ७२.३० टक्के,कोल्हापूर – ७६.२५ टक्के,लातूर – ६६.९२ टक्के,मुंबई शहर- ५२.०७ टक्के,मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,नागपूर – ६०.४९ टक्के,नांदेड –  ६४.९२ टक्के,नंदुरबार- ६९.१५  टक्के,नाशिक – ६७.५७  टक्के,उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,पालघर – ६५.९५ टक्के,परभणी – ७०.३८ टक्के,पुणे –  ६१.०५ टक्के,रायगड –  ६७.२३ टक्के,रत्नागिरी – ६४.५५ टक्के,सांगली – ७१.८९ टक्के,सातारा – ७१.७१ टक्के,सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,सोलापूर – ६७.३६ टक्के,ठाणे – ५६.०५ टक्के,वर्धा –  ६८.३० टक्के,वाशिम – ६६.०१  टक्के,यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे.

Maharashtra Election: विधानसभेसाठी राज्यात 65.11 टक्के मतदान, कोण मारणार बाजी? Read More »

Sanjay Raut: अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हल्ला, याला जवाबदार सरकार आणि देवेंद्र फडणवीस, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहे. तर आता या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले शरद पवारांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूर मध्ये हल्ला झालाअत्यंत निर्गुण हल्ला झाला. आपण एक चित्र पाहिला असेल त्यांच्या डोक्यावर इतर भागात दगडफेकीमुळे ते रक्त बंबाळ झालेले आहे. काल ते अत्यावस्थत होते. असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, हल्ला करताना भारतीय जनता पक्षा कडून जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याच्या माजी गृहमंत्री त्याच्यावर ठार मारण्याचा हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते आणि अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर माजी गृहमंत्री यांना ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात या राज्यातल्या कायदा सुव्यवस्था काढणारे हे ढिंडोरे आहे. त्याला जबाबदार शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आहे. आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात. जर ही गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो सध्या हे भाजपच्या काळामध्ये. निवडणूक आयोग त्यांच्याच हातामध्ये असतं आणि ते त्यांचीच माणसं असतात आणि काम करतात. देवेंद्र फडवणीस यांनी जवाबदारी स्वीकारली पाहिजे.असेही संजय राऊत म्हणाले. तर राज ठाकरे यांच्यावर टीका करत संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे किती वेळा बोलणार. राज ठाकरे हे गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेल्या स्क्रिप्ट वाचतात. कधी नारायण राणे, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्क्रिप्ट वाचतात. शिवसेनेच्या बाबतीत गांभिर्याने घ्यायची गरज नाही. त्यांनी स्वतः पक्ष शिवसेना पक्ष सोडलेला आहे. आणि स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे. ते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस या महाराष्ट्रातल्या दुश्मनांना मदत होईल पूर्णपणे अशी भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेणार असं वाटत नाही. असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut: अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हल्ला, याला जवाबदार सरकार आणि देवेंद्र फडणवीस, संजय राऊतांचा हल्लाबोल Read More »

Anmol Bishnoi ला भारतात आणण्याची तयारी, FBI -भारतीय अधिकाऱ्यांची भेट

Anmol Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. तर आता त्याला भारतात आण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने त्याला गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियातून ताब्यात घेतले होते. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एफबीआयच्या नवी दिल्लीतील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी अनमोल बिश्नोईचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली. अनमोल बिश्नोई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी वॉन्टेड आहे. एनआयए आणि मुंबई पोलीस बऱ्याच दिवसांपासून अनमोल बिश्नोईचा शोध घेत होते. एनआयएने अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचे बक्षीसही ठेवले आहे. एफबीआय आणि भारतीय अधिकाऱ्यांमध्ये 45 मिनिटे बैठकइंडियन एक्स्प्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाबाबत एफबीआय आणि भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये 45 मिनिटे बैठक झाली. यामध्ये त्याच्यावरील खटले आणि पुराव्यावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान अनमोलचा बाबा सिद्दीकी हत्याकांडातील कथित सहभाग आणि सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारावरही चर्चा झाली. अनमोलचे एक प्रवासी कागदपत्र बनावट असल्याचे यूएस इमिग्रेशन विभागाला आढळून आल्याचेही सूत्रांनी सांगितले. अनमोल 15 मे 2022 रोजी भानू नावाच्या व्यक्तीच्या नावाने बनावट पासपोर्ट मिळवून अमेरिकेत पळून गेला होता, परंतु अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाला त्याच्या प्रवासाशी संलग्न असलेल्या एका कंपनीचे संदर्भ पत्र आढळून आल्याने त्याचा पर्दाफाश झाला. कागदपत्रे बनावट होती. अमनोल बिश्नोई कॅनडात राहतातअनमोल कॅनडामध्ये राहणारा असून तो नियमितपणे अमेरिकेत जात असल्याचे समजते. तो लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. तुरुंगात असूनही लॉरेन्सवर जागतिक गुन्हेगारी टोळी चालवल्याचा आरोप आहे. सूत्रांनी अनमोलच्या ताब्यात घेण्याबाबत अधिक माहिती दिली नाही. सूत्रांनी सांगितले की, अनमोल अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, मुंबई पोलिसांनी एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नाव असलेल्या अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना अनमोल बिश्नोईच्या त्यांच्या देशात उपस्थितीची माहिती दिल्यानंतर हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले होते.

Anmol Bishnoi ला भारतात आणण्याची तयारी, FBI -भारतीय अधिकाऱ्यांची भेट Read More »